Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय सांगतेस, अंजू?? एवढ्या
काय सांगतेस, अंजू?? एवढ्या लवकर गुंडाळण्याइतकीपण वाईट नाहीये ही मालिका!! इन फॅक्ट मला तर आवडते.. लोकांना आस्तिक नास्तिक द्वंद्व बघवत नाहीये की काय? की नास्तिक विचार पचनी पडत नाहीयेत?? कमाल झाली खरंच!!
ती फालतू कादीप बंद करायला हवी हिच्या पेक्षा!!
वेळ बदलणार असतील तर माहिती
वेळ बदलणार असतील तर माहिती नाही पण रात्री उशिरा थोडा वेळ खु क खु चा एक शॉट बघितला तो झाल्यावर add आल्या त्यात होतं.
अंजू , झी युवा हा झी चा नवा
अंजू , झी युवा हा झी चा नवा युवकांसाठीचा चॅनेल सुरु होतोय तिथली आहे ही सिरीयल . प आ मु चालूच रहाणार आहे .
हो, झी युवा ही वाहिनीच
हो, झी युवा ही वाहिनीच २२ऑगस्ट पासून सुरू होत आहे. 'लग्न लाईफ लोचा' अशा नावाची मालिका आहे.
http://abpmajha.abplive.in/tv
http://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/pasant-aahe-mulgi-to-go-off-ai...
ही मालिका खरंच बंद होणार आहे..झी मराठी ने officially declare केलंय
अरेरे!! त्यातल्या त्यात
अरेरे!! त्यातल्या त्यात काहीतरी वेगळा विचार करायला लावणारी किंबहुना वेगळा विचार दाखवणारी मालिका होती ही...
उर्मीच्या बाबांच्या भाषेत बोलायचं तर, मठवाल्यांनी बंद पाडली की काय? त्यांचा धंदा बसायला लागला की काय, लोक तर्कशुद्ध विचार करायला लागले असतील, त्यांचे टोटल ब्रेनवॉशिंग व्हायच्या आत मालिका वाल्यांना गाशा गुंडाळायला लावलेला दिसतो!!
तसा मालिकेत जीव नव्हताच,
तसा मालिकेत जीव नव्हताच, दोघही टोकाचे विचार करणारे, त्यामुळे मत परीवर्तनाला स्कोपचं नाहीये. उर्मि ला अजून चांगले रोल्स मिळायला हरकत नाही.
खरंच की काय.. आय वॉज लुकींन
खरंच की काय..
आय वॉज लुकींन फॉर्वर्ड टू उर्मी..... ती कशी चेंज करते ते बघायचं होतं....मलाही थोडं मार्गदर्शक ठरलं असतं....!!
म्हणजे फार न दुखावता लॉजीकली कसे पटवून देत्ये ते!
ती कशी चेंज करते ते बघायचं
ती कशी चेंज करते ते बघायचं होतं... म्हणजे फार न दुखावता लॉजीकली कसे पटवून देत्ये ते > + १११
एबीपी माझाच्या लिंक मध्ये
एबीपी माझाच्या लिंक मध्ये निर्मात्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय म्हटलंय म्हणजे अंतर्गत काही प्रॉब्लेम असतील.
बरी होती ही मालिका. ती वैभव
बरी होती ही मालिका. ती वैभव आणि जय-आदिती एवढे दिवस ठेवली मग हिलाच का गाशा गुंडाळावा लागतोय?
हो सम्प्ते आहे ही सेरिअल
हो सम्प्ते आहे ही सेरिअल ....बरय आता निदान त्या नन्दिनि चे दिवस भरले अहेत अस समजुया ..
ती कशी चेंज करते ते बघायचं
ती कशी चेंज करते ते बघायचं होतं... म्हणजे फार न दुखावता लॉजीकली कसे पटवून देत्ये ते >>> हाच ओरिजनल ट्रॅक असावा, पण त्या ऐवजी नंदिनी ट्रॅक वर च लक्ष केंद्रीत करत आहेत, यावरूनच समजतंय, की ते चेंज करणं दाखवणं त्यांना शक्य नसावं..नाही म्हणायला, लग्न झाल्यावर उर्मी मोबाईलचे फंक्शन्स, इंटरनेट इ. चा वापर करून नंदिनी साठी आलेल्या मुलाची चौकशी करते, तिचं सगळे कौतुकही करतात, पण बस, तेवढंच..
त्यानंतर दादांना पण ती एका भाषेविषयीच्या वादात म्हणते की कुठलीही भाषा शिकल्यावर न बोलणं ठिक आहे, पण परकी भाषा ना शिकताच मातृभाषेचा अभिमान बाळगणे, चूक आहे, यावर दादांच्या भुवया उंचावतात, आपण या विषयावर नंतर बोलू, असं ते सांगतात..
डबल पोस्ट
डबल पोस्ट
आपण या विषयावर नंतर
आपण या विषयावर नंतर बोलू...... हा दादांचा पेटंट डायलॉगे.......बरं म्हणजे वेळ मारुन न्यायला...
हो, असंच दिसतंय एकंदरीत..
हो, असंच दिसतंय एकंदरीत..
संपत आली सिरीयल की सगळी कोडी
संपत आली सिरीयल की सगळी कोडी एका झटक्यात सोडवतात झीचे लेखक.
कारेदु, लक्ष्मीबाईत नाही का माफ केले एका झटक्यात. तसेच इथे नंदिनी नविन संसार थाटेल, ती बहिण आपल्या आपल्या सासरी जाईल, मोठा भाऊ मठाधिपती, लग्नाला होकार, दादा नास्तिक व उर्मीचे वडील धार्मीक होतील. देवा त्यांना माफ कर!
अवघ्या सात महिन्यांत मालिका
अवघ्या सात महिन्यांत मालिका गुंडाळली! म्हणजे पहिल्या पानावरची माझी दुसरी पोस्ट अगदी खरी ठरली.
दादा नास्तिक व उर्मीचे वडील
दादा नास्तिक व उर्मीचे वडील धार्मीक होतील. देवा त्यांना माफ कर! <<<<
अवघ्या सात महिन्यांत मालिका गुंडाळली! म्हणजे पहिल्या पानावरची माझी दुसरी पोस्ट अगदी खरी ठरली. >>> सारिका, कालच योगायोगाने मी ती पोस्ट वाचली आणि हेच मनात आलं होतं अगदी!
मला उर्मी फार आवडली होती.
मला उर्मी फार आवडली होती.
आता उर्मी कशी वागते हे कुणी
आता उर्मी कशी वागते हे कुणी सान्गाल का मला? बावळट की शहाण्यासाऱखी?
आय वॉज लुकींन फॉर्वर्ड टू
आय वॉज लुकींन फॉर्वर्ड टू उर्मी..... ती कशी चेंज करते ते बघायचं होतं....मलाही थोडं मार्गदर्शक ठरलं असतं....!!>>> म्हणजे तुझ्याही घरात आस्तिक्-नास्तिक चालू आहे?
दादा नास्तिक व उर्मीचे वडील
दादा नास्तिक व उर्मीचे वडील धार्मीक होतील>>>
आता कुठे ही मालिका जरा पकड
आता कुठे ही मालिका जरा पकड घेत होती. आता महिन्याभरात संपवणार म्हणजे सगळंच गुंडाळणार असतील
याच्यापेक्षा ती रात्रीस खेळ बंद केली असती तरी चाललं असतं.
new serial strt hoty 22 aug.
new serial strt hoty 22 aug. pasun
8 chya slot mdhe..ajj ch promo bghitl
सुलू_८२, हो.......इतकं नाही
सुलू_८२, हो....:-)...इतकं नाही म्हणजे.........पण थोड्या फार प्रमाणात...गुरु महाराज वगैरे.....
बरं त्या फताड्या नंदिनीचे
बरं त्या फताड्या नंदिनीचे कोणते नवीन चाळे चालूयत आत्ता? कारण ती इतकी डोक्यात गेली की सिरीयल पहाणेच बंद केले. पण आता संपतेच आहे तर जस्ट उत्सुकता, यू नो!
मी पण संपणार म्हणून बघायला
मी पण संपणार म्हणून बघायला लागले पुन्हा. जोग बाईंना पुन्हा आणणार का मोनेंसारखी त्यांनी पण सोडली मालिका ?
कोण जोगबाई?
कोण जोगबाई?
उज्ज्वला जोग, त्या नंदीची
उज्ज्वला जोग, त्या नंदीची सध्या हरवलेली खडूस आत्या.
Pages