पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सांगतेस, अंजू?? Uhoh एवढ्या लवकर गुंडाळण्याइतकीपण वाईट नाहीये ही मालिका!! Sad इन फॅक्ट मला तर आवडते.. लोकांना आस्तिक नास्तिक द्वंद्व बघवत नाहीये की काय? की नास्तिक विचार पचनी पडत नाहीयेत?? कमाल झाली खरंच!!

ती फालतू कादीप बंद करायला हवी हिच्या पेक्षा!!

वेळ बदलणार असतील तर माहिती नाही पण रात्री उशिरा थोडा वेळ खु क खु चा एक शॉट बघितला तो झाल्यावर add आल्या त्यात होतं.

अंजू , झी युवा हा झी चा नवा युवकांसाठीचा चॅनेल सुरु होतोय तिथली आहे ही सिरीयल . प आ मु चालूच रहाणार आहे .

हो, झी युवा ही वाहिनीच २२ऑगस्ट पासून सुरू होत आहे. 'लग्न लाईफ लोचा' अशा नावाची मालिका आहे.

अरेरे!! त्यातल्या त्यात काहीतरी वेगळा विचार करायला लावणारी किंबहुना वेगळा विचार दाखवणारी मालिका होती ही...

उर्मीच्या बाबांच्या भाषेत बोलायचं तर, मठवाल्यांनी बंद पाडली की काय? त्यांचा धंदा बसायला लागला की काय, लोक तर्कशुद्ध विचार करायला लागले असतील, त्यांचे टोटल ब्रेनवॉशिंग व्हायच्या आत मालिका वाल्यांना गाशा गुंडाळायला लावलेला दिसतो!!

तसा मालिकेत जीव नव्हताच, दोघही टोकाचे विचार करणारे, त्यामुळे मत परीवर्तनाला स्कोपचं नाहीये. उर्मि ला अजून चांगले रोल्स मिळायला हरकत नाही.

खरंच की काय..
आय वॉज लुकींन फॉर्वर्ड टू उर्मी..... ती कशी चेंज करते ते बघायचं होतं....मलाही थोडं मार्गदर्शक ठरलं असतं....!! Happy
म्हणजे फार न दुखावता लॉजीकली कसे पटवून देत्ये ते!

एबीपी माझाच्या लिंक मध्ये निर्मात्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय म्हटलंय म्हणजे अंतर्गत काही प्रॉब्लेम असतील.

हो सम्प्ते आहे ही सेरिअल ....बरय आता निदान त्या नन्दिनि चे दिवस भरले अहेत अस समजुया ..

ती कशी चेंज करते ते बघायचं होतं... म्हणजे फार न दुखावता लॉजीकली कसे पटवून देत्ये ते >>> हाच ओरिजनल ट्रॅक असावा, पण त्या ऐवजी नंदिनी ट्रॅक वर च लक्ष केंद्रीत करत आहेत, यावरूनच समजतंय, की ते चेंज करणं दाखवणं त्यांना शक्य नसावं..नाही म्हणायला, लग्न झाल्यावर उर्मी मोबाईलचे फंक्शन्स, इंटरनेट इ. चा वापर करून नंदिनी साठी आलेल्या मुलाची चौकशी करते, तिचं सगळे कौतुकही करतात, पण बस, तेवढंच..

त्यानंतर दादांना पण ती एका भाषेविषयीच्या वादात म्हणते की कुठलीही भाषा शिकल्यावर न बोलणं ठिक आहे, पण परकी भाषा ना शिकताच मातृभाषेचा अभिमान बाळगणे, चूक आहे, यावर दादांच्या भुवया उंचावतात, आपण या विषयावर नंतर बोलू, असं ते सांगतात..

आपण या विषयावर नंतर बोलू...... हा दादांचा पेटंट डायलॉगे.......बरं म्हणजे वेळ मारुन न्यायला...

संपत आली सिरीयल की सगळी कोडी एका झटक्यात सोडवतात झीचे लेखक. Proud

कारेदु, लक्ष्मीबाईत नाही का माफ केले एका झटक्यात. तसेच इथे नंदिनी नविन संसार थाटेल, ती बहिण आपल्या आपल्या सासरी जाईल, मोठा भाऊ मठाधिपती, लग्नाला होकार, दादा नास्तिक व उर्मीचे वडील धार्मीक होतील. देवा त्यांना माफ कर! Proud

दादा नास्तिक व उर्मीचे वडील धार्मीक होतील. देवा त्यांना माफ कर! <<<< Rofl

अवघ्या सात महिन्यांत मालिका गुंडाळली! म्हणजे पहिल्या पानावरची माझी दुसरी पोस्ट अगदी खरी ठरली. >>> सारिका, कालच योगायोगाने मी ती पोस्ट वाचली आणि हेच मनात आलं होतं अगदी!

आय वॉज लुकींन फॉर्वर्ड टू उर्मी..... ती कशी चेंज करते ते बघायचं होतं....मलाही थोडं मार्गदर्शक ठरलं असतं....!!>>> म्हणजे तुझ्याही घरात आस्तिक्-नास्तिक चालू आहे?

आता कुठे ही मालिका जरा पकड घेत होती. आता महिन्याभरात संपवणार म्हणजे सगळंच गुंडाळणार असतील Sad
याच्यापेक्षा ती रात्रीस खेळ बंद केली असती तरी चाललं असतं.

बरं त्या फताड्या नंदिनीचे कोणते नवीन चाळे चालूयत आत्ता? कारण ती इतकी डोक्यात गेली की सिरीयल पहाणेच बंद केले. पण आता संपतेच आहे तर जस्ट उत्सुकता, यू नो!

मी पण संपणार म्हणून बघायला लागले पुन्हा. जोग बाईंना पुन्हा आणणार का मोनेंसारखी त्यांनी पण सोडली मालिका ?

Pages