पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी आवडला. उर्मी छान म्हणते. दोनी दोन टोकाचेच आहेत मिळून मिसळून जोडायची भाषा कोणाचीच नाही. दोन्ही बाबा अतिरेकीच आहेत. असे भरडले जाणारे तरूण तरुणी किती असतात. शिवाय कारस्थानी साळसूद नंदिनी. तिची माफी मागावी लागणे फारच लाजीरवाणे आहे. पुनर्वसू चे बरोबर होते पन आयत्या वेळी उखडल्याने तो मार्क घालवतो.

ती नंदिनीची आत्या खरेतर छान दिसते कि नाही? तिच्या साड्या पण छान आहेत कॉटनच्या पण सुरेख. तिचे खरेतर लग्न लावायला हवे. मंगळा मुळे अडली आहे बिचारी. मुख्य म्हणजे काल मालिकेत काहीतरी
घडत होते. लक्ष्मी काटून एकतासाचा भाग दाखवला. मी आपले आता संपेल मग संपेल म्हणत होते तर ह्यांचे चालूच त्यामानाने काहे दिया परदेस फिके वाटले.

उर्मीच्या घरचा पार्ट मिसला मी. आजी एक भैताड.

हो न...लक्ष्मीला का काल काटलं...? आधीच तर बिचारीचे दिवस भरलेत! Happy एपिसोड तयार नसेल तर सौभाग्यवतीचा एपिसोड दाखवायचा की...!!!

आजीच नाही तर उर्मीच्या घरचे तिघेही भैताड आहेत. काय ते बोलणं, डोळे गरागरा फिरवणं, संवाद पण असले लाडेलाडे आहेत की त्यावर अश्शी ओव्हरअ‍ॅक्टींग झालीच पाहिजे. तो बाबा तर लैच डोक्यात जातो. इरीटेटींग माणुस. वटसावित्रिच्या दिवशी बायकोने साडी नेसलान तर काय पकवलाय बाब्याने. हरे राम.

ती उर्मीची आई व बाबा ह्यांचे चेहरे अनारश्यासारखे फुलून आल्या वानी दिसतात व अन नॅचरली लाल भडक गोबरे गुबरे. नोकरी करणार्‍या बायकांचे चेहरे ओढलेले असतात. ते नाहीच. बाबा काय घरी बसून लेख लिहीतो. ते तिघे ही फार पेनफुल आहेत. ते आले की मी घरातली कामे उरकून टाकते. ते घर पण काहीही आहे.

<< आजीच नाही तर उर्मीच्या घरचे तिघेही भैताड आहेत.>> अच्छा ! म्हणूनच पंतानी दोनदां हांकललं तरी उर्मी जात नाहीं आहे का माहेरीं !!! Wink

मला हे कळल नाही ती आदिती का नाही बोलली काही ती चिट्ठि जाळुन टाकलिय ते? रडन्याशिवाय काही येतच नाही का तिला?

अदिती, मठ्ठाधिपतींपुढे सांगत नाही की ती चिठ्ठी तिने जाळलीय. मला वाटत की तिने त्या जाळायच्या आधीच फताडीने झेरॉक्स मारुन ठेवल्या होत्या.

संवाद लेखन मात्र खूप उजवं आहे या मालिकेचं असं मागेच जाणवलं होत . स्पेशली उर्मीचे बोलणं .
कोण आहेत मालिका लेखक किव्वा लेखिका Happy

<<संवाद लेखन मात्र खूप उजवं आहे >> खरंय. पण ते संवाद चपखलपणे कोंदणात बसतील अशी कथानकाची घडण जमलेली नाही. त्यामुळे, ते संवाद नुसतीच 'डायलॉगबाजी' असल्यासारखेच वाटतात. निदान मला तरी असं तीव्रतेने जाणवतं, हें प्रामाणिकपणे नमूद करतो.
शिवाय, << .. कितीही चांगला एपिसोड म्हटला तरीही मठाधिपतिंचं १८व्या शतकात शोभेलसं अतिरेकी आख्यान व वासुचा वैताग हें आतांपर्यंत ५६वेळां दाखवून झालंय ! परत परत आपलं तेंच !! >> हेंही आहेच !

संवादलेखन मालिका सुरु झाली तेव्हा प्रियदर्शिनी देशपांडे होती, तिने आधीच्या एका मालिकेतपण छान संवाद लिहीले, आता कोण आहे माहीती नाही. मी दोन दिवस पहिले बघितली होती ही सिरीयल आणि बहुतेक मी पहील्या पानावर लिहीलंय प्रियदर्शिनीचं.

प्रियदर्शिनी देशपांडे डायलॉग रायटर आहे त्यामुळे चांगल्या डायलॉग्जची अपेक्षा आहे, आधीच्या माझ्या अनुभवानुसार, बघुया. आजतरी काही खास वाटलं नाही. हि माझी २५ जानेवारी रात्री १० ची पोस्ट आहे पहिल्या पानावरची. Happy

एक शंका -
मठाधिपती व त्यांचे दोन्ही सुपुत्र नोकरी, इतर कांहीं व्यवसाय करत नाहींत. पंत पत्रिका बघण्याचे पैसेही घेत नाहीत, उलट कुणी 'रजिस्टर्ड' लग्न करत असेल, तर त्याला पैसे देवून विधिवत लग्न करायला सांगतात [ असं वासुचं म्हणणं ]. त्यांच्या मठाला शासकीय ग्रांट किंवा 'फोर्ड फाउंडेशन'सारख्यांकडून पैसे मिळतात अशीही शक्यता नाहीं. शेती-वाडी असेल म्हणावं तर तसा राबता दिसत नाहीं किंवा त्याचा उल्लेखही नाहीं. मठासाठी तर विश्वस्त मंडळ आहे.
मग हें कुटूंब एखाद्या जमीनदाराच्या /सावकाराच्या थाटांत रहातं तरी कशाच्या जोरावर ?

मठाधिपती आहेत ते म्हणजे मठाच्या उत्पन्नावर घर चालवतात असा अंदाज आहे.
बादवे, कालच्या एपिसोड मधला डॉ़क्टर नाही का खटकला कोणाला. गुलबक्षी रंगाचा झब्बा खांद्यावर शबनम अशा अवतारात होता. कॉश्च्युम गंडल ? का कास्टिंग गंडल? का दुस-या सेटवरचा कलाकार त्याच सेटवरच्या प्रॉप आणि कोश्च्युम मधे इकडे आयात केला Uhoh

संवाद खरचच प्रभावी आहेत. आणि उर्मिच्या घरच्यांबद्दल पण +१
नंदिनीचा अभिनय आवडतोय मला. तिच वागण बोलण खरोखरीच डोक्यात जाणारं असायला हवय आणि ते तसं घडतय. मला तरी मालिकांमधल्या खलनायिकांचा अभिनय बघायला आवडतय.

ह्या सगळ्यात वासूची एकच गोष्ट आवडली. त्याने उर्मीची त्याच्या पत्रिकेला जुळणारी खोटी पत्रिका बनवली नाही.

टायटल साँग बघुन असे काहितरी असेल असे वाटले होते.

श्यामली, तो डॉक्टर नाही आयुर्वेदीक वैद्य दाखवलाय बहुतेक. कारण तो नंतर काढे व औषधे घेऊन जा असे सांगतो. आणी तसेही पंतांचा डॉक्टर पेक्षा वैद्यांवर जास्त विश्वास असेल असे वाटते.

कालचे संवाद खरच प्रभावी होते. उर्मी, कुठेही आक्रस्ताळी वा हेकेखोर वाटली नाही, त्यामानाने पंतच हिटलर वाटले.

पण एक बावळट प्रश्नः- उर्मीला एकदाही असे वाटले नाही का की आजीला फोन करुन पत्र आणी फोटोंबद्दल विचारावे.:अओ: आणी कोणाची पत्रं अशी उघड्या कपाटात / ड्रॉवर मध्ये ठेवतात? जिथे एखादी अशी फताडी आरामात जाऊन चोरु शकेल. आजी खरच भैताड आहे.

मला तरी मालिकांमधल्या खलनायिकांचा अभिनय बघायला आवडतय.>>>> सहमत. कधीकधी ह्या खलनायिका नायिकान्पेक्षा confident असतात. नायिका बावळट वाटतात त्यान्च्यापुढे.

ह्या सगळ्यात वासूची एकच गोष्ट आवडली. त्याने उर्मीची त्याच्या पत्रिकेला जुळणारी खोटी पत्रिका बनवली नाही.

टायटल साँग बघुन असे काहितरी असेल असे वाटले होते.>>>> Maybe पुढे असे दाखवतील. आणि तशीही झी मराठीची परम्परा आहे ना खोटे बोलण्याची. Wink

आणी तसेही पंतांचा डॉक्टर पेक्षा वैद्यांवर जास्त विश्वास असेल असे वाटते.>>>> अरे देवा! पण पंतांना म्हणाव, उदया major काही झाले तर वैद्यान्च्या काढ्यान्चा काहीच उपयोग होणार नाही, शेवटी त्यान्ना डॉक्टरान्कडेच जावे लागेल. किती अती-बुरसटलेपणा हा! Uhoh

अर्र!! हो का? मी मिसलय मग ते काढे घेउन जा वगैरे. असेल मग वैद्य, पण तरी वैद्यसुद्धा ह्या गेटप मधे:अओ: Lol
खोटी पत्रीका बनवेल आता वासू Proud

उदया major काही झाले तर वैद्यान्च्या काढ्यान्चा काहीच उपयोग होणार नाही, शेवटी त्यान्ना डॉक्टरान्कडेच जावे लागेल. >> त्या वैद्याने पण सांगितलं ना कि 15??? दिवसांत बीपी नाॅर्मल नाही झाले तर चांगल्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागेल.

त्या वैद्याने पण सांगितलं ना कि 15??? दिवसांत बीपी नाॅर्मल नाही झाले तर चांगल्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागेल.>>> आता काय करणार पन्त?:हाहा:

Pages