Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निधी, माई काल उर्मीशी बोलताना
निधी, माई काल उर्मीशी बोलताना तिला सांगतात की त्यांच्या सासुबाईंच (वासुची आजी) वय झाल्यावर त्यांना बाहेर वड पुजायला जाण जमेनास झाल म्हणुन त्यांनी पाटावर वडाची रांगोळी काढुन त्याची पुजा करायला, प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर माईंनीसुद्धा तेच फॉलो केल, पण घरात पुजा करुन त्या शिवाय बाहेरही वडाच्या पुजेला जात होत्या आणि ती एक प्रथा बनली की घरात वडाची पुजा करुन मग बाहेरच्या वडाचीही पुजा करायची.
ओके मुग्धा. मी हल्ली एकही
ओके मुग्धा.
मी हल्ली एकही शिरेल बघत नाही, सगळ्याच जाम बोअर मारतायत.
फक्त इकडे येऊन वाचते.
<< त्यांनी वडाची झाडे लावली
<< त्यांनी वडाची झाडे लावली पण घरच्या पुजेत एक वडाची फांदीपण होती >>
तो आक्षेप नाही ग माझा. वडाची फांदी काय, तोडली तर परत येईल;
पण माझ्या सात जन्मांचं काय !!
(No subject)
पण माझ्या सात जन्मांचं काय
पण माझ्या सात जन्मांचं काय !!>>
भाऊकाका . अरे जातील बाहेर
भाऊकाका .
अरे जातील बाहेर वडाची पूजा करायला नक्की. दशमी क्रियेशन (निर्मिती संस्था) वाल्यांचे एक आवडतं वडाचं झाड आहे ते डेफिनेटली सर्व त्यांच्या शिरेलीत दाखवतात दरवर्षी. मग गाव कुठलंही असो वड सेम. वसई, वांद्रे, आता हा पुनर्वसू कुठे राहतो ते गाव.
आता सिरीयल्स न बघता मला कसं माहीती विचारु नका, बघत नसले तरी मी त्यांच्या फेसबुक पेजवर चक्कर टाकत असते तेव्हा काहीजणांनी मागे लिहीलं होतं सगळीकडे एकच वडाचं झाड असं .
भाऊकाका
भाऊकाका
खरंच अधून-मधून तरी कां बघतों
खरंच अधून-मधून तरी कां बघतों आपण ह्या सिरीयल्स ! वासु व उर्मी यानी रजिस्टरर्ड लग्न केलंय हें जणूं त्यानी केलेला कुणाचा तरी मर्डर आहे आणि तें पंताना कळलं तर तर सबंध जग हादरणार आहे, अशी हवा कां निर्माण करताहेत या सिरीयलमधे ? जगातच नव्हे महाराष्ट्रातही अशी अगणित लग्न कित्येक वर्षं होताहेत, व तीं जोडपीं सुखात नांदताहेत, [ आमचंही लग्न पत्रिका न पहातां याच पद्धतिनं ४० वर्षांपूर्वी झालंय ], हें पुण्याच्या इतक्या जवळच्या गांवात रहाणार्या सुशिक्षित पंताना ठावूकही नसेल ? मग असलीं झापडं लावून जगणार्या व इतरांवर बुरसट विचार लादणार्या पंताना असं गोंडसपणे कां प्रोजेक्ट केलं जातंय !!
भाऊ तरांवर बुरसट विचार
भाऊ
तरांवर बुरसट विचार लादणार्या पंताना असं गोंडसपणे कां प्रोजेक्ट केलं जातंय !!>>>>>पंत स्वतःला गोंडस समजत असतील.:फिदी:
अन्जूला सिरीयल्सचे दिग्दर्शक,
अन्जूला सिरीयल्सचे दिग्दर्शक, नट, नट्या, लोकेशन्स ह्या सगळ्याच्या ज्ञानाबद्दल PhD देण्यात यावी
अन्जू घेशिलच
पण माझ्या सात जन्मांचं काय !
पण माझ्या सात जन्मांचं काय ! >>
>>> मग असलीं झापडं लावून
>>> मग असलीं झापडं लावून जगणार्या व इतरांवर बुरसट विचार लादणार्या पंताना असं गोंडसपणे कां प्रोजेक्ट केलं जातंय !!>> भाऊकाका अगदी अगदी!! एकूण एक शब्दाशी सहमत.
नताशा अगं उंडारत असतेना नेटवर
नताशा अगं उंडारत असतेना नेटवर मी आणि माझी एक आवडती सिरियल दशमीवाल्यांची होती, त्या सिरियलमधलं काही खटकलं किंवा आवडलं तर कळवायचे मी त्यांच्या फेसबुक पेजला म्हणून माहीतेय.
त्यांनी वडाची झाडे लावली पण
त्यांनी वडाची झाडे लावली पण घरच्या पुजेत एक वडाची फांदीपण होती >>> ती बहुदा फांदी नव्हती, नंतर त्यांनी जी झाडे लावली त्यातले एक रोप होत ..त्याला खाली प्लॅस्टिक ची पिशवी होती आणि नंतर वासुच्या हातात तसेच सेम रोप होत
पण उर्मी सेंसिबल काम
पण उर्मी सेंसिबल काम करते.
काल माई म्हणतात की तुला सोवळ्यात सगळा स्वयंपाक करावा लागेल शिवाशिव चालणार नाही वगैरे..तर ताडकन नाही म्हणू शकली असती..पण ऐकून घेतले. मला ती कसकशी पुढे जाते ते पहाण्यात इंटरेस्ट आहे...प्रोव्हाईडेड दिग्दर्शक आणि लेखक स्क्रिप्ट चे वाट्टोळे करणार नाहीत!
ती विचारात पडलेली छान दाखविली आहे.
आंबट गोड + १११
आंबट गोड + १११
घरी उर्मी आवडायला लागली आहे.
घरी उर्मी आवडायला लागली आहे. साड्या छान आहेत.
'घरी?'... :-)
'घरी?'...
पण फताडी नंदिनी काय सुधरेनां!
पण फताडी नंदिनी काय सुधरेनां!
वासुस्च्या बहीणीने खोली बंद
वासुस्च्या बहीणीने खोली बंद करून वासु व उर्मीला त्यांच्या रजिस्टर्ड लग्नाचं पंताना कळलं तर काय होईल याची तिला भयंकर भिती वाटते , हें एकदां सांगून झालं. आतां, नंदीनीला तें चोरून ऐकतां यावं म्हणून ती हें उर्मीला परत बाहेर व्हरांड्यात बसून सांगते. नंदीनीला तपशील ऐकूं गेला नसेल तर तो तिला मिळावा म्हणून उर्मी मग वासुच्या बहिणीला हें लिहून काढ व फाडून टाक असा सल्ला देते. मग नंदिनी तो कागद चोरून वाचते ! अरे, किती कल्पनाशून्य पद्धतिने कथानक रचताय ? आणि, किती बिनडोकपणे आम्ही हें बघावं अशी अपेक्षा करताय ?
मला नंदिनी बेडकासारखी वाटते.
मला नंदिनी बेडकासारखी वाटते. तिचे डोळेतर भयानकच आहेत.
हो ना.......कुणी निवडलं तिला
हो ना.......कुणी निवडलं तिला अभिनेत्री म्हणून..? ..टी व्ही वर का होईना, पण नायिकेच्या काही किमान अपेक्षा आम्ही प्रेक्षकांनी ठेवूच नयेत का? का .. का....असा अत्याचार आमच्यावर?
भाऊ.. अगदी अगदी.. आणि इतकं
भाऊ.. अगदी अगदी..
आणि इतकं आभाळ कोसळ्यासारखे भाव दर वेळी चेहेर्यावर..
ते रजिस्टर्ड लग्नाचं ऐकून.
उर्मी मग वासुच्या बहिणीला हें
उर्मी मग वासुच्या बहिणीला हें लिहून काढ व फाडून टाक असा सल्ला देते. >> उर्मी सायकाॅलाॅजीची विद्यार्थीनी आहे ना?? आणि एखाद्या गोष्टीचा राग आला असेल अन् तो व्यक्त करता येत नसेल तर हा लिहून फाडायचा उपाय करतात ना... भिती वाटली तरीही हाच उपाय असतो का??
काल माई म्हणतात की तुला
काल माई म्हणतात की तुला सोवळ्यात सगळा स्वयंपाक करावा लागेल शिवाशिव चालणार नाही वगैरे..तर ताडकन नाही म्हणू शकली असती..पण ऐकून घेतले.>>>> मला वाटत डेली सोप च्या परम्परेनुसार, उर्मीचे सुद्धा आदर्श सुनेत रुपान्तर होईल असे वाटते. आधी वडाला फेरया घातल्या, आता काय तर सोवळ्यात स्वयंपाक करते. एकूणात काय, तर सगळ्या सिरीयल्स इथून तिथून सारख्याच.
काल, पंत व माई आपल्या खोलीत
काल, पंत व माई आपल्या खोलीत उर्मीबद्दल बोलताहेत; कां, तर पुन्हा नंदीनीला तें चोरून ऐकतां यावं म्हणून !
कालचा भाग फारच छान होता.
कालचा भाग फारच छान होता. उत्तम संवाद लेखन. पुनर्वसूचा वैताग अगदी पोहोचला. उर्मीची पण बाजू पटली. छान काम एक तासाचा भाग. आज घरी जाउन परत बघणार आहे.
पण, कितीही चांगला एपिसोड
पण, कितीही चांगला एपिसोड म्हटला तरीही मठाधिपतिंचं १८व्या शतकात शोभेलसं अतिरेकी आख्यान व वासुचा वैताग हें आतांपर्यंत ५६वेळां दाखवून झालंय ! परत परत आपलं तेंच !!
संवाद ऐकुन ताप येइल.
संवाद ऐकुन ताप येइल. न्यायालयातलं लग्न, धर्म शास्त्राची जोड, अरे काय अरे.
पंतसचिवीण बाईंना तर काही से च नाही. नवर्याच्या मागनं री ओढायची. कधी उर्मी चांगली तर लगेच वाइट. मग मी तुला मुलीसारखी समजत होते वैगेरे
मी तर म्हणते वाश्याने सरळ सांगायचं लग्न केलेलं नाहीये असेच रीलेशनशिप्मधे राहतोय. आणि द्यायच पंस ला अटॅक
(No subject)
Pages