Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता फक्त रनिंग मेट कोणाचे कोण
आता फक्त रनिंग मेट कोणाचे कोण असतील ही एक माफक उत्सुकता राहिली आहे.
हिलरीने एलिझाबेथ वॉरेन ला
हिलरीने एलिझाबेथ वॉरेन ला घ्यावे असे अती-डावे म्हणत आहेत. मुख्य निवडणुकीआधीच ती हिलरीचीच चौकशी चालू करेल
तसे टेक्निकली बिल क्लिन्टन
तसे टेक्निकली बिल क्लिन्टन ला पण घेऊ शकते ना ती
मै better where she can
मै better where she can watch him
जोक्स अपार्ट - दोनदा अध्यक्ष झाल्यावर मग वीपी यातला विअर्ड पणा सोडला, तर घटनेत असे काही आहे का की ज्यामुळे हे होऊ शकत नाही?
टेक्निकली होऊ शकतो तो व्हिपी.
टेक्निकली होऊ शकतो तो व्हिपी. आणि इव्हन प्रेसिडेन्ट इन केस हिलरी ... ... यु नो ..... इज नो लॉन्गर केपेबल... बाय सम रीझन !!
अर्थात ही गुगल करून मिळवलेली माहिती आहे, कितपत ऑथेन्टिक आहे ते नाही माहित.
उपाध्यक्षाची पात्रता: जर
उपाध्यक्षाची पात्रता: जर राष्ट्राध्यक्षाचे बरेवाईट झाले तर उपाध्यक्ष तो पदभार स्वीकारतो त्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्हायला जी पात्रता लागते तीच उपाध्यक्षालाही आवश्यक आहे. त्यामुळे बिल क्लिंटन ह्या पदावर नेमता येणार नाही. त्याने ८ वर्षे राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे ती पात्रता गमावलेली आहे. असो.
उच्चभ्रू वर्तुळात म्हणजे माध्यमे आणि कलावंत ह्या वर्गात ट्रंपला झोडपणे फॅशनेबल आहे. कोण किती प्रकारे ट्रंपची टिंगल करू शकतो ह्यावर त्यांचे पुरोगामीत्व किती कडवे ह्याचे मोजमाप होते. मग त्याच्या केसाची टिंगल, त्याच्या आवाजाची टिंगल, त्याच्या ताम्रवर्णीय त्वचेची टिंगल. सामान्यतः लोकांच्या शारिरिक व्यंगाची टिंगल केली जात नाही असा संकेत आहे पण ट्रंपच्या बाबतीत हा गुंडाळून ठेवला जातो.
उच्चभ्रू लोकांत ही प्रथा असल्यामुळे अनेक बुद्धीवादी लोकांनाही ह्या रोगाची लागण झालेली दिसते. दिसला ट्रंप की झोडप!
आजवर प्रायमरी निवडणुकीत जवळजवळ प्रत्येक टप्प्यावर "आता ट्रंप संपला" असे छातीठोक्पणे सांगणारे जाणकार दिसत होते. त्या सगळ्या पांडित्यपूर्ण भाकितांना धाब्यावर बसवून ट्रंप ठणठणीत राहिला आहे. उरलेली सगळी रत्ने गळाली आहेत. त्यामुळे मते देणारी जनता असल्या विद्वत्तेला काय किंमत देते ते दिसतेच आहे.
बेकायदा घुसखोरीला विरोध आणि इस्लामी अतिरेकाला विरोध हे सामान्य जनतेला भावणारे मुद्दे आहेत पण विद्वत्तापूर्ण ढुढ्ढाचार्यांना हे दोन्ही मुद्दे खटकतात त्यामुळे ट्रंपला झोडपून काढले जाते.
इथल्या आगलाव्या लेखांवरून देशी लोकही ह्या प्रकाराला बळी पडत असावेत असे वाटते.
काही मूठभर लोक जे वर्णद्वेष्टे आहेत ते ट्रंपच्या मागे आहेत म्हणून ट्रंप आणि त्याचे तमाम समर्थक तसे आहेत असे म्हणणे म्हणजे परवा सॅन फ्रॅन्सिस्कोत ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर, ला रास्सा आणि कोड पिंकचे डोकेफिरू अतिरेकी ज्या पध्दतीने वागत होते ते पाहून हिलरी आणि तिचे समस्त समर्थकही त्याच जातकुळीतले आहेत असे मानण्यासारखे आहेत. द्वेष्टे लोक दोन्ही बाजूला आहेत आणि दोघे तितकेच घातक आहेत.
बिल क्लिंटन टेक्नीकली असू शकत
बिल क्लिंटन टेक्नीकली असू शकत नाही ना वाईस- प्रेसिडन्ट? कारण प्रेसीडन्ट जेव्हा त्याचं काम करू शकत नसेल (नॉट इन कपॅसिटी टू अॅक्ट अॅज प्रेसिडन्ट) तेव्हा वाईस प्रेसिडन्ट अॅक्टिव्ह प्रेसीडन्ट होणार आणि बिल काका आता कुठल्याही प्रकारे प्रेसिडन्ट असू शकत नाहीत?
शेन्डेनक्षत्र- इतके सोपे
शेन्डेनक्षत्र- इतके सोपे ब्लॅक अँड व्हाइट नाही ना ते.
Twenty-Second Amendment: “No person shall be elected to the office of the President more than twice ….”
इथे इलेक्ट नाही होऊ शकत हा भाग महत्वाचा. "कॅन नॉट सर्व्ह अॅज " असा शब्दप्रयोग नाही आहे. त्यामुळे टेक्निकली होऊ शकतो असेच दिसते (फक्त निवडून येऊन प्रेसिडेन्ट नाही होऊ शकत पण ही बॅक डोअत एन्ट्री पॉसिबल आहे असे म्हणतात)
हा माझा शोध वगैरे नाहीये, बर्याच ग्रुप्स वर, पेप्रात इ. ही चर्चा सुरु होती म्हणून मला कळली इतकेच.
शें.न. इतके दिवस मला शंका
शें.न. इतके दिवस मला शंका होती पण वरची पोस्ट वाचल्यावर तुम्ही फक्त हा बाफ चर्चेत राहावा म्हणून ट्रंप्च्या बाजूने बोलता अशी माझी पूरेपूर खात्री पटली आहे.
हो तो सक्सेशन चा नियम व
हो तो सक्सेशन चा नियम व त्यामुळे अपात्र होणे हे लक्षातच आले नाही.
इथे इलेक्ट नाही होऊ शकत हा
इथे इलेक्ट नाही होऊ शकत हा भाग महत्वाचा. "कॅन नॉट सर्व्ह अॅज " असा शब्दप्रयोग नाही आहे. >> ये भी ठीक है. कोर्ट असेही इंटरप्रिटेशन करू शकेल.
असामी, तुम्ही मुद्द्यावर
असामी, तुम्ही मुद्द्यावर चर्चा न करता निव्वळ व्यक्तीगत हल्ले करण्यावर का बरे जोर देत आहात? जेव्हा ट्रंपबद्दल मुद्देसूद चर्चा करू या असे मी म्हटले तेव्हा आपण पळ काढलात मात्र अशा प्रकारे मतांच्या पिंका टाकणे चालूच आहे असे का?
मला ट्रंप आवडतो. मी त्याला मत देणार आहे.* आणि माझ्या परीने मी त्याचे समर्थनही करणार आहे. कुणाला कसली खात्री वाटो वा ना वाटो!
(* अर्थात कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्यामुळे माझ्या मताला शून्य किंमत आहे ह्याची नम्र जाणीव आहे.)
मैत्रेयी मैत्रेयी बालिश्टर का
मैत्रेयी मैत्रेयी बालिश्टर का नाही झालीस असं म्हणणार होतेच पण तेवढ्यात तळटीप वाचली.
शे.नं. तुम्ही एकदम
शे.नं. तुम्ही एकदम ट्रंपसारखे बोलताहात. (तुम्ही बोलता ते सोडून बाकीचे सर्व पर्सनल असतात) मुद्द्यांबद्दल मी मागेही तुम्हाला 'ट्रंपच्या पॉलिसीबद्दल किंवा पोलिटिको बद्दल विचारले होते' तेंव्हा तुम्ही सरळ उत्तरे दिली नव्हती. 'हिलरीने तसे केले आहे का ?' हा मुद्दा त्याचे उत्तर होउ शकत नाही. तेंव्हा तुमच्याशी मुद्देसूद चर्चा 'येह मेरे बस कि बात नही' ही खूणगाठ मी बांधली होती . तुम्ही इतरत्र तर्कशुद्ध लिहिता (इथे वगळता) त्यामूळे वरचे अनुमान त्यावरून मी त्यावरून बांधले होते. ह्यात पर्सनल काहीच नाही फक्त माझे अनुमान होते. तुम्ही तुमचे मत कोणाला द्यावे ह्याबद्दल माझा काडिचाही आग्रह नाही हो
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सलग २
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सलग २ पेक्षा अधिक वेळा निवडून येऊ शकत नाही मात्र जर मध्ये गॅप असेल तर मात्र निवडणुकीला उभे राहू शकतो व निवडून येऊ शकतो ना?
थिओडोर रुझवेल्ट १९०१ ते १९०८ असा राष्ट्राध्यक्ष राहिल्यानंतर १९१२ साली पुन्हा निवडणुकीला उभे होते ना?
नाही. “No person shall be
नाही. “No person shall be elected to the office of the President more than twice ….”
टण्या, मैत्रेयी, बावीसावी
टण्या, मैत्रेयी, बावीसावी अमेंडमेंट आहे ती. १९४७ मध्ये पास झाली, त्याआधी असा रूल नव्हता.
एका लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात
एका लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात ट्रंप विजयी होईल असे भाकित अॅन कोल्टर ने केले तर प्रेक्षक खदा खदा हसले. इतर पाहुणेही "ही कोण बावळट?" असा भाव चेहेर्यवर आणून हसले.
ओबामाच्या वेळेला बिनचुक अंदाज केल्याने नेट सिल्व्हर चा रथ दोन बोटे हवेत चालत होता. परवा परवा पर्यंत "घाबरू नका हो! ट्रंप काय जिंकत नाय" असे सांगत होता. त्याचा रथ पंक्चर झाला आहे.
ट्रं चे साधे सोपे थेट बोलणे कुठेतरी लोकांना अपील झाले आहे हे खरे.
अ पु म ब !
बिल मारच्या कार्यक्रमात अॅन
बिल मारच्या कार्यक्रमात अॅन कोल्टर मागल्या वर्षीच -प्रायमरीचा दंगा सुरु व्हायच्या आधी म्हणाली होती की ट्रम्प हॅज बेस्ट चान्सेस. बिल मार पण खदाखदा हसला होता.
विकु, तुम्ही भारतात सोनियामाता आणि इथे अॅन कॉल्टर का? जसे बरेच भारतीय भारतात मोदी आणि इथे डेमोक्रेट्स असतात तसे?
अहो टण्या, मी एकदा म्हंटले
अहो टण्या, मी एकदा म्हंटले मला श्रीमंत व्हायचे आहे, तर लोक म्हणाले रिपब्लिकन हो. मग मी म्हंटले, होतो, कसे व्हायचे? तर ते म्हणाले प्रथम तुला खूप श्रीमंत व्हावे लागेल!
नंतर बुश छेनि नि क्रुझ, ट्रंप सारखे रिपब्लिकन पाहिल्यावर नको वाटतात रिपब्लिकन.
>> No person shall be elected
>> No person shall be elected to the office
पण व्हाईस प्रेसिडन्ट हा इन्डायरेक्टली इलेक्ट होऊन मगच तो एलिजीबल राहतो प्रेसिडन्ट'स ऑफीस अॅझ्युम करण्यासाठी? त्या न्यायाने बिल क्लिन्टन हिलरी च्या तिकीटावर असू शकत नाही?
तसे टेक्निकली बिल क्लिन्टन ला
तसे टेक्निकली बिल क्लिन्टन ला पण घेऊ शकते ना ती
अहो पण आधी निवडून तर यायला पाहिजे ना!
जर अमेरिकन जनतेला ट्रंपच पाहिजे असेल, तर तोच येईल. मागे रेगनच्या वेळी सुद्धा लोक असेच त्याच्याविरुद्ध ओरडत होते, मी अमेरिकेला पुनः "ग्रेट" करीन असेच तोहि म्हणत होता. पण निदान तो ८ वर्षे गव्हर्नर होता. लोकांनी निवडून दिल्यावर राज्यातल्या सिनेट काँग्रेस मधल्या नि राज्यातल्या उच्च कोर्टातल्या लोकांबरोबर काम करायचा त्याला अनुभव होता.
आता मुसलमानांना येऊच देणार नाही, नि मेक्सिकन लोकांना हाकलून देईन, असे म्हणण्याने लोकांना हुरुप येतो, कितीहि जोरदार भाषणे ठोकून निवडून आल्यावर प्रत्यक्ष वचन पूर्ण करणे कठीण असते. इथे आधी घटना तपासावी लागेल, कदाचित बदलावी लागेल, नि ते असे भाषणे देऊन होत नाही, तिथे काँग्रेस, सिनेट, सुप्रीम कोर्ट मधल्या लोकांशी संबंध असतो, त्यांची मते गरीब, अशिक्षित नि वर्णद्वेषी लोकांपेक्षा वेगळी असतात. तेच ते उच्च्भ्रू लोक. ते नुसते फॅशन साठी बोलत नाहीत. त्यांच्या हातातहि बरीच सत्ता असते, ते असे सहजासहजी काही होऊ देत नाहीत. बरेच अडथळे आणतात.
मला माहित आहे ट्रंप डील करण्यात तज्ञ आहे. तो मेक्सिकोला म्हणेल, भिंत बांधायला पैसे द्या, (कर्जावू, ५० टक्के दराने, आठ वर्षांनंतर परत करीन. ) मग तो स्वतःच्या कंपनीचा भरपूर फायदा करून घेईल, आठ वर्षांनंतर तो नक्कीच राष्ट्राध्यक्ष नसेल, जो कुणि येईल त्याची डोकेदुखी! जसे बुश छेनी ने इराक बद्दल केले! नि आता ओबामाला शिव्या! लई हुश्शार राव!
तो सांगतो ते खरे आहे, एव्हढी अक्कल दुसर्या कुणालाच नाही! : (कुजकट हसू!)
ईमेल सर्वर प्रकरणातुन
ईमेल सर्वर प्रकरणातुन हिलरीबाई सुटणार बहुतेक...
ट्रम्प - क्लिन्टन यान्च्यात
ट्रम्प - क्लिन्टन यान्च्यात अन्तिम सामना आता होणार आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, VP साठी कोण ? बर्नी सॅन्डर्स यान्नी VP होण्याची शक्यता टाळलेली नाही. तर आतापर्यन्त ३ लोकान्नी ट्रम्पचा VP होण्याची शक्यता पुर्णत: नाकारली आहे.
ट्रम्प नको म्हणुन हिलरीला मत, हिलरी नको म्हणुन ट्रम्पला मत, दोघे नको म्हणुन मतदानाला जाणार नाही... असा सर्वत्र गोन्धळ दिसतो आहे.
प्रायमरी निवडणुकांबद्दल एक
प्रायमरी निवडणुकांबद्दल एक परिप्रेक्ष्यः
Hillary Clinton has won 12,575,576 votes out of 23,376,193 counted in Democratic contests. That represents:
- 5.6% of all eligible voters in the United States
- 5.0% of all adult residents in the United States
- 3.9% of all people living in the United States
Trump has won 10,706,130 votes out of 26,590,345 counted in Republican contests so far. That represents:
- 4.7% of all eligible voters in the United States
- 4.3% of all adult residents in the United States
- 3.3% of all people living in the United States
दुवा: http://www.fairvote.org/how_few_votes_it_takes_to_become_a_presumptive_n...
बरं मग निष्कर्श काय आहे
बरं मग निष्कर्श काय आहे तुमचा? सुरुवातीपासुन फक्त तीन कंटेस्टंट्स घेउन १२ मिल्यन्स वोट्स मिळवणार्या हिलरीचा, १७ कंटेस्टंट्स घेउन १० मिल्यन्स वोट्स मिळवणार्या ट्रंपसमोर टिकाव लागेल?
>>> बरं मग निष्कर्श काय आहे
>>> बरं मग निष्कर्श काय आहे तुमचा?
निष्कर्ष काही नाही. केवळ परिप्रेक्ष्य - की इतका गाजावाजा होऊनही प्रायमरीजमध्ये किती कमी संख्येने लोक सहभागी होतात.
>>> सुरुवातीपासुन फक्त तीन कंटेस्टंट्स घेउन १२ मिल्यन्स वोट्स मिळवणार्या हिलरीचा, १७ कंटेस्टंट्स घेउन १० मिल्यन्स वोट्स मिळवणार्या ट्रंपसमोर टिकाव लागेल? स्मित
--- शक्य आहेही वा नाहीही. वर म्हटल्याप्रमाणे, हा केवळ एक पर्स्पेक्टिव्ह आहे.
ट्रम्पला नक्की काय म्हणायचंय?
ट्रम्पला नक्की काय म्हणायचंय? टॅक्सेस वाढणार की घटणार? -
In the CNN interview, Mr. Trump – who has made his political mark as the “tell-it-like-it-is” candidate – tried to counter questions that he was flip-flopping on policy issues.
“Let me just set it straight,” Mr. Trump said in talking of his past tax proposals. “I put in the biggest tax decrease of anybody running for office by far, O.K., and many people think it’s great, and if anything, I was criticized because it’s too steep a cut, but that’s O.K., but I put in by far the biggest tax decrease.”
He added, “What I said – and that really is a proposal because we have to go to Congress, we have to go to the Senate, we have to go to our congressmen and women and we have to negotiate a deal. So it really is a proposal, but it’s a very steep proposal.”
Then he said, “I said that I may have to increase the section – and by the way, everybody across the board, businesses, everybody’s getting a tax cut, especially the middle class. And I said that I may have to increase it on the wealthy. I’m not going to allow it to be increased on the middle class. Now, if I increase on the wealthy, that means they’re still going to be paying less than they pay now.”
ट्रंप मुरब्बी राजकारणी
ट्रंप मुरब्बी राजकारणी आहे,
मग श्रीमंतांचा कर कमी करायचा नि म्हणायचे पहा म्हंटल्याप्रमाणे कर कमी केला, नि गरीबांचा कर वाढवायचा नि श्रीमंतांना सांगायचे पहा मी सांगितले तसे केले. असेहि जास्तीत जास्त कर श्रीमंतांकडूनच जमतो (म्हणजे कागदावर, प्रत्यक्षात, कुणास ठाऊक? त्यामुळे तसा काही फरक पडत नाही.नाही, कारण कर्ज वाढतेच आहे.
तसेहि त्यानेच म्हंटले आहे - मी सध्या फक्त निवडून येणे हा उद्देश ठेवला आहे, म्हणून जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी जे लोकांना आवडेल ते व तसे बोलायचे.
लोकशाही मधे यथा प्रजा तथा राजा, अक्कल, अभ्यास इ. ला काही अर्थ नाही. नाहीतरी बहुसंख्य लोक मारामार्या, उघडे नागडे पणा असलेला सिनेमा पहायलाच गर्दी करतात, मग त्यात कितीहि अशक्य गोष्टी दाखवल्या तरी चालते. तसेच लोक जास्त झाले तर ते कुणाला निवडतील हे उघड आहे.
लोकशाही - लोकशाही - लोकशाही.
ज्यू किंवा ख्रिश्चन नसलेल्यांना मारून टाका असे बहुसंख्य लोक म्हणत असतील तर तसे होईल, उगाच त्यांना दोष देऊन आपला जीव वाचणार नाही, आपण आपली काळजी घ्यावी.
भारतीयांना धोका नाही, पाSर शक, हूण, ख्रिश्चन, मुसलमान ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच सगळ्यांचे अन्याय सहन करून त्यांची लोकसंख्या वाढतेच आहे.
भारतीयांना धोका नाही, पाSर
भारतीयांना धोका नाही, पाSर शक, हूण, ख्रिश्चन, मुसलमान ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच सगळ्यांचे अन्याय सहन करून त्यांची लोकसंख्या वाढतेच आहे.
Pages