अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्नीची घोडदौड चालूच. हवाई, अलास्का आणि वॉशिंग्टन खिशात! पोर्टलंडच्या सभेत एका छोट्या पक्षाने उपस्थित राहून थोडी गंमत केली. चक्क बर्नीच्या समोर पोडियमवर उतरला. लोकांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. असे म्हणतात की पक्षामु़ळे सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून हिलरीने आपल्या पुढच्या प्रचारसभेत एक पक्षी पिंजर्यात डांबून आणायचा हुकुम सोडला आहे! बिल क्लिंटनने ह्या बाबतीत मदत करायची तयारी दाखवली आहे पण बिल कुठल्या पाखरांच्या मागे धावेल ते सांगता येत नाही (पण अंदाज करता येतो!) असो.

>>राज, ते बहुधा मित्राचेच असावे. एकाने ते केले होते शेअर. तसेही त्यावर काही फार क्रेडिट वगैरेचा इशु नाही.<<

आॅल्राइट, ॲज लाॅंग ॲज यु आर गुड विथ इट. बायदवे, त्याचं नांव - क्रिस ले...

Trump's campaign manager arrested म्हणे! हा काय नविन स्टन्ट? Happy

स्टन्ट नाहीये स, त्यानी एका रिपोर्टर ला अ‍ॅसोल्ट केले ही बरीच जुनी न्युज आहे. आता फायनली त्याच्यावर चार्ज दाखल केलेत वाटतयं.

यात खरी गोम? >> कसली गोम, ट्रंप साहेब म्हणणार "Listen, I will tell you real thing, trust me when I'm saying this. This room is full of beautiful people. I have never seen so many beautiful people in a room, Lets introduce ourselves." झालं बदलला विषय Wink

अँगर/अँग्री जाऊन आता ब्युटी/ब्युटीफुल ने जागा घेतली का त्याची? Happy

आर एन सी मध्ये लोडेड वेपन्स घेऊन जाण्याकरता पिटीशन दाखल केलं ना?

आर एन सी मध्ये लोडेड वेपन्स घेऊन जाण्याकरता पिटीशन दाखल केलं ना? >> होय होय !! काय होतंय ते पाहू. हिप्पोक्रेट्स आहेत का परमिशन देत आहेत ते बघायला मजा येणार आहे. आणि मग सिक्रेट सर्व्हीस वाल्यांची तारांबळ उडेल Lol

>>/..Listen, I will tell you real thing, trust me when I'm saying this. This room is full of beautiful people. I have never seen so many beautiful people in a room, Lets introduce ourselves.

असामी, आता ट्रंपची भाषणं ल्ह्यायला घे Wink

कालच्या त्या मुलाखतीत अँडरसनला ट्रंम्प किती वेळा Excuse me (एकेए - "ए गपे") म्हणाला मोजायला हवं होतं Proud

ही गेल्या वर्षीची बातमी:
20 times Donald Trump has changed his mind since June (दुवा)

आणि आजचं हे प्रात्यक्षिकः
Donald J. Trump, pressed Wednesday on his support for a ban on abortion and what it would mean in practice, said that “there has to be some form of punishment” for women who have abortions.

Less than three hours later, Mr. Trump revised himself, issuing a written statement saying that such a ban would criminalize only those performing the procedure, not the women getting abortions. “The woman is a victim in this case, as is the life in her womb,” he said.

The revision may have set a land-speed record for a recanting of a controversial political pronouncement:
(दुवा)

कोलबेर ने या कोलांटउड्यांच्या क्लिप्स घेउन एक "ऑल ट्रम्प" डीबेट बनवले आहे :). धमाल आहे. दोन्ही बाजूला ट्रम्पच Happy
https://www.youtube.com/watch?v=WpKiP_gmDS8

ट्रम्प चे गर्भपात करणार्‍या महिलानबद्दलचे विचार खुप बालिश वाटले. महिलान्ना शिक्षा व्हायला हवी, काय शिक्षा तर विचार केला नाही... आता शब्द फिरवत डॉक्टरान्ना जबाबदार धरले जात आहे. अत्याचाराने ग्रस्त महिलान्नापण अशा प्रकारे शिक्षा सुचवली असेल तर मुर्खपणाचा कळस आहे.

जॉन केसिक कुठल्या आशेने अजुनपर्यन्त अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे? काल केसिकना पण गर्भपाताच्या त्यान्च्या भुमिके बद्दल प्रश्न विचारला गेला होता. जन्म-मरण आणि पुन्हा जन्म आहे... असे पोथिनिष्ट उत्तर केसिकचे होते.

ट्रंपला गोत्यात आणण्याकरता ठरवून त्याला विचारलेला प्रश्न आहे. मला वाटते प्रत्येक उमेदवाराला कचाट्यात पकडणारे प्रश्न विचारता येतीलच. त्याने एवढेच सिद्ध होते की माध्यमांनी ट्रंपवर डूख धरलेला आहे.
उदा. क्रूझ व केसिक यांचे उत्क्रांतीबद्दलचे मत विचारले आणि खोलात गेले तर असेच काहीतरी हास्यास्पद ऐकावे लागेल.

ट्रंपला गोत्यात आणण्याकरता ठरवून त्याला विचारलेला प्रश्न आहे. >> पण त्यात शिरणॅ न शिरणे हे त्याच्या हातात होते ना रे ? दर वेळी सगळेच कसे चुकीचे असतील ट्रंपच्या बाबतीमधे ?

अरे मग असाच प्रश्न तो प्रेसिडेंट असताना विचारला गेला आणि त्यानी असं काही तरी भलतं उत्तर दिलं तर तिकडे युद्ध भडकायची पाळी आहे. मग काय करणार - तयारी नको का ? आणि असे काही उत्तर द्यायचेच कशाला. क्रुझ आणि केसिक चे विचार कसे ही असोत ते स्थिर तरी आहेत ना.

>>अरे मग असाच प्रश्न तो प्रेसिडेंट असताना विचारला गेला आणि त्यानी असं काही तरी भलतं उत्तर दिलं तर तिकडे युद्ध भडकायची पाळी आहे. मग काय करणार - तयारी नको का ? आणि असे काही उत्तर द्यायचेच कशाला. क्रुझ आणि केसिक चे विचार कसे ही असोत ते स्थिर तरी आहेत नाव`
<<

युद्ध घोषित करायचे असेल तर ते ख्रिस मॅथ्यूजच्या समोर बसून करण्याइतका कुणी अध्यक्ष मूर्ख नसेल. एकदा राष्ट्राध्यक्ष झाला की मुलाखत द्यायची का, कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे ते अध्यक्ष ठामपणे ठरवू शकतो. ह्या प्रश्नाचे मी इथे उत्तर देणार नाही असे तो ठणकावू शकतो. (तुमच्या लक्षात आले असले तर ओबामा अलीकडे अशा कुठल्याही माध्यमांना मुलाखत देत नाही. यु ट्युब वगैरे ठिकाणी जिथे जास्त खोलातले प्रश्न विचारले जाणार नाहीत अशाच ठिकाणी उपस्थिती लावतो.)

प्रचाराकरता उमेदवारांना असा माज करता येत नाही आणि ह्याचा फायदा चॅनेलवाले घेत आहेत. ट्रंपने बेसावधपणा दाखवला. नंतर त्याने त्या भूमिकेत बदल केला आहे पण माध्यमांना त्यात स्वारस्य नाही. त्याला खजील करण्यातच ते धन्यता मानतात.
हिलरीने लिबियात अमेरिकेने एकही जीव गमावला नाही असे म्हटले होते. पण तिला कुणी त्याकरता धारेवर धरले नाही. निदान मुख्य माध्यमांनी तर नाहीच. हे विधानही बेजबाबदारपणाचे होते. देशाचा प्रतिनिधी असणारा राजदूत आणि त्याच्या संरक्षणाकरता असणारे लोक हे मारले गेले असताना असे बोलणे साफ चूक होते. पण तिला माध्यमांनी माफ केले ह्यात दुटप्पीपणा दिसतो.

http://townhall.com/tipsheet/guybenson/2016/03/15/hillary-we-didnt-lose-...

मलाही ट्रंप ला बेनेफिट ऑफ डाउट द्यावासा वाटतो. गेले दोन तीन दिवस मेडिया ट्रंप च्या मागे हात धुवून लागला आहे की काय असे वाटते आहे. झाला असेल एखादा स्लिप ऑफ टंग.

मिडिया हात धुवुन मागे लागणारच त्यान्च कामच आहे ते... देशातल्या मिडियाला फेस कसे करायचे हेही कळेलच की त्याला... शिवाय प्रेसिडेन्ट झाल्यावर तर असे अनेक बुमरॅन्ग प्र्श्न बाहेरुन येतिल मग काय करणार...

>>मिडिया हात धुवुन मागे लागणारच त्यान्च कामच आहे ते
मिडिया खरोखरच नि:स्पृहपणे सगळ्या उमेदवारांची अग्निपरीक्षा घेत असते तर स्तुत्य होते. पण बहुतेक माध्यमांनी फक्त ट्रंपला बळीचा बकरा बनवायचे ठरवले आहे नि हिलरी सारख्या प्रस्थापितांना मोकळे सोडले आहे हा दुटप्पीपणा कशाला? हिलरीही जर अध्यक्ष झाली तर तिलाही अशा बुमरँगांना तोंड द्यावे लागणारच आहे. तिला प्रॅक्टिस न देता फक्त ट्रंपलाच द्यायचा प्रेमळपणा का?

बहुधा ट्रंप प्रस्थापितांकडून पैसे घेत नसल्यामुळे त्यांचा जळफळाट होत असावा.

माझे मत असे आहे की ट्रंप मुळात उदारमतवादी आहे. परंपरावाद्यांना खूश करायला तो गर्भपात विरोध वगैरे म्हणत आहे पण ते काही खरे नाही. ते नुसते म्हणण्यपुरते (ओबामाचे मी धार्मिक ख्रिश्चन आहे हे म्हणणे जितके खरे होते तितकेच!)

माझे मत असे आहे की ट्रंप मुळात उदारमतवादी आहे. परंपरावाद्यांना खूश करायला तो गर्भपात विरोध वगैरे म्हणत आहे पण ते काही खरे नाही. ते नुसते म्हणण्यपुरते (ओबामाचे मी धार्मिक ख्रिश्चन आहे हे म्हणणे जितके खरे होते तितकेच!) >> म्हणजे ट्रंप पण दुटप्पीच आहे असा अर्थ झाला की. मग मिडियाविरुद्ध आरडाओरडा कशाला ?

दुटप्पीपणा ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल गफलत होते आहे इथे. भूमिका बदलणे म्हणजे दुटप्पी नाही. एकाच वेळी दोन लोकांना वेगळी वागणूक देणे ह्याला मी दुटप्पीपणा म्हणतो.
भूमिका बदलण्याबद्दल बोलायचे तर हिलरीने काय केले? मते मिळावीत म्हणून इराक युद्धाची खंदी समर्थक बनली. काळ बदलल्यावर विरोधी भूमिका सुरू केली. समलिंगी लोकांच्या लग्नाबद्दल काय? पहिल्यांदा विरोध मग समर्थन. राजकारणी हे करतातच. पत्रकारांनी तसे करणे चूक आहे. पत्रकार पक्षपाती असता कामा नयेत.

एक मिनीट दर वेळी हिलरी कशाला लागते ट्रंपला defend करायला ? हिलरी टाकाऊ आहे असे म्हणताय तर तिने केले ते ट्रंपने केले की ते समर्थनीय होते का ?

आता दुटप्पीपणाबद्दल, स्वतः उदारमतवादी असताना परंपरावाद्यांना खूश करायला तो गर्भपात विरोध वगैरे म्हणने हा दुटप्पीपणाच झाला की.

>>एक मिनीट दर वेळी हिलरी कशाला लागते ट्रंपला defend करायला ? हिलरी टाकाऊ आहे असे म्हणताय तर तिने केले ते ट्रंपने केले की ते समर्थनीय होते का ?
<<
ट्रंप हा काळाकुट्ट खलनायक जो जेम्स बाँडच्या सिनेमातील व्हिलनसारखा अमेरिकेचा विध्वंस करण्याचे कारस्थान आखणारा असा रंगवला गेला जात आहे. याउलट हिलरी ही धवल हिमाप्रमाणे स्वच्छ, वैगुण्यरहित, आदर्शवत अशी समजली जाते त्यामुळे हिलरीन एखादी गोष्ट केली आहे असे म्हटले की ट्रंपचे तसे करणे सौम्य वाटेल अशी आशा!

>>आता दुटप्पीपणाबद्दल, स्वतः उदारमतवादी असताना परंपरावाद्यांना खूश करायला तो गर्भपात विरोध वगैरे म्हणने हा दुटप्पीपणाच झाला की.
<<
वर मी असे म्हटले आहे की माझे मत आहे की.. ह्याचा अर्थ ते त्रिकालाबाधित सत्य आहे असे नाही. केवळ माझे मत. ट्रम्प हा न्यू यॉर्कचा रहाणारा असल्यामुळे तो टेक्सस वा फ्लोरिडाच्या कट्टर धर्मवाद्यांप्रमाणे दाखवत असला तरी त्याचा पिंड तसा नाही. हे पुन्हा माझे मत आहे. आणि असा आतून उदारमतवादी परंपरावाद्यांचे प्रतिनिधित्व करत असेल तर ते चांगलेच आहे असेही माझे मत आहे.

वेगवेगळ्या इशुज वर ट्रंपचे मौलिक विचार हास्यास्पद वाटण्यापेक्शा आरेंसीची, ट्रंपचं नाॅमिनेशन रोकायला चालवलेली केविलवाणी धडपड जास्त एंटरटेनिंग आहे. माझे २ सेंट्स...

>>> याउलट हिलरी ही धवल हिमाप्रमाणे स्वच्छ, वैगुण्यरहित, आदर्शवत अशी समजली जाते
--- ऐकावे ते नवलच! अगदी उघड उघड लिबरल बायस असणार्‍या सायटींवरही हे पाहिलेलं नाही. सँडर्सचे समर्थक हे हिलरीची वैगुण्यं दाखवून देण्यात रिपब्लिकनांच्या तोडीस तोड आहेत Happy

>>> मिडिया खरोखरच नि:स्पृहपणे सगळ्या उमेदवारांची अग्निपरीक्षा घेत असते तर स्तुत्य होते. पण बहुतेक माध्यमांनी फक्त ट्रंपला बळीचा बकरा बनवायचे ठरवले आहे नि हिलरी सारख्या प्रस्थापितांना मोकळे सोडले आहे
--- हिलरीही फॉक्स न्यूजवर गेल्या महिन्यात गेली होतीच की. त्यांनी विचारलेले प्रश्न सोपे होते का? याच मुद्द्यावर, रो वि. वेडबद्दल, तपशीलात जाऊन विचारलेले प्रश्नही नेमके होते -
https://www.washingtonpost.com/news/the-fix/wp/2016/03/08/fox-news-got-h...

ट्रम्प आणि मुरलेल्या राजकारणी लोकांत (दोन्ही पक्षांतल्या) फरक इतकाच आहे की, गोत्यात न येता प्रश्नांचं उत्तर द्यायचं कसब त्यांना सरावाने जमलेलं आहे. (गर्भपाताच्या प्रश्नावर क्रुझने कशा प्रकारे उत्तर दिलं असतं, त्याची कल्पना सहज करता येईल.) ट्रम्पला ते अजून जमलेलं नाही आणि/किंवा एखाद्या गोष्टीवर सखोल विचार केलेला नसला, तरी आत्मविश्वासाने ठाम उत्तर दिलंच पाहिजे, ही भूमिकाही याला कारणीभूत असू शकेल. मीडियाला सरसकट दोष देण्यात काही अर्थ नाही.

जो सनसनाटी बातमी देतो, त्याच्याकडे माध्यमं वळतात - मग तो ट्रम्प असो वा २००४ सालातला Howard Dean. हा खपाचा, बाजारपेठेचा नियम आहे. खुद्द ट्रम्पने हे हेरून, आतापर्यंत आपल्या फायद्यासाठी, सतत चर्चेत राहण्यासाठी याचा खुबीने उपयोग केला आहे. पहा - http://fivethirtyeight.com/features/how-donald-trump-hacked-the-media/

>>ऐकावे ते नवलच! अगदी उघड उघड लिबरल बायस असणार्‍या सायटींवरही हे पाहिलेलं नाही. सँडर्सचे समर्थक हे हिलरीची वैगुण्यं दाखवून देण्यात रिपब्लिकनांच्या तोडीस तोड आहेत
<<
सँडर्समुळे हिलरीसमर्थक माध्यमांची थोडी पंचाईत होत आहे हे खरे. आणि माध्यमे त्यांच्या परीने सँडर्सला दुर्लक्षित ठेवायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या कित्येक रॅल्यांचे काहीही वृत्तांकन होत नाही. पण माझा मुद्दा माध्यमांचा आहे. हिलरीला कोपर्‍यात पकडून अप्रिय प्रश्नांना उत्तर देणे अपरिहार्य केले जात नाही. "आत्ताच्या आत्ता उत्तर दे" छाप दादागिरी जी ट्रंपवर केली गेली तशी हिलरीवर केली गेलेली नाही. सीएनएन, एमएसएनबीसीचे लोक उघड उघड हिलरीच्या बाजूने आहेत हे सत्य लपलेले नाही. ख्रिस मॅथ्यूज ट्रंपवर ज्या त्वेषाने तुटून पडला त्या त्वेषाने हिलरीवर तुटून पडेल का? आजिबात नाही.

सनसनाटी बोलून ट्रंपने प्रसिद्धीचा झोत आपल्यावर ठेवला आहे हे नक्कीच खरे. पण प्रसारमाध्यमे त्याच्या प्रत्येक पराचा कावळा आणि प्रत्येक राईचा पर्वत करणे आपले कर्तव्य समजतात. ट्रंपच्या नशिबाने डावी आणि उजवी दोन्ही माध्यमे त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे हा अतिरेक फारच जाणवतो आहे.

उत्तरे देण्याचे म्हणाल तर एका क्षणात अचूक उत्तर देण्याचा आग्रह करणे मूर्खपणाचे आणि उथळपणाचे आहे. हिलरीला अनेक वेळा विचारण्यात आले की तुम्ही गोल्डमन सॅक्स सारख्या मातब्बर लोकांकडून भरपूर पैसे घेता मग तुमचे धोरण त्यांना अनुकूल असेच असणार असे आम्हाला वाटते. ह्यावर काय म्हणाल? ह्याचे समाधानकारक उत्तर हिलरीने कधीच दिलेले नाही. पण ते कुणाला खटकत नाही. माध्यमांतल्या दिग्गज पत्रकारांना ते खटकत नाही. मात्र ट्रंपचे एक चुकीचे उत्तर हे प्रचंड उत्पात असल्यासारखे मिरवले जाते.

ट्रंपच्या बाबतीत वज्रादपि कठोराणि असलेली माध्यमे हिलरीच्या बाबतीत मृदूनि कुसुमादपि असतात असे मला ठाम वाटते.

हाउस कॉफ कार्डस - चौथा सिझन मध्ये एक संवाद आहे.

तो रिपब्लिकनचा उमेदवार म्हणतो की लिबरल असून साउथ कॅरोलिनाचा आहेस आणि मी न्यूयॉर्कचा रिपब्लिकन म्हणजे खरेतर तुझ्यापेक्षाही लिबरल आहे.

ट्रम्पबाबतीत अगदी तसेच आहे. तो खरा लिबरल आहे पण उगाच ख्रिश्चॅनिटीचे घोंगड अंगावर घेऊन वावरतोय.

त्याने हे घोंगडं फेकुन द्यावे अन म्हणावे मी न्यूयॉर्कचा लिबरल आहे. मग बघू.

पण एकंदरीत ट्रम्प सारा पेलिनची उणीव भासू देत नाहीये सध्या.

तमाम बायस्ड लिबरल मिडीया बाजूला ठेवा नि ट्वीटरवर स्वतःचे दात घशात घालणारी पोस्ट्स करणारे ट्रंपचीच बोटे आहेत ना ? कि तीही कोणी घोस्ट राईट करते आहे ?

Pages