२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आफ्रिदी बद्दल मला आता थोडासा आदर वाटत चालला आहे कारण तो गेले काही वर्षे सगळेच थोडे स्पोर्टिव्हली घेत आहे. आजही चांगला बोलला.

केदार,
तेच म्हणणार होते, कित्ती कुल होता शेवटी अवॉर्ड सेरिमनीला, हसून अभिनंदन केलं, काही एक्स्ट्रिम इमोशन्स नाहीत !
पूर्वी इंडीया -पाक एकमेकांविरुध्द हारलेकी किती रडारड चिडि चालायची , ही जनरेशन खूप नॉर्मल आहे !

खुप मस्त !!!
पूर्वी इंडीया -पाक एकमेकांविरुध्द हारलेकी किती रडारड चिडि चालायची , ही जनरेशन खूप नॉर्मल आहे !> तरी जोश असतोच .. वेगळा मूड असतोच ... पण आफ्रीदी mature वाटला आज बोलताना ....

Lagta hai Virat kohli abtak bhula nahi
Ki Pk movie me Anushka ka boyfriend
pakistani tha...
# IndvsPak

या हल्लीच्या वर्ल्डकप भारत पाक मॅच फिक्स असतात की काय असे उगाचच वाटत राहते. आज तर पाकिस्तान वेगवान गोलंदाजांची शॉर्टपिच आणि स्पिनर्सची निष्प्रभ गोलंदाजी बघून शंका आणखी वाटत होती. नसेलही तसे काही. पण यात साला माझाच जिंकण्याचा आनंद मिस होतो Sad

विराट मात्र अप्रतिम!

असे वाटते की तो ठरवतो आणि खेळतो. बाकीचे दहा फलंदाज त्याला फक्त थोडी बहुत साथ द्यायला हवे असतात, त्याचा आवेश आणि एटीट्यूड हा मॅच तर मी एकटाच तुम्हाला मॅच जिंकवून देईन, मॅचच नाही तर वर्ल्डकप मिळवून देईन असा असतो. त्याला जिंकायला आवडते म्हणण्यापेक्षा त्याला हरायला आवडत नाही असे म्हणने जास्त योग्य वाटेल.

त्याच्यातील याच गुणामुळे तो प्रत्येक सामन्यागणिक तो ईतरांच्या फार पुढे निघून जात आहे.

त्याची कारकिर्द संपता संपता तो आजवरचा क्रिकेटच्या ईतिहासातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला तरी आश्चर्य वाटू नये.

बाकी या सामन्यातही धोनीने आपली सिग्नेचर सोडली..
तो षटकार विनिंग शॉट म्हणून आला असता तर आणखी मजा आणली असती ..
धोनी आणि विराट हे दोन बंदे आपल्याला हा विश्वचषक मिळवून देणार..
धोनी नुसता फलंदाजीने नाही तर आपल्या बॉलर्सचा ताफा घेऊन ही कामगिरी बजावणार.. त्याच्या बॉलिंग रिसोर्समधे पांड्या हाच एक वीक लिंक वाटतोय पण आतापर्यंत त्याने त्यालाही शक्य तितके चपलख वापरलेय.. आणि हे तुर्तास चांगलेच आहे.. एखाद्या 200 धावांच्या सामन्यात त्याची फटकेबाजी महत्वाची ठरू शकते आणि त्यासाठी त्याची गोलंदाजीत समाधानकारक कामगिरी होत तो संघात राहणे गरजेचे.

रैनाचा मात्र फॉर्म गंडलाय. त्याबाबत काय जुगार खेळायचा हे धोनीच ठरवेल. पण तो सुद्धा धोनीचा एक लाडका बॉलिंग रिसोर्स आहे ज्याला योग्य प्रकारे वापरणे त्याला जमते.

धवनला धोनी नाही काढत. शर्मा धवन जोडी तो नाही फोडत. या फॉर्मेट मध्ये तरी नाही.. ऑस्ट्रेलियात सुद्धा धवन फ्लॉपचा ओरडा चालू असून धोनीने त्यावर विश्वास दाखवला. धवनने सार्थ ठरवला.

काल अश्विन व जडेजाचे चेंडू काटकोनात वळताना व उसळताना पाहिले आणि लक्षांत आलं कीं प्रत्येक सामन्याचा संघ निवडताना तिथल्या खेळपट्टीलाच निर्णायक महत्व द्यावं लागणार. काल पाकने एका सीमरच्याजागी चांगला स्पीनर खेळवला असता, तर भारतावर अधिक दडपण ते आणूं शकले असते. [ कालची खेळपट्टी एवढ्या मोठ्या जागतिक स्पर्धेला साजेशी नव्हती, असंही मनात येवून गेलं. सौरवनेही खेळपट्टीबद्दल अश्चर्य व्यक्त केल्याचं कुणीतरी समालोचक म्हणाला ]

भारत सरकार हमें पूरी सुरक्षा की गारंटी दे तभी हम भारत आएँगे"-पकिस्तानी टीम इस मैच से पहले।
"पाकिस्तान सरकार हमें पूरी सुरक्षा की गारंटी दे तभी हम पाकिस्तान वापस जाएँगे।"-पाकिस्तानी टीम इस मैच के बाद।

अश्चर्य व्यक्त केल्याचं कुणीतरी समालोचक म्हणाला>>> नंतरच्या चर्चेत वसीम अक्रम पण रडत होता. हे बरोबर नाही. मोठ्या धावसंख्येची मॅच टी-२० मधे अपेक्षित असताना अश्या पीच तुम्ही कशा काय बनवू शकता.. त्याचबरोबर पाकीस्तान ने पीच कंडीशन नीट न पाहता एका स्पीनरच्या जागी सीमर का घेतला.. वगैरे वगैरे.

रच्याकने, ती सेहवाग - जहीरची जाहिरात पाहिली का कोणी? चॅनेलचा माणुस येऊन सेहवागला सांगतो की माझ्या नोकरीचा प्रश्न, आहे अमुक बोलू नको, तमुकच बोल वगैरे. त्यावर सेहवाग नुसतंच हं हं करत मान डोलावतो. शेवटी जहीर हसत सांगतो की तो कोच आणि कॅप्टनलाही असंच करायचा. सगळ्याला हो हो करत, शेवटी आपल्या मनाचंच करायचा ! मस्त जमली आहे जाहिरात

आपली ओपनिंग जोडी पाकिस्तानच्या जोडी पेक्षा खराब झाली आहे. त्यांनी किमान ३५ रन्सची भागीदारी तरी केली. आपली जोडी आशिया कप पासून एकदाही ३० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करू शकली नाही. श्रीलंकेविरुध्द ३ मॅच आशिया कप मधे ४ मॅच आणि आता विश्वचषक मधे २ मॅच टोटल ९ मॅच मधे आपली पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ३० पेक्षा अधिक धावांची अवघ्या २-३ मॅच मधेच झाली असेल. ही प्रचंड मोठी धोक्याची सुचना आहे. विराट खेळतोय म्हणून आपण जिंकतोय हेच खरे आहे.
२००७ च्या विश्वचषकाच्या वेळी आपली ओपनिंग भागिदारी मजबूत होती प्रत्येक मॅच मधे ४०-५० रन्स तरी सेहवाग-गंभीर काढत होते त्यामुळे मधल्या फळीवरच्या फलंदाजांना नंतर तुफ्फान हाणामारी करता आली.
पुढच्या कुठल्या सामन्यात जर १८०-२०० धावा समोरच्या संघाने काढल्या तर जशी इंग्लंडने सुरुवातीपासून हाणामारी सुरु केली होती तशी कोण करणार? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे.
इंग्लंड कडे मॉर्गन चुकला तर त्याची जागा रुट, स्ट्रोक, हेल्स, रॉय भरून काढल्याचे बघितले आहे. पण आपल्याकडे विराट गेल्यावर त्याची जागा भरून काढताच आली नाही. न्युझिलंडच्या मॅच मधे वास्तव दिसून आले. गुप्तिल आऊट झाल्यावर विल्यमसन, इ. नी स्कोर बनवला. पण आपण विराट गेल्यावर कुठल्याही फलंदाजाने उभे राहण्याचे मनावर घेतले नाही. रैना तर शेवटची मॅच ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळला त्यानंतर सतत फ्लॉप ठरत आला आहे.
खर तर आता भारतीय संघाने याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पुढच्या दोन्ही मॅचेस महत्त्वाच्या ठरणार आहे. बांग्लादेशविरुध्द तर जिंकूच आपण पण ऑस्ट्रेलिया विरुध्दची मॅच ही क्वॉटरफायनल सारखी होणार कारण तिच्यात जो जिंकेल तो सेमिफायनल मधे पोहचेल.

माझं एक स्वप्न आहे झरीना... एका शांत प्रशस्त सभागृहात जाणकार श्रोत्यांचा समुदाय जमलाय. गर्दी आहे, पण ती दर्दी रसिकांची. व्यासपीठ रिकामं आहे, पण तरीही रिकामं नाही; कारण पूर्वी गाऊन गेलेल्या गायकांनी जे नादब्रह्म निर्माण करून ठेवलंय त्याची ऊब अजूनही कुरवाळतेय त्या बैठकीला. अचानक कुणीतरी वडीलधारी व्यक्ती मला संकेत करतात, मी उठतो, आपल्या गुरूंना नमस्कार करतो आणि व्यासपीठावर जाऊन बसतो. तानपुरा उचलतो आणि गायला सुरुवात करतो. समोरची ती रसिकांची सभा बघतो, क्षणभर माझं मन धास्तावतं पण मी डोळे बंद करून बेभान गात सुटतो. मला येतं ते सारं सारं मी त्या गाण्यात ओतून टाकतो, अगदी माझा जीवदेखील. वेळेचं भान नसतंच मला पण कधीतरी माझं गाणं थांबतं. टाळ्यांचा कडकडाट नाही होत. नुसतीच घोर शांतता, कारण सारेच भारावलेले, गहिवरलेले. मी तानपुरा खाली ठेवतो, सभेला नमस्कार करतो. इतक्यात एक ज्येष्ठ गायक गुरूंचा गुरू, उस्तादांचा उस्ताद माझ्या समोर येतात. माझ्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात की ‘शाब्बास पोरा, आज कानांचं सार्थक झालं. जीते रहो, गाते रहो’. माझ्याच कानांवर माझा विश्वास बसत नाही. मी आपल्या गुरूंकडे बघतो आणि अचानक एकाएकी मला सभोवतालचं सारं दृश्य अंधुक दिसायला लागतं. मला कळत नाही असं अचानक पाऊस कसा सुरू झाला ? मग लक्षात येतं, पाऊस बाहेर नाही, पाऊस माझ्या डोळ्यांत आहे. त्या एका आशीर्वादावरनं आपला जीव ओवाळून टाकावा झरीना.... ‘जीते रहो, गाते रहो’. कुठलाही कलाकार त्या एका क्षणासाठीच जगत असतो, त्या क्षणापुरताच जगत असतो. ‘जीते रहो, गाते रहो’.... ‘जीते रहो, गाते रहो’..... ‘जीते रहो, गाते रहो’...

---

फेसबुक सभार

ऋन्मेष , तुम्ही साधारणपणे काहीही लिहिता हे माहिती आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा उल्लेख 'तालिबान' असा करणं ही अफगाण लोकांची क्रूर थट्टा आहे.
तुम्ही यावरही युक्तिवाद कराल याची खात्री आहेच. असो.

विराटची द्रूष्ट काढुन टाका. (नुकतीच त्याच्यावरची नजर निघुन गेली होती..ती परत यायला नको.. किमान वर्ल्ड टी २० पुर्ण होइ पर्यंत तरी Happy )

ओह... वरिल प्रतिसाद आता बघितला.
तालिबान ही अत्यंत क्रुर जमात आहे. अफगाणिस्तानच्या लोकांनी कितीतरी अमर्यादित अत्याचार सहन करून त्यांच्या विरुध्द लढा दिला आहे. त्यानंतर कुठे त्यांना हे सगळे करता आले. जसे वेस्ट इंडीज इ. देशांनी वर्णवादाच्या द्वेषाविरुध्द क्रिकेट हे हत्यार वापरले. आणि स्वतःचे स्थान निर्माण केले तसेच अफगाणिस्तान आणि बांग्लादेश सारखे देश गरिबी, अत्याचार, इ. विरुध्द क्रिकेट वापरत आहे. हेच त्यांचा आनंद हेच त्यांचे सर्वस्व. म्हणून बांग्लादेशच्या विजय पराभवावर तिथले लोक ओवर रिअ‍ॅक्ट करतात. कारण दुसरे काही साधन अस्तित्वात नाही. हे देशच स्वतःच्या अस्तित्वाकरीता खेळतात.

तो ड्वेन ब्रावो विकेट काढल्यावर एक्दम अहो राया चल्ला घोड्यावरती बस्सू डान्स करतो. Lol

१२२. डिफेंडेबल पण म्हणता येइना त्या गेलचा फॉर्मं बघता. बघू आता.

ऋन्मेष , तुम्ही साधारणपणे काहीही लिहिता हे माहिती आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा उल्लेख 'तालिबान' असा करणं ही अफगाण लोकांची क्रूर थट्टा आहे. >>

सिरियसली !

अफगाणी क्रिकेटर्स ज्या पद्धतीने खेळले ते आवडले.

सॅम्युलस आउट झाला श्रीवर्धनाच्या बॉलिंग वर पण त्याला खरा आउट होण्यासाठी आदल्या ओव्हर मध्ये सेट केले तरे वंदरसेने. त्याचे ते तीन बॉल अफलातून होते. आणि अगदी तश्याच बॉलवर तो पुढच्या ओव्हर मध्ये आउट झाला. वंदरसेची बॉलिंग आवडली.

अरे टाईट केलय बरच. इट कुड गो एनीवे!
फ्लेचर जबरी वाचला.
रसलनी मारली ४!
फक्त नीट लाईन ठेवलीतरी काम होईल श्रीलंकेचं. नो लूज बॉल्स प्लिज.
काय गहाळ फिल्डिंग! हे म्हणजे आम्ही वाळूत क्रिकेट खेळताना पोरं डाईव मारायला काचकिच करायचे तसलं झालं. Lol

फक्त नीट लाईन ठेवलीतरी काम होईल श्रीलंकेचं. नो लूज बॉल्स प्लिज >> बुवा लंकेला सपोर्ट करत होते का?

मग माझी टीम जिंकली. Lol

अंडरडॉगला नेहमीच सपोर्ट असतो केदार (फकस्त इंडिया विरुद्ध नसेल तर). Lol

काय राव तो कॅच सोडला? प्युअर नर्व्ज दुसरं काही नाही. जाऊ द्या. आपल्याला काये? आता आपली बुधवारी आहे, ती बघता नाही यायची पण रविवारी एक माझ्या फ्रेंडं आहेत त्या म्हणतात तसं, भारत आस्ट्रेलिया मॅच आहे एकूनच कापरं भरलं. Lol तसं यन्झेडांनी दारुण पराभव कसा असतो हे सुरवातीलाच दाखवून दिल्यामुळे थोडी भीड चेपली असावी का आपल्या पोरांची? म्हणजे अगदीच काय व्हील अन कस्सं व्हील असं नसावं वाटत. आता पुढच्या सगळ्या जिंका म्हणा बास!
रुट सारखाच कोहलीचा खेळ खुप सरस वाटला इतरांपेक्षा. युवराज पण फॉर्मात येतोय. बॅटिंग लाईन अप भारी आहे आपला अन बॉलिंग पण वाईट नाही.

<< बॅटिंग लाईन अप भारी आहे आपला अन बॉलिंग पण वाईट नाही.>> क्षेत्ररक्षणही चमकदार आहे आणि .....विकेट कशी बनवायची हें तर आपल्याच हातात आहे !!! Wink

Pages