रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निधी Rofl

भाऊ
चित्रं मी फोटो अपलोड करून डिजीटल कन्व्हर्जन करून त्याचं व्यंगचित्रं बनवलेलं आहे. त्यामुळे चित्राचे श्रेय मला देऊ नयेत. फक्त कल्पना राबवण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला.
( अवांतर : स्कॅनर घेतल्यानंतर हाताने काढलेली चित्रं अपलोड करीन. पेंटब्रश मधे चित्रं काढतात हे ऐकून आहे पण जमत नाही.)

सरिता दत्ताला माधवसाठी बाजारातून फळं आणायला सांगते. माधवला बरं वाटत असतं म्हणुन तो खाली येऊन बसतो. त्याला बरं वाटलेलं पाहून दता सारं श्रेय देवाला देतो. माईही त्याला बरं बघून खुश होतात. निलिमा म्हणते औषध घेतल्याने झालं. माधव म्हणतो की सार्‍यानी काळजी घेतली म्हणून विशेषतः सरिताच्या पेजेमुळे झालं. तसंच , औषधं आणि देवाची कृपा वगैरे. तेव्हढ्यात सरिता 'आता बरं वाटलं म्हणून बाहेर जाऊ नका' असं निलिमाकडे बघत टोमणा मारते. एव्हढ्यात तिथे छाया येते आणि माधवला मला कोणी तुझ्या खोलीत जाऊ देत नव्हतं तुला कसं आहे असं विचारते. तेव्हढ्यात तिला दत्ता तू डोळ्यात काजळ का घातलंस म्हणून विचारतो. मग विचारतो की काल कुठे गेली होतीस. ती म्हणते घरीच होते. दत्ता आर्चिसची साक्ष काढतो. पण आर्चिस म्हणतो की तिच्यासारखी कोणीतरी असेल. माई, माधव, निलिमा, सरिता हे सगलं ऐकून अवाक होतात. मग छाया माधवसाठी कुळथाची पिठी करते म्हणून स्वयंपाकघरात जाऊ पहाते आणि तिचं आणि सरिताचं वाजतं.

कुठल्या काळात आहेत हे लोक्स नक्की. छायाला स्वयंपाक करून देत नाहीत ते. कोकण परिचयाचे आहे लहानपणापासून पण कुठल्या घरात हे असं बघितलं नाही.

दत्ता बायकोची बाजू घेतो. शेवटी निलिमा म्हणते की माधवला आता बरं वाटतंय आणि तुम्ही का भांडताय? मग छायाला म्हणते की मी माधवला काय पाहिजे ते बनवून देईन (हिला कुळथाची पिठी काय ते ठाऊक आहे?). छाया जाता जाता सरिताला ऐकवते की त्यांच्या अश्या स्वभावाने गणेश वाया गेला. माई सुध्द्दा उद्विग्न होऊन निघून जातात.

मग माई छायाला तिच्या खोलीत जाऊन समजावतात. तेव्हा ती त्यांनाही काहीतरी लागेल असं बोलते. मला नीट कळलं नाही ते. पण माई तिला समजावतात की आपल्या मुलीचं असं झालेलं पाहून कुठल्याही आईला वाईट वाटेल आणि त्यांनी जे केलं ते तिच्या भल्यासाठीच. मी आज आहे, मग नाही, तू कामात मदत करत जा. आणि माझ्यानंतर तुला भावाचाच आधार आहे वगैरे. मग छाया त्यांच्या कुशीत पडून रडते.

सरिता केर काढत काढत रडत अस्ते. दत्ता काय झालं म्हणून विचारतो. पण तो तिला समजावणार एव्हढ्यात माई येतात (कबाबमे हड्डी!). मग त्या सरिताला समजावतात की तू खूप केलंस, करतेस, छाया थोडी तडकू आहे, तुम्ही समजून घ्या. माझ्यानंतर तिला वार्‍यावर सोडू नका, नाहीतर ती जीवाचं बरंवाईट करून घेईल वगैरे. दत्ता आणि सरिता दोघे म्हणतात की आम्ही तिची काळजी घेऊ. पण मजा अशी की सरिता, दत्ता किंवा छाया माईला असं म्हणत नाहीत की कशाला मरणाच्या गोष्टी करतेस. असो.

आजचा गोषवारा कळला. थांकू स्वप्ना.

मी match बघितली (जिंकलो). तसंपण रा खे चा बघण्यापेक्षा इथे येऊन वाचायला जास्त आवडतं.

नाथाची बायको विहिरीजवळ भांडी घासत असते. छाया जवळ बसलेली असते. तिथे आर्चिस येतो आणि तिला सॉरी म्हणतो. तेव्हा ती म्हणते की ते निमित्त्त होतं. आपण विहिरीला कसं दु:ख सांगतो वगैरे ती आर्चिस ला सांगते. मग म्हणते की मी एक दिवस ही विहिरच जवळ करणार आहे. हे ऐकून नाथाची बायको म्हणते की असं म्हणू नये, पाण्याला आस लागते (म्हणजे काय?). ती भांडी घेऊन निघून जाते तेव्हा आर्चिस आणि छाया उभे राहून विहिरीत वाकून पहातात. तेव्हा आर्चिस तिला आम्ही आहोत, असा वेडावाकडा विचार करायचा नाही असं आपली शपथ घालून बजावतो. ती हो म्हणते. मग छाया त्याला म्हणते की आम्ही सगळी भावंडं लहानपणी इथे गप्पा मारायचो. आणि विहिरीत ओरडलं की आवाज येतो, मग आधी ती ओरडते 'ये'. आतून एको येतो. मग आर्चिस ओरडतो, त्याचा एको येतो. मग दोघं घराकडे जायला निघतात. थोडं अंतर चालून जातात आणि........

आणि विहिरीतून आधी छायाचा आणि मग आर्चिसचा एको येतो 'ये'. दोघं दचकून एकमेकांकडे पाहतात.

<< पाकिस्तान्यांनीच लिंबू मिरची टाकल्यानी वाटतां..>> हाटेलात खिम्यावांगडा लिंबू-मिरची ठेवतत; विराटाक हो तसोच प्रकार वाटलो म्हणान त्येना खिमोच केल्यान !! Wink
<< पेंटब्रश मधे चित्रं काढतात हे ऐकून आहे पण जमत नाही.) >> मी मुळातच आळशी असल्याने इथलीं सर्व चित्रं, व्यंचि मीं 'पेंटब्रश'मधेच माऊस वापरून काढतो. फक्त सरावाचा प्रश्न आहे. एकदां हात बसला कीं फार सोपं, सोईचं !!

अंजू Happy आजच्या एपिसोडचा शेवटला भाग भारी होता. अर्थात एको दोघांचा आला त्यामुळे ह्याला acoustics चं काहीतरी कारण असेल. फक्त छायाचाच आवाज आला असता तर गोष्ट वेगळी होती.

पुढच्या भागात दाखवणार आहेत की अभिराम आणि देविका बोलत असतात. ती त्याला एक पुडी देऊन ती नेहमी जवळ ठेवा म्हणजे सगळं नीट होईल असं सांगते आणि तेव्हढ्यात अभिरामला छाया लाल साडी नेसून कुठेतरी जाताना दिसते.

हाटेलात खिम्यावांगडा लिंबू-मिरची ठेवतत; विराटाक हो तसोच प्रकार वाटलो म्हणान त्येना खिमोच केल्यान !! >> Rofl खराच भाऊ.

मग म्हणते की मी एक दिवस ही विहिरच जवळ करणार आहे. हे ऐकून नाथाची बायको म्हणते की असं म्हणू नये, पाण्याला आस लागते (म्हणजे काय?). >> पाणी तिची वाट बघत राहणार.. ती कधी येणार (जीव देणार) त्याची.

अभिरामला छाया लाल साडी नेसून कुठेतरी जाताना दिसते. >> अर्चिसला दिसते तेव्हा पण ती त्याच साडीत असते.

भाऊकाका भारी कमेंट.

स्वप्ना, त्या छायाच्या रीमॅरेजचं बघायला हवं होतं आधीच. आता ब-याच प्रमाणात पुढारलेला आहे समाज. अर्थात ही सिरियल आहे त्यामुळे ते हव्या तशा गोष्टी वळवणार.

तो छाया आणि आर्चिसाचा विहीरीतल्या एकोचा सीन मस्त जमला होता.. आवडेश एकदम.. प्रेडिक्टेबल असला तरी.
...पण ती त्याच साडीत असते>>> सारखा सारखा त्याच त्याच साडीत काय !!! (संदर्भ : अशी ही बनवाबनवी)
सोमवारचा एपिसोड पण छाया कुठे चालली, आम्ही नाही पाहिली वर खर्च करणार !

छाया, अर्चिसला दिसते तेव्हा गुलाबी साडीत असते आणी अभिरामला दिसते तेव्हा लाल साडीत असते. >> Lol
जल्ला माका काल पण ता गुलाबी साडी नेसलाय असा वाटलां.

...पण ती त्याच साडीत असते>>> सारखा सारखा त्याच त्याच साडीत काय !!! (संदर्भ : अशी ही बनवाबनवी) Lol

>>> पाण्याला आस लागते (म्हणजे काय?)
स्वप्ना_राज, 'आस लागणे' म्हणजे ओढ लागणे, हवेहवेसे वाटणे. [आठवः 'भेटीलागी जीवा लागलीसे आस']

(कसंकाय अप्पा वरून)
बबन्या: रे बाळ्या, ता 'रात्रीस खेळ चाले' मदी तुका हॉरर काय वाटता रे?
बाळ्या: अरे मेल्या, ते जी मालवणी बोलतत ना, ताच लय हॉरर आसा !

Pages