२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता हायलाईट्स बघितले! अर काय रन धुमाळी राव दोन्ही इनिंगांमध्ये? Lol
एक आमला सोडला तर बाकी साऊथ अफ्रिकन खुपच आडवे तिडवे हाणतात. सध्या तशीच पद्धत आहे म्हणा तरी रिस्की वाटतात. इंग्लड अन पुढे सा आ नी पण अत्यंत बेकार बॉलिंग केली. सा आ ला पहिल्या २ ओवर मधले ४४ खुप महागात पडले अन नंतर शेवटी पण अत्यंत ढिसाळ बॉलिंग केली. रुट्चा गेम मात्र सरस वाटतो, भौच्या रक्तातच टेक्निक आहे, कित्येक शॉट त्यानी अक्षरशः फिल्डिंग डोक्यात ठेवून अ‍ॅड्जस्ट्मेंट करुन मारले! सिंपली मार्वलस! He is someone I am going to be watch until the end.
बाकी छक्के बसल्यावर पोरी जरा जप्पूनं दांडा धरं अन त्याहीपेक्षा कल्लुळाचं पाणी एकून कान तृप्त झाले! एक ७० वर्षांपुर्वी भारतात पुढे इंग्रज लोकं आपल्या इथे येऊन त्यांचा "क्रिकेट" खेळ खेळतील अन त्यांच्या छक्क्यांवर आपलं गावठी म्युजिक लागेल असं कोणी म्हणलं असतं तर त्या व्यक्तीला तुरुंगात टाकलं असतं इंग्रजांनी! Lol

भाऊ काळजीबद्दल + १. पण इंग्लंड पण हरले होते पहिली त्यामुळे आशा आहे मला. Happy

आज धुमश्चक्री.... आजची मॅच जिंक्ल्यावर पुढच्या सगळ्या हारुन ह्या राऊंड मध्येच बाहेर पडलो तरी कोणाला ही काहीही वाटणार नाही...

प्रत्येक सामना पाहिल्यावर, आपल्या संघाबद्दलची काऴजी वाढतच जात्येय !>>>

भाऊ+१

काला मॅच संपली तेंव्हा हाच विचार मनात आला!
रुट ने मुळापासुनच अपेक्षांना सुरुंग लावला आफ्रिकेच्या!!

पहिल्या ३ ओव्हर मधे ६० आंणि ६ ओव्हर मधे ८०-९० स्कोर ज्यांनी मारला ते इंग्लंडच्या विजयाचे मुख्य शिल्पकार खासकरून रॉय. १६ चेंडूत ४५ धावा ज्या गतीने काढल्या ते अजोड होत्या. रुटने येऊन त्यावर कळस चढवला. रुटकडे कुणाचे लक्षच गेले नाही कारण तो चौकार बरोबर सिंग्लस डबल घेऊन स्ट्राईक सतत फिरवत होता. त्यामुळे त्याच्यावरचा फोकस आफ्रिकेचा कधीच बनला नाही.

<< इंग्लंड पण हरले होते पहिली त्यामुळे आशा आहे मला>> आशा आहेच, पण विश्वासही आहे आपल्या पोरांवर !!

बाकी छक्के बसल्यावर पोरी जरा जप्पूनं दांडा धरं अन त्याहीपेक्षा कल्लुळाचं पाणी एकून कान तृप्त झाले!
<< हे कुठे बुवा ?

बाकी छक्के बसल्यावर पोरी जरा जप्पूनं दांडा धरं अन त्याहीपेक्षा कल्लुळाचं पाणी एकून कान तृप्त झाले!
<< हे कुठे बुवा ?>>>>>>>>>
वानखेडे वर

एकही पोस्ट नाही ? कोणी पहात नाहीये का मॅच ?
पाक ला बरं बांधलय निदान १३ व्या ओव्हर पर्यंत !
सुरवातीला बच्चन चं राष्ट्रगीत जबरा झालं Happy

अर काय अंधी मारला आफ्रिदीनी! बॅट्समन कमी खाटिकच शोभतय ते! Lol मलिक पण हापसतच आहे नुसते!
त्याच्या आधीची विकेट सुद्धा केवढा अक्रॉस द लाईन मारला? ऑफ साईड गोईंग बॉला ला लेग ला हाणतय बेणं.

जाऊ द्या. आपण येऊन इझी मारली म्हणजे बास!
स्पिनर लोकांना खत्तरनाक टर्न मिळत आहे. वि हॅव टु वॅच आउट.
बाकी वहाब रियाझची लै भिती वाटते! Sad

नैतर काये? परवा रुट बॅटिंग करत असताना कॉमेंटेटर पॉईंट आऊट करत होते. शॉट मारतना त्याचं डोकं इतकं स्टेडी होतं. एक दोन वेळा एल्बो वगैरे असला मस्त वर आला. एकदम टेक्स्ट बूक शॉट! अगदी तसले नाही मारले तरी बाकी इतर लोकं व्यवस्थित मिडल तरी करतात. हा भौ म्हणजे बॉलची लाईन कुंकडं, त्याच्या बॅटचा हापसा कुंकडं अन त्याचं डोकं अन डोळे कुंकडं! कशाचा कशाला पत्त्या नाय! हे असले हापशे मारु मारु अन फेकी बॉलिंग करु करु कस काय टिकलं ते काय माहित! Lol

अतिशय पादरा स्कोअर आहे फक्त आपल्याला बदहजमी होऊ नये म्हणजे मिळवली.
धोनी जरा जपून दांडा धरं! Lol

रैना ने पहिल्या ओव्हर मधे विकेट घेतली, पिच बुवांच्या जीभेसारखे वळतय Wink नि रैना ने एकच ओव्हर टाकली, युवीला वापरला नाही. अश्विन ने ३ टाकल्या, बुमराह नि नेहरा ने ४-४ पूर्ण केल्या. काय लॉजिक आहे देव जाणे ! dew वर आशा लावून बसा राव.

असामीजी, खरंय.'स्क्वेअर टर्नर' विकेटवर वापरा ना तुमचे पार्ट-टाईम स्पीनर्स. पाकिस्तानला आयतं खिंडीत पकडलं होतं; सीमर्सना आणून मोकळी वाटच करून दिली त्याना ! असो. आतां जरा संभलके !!

असामी, हौ, काही लॉजिक कळेना.
पहिल्या जोडीनी ६० एक रन जरी केले तरी मस्त काम होईल!

अर काय अंधी मारला आफ्रिदीनी! बॅट्समन कमी खाटिकच शोभतय ते! >>> अरे बुवा तो खाटीक बनण्याच कारण पाकिस्तानी पुनम पांडेचा व्हिडिओ आहे Lol

अवघड करतायेत उगा पाक कडे स्पिनर नाही एवढा भारी तरी प्रॉब्लेम करून घेतायत. युवीला आत्मविश्वास नाही अजून

Pages