रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा हो, आता सुषमाच म्हणेल तिला, पण रस्त्याजवळच्या जमिनीबाबत आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना पडलेला प्रश्न निलीमाला पडू दे रे रवळनाथा....होय महाराजा.

बाकी d3 मधेही सगळे नवे होते . त्याच्यापुढच
पाऊल इथे सगळे नवे तर आहेतच पण कुणाला
अजिबात अभिनयही येत नव्हता , जो आता काही प्रमाणात सुधारत आहे . तरी मालिका
पार्श्वसंगीत आणि वातावरण निर्मिती यावरच
चालणार आहे . 10.30 ची वेळ वेगवेगळ्या प्रयोगासाठी राखून ठेवली आहे .

आजच्या भागात ठोकळा धापा टाकत ठोकळीक बोलावतय. पण तो खिडकीजवळ उभा रवन हाका का मारतय? त्येका खाली जावचो काय प्रॉब्लेम असा? का सुसल्या आणी ठोकळी खाली दत्तीबरोबर पाच-तीन-दोन खेळतात की फेर धरुन नाचत्यात?

पण तो खिडकीजवळ उभा रवन हाका का मारतय?>>>
कारण त्याला हलता येत नाहीये. त्याच्या डाव्या पायाच्या बुटाची लेस, उजव्या पायाच्या बुटाच्या लेसशी बांधली आहे ! डॅमीट !!!

ती देविकाची आई किती कृत्रिम बोलते!

>> हो ना.. काल तर अशी मुरके मारत (छापील पाठांतर केलेले मालवणी) बोलत होती कि मला वाटले ती अभिरामवर लाईन मारतेय. ठोमा मरणार का आता? इकडे वाचुन मालिका पाहायला लागले मी. Happy

काल सुसल्या अशी शुन्यात बघत का बसली होती काय माहित. साबांना हॉरर मालिकांची भिती वाटते त्यामुळे सलग पाहाता येत नाही मालिका. शिवाय घरात आलेल्या पाहुण्यांच्या कृपेने 'अस्सं सासर सुरेख बै', 'सरस्वती' आणि 'कमला' मध्येच दिसते. सगळाच काला झाला डोक्याचा. Uhoh

<< हे मान्गराची जमीन म्हणजे काय??>>> शेती- बागयतीचीं अवजारं, लाकूडफाटा इ.इ. ठेवण्यासाठी घराजवळ किंवा शेती-बागायतीत बांधलेलं खोपटं, असा सर्वसाधारण अर्थ आहे 'मांगरा'चा . घराजवळ जरा बर्‍यापैकी बांधलेला 'मांगर' असेल , तर तो 'आऊट-हाऊस' म्हणूनही वापरला जातो. 'मांगराची जमीन' म्हणजे त्या जवळपासची जमीन असावी.

भाऊकाका, रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का?(आमी घाटावरली माणसं!)

अरे तो घरात आजारी हाय ना? मग घरात कशाला बुट घालुन फिरेल तो? नोबिता समजलाव काय त्येका?>> बुटं नाय पण चपला घालून फिरतात ते घरात. Uhoh लादी असेल तर ठीक पण शेणाने सारवलेल्या जमिनीवर चपला का घालतात कळत नाही.

भाऊ, मांगर म्हंजी काय ता माका पण आत्ताच समजला. Happy

<< रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का? >> अगदीं तसंच. कोणी वेगळं काय सांगितलं, तर खुशाल दाखवा बोट माझ्याकडे ! Wink

नशीब, " नायकांच्या शेतात मांगर नाऽऽऽऽय " हे नाही ऐकायला मिळाले. काय एकेक खेळ चालेल काही सांगता येत नाही.

भाऊकाकांच बरोबर आहे (मांगर शब्दाचा अर्थ). मलापण माहीती नव्हतं, नव-याला (माझ्या) विचारलं मी.

आमच्याकडे घराजवळ बांधलेली असेल त्याला खोपटी म्हणतात आणि शेतातल्याला मांगर.

रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का?>> म्हणजे ती नापीकच असते का?

अरे, जखमी बॅटसमन ला जसा रनर देतात तसा त्या नानांना कोणीतरी प्लेबॅक शोधून आणा रे. आजच्या एपिसोडमध्ये शेवटी काय म्हणाले ते? त्यांचा क्लोजअप मारणार्‍या कॅमेरामनला तर रौरव नरकात पण जागा मिळणार नाहिये. बाकी निलिमाचा सौजन्य सप्ताह सुरु झालेला दिसतोय. नाईक फॅमिली एकत्र यावी म्हणून वकिलाने ही आपल्याला जमीन दिल्याची ट्रिक केली नाहिये ना? आता नाईकांचा 'एकता का वृक्ष' किती दिवस टिकतो पाहू यात.

माधव अगदीच लेचापेचा आहे. मुंबईला गेल्यावर त्याने दरवर्षी वटसावित्रीची पूजा करायला पाहिजे की जन्मोजन्मी हीच बायको मिळो.

म्हणजे ती नापीकच असते का?
नाय ओ काळ्या आईच्या कृपेने भरपूर पिकतं तिच्यात. शेड काय सगळ्या रानात नाय बांधलेलं वस्तीवर बांधलय.

भगवती, सुपीक जागेत एक-दोन खोल्या बांधून तिथल्या तिथे शेतीसाठी लागणारी अवजारं, किंवा कोणी कोणी राहते पण तिथे, छोटंसं घर बांधून मग चुलीवर जेवण वगैरे करण्यासाठी लाकूडफाटापण ठेवतात अशा ठिकाणी.

शेती करायला सोपं जातं. मुख्य घर आणि शेत लांब असेल तर सोयीचं होतं.

वकीलाचा अभिनय बरा आहे. टीव्ही शिरेली मिळतील पुढे मागे आणखी.

ठोकळा ठोकळी आणि दत्ता दत्तीला घेऊन बिग बजेट हिंदी सिनेमा काढूयात वर्गणी काढून.
भाऊबळी !

Pages