मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
केला थोडा बदल .
केला थोडा बदल .
मामा हो, आता सुषमाच म्हणेल
मामा हो, आता सुषमाच म्हणेल तिला, पण रस्त्याजवळच्या जमिनीबाबत आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना पडलेला प्रश्न निलीमाला पडू दे रे रवळनाथा....होय महाराजा.
बाकी d3 मधेही सगळे नवे होते .
बाकी d3 मधेही सगळे नवे होते . त्याच्यापुढच
पाऊल इथे सगळे नवे तर आहेतच पण कुणाला
अजिबात अभिनयही येत नव्हता , जो आता काही प्रमाणात सुधारत आहे . तरी मालिका
पार्श्वसंगीत आणि वातावरण निर्मिती यावरच
चालणार आहे . 10.30 ची वेळ वेगवेगळ्या प्रयोगासाठी राखून ठेवली आहे .
आजच्या भागात ठोकळा धापा टाकत
आजच्या भागात ठोकळा धापा टाकत ठोकळीक बोलावतय. पण तो खिडकीजवळ उभा रवन हाका का मारतय? त्येका खाली जावचो काय प्रॉब्लेम असा? का सुसल्या आणी ठोकळी खाली दत्तीबरोबर पाच-तीन-दोन खेळतात की फेर धरुन नाचत्यात?
पण तो खिडकीजवळ उभा रवन हाका
पण तो खिडकीजवळ उभा रवन हाका का मारतय?>>>
कारण त्याला हलता येत नाहीये. त्याच्या डाव्या पायाच्या बुटाची लेस, उजव्या पायाच्या बुटाच्या लेसशी बांधली आहे ! डॅमीट !!!
अरे तो घरात आजारी हाय ना? मग
अरे तो घरात आजारी हाय ना? मग घरात कशाला बुट घालुन फिरेल तो? नोबिता समजलाव काय त्येका?:खोखो:
नोबिता नाय काय.. हल्लीच 'हॉट
नोबिता नाय काय.. हल्लीच 'हॉट शॉट्स२' सिनेमा परत पाहिला. त्यातल्या एका पाचकळ सीनची आठवण झाली
ती देविकाची आई किती कृत्रिम
ती देविकाची आई किती कृत्रिम बोलते!
>> हो ना.. काल तर अशी मुरके मारत (छापील पाठांतर केलेले मालवणी) बोलत होती कि मला वाटले ती अभिरामवर लाईन मारतेय. ठोमा मरणार का आता? इकडे वाचुन मालिका पाहायला लागले मी.
काल सुसल्या अशी शुन्यात बघत का बसली होती काय माहित. साबांना हॉरर मालिकांची भिती वाटते त्यामुळे सलग पाहाता येत नाही मालिका. शिवाय घरात आलेल्या पाहुण्यांच्या कृपेने 'अस्सं सासर सुरेख बै', 'सरस्वती' आणि 'कमला' मध्येच दिसते. सगळाच काला झाला डोक्याचा.
कुठल्या हॉरर मालिकेविषयी
कुठल्या हॉरर मालिकेविषयी बोलताय तुम्ही. ही मालिका जाम इनोदी हाय.
काय यक यक परतीसाद हायेत
काय यक यक परतीसाद हायेत
<< हे मान्गराची जमीन म्हणजे
<< हे मान्गराची जमीन म्हणजे काय??>>> शेती- बागयतीचीं अवजारं, लाकूडफाटा इ.इ. ठेवण्यासाठी घराजवळ किंवा शेती-बागायतीत बांधलेलं खोपटं, असा सर्वसाधारण अर्थ आहे 'मांगरा'चा . घराजवळ जरा बर्यापैकी बांधलेला 'मांगर' असेल , तर तो 'आऊट-हाऊस' म्हणूनही वापरला जातो. 'मांगराची जमीन' म्हणजे त्या जवळपासची जमीन असावी.
भाऊकाका, रानात शेड बांधलंय
भाऊकाका, रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का?(आमी घाटावरली माणसं!)
अरे तो घरात आजारी हाय ना? मग
अरे तो घरात आजारी हाय ना? मग घरात कशाला बुट घालुन फिरेल तो? नोबिता समजलाव काय त्येका?>> बुटं नाय पण चपला घालून फिरतात ते घरात. लादी असेल तर ठीक पण शेणाने सारवलेल्या जमिनीवर चपला का घालतात कळत नाही.
भाऊ, मांगर म्हंजी काय ता माका पण आत्ताच समजला.
धन्यवाद भाऊकाका
धन्यवाद भाऊकाका
<< रानात शेड बांधलंय आम्ही
<< रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का? >> अगदीं तसंच. कोणी वेगळं काय सांगितलं, तर खुशाल दाखवा बोट माझ्याकडे !
नशीब, " नायकांच्या शेतात
नशीब, " नायकांच्या शेतात मांगर नाऽऽऽऽय " हे नाही ऐकायला मिळाले. काय एकेक खेळ चालेल काही सांगता येत नाही.
भाऊकाकांच बरोबर आहे (मांगर
भाऊकाकांच बरोबर आहे (मांगर शब्दाचा अर्थ). मलापण माहीती नव्हतं, नव-याला (माझ्या) विचारलं मी.
आमच्याकडे घराजवळ बांधलेली असेल त्याला खोपटी म्हणतात आणि शेतातल्याला मांगर.
रानात शेड बांधलंय आम्ही
रानात शेड बांधलंय आम्ही खतं,जळण,जुनं सामान ठेवायला त्याला तुमच्याकडं मांगर म्हणतात का?>> म्हणजे ती नापीकच असते का?
नोबिता समजलाव काय त्येका?>>
नोबिता समजलाव काय त्येका?>>:हहगलो:
अरे, जखमी बॅटसमन ला जसा रनर
अरे, जखमी बॅटसमन ला जसा रनर देतात तसा त्या नानांना कोणीतरी प्लेबॅक शोधून आणा रे. आजच्या एपिसोडमध्ये शेवटी काय म्हणाले ते? त्यांचा क्लोजअप मारणार्या कॅमेरामनला तर रौरव नरकात पण जागा मिळणार नाहिये. बाकी निलिमाचा सौजन्य सप्ताह सुरु झालेला दिसतोय. नाईक फॅमिली एकत्र यावी म्हणून वकिलाने ही आपल्याला जमीन दिल्याची ट्रिक केली नाहिये ना? आता नाईकांचा 'एकता का वृक्ष' किती दिवस टिकतो पाहू यात.
माधव अगदीच लेचापेचा आहे. मुंबईला गेल्यावर त्याने दरवर्षी वटसावित्रीची पूजा करायला पाहिजे की जन्मोजन्मी हीच बायको मिळो.
भूताटकी दाखवायची दिली सोडून
भूताटकी दाखवायची दिली सोडून फालतु काहीतरी दाखवत आहेत रोज
सुशल्या सीआयडी इन्स्पेक्टर
सुशल्या सीआयडी इन्स्पेक्टर निघते की नाही बघा शेवटी
म्हणजे ती नापीकच असते का? नाय
म्हणजे ती नापीकच असते का?
नाय ओ काळ्या आईच्या कृपेने भरपूर पिकतं तिच्यात. शेड काय सगळ्या रानात नाय बांधलेलं वस्तीवर बांधलय.
स्वप्ना, नाना म्हणत होते की
स्वप्ना,
नाना म्हणत होते की दिवा नको घालवूस..
संशोधक, धन्यवाद. दत्ता म्हणत
संशोधक, धन्यवाद. दत्ता म्हणत होता कि काही पिकत नाही तीथे म्हणुन नीटसं समजले नाही.
भगवती, सुपीक जागेत एक-दोन
भगवती, सुपीक जागेत एक-दोन खोल्या बांधून तिथल्या तिथे शेतीसाठी लागणारी अवजारं, किंवा कोणी कोणी राहते पण तिथे, छोटंसं घर बांधून मग चुलीवर जेवण वगैरे करण्यासाठी लाकूडफाटापण ठेवतात अशा ठिकाणी.
शेती करायला सोपं जातं. मुख्य घर आणि शेत लांब असेल तर सोयीचं होतं.
अच्छा, बरीच माहिती मिळाली आज.
अच्छा, बरीच माहिती मिळाली आज. ठांकू.
वकीलाचा अभिनय बरा आहे. टीव्ही
वकीलाचा अभिनय बरा आहे. टीव्ही शिरेली मिळतील पुढे मागे आणखी.
ठोकळा ठोकळी आणि दत्ता दत्तीला घेऊन बिग बजेट हिंदी सिनेमा काढूयात वर्गणी काढून.
भाऊबळी !
बरे वाटले, आज भावंडांना एकत्र
बरे वाटले, आज भावंडांना एकत्र येतांना. एकीची दुकी नका करू म्हणावे.
माईंचा अभिनय एकदम लाजवाब.
(No subject)
Pages