रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< का मला भास होतोय कळत नाही. >> गुरवाक इचारा, आयतो हजर असता हल्ली !! Wink
मालवणी भाषा अस्सल नाही, बर्‍याच ढोबळ चूका आहेत, हें सर्व असूनही व नांवाजलेले अभिनेते नसतानाही कोकणातलं वातावरण व तिथल्या व्यक्तीरेखा साकारण्यात ही मालिका बव्हंशी यशस्वी ठरत्येय, असं मला वाटतं. अर्थात, कथानक कसं उलगडत जातं यावरच शेवटीं लेखनाचं, दिग्दर्शनाचं व एकंदरीतच या मालिकेचं मूल्यमापन होईल, हें आहेच.

भाऊंशी सहमत.
कथानक फसण्याची शक्यता आहे एकवेळ. पण त्या साचेबद्ध मालिकेच्या वातावरणातून खरं वाटावं अशी माणसं, खरं खुरं घर हे अनेक वर्षांनी दिसलं मालिकेत. कदाचित त्यामुळेच एव्हढ्या धपाधप पोस्टी पडत असाव्यात.

वकील काका छुपे रुस्तम निघाले...आधी काही बोलले नव्हते. आज हळूच सांगून गेले माझा पण वाटा आहे.

मृत्यूपत्र खरं आहे का नक्की. हळू हळू अजून काहीजण सांगायला येतील, माझा पण वाटा>>> अगदी हीच शंका आली मला सुद्धा...काहीतरी गौडबंगाल आहे त्या मृत्युपात्राबाबत...

नाथा पण मागणार ना वाटा? तरी निलीमाला संशय आलाय कि मृत्यूपत्र वाचनानंतरच हे सगळं विचीत्र चाललयं. ती छडा लावणार आहे म्हणे.
बहूतेक सुसल्या अण्णांची मुलगी नसेलच. खरे मृत्यूपत्र लपविले असेल. गावात एकट्या गुरवासारखा एकच वकील असेल, मग मनमानी कारभारच असेल.
सुसल्या आणि वकीलाची मिलीभगत असावी.

सगळं गौडबंगाल असेल तर, कदाचित अण्णांना नैसर्गिक म्रुत्यु नसेल आला, गेम केला असेल त्यांचा. बरेच जण सामील असतील.

माझी काहीतरी गल्लत होतेय.
२० एकर जमीनीपैकी
५ एकर नदीकाठची जमीन आईंची आणि दागिने
६ एकर मांगरावरची जमीन दत्ताची
४ एकर जमीन खालच्या बाजुची अभिरामची
५ एकर जमीन वरच्या बाजुची माधवची
शेतीचे एकुण उत्पन्न तीन भावात समान
पैकी १२% उत्पन्न छायाचे
१५% सुसल्याचे
घरावर सगळ्या कुटुंबीयांचा समान हक्क
मग रस्त्याजवळची जमीन आली कुठून?
बर वकीलाने जरी छातीठोकपणे सांगीतले की अण्णांनी जमिनीकडे बोट दाखवून हि जमन तुमची आहे असे सांगीतले तरी वकीलांनी लिखापढी केली आहे का?
ते कितीही बेरकीपणे वागले आणि लबाडी करायचा प्रयत्न केला तरी त्यांची गाठ सायंटीस्टशी आहे म्हणावे.
नाथाची पण हक्काबाबतची लुडबुड व्यर्थ.

भगवती एवढे डीटेलींग लक्षात. ग्रेट.

डोक्याला शॉट नको घेऊस. समजेल लवकर Wink .

नाहीतर मग अण्णाच येतील शेवटी, मी जिवंत आहे, कोणाचं काही नाही.

ती ठोकळी घरातल्यांना कायद्यानी सुष्माचा हक्क आहे वगैरे शहाणपणा शिकवतीय, आता बघू वकीलाला पण सुनावते का की आण्णांनी मृत्युपत्रात लिहीले नसेल तर फक्त तोंडी काय बोलले ते कायद्यात बसत नाही म्हणून!

भाऊंची व्यंगचित्रे आणि कमेंट्स लई भारी. एकंदर सगळा धागाच छान चाललाय.

दत्ता आणि विशेषतः दत्ती या व्यक्तिरेखा खूप आवडल्या.

' मी आतांच काहीं बोललो, तर अण्णांच्या भानगडींत साथ दिली म्हणून मींच अडचणीत येईन' असं कांहींसं कालच्या एपिसोडमधे नाथा बायकोला समजावतो, हें फार सूचक वाटलं.
<< वकील काका आले की अभिरामा गायब होतला >> मालवणीत एक म्हण आहे, ' कोणा कोणाला कसली कसली चिंता, तर रामाला लागलाय सीतेचाच ध्यास !' [ कोणाक कित्याचां, रामाक सीतेचां !']. अभिरामाची स्थिती सध्यां तशीच आसा ! Wink
अण्णा काय धड माणूस होतो असां वाटणां नाय !! सगळां करून सवरून आतां फोटोत्सून मेलो मजा बघताहा !! Wink

सगळां करून सवरून आतां फोटोत्सून मेलो मजा बघताहा !! >> घरच्यांची आणि प्रेक्षकांची Uhoh

आजच्या एपिसोडमध्ये कॅमेरामॅनचा हात दुखणार आहे. किती तो ठोकळ्यावर मारणार?
तसंही ठोकळा लैच भागुबाय वाटतोय, गेल्या जन्मी ससा असावा बहुतेक- झाडाचं पान जरी पडलं तरी आभाळ पडलं म्हणून बोंब ठोकणारा! Wink

मालवणी भाषा अस्सल नाही, बर्‍याच ढोबळ चूका आहेत, हें सर्व असूनही व नांवाजलेले अभिनेते नसतानाही कोकणातलं वातावरण व तिथल्या व्यक्तीरेखा साकारण्यात ही मालिका बव्हंशी यशस्वी ठरत्येय, असं मला वाटतं. अर्थात, कथानक कसं उलगडत जातं यावरच शेवटीं लेखनाचं, दिग्दर्शनाचं व एकंदरीतच या मालिकेचं मूल्यमापन होईल, हें आहेच.>>>>>>>भाऊकाका +१०० Happy

<< काही दिवसांनी प्रेक्षक पण मागू लागतील माझा वाटा >> रात्रीचो टीव्हीचो अर्धो तास आणि 'माबो'चो हो धागो, असो घसघशीत वाटो दिलोहा ना प्रेक्षकांक; आणखी रे हांव कसली करतास ? Wink

भगवती हुशार आहे पोरगी....वकिलांनीसुद्धा असे पत्रक तयार केले नसेल.

बाकी तू त्या सुसल्या नावाने कशी काय हाक मारतेस आता ? ती रुबाबात सांगते सर्वांना "सुषमा" म्हणायचे. येईल बघ तुझ्यासमोर आता ती टेचात सांगायला.

काल ठोकळी परत जराशी जास्त हसलीन.
अभिराम पुन्हा गाणी गात सासुरवाडीक गेलान. (बहुतेक रश्मीने माझ्या लिस्टीत अ‍ॅड केलेली नवीन गाणी परवा त्याची गायची राहून गेली होती म्हणून )
अन तो गायब झालेलो पांडु पण इलो..
....सुख सुख म्हणतात ते या पेक्षा वेगळं काय ! Wink

साप होता तो. कोकणात असा समज आहे कि प्रत्येक घराचा मुळपुरुष एका नागाच्या रुपात घर शेत वगैरेचे रक्षण करतो. त्याला राखणदार म्हणतात. वर्षातून एकदा कोंबडीपण देतात. कोंबडी कसा खातो, ते तो राखणदारच जाणे Wink

Pages