२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किवी स्पिनर्स भारतात आपल्याविरूद्ध खतर्नाक? 'वेक अप कॉल' असेल हा. पुढच्या मॅच पासून जागे होतील सगळे. >> +१. शांत राहा सगळे नि उगाच बाफ भरू नका.

द. आफ्रिकेचा आपण कसोटी मालिकेत केवळ 'स्पिनींग ट्रॅक्स' बनवून धुव्वा उडवला, अगदीं दोन-तीन दिवस राखून. त्याने भुरकटून जावून तशाच खेळपट्ट्या विश्वचषकासाठी आपण बनवणार, हें हेरूनच सर्व संघ तशी तयारी करूनच या स्पर्धेत उतरले असणार. या एका सामन्याने जरी आपला संघ कमकुवत ठरत नसला, तरीही दर्जेदार फिरकीपुढे आपल्या फलंदाजीची धार बोथट होते हें लक्षात आल्याने इतर संघांचा आत्मविश्वास आपल्याविरुद्ध खेळताना दुणावेल, हें नक्की.

<< कमी धावसख्येचा पाठलाग नेहमीच त्रासदायक ठरतो. >> बहुतेक वेळां हवामान, खेळपट्टी इत्यादींमुळेच धांवसंख्या अपेक्षेपेक्षां खूपच कमी झालेली असते व म्हणूनच त्या धांवसंख्येचा पाठलाग करतानाही नेमके तेच घटक त्रासदायक ठरत असावेत.

Just wait man

ही पहीली आहे
आमच्याच घरात येऊन आम्हालाच मारून जाणार का?
इस का जवाब मिलेगा करारा जवाब मिलेगा

किवी स्पिनर्स भारतात आपल्याविरूद्ध खतर्नाक? 'वेक अप कॉल' असेल हा. >>. बस का फा? अरे भारतातील टेस्ट सिरिज विसरलास का? मोईन अलीला बनवणारे आपणच आहोत.

अरे तसे नाही. स्पिनर्स भारतात चालतात हे खरे. पण किवीज जेव्हा भारतीय उपखंडात खेळतात तेव्हा त्यांचा रोल सहसा त्यांच्या ग्रूप मधल्या आशियाई टीम्स ना पुढे जाण्याकरता मदत करणे हा असतो. इथे ते खरेच खेळत आहेत याचे आश्चर्य वाटले Happy

अशिया कपला मांजरेकर्चा कर्स नव्हता. तेव्हा दाखवलेली कॉमेंट्रेटरची लीस्ट बघुन मी खुष झालो होतो. नेमका प्रॅक्टीस मॅचला दिसला व मनात शंकेची पाल चुक्चुकलीच होती. पहिल्या बॉल्सपासुन त्यांचा १२७ झाला तेव्हाही. वन्स अगेन प्रुव्ह्ड की मांजर्‍या इज कर्स टु आवर टीम, रमीज राजा फॉर पाकीच.

मांजर्‍या हटाव!!

छगन भुजबळ यांच्या अटकेने टीम इंडीया मधे नाराजी
पहिली मॅच हरून व्यक्त केल्या भावना.!!!!
---
धोनीचा नविन स्टेटस :- पहिली मॅच "देवाची"..!!

-ट्विटरजोक्स

किवी सारख्या फिरकीशी संबंध नसलेल्या खेळपट्ट्यांच्या देशातून येऊनसुद्धा ते लोक आपली पिच धोनीपेक्षा चांगली जज करु शकतात? साऊदी, बोल्ट, मकक्लेनाघन या तिघाना बाहेर ठेवून ३ फिरकी खेळवणे त्याना जमते आणि आम्ही अश्विनपेक्षा चांगला विकेटटेकर असलेल्या हरभजनला बाहेर बसवतो?

अफ्रिदीची कॅप्टन इनिंग १ रन हवे असताना सुध्दा षटकाराचा विचार करणारा तो जगातील एकमेव फलंदाज असेल. दुसरा सेहवाग आहेच.

खेल खेल मे गेल गेल ने ब्रिटीशांची ईंग्लिश विंग्लिश करून टाकली Happy

कालच्या थकेल्या सामन्यानंतर आज आफ्रिदी आणि गेल बरसले. मजा आली.

गेल अशा फॉर्म मधे असताना, प्रतिस्पर्धी कर्णधार फक्त बघ्याची भुमिका घेऊ शकतो. त्याच्या बाऊंड्रीज आटवल्या तरच त्याला आऊट करण्याची शक्यता निर्माण करता येते (१०० धावांत फक्त १४ सिंगल्स). पण विंडीज कडे सॅमी, ब्राव्हो, सॅम्युअल्स, रसेल असे चांगले खेळाडू आहेत टी२० साठी.

काल आपण हारलो, ह्यापेक्षा दु:ख ह्याचं होतं की चांगल्या फिरकीला तोंड देण्याचं कसब आपले फलंदाज हरवून बसले आहेत. डोमेस्टीक क्रिकेट मधे चांगले फिरकी गोलंदाज नसण्याचा हा परिणाम आहे. आपल्या फलंदाजांचं ईतकं दुबळं फूटवर्क पाहून वाईट वाटलं.

<< त्याच्या बाऊंड्रीज आटवल्या तरच त्याला आऊट करण्याची शक्यता निर्माण करता येते >> ' त्याला टप्प्यातले चेंडू मिळाले तर तो फेकूनच देतो बाउंडरीबाहेर, व आंखूड टप्प्याचे टाकले तर तो आधीच पवित्रा घेवून [ प्रिमेडिटेटेड] शॉट मारतो !'; हें कालचं निरिक्षण होतं समालोचक इंग्लंडच्या हुसेनचं. कदाचित, दर्जेदार फिरकीच त्याच्या झंझावाताला कांहीसं वेसण घालूं शकत असावी.
<< काल आपण हारलो, ह्यापेक्षा दु:ख ह्याचं होतं की चांगल्या फिरकीला तोंड देण्याचं कसब आपले फलंदाज हरवून बसले आहेत. >> १००% सहमत.

काल दोन्ही मॅच वन मॅन शो होत्या. जर नेहमी प्रमाणे आफ्रिदी ० वर आउट झाला असता तर पाकिस्तान १५० पर्यंतच पोहचली असती. आणि बांग्लादेश कदाचित जिंकला सुध्दा असता
आणि क्रिस गेल जर चालला नसता तर बाकिच्या वेस्ट इंडीज फलंदाजाची १८३ धावांच्यासमोर कसोटी लागली असती. १८३ धावा खुज्या फक्त आणि फक्त गेलच्या झंझावातामुळेच वाटू लागलेल्या.

न्युझिलंड विरुध्द मॅच आपण हारली की मुद्दामुन हारली?

आज मलिंगाला सांभाळून घेतले तर अफगाणीस्तान अपसेट करू शकतो. आज शक्यता तर तीच वाटत आहे.
श्रीलंकाची टीम पुर्ण ढेपाळली आहे. चांदीमल आणि दिलशान यापैकी एकावेळेला एकच चालतो (जसा आपला रोहीत नाहीतर कोहली) .

मलिंगा नाहीये आज. पण लंका जिंकतील. त्यांचे स्पिनर्स चांगले आहेत.

आपल्या टीम विषयी. जर जडेजा बॅटींग करू शकत नसेल (तसही, लॉर्ड्स च्या टेस्ट मधली दुसरी ईनिंग, रणजीमधल्या काही ईनिंग्ज आणी काही आयपीएल मॅचेस वगळता त्याच्या बॅटींग च्या आठवणी फारशा नाहीयेत), तर त्याच्यापेक्षा एखादा जेन्युईन लेग-स्पिनर (अमित मिश्रा?) का नाही खेळवत?. त्याच्या फिल्डींगसाठी खेळवतात हे जर लॉजिक लावलं, तर युवराज बॉलिंग करणार नसेल, तर रहाणे ला का नाही खेळवत (फिल्डींग आणी बॅटींग दोन्ही आताच्या युवराज पेक्षा चांगलं आहे)?

<< तर त्याच्यापेक्षा एखादा जेन्युईन लेग-स्पिनर (अमित मिश्रा?) का नाही खेळवत?. >> निदान, नागपुरसारख्या खेळपट्ट्यांवर तरी चांगला लेग-स्पीनर खेळ्वणं आवश्यकच वाटतं.

युवि नि रैना ह्या दोघांचा सध्याचा फॉर्म बघता दोघेही एकाच वेळी संघात असणे हे फक्त डावखुरे - उजवे combo देण्याव्यतिरिक्त का आहेत ते माहित नाही.

Pages