रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा एपिसोड नाही बघतां आला पण तें बरंच झालं असं वाटतंय वरच्या शेरेबाजीवरून ! रच्याकने, << बर ती नंतर म्हणाली एक्सपायरी चेक करा>> हें निलीमामॅडम औषधाबद्दल म्हणत होत्या कीं पेशंटबद्दल ? Wink
<< (रच्याकने गंभीर दिसत नाय आजकाल ) >> ( गौतम गंभीर बद्दल बोलताय ? काढला ना धोनीवरचा खुन्नस त्याने हल्लींच; कोहली स्वतः म्हणतो, धोनी जगातला सर्वोत्तम 'फिनीशर' आहे तर हा कोकलला ' नाही, कोहलीच सर्वोत्तम फिनीशर आहे !! )

शास्त्रज्ञ : तुम्ही त्याला इंजेक्शन द्या.
डॉक्टर : एकच इंजेक्शन आहे बॅगेत
शास्त्रज्ञ : मग देऊन टाका ना
डॉक्टर : खूप दिवसांचं आहे
शास्त्रज्ञ : एक्स्पायरी चेक करून देऊन टाका

कुठलंही इंजेक्शन कुठल्याही तापात दिलं की बरं वाटतं हे शास्त्रज्ञांचं ज्ञान. या दोन्ही पेशांबद्दल दिग्दर्शकाने छान सामाजिक जागृती केलीय.

मालिकेतील कालावधी नेमका कुठला आहे याचा विचार करण्याची गरज नाही कारण मोबाईल्सचा वापर करताना पात्रे दाखविली आहेत म्हणजे तो सद्याच्या दशकातील आहे असे मानायला हरकत नाही. असे असताना ज्या गावात इतक्या सुविधा आहेत तिथे असा एक डॉक्टर आणला आहे, तो इंजेक्शन देताना स्वतःच विरूद्ध बाजूला मान वाकडी करून ते देत आहे शिवाय जणू काही आपल्याच हातात सुई गेल्याची वेदनाही दर्शवितो आहे. विनोद असावा पण अशा एका व्यवसायातील व्यक्तीबाबत दाखविताना किमान काहीतरी दर्जाचा तो दाखवावा.

कोकणपट्टी या मालिकेच्या विरोधात आहे हे वारंवार वाचत असतो....आता "कोकणात असले डॉक्टर आहेत का ?" या अर्थाची निषेधाची पाटी चमकली तर त्यात आश्चर्य नाही.

मालिकेचे रुपडे चेष्टेमध्ये बदलत चालले आहे हे दिग्दर्शक आणि लेखकांनी लक्षात घ्यायला हवे.

कालचा भाग अत्यन्त हास्यास्पद होता.:अरेरे::फिदी: भयानक! घोर अज्ञान! डॉक्टर पण दत्ताने बळजबरीने पकडुक आणलो असा दिसता. ( मध्येच मला तो देविकाचा बाप किन्वा काका असावा अशी शन्का आली)

ता गुरव काय वैदु पण हाय का?

सगळ्या पोस्ट्स Lol
काल शेवटी उद्याच्या भागात माधवचा पण बहुतेक मृत्यू किंवा तो बेशुध्द झालेला दाखवला आहे. एक्स्पायरी डेट उलटलेल्या इंजेक्शनमुळे?

देविकाचा बाप किन्वा काका>>> परफेक्ट..
तो डॉक्टर प्रत्येक वाक्याला रामदास पाध्येंच्या बाहुल्यांसारखा भुवया उडवत बोलत होता. मज्जा !
माशाबा काल बोलली की इथल्या डॉक्टरला नाही जमलं तर मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईन वगैरे.. तेव्हाच शंका आली की माधव या पात्राचं या पृथ्वीतलावरचं कार्य संपत आलं आहे. आजच्या भागाच्या प्रोमोत पण माधवाने हात टाकलेला दिसला !

<< काल शेवटी उद्याच्या भागात माधवचा पण बहुतेक मृत्यू किंवा तो बेशुध्द झालेला दाखवला आहे >> मृत्यू अशक्य; कारणं -१] निलीमामॅडमच्या धाकात इतकीं वर्षं काढलेला हा लढवय्या अशा फालतू धक्क्याने जाणं शक्यच नाही व २] नाईकांच्या घराण्यात मृत्यूपत्र केल्याशिवाय असं जातां येत नाहीं !!! Wink

<< छे तिने तर टायटल साँगातच अपेक्षाभंग केलाय.> टायटल सोंगात म्हणायचंय का ? Wink

तस म्हणा भाउ काही हरकत नाही. त्या मालिकेच टायटल साँग तसही एक सोंगच आहे. कॉस्च्युम, कलरकॉम्बीनेशन, दागिने कश्शाकश्शाचा म्हणुन ताळमेळ नाहीये.

काय तो टपराट डॉक्टर Angry आमच्या कडे नै बै असले डॉक्टर. कुठुन तरी धरुन बांधुन आणल्यासारखा. ठोशा ने घरच्यांशी जरा प्रेमाने वागायला काय हरकत आहे. मोठी सुन / जाउ / वहीनी आहे ती घरातली. दत्ता-दत्ती रागाने बोलतात पण माई, ठोमा, आर्चिस साठी त्यांचं प्रेमपण कळुन येतं.

आर्चिस एवढा मोठा. म्हणजे ठोशा लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही माणसांशी फटकुनच.
आणि सरीता अशी बोलत होती तिच्या ड्रेस घालण्याबद्दल की जशी नवी नवरी पहिल्यांदाच गावी आलीये आणि ड्रेस घालतेय. एवढ्या वर्षात ठोशा गावी आली नाय काय.

अरे काय फालतुगिरी चालली होती कालच्या भागात. नक्की भूताचीच (हॉरर ) शिरेल आहे न हि? कोण तो बावळट पकडुन आणला होता डॉक्टर म्हणून?आधी मला पण तो देविकाचा बाबाच वाटला (खूप साम्य होत त्याच्या चेहऱ्यात). काय तो सीन होता इंजेक्शनचा, सगळा मुर्खाचा बाजार नुसता. असा कुठे कधी डॉक्टर असतो का? आणि वर त्या माधवालाच थांक्यु म्हणला, काय तर म्हणे "आज तुमच्यामुळे मी पहिल्यांदा इंजेक्शन देऊ शकलो".

शिरेलीचे प्रोमो दाखवताना मम्मी म्हणालेली "हि शिरेल नाही लावायची" म्हणून, आणि कालचा तो सीन बघून खो - खो हसत होती.

कोण तो बावळट पाकादुनानाला होता डॉक्टर म्हणून?>>> आधी मी इथे पादुकानन्द वाचलं. Lol
बादवे, अर्थ काय पाकादुनानाला चा?

"आज तुमच्यामुळे मी पहिल्यांदा इंजेक्शन देऊ शकलो". >>>> हे अस एक डॉक्टर म्हणाला? हसु की काय करु ते कळत नाहीये.<<<< अर्थात हसायचच, दुसर काही करू शकतो का आपण?

<< तो सीन हसण्यासाठीच होता असं आपलं मला वाटलं.>> ह्या सिरीयलच्या विरोधात कोकणात आवाज उठवला गेला, तेंव्हा सिरीयलवाल्यानी " आम्ही सकारात्मक वळण देवूं या सिरीयलला", असं आश्वासन दिलं होतं. कालचा एपिसोड ही त्याची सुरवात असावी. Wink

डॉ चा सीन अतर्क्य होता... कै च्या कैच... ठोशा येवढे प्रेशराईज का करत होती.?.दुसरे कोणी असते तर भीक नको पण कुत्रं आवर प्रमाणे ..त्याला म्ह्णाले असते राहुदे तुझे उपचार !!
आणि डॉ च्या तोन्डी बाहेरचे काही असेल तर बघुन घ्या असले संवाद नको होते... त्यामुळे तो डॉ. प्लान्ड असेल असेच वाट्ते..
आणि ठोमा ने चिखलाचा येवढा धसका घ्यावा ? Angry

>>जर आधीपासुनच तिने थोडी नरमाई दाखवुन, परीस्थिती आपल्या हातात घेऊन, सगळ्याना समजावुन आणी समजून घेऊन कारवाई केली असती तर मालीकेला रन्ग चढला असता., पण बाईन्चा पहिल्यापासुनच मला पहा आणी फुले वहा असा शास्त्रज्ञ अ‍ॅटिट्युड होता.
>>पहिल्यान्दा तिच्या स्वरात सुरेख चढ उतार जाणवला. गुरवाला बोलते तेव्हा आणी नन्तर गणेश च्या काळजीने जावेला बोलते तेव्हा. त्या दोन सुरात वेगळेपण होते.

+१

सुटकेस मध्ये चिखल बघून माधवला ताप आला? आरारारारा! भलतंच नाजूक काम दिसतंय हे. निलीमाच्या बाळंतपणात लेबर रुममध्ये हाच बेशुद्ध पडला असेल. बाकी आता निलीमा सुशल्याकडून आपले कपडे परत मागणार काय? सुटकेस बदलली आहे कोणीतरी नक्की. सुटकेसमधले कपडे काढून चिखल भरणं ह्या कामाला वेळ लागणार. आणि तो डॉक्टर काय नमुना आणला होता. माधव झोपलाय तरी म्हणे हा पेशंट का? कोकणात एवढे बिनडोक डॉक्टर असतात? बरं तो कधी इंजक्शन दिलं नाही म्हणतोय, एकच आहे म्हणतोय तरी ही बाई म्हणतेय की दे. हिला नवरा गचकायला हवाय का काय? आणि माधव निलीमासोबत संसार करून साध्या इंजक्शन ला घाबरतोय? चुल्लू भर पानी में डूब जाओ म्हटलं असतं त्याला पण नाईकांना पाण्यापासून भयं आसा ना Happy

नाईकांच्या घरात चहाचं व्हेंडींग मशीन आहे का? सरिता चहा मागितला की लगेच आणून देते ते? बाकी गुरव मात्र फुल्लटू व्हिलन झालाय हा. बघतो कसा डोळे मोठे करून निलीमाकडे. पण निलीमाचं एक आहे - काही झालं तरी बाई आपल्या मतापासून हटत नाहीये मागे. एखादी असती तर गुरवाच बोलणं ऐकून धास्तावली असती. तो काय वाटेल ते बोलला काल. सगळं गांव ऐकतंय आणि ही बाई आपल्याला जुमानत नाही ह्याने पेटलाय तो. त्या नाथाचा काय प्रॉब्लेम आहे? सदोदित घराकडे का बघत असतो तो? दुसरा वेडा नोकर कुठे गायब झालाय?

कालच्या एपिसोडनंतर कथा घोटाळते आहे असं वाटतंय.

निलीमाच्या बाळंतपणात लेबर रुममध्ये हाच बेशुद्ध पडला असेल. >>>>> गेला असेल का लेबर रुममध्ये इथपासुन शंका आहे.

त्यात पण निलिमा म्हणाली असेल मी सांगते म्हणून मूल पाहिजे म्हणू नको. प्रॅक्टिकली विचार कर. आणि ती एकंदरीत सगळी प्रोसेस तिने सायंटिफिक दृष्टीकोणातून पार पाडली असेल. Wink बिच्चारा माधव!

Actor Calling Actor (एफएम ९२.७ वरचा कार्यक्रम)

Dad, मुझे हॉरर सिरियल्स बहोत अच्छे लगते है ये तो आपको पता है. मुझे एक फ्रेन्ड ने कहा की झी मराठी पर एक नयी हॉरर सिरियल शुरु हो गयी है तो मैने कल उसका एपिसोड देखा. Dad, उसमे एक डॉक्टर पेशन्ट को इन्जेक्शन देने से घबरा रहा था. ये कैसे मुमकिन है Dad?

बेटा, इस बातपे मुझको दो पंक्तीया याद आ रही है, अर्ज करता हू, मुलाहिजा फर्माओ
डॅssssssड.............

के उई उई मै मर गई उई उई
डॉक्टर बाबू देर ना कर तू, जल्दी लगा दे सुई सुई उई......बेटे.....उई....उई.

लेकिन Dad, इसका मेरी प्रॉब्लेमसे क्या कनेक्शन?

देखो बेटा, हालाकी इसमे दो राय नही है के इस सिरियल के घर के लोग बडे अजीब है. उपरसे घरमे बहोत अजीब अजीबसी वारदाते भी हो रही है जैसे के सूटकेस मे किचड मिलना, रात के बारह बजे किसीने दरवाजा खटखटाना, घर मे अचानक आग लगना एक्सेक्ट्रा एक्सेक्ट्रा. तो इसके चलते जो डॉक्टर बुलाया गया वो भी अजीब हो ये तो लाझमी है. बाकी फोन जल्दीसे रखो क्योंकी call waiting मे आझमी है.

Pages