रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठोकली वाचली?. काल काय झाल ? स्माईली झकास आहेत सगळ्यांच्या . ह ह पु वा
ती जी ठोकळीला बाई दिसली ती अण्णाची भानगडच असावी . बाकी ता दत्ती मस्त बोलातव . फरा फरा फरा फरा . कालचे अपडेट्स प्लीज Happy

कालचा भाग जरा बरा जमला. भाषेची आता सवय होऊ लागली बहुतेक आपल्याला असं काल वाटलं. शेवंताचं वर्णन मस्त टरकेश होतं. अश्विनी काळसेकर, शेवंता म्हणून पहायला मजा येईल.

हे "धतड धतड धतड धतड "!!!!
माझा अन्दाज खरा ठरला . आण्णांची भानगड - तिची मुलगी सुश्मा .
फक्त भानगड - विहिरित नाही तर झाडावर लटकून मेली .
सहावा वाटा सुशमाचा .
अश्विनी काळसेकर, शेवंता म्हणून पहायला मजा येईल. >> + १००००

घरात अर्चिस , माई आणि सत्ता आजारी आहेत. ठोकळी सोडुन सगळ्याना वाटतय की हे कालच्या प्रकारामुळे झाले आहे . ठोकळी औशध देउ करते , पण माई म्हणते सगळ निवळल्यावर मला बरं वाटेल. दरम्यान नाथा आणि त्याची बयको ( यमी???) यान्च काहितरी संश्यास्पद बोलण होतं . वकिल काकांना कालचा प्रकार कळल्यामुळे ते सगळ्यान्ची चौकशी करायला घरी येतात. मग सगळे त्याना सहावा वाटा कोणाचा ते सांगण्याची गळ घालतात. हो-नाही करत ते तयार होतात पण सगळ्याना हजर रहायला सांगतात. नाथा आणि सुश्मा ला पण बोलवतात . माई सुशमाला घरात येउ देत नाही त्यामुळे ती पडवीतच थांबते. वकिलकाका सांगतात की सहावा वाटा सुशमाचा आहे. त्यावर सगळे आश्चर्यचकित होतात. सत्ता भडकते. माझा नवरा राब राब राबतो घरासाठी , बाकीचे फक्त बघायला येतात. आता आपापला हिस्साघेयुन जातील म्हणून ती सगळ्यान्समोर बिथरते. आणी नोकराच्या मुलीला आपल्याबरोबरीने वागवल जातय म्हणून आणखी चिडते.वकिल काका सांगतात , तो हिस्सा का दिला गेला ते माई सान्गतिल आणि ते निघून जातात. ठोकळी माईना खर काय ते सांगायला सांगते.
माई म्हणतात , अण्णानी अनेक लोकांच्या जमिनी हडपल्या , त्यांची हाय लागली आहे. अण्णांची आता २० एकर जमिन आहे , कोणे एके काळी ती २५० एकर होती . त्यानी गावात एक बाई ठेवली होती - शेवंता. तिच्या नादाला लागून त्यानी बरीचशी जमिन तिच्या नावाने केली आणि मग तिने ती विकून बक्कळ पैसा कमवला. तिला या घरात यायच होतं पण माईनी येउ दिलं नाही. बराच विरोध झाल्यावर , माई बधत नाही म्हटल्यावर ती एकदा घरी येउन पोचली. शेवंताच वर्णन त्या - ठोकळीला भेटलेल्या बाई सारखच करतात. शेवंताने मग समोरच्या झाडाला लटकून जीव दिला , पण लटकतानाही तिची मेलेले डोळे घरावर रोखले होते ( असं सांगून आपल्या अंगावर काटा आणतात Happy ) . सुश्मा - शेवंताची मुलगी आहे. दरम्यान कधीतरी सुश्मा घराकडे बघत बघत फाटकाच्या बाहेर पडते.
शेवटी परत घराचा ड्रोन शॉट झाडावरून Uhoh

कथानकातील हाच भाग अगदी....(व्यावहारीक पातळीवर)....न पटणारा आहे आणि लेखकाचे ते अपयश मानावे लागेल. ज्या रखेल बाईला २००+ एकरांची जागा मिळाली आहे तिच्या यजमानाकडून (किंवा तिने मिळविले आहे आपल्या अक्कलहुशारी आणि सौंदर्याच्या जोरावर) ती आपल्या सवतेचं घरही आपल्या नावावर करून मिळावे असा आग्रह धरेल असे वाटत नाही. कारण कोकण असो वा पठारावारील प्रदेश, चारचौघांसमोर लग्न करून घरात आलेल्या स्त्री चा मान सर्वत्र ठेवला जातोच...पै पाहुणे आणि शेजा-यापाजा-यांतही. शिवाय नानांना अगोदरच चारपाच पोरे आहेत आणि ती जाणती होत असताना आता त्या सर्वांना बाहेर काढून आपल्याला ते घर मिळेल असे शेवंता मानत असेल हे पटत नाही....बरं ते घर म्हणजे मालवण भागातील सर्वसामान्यांच्या घरासारखेच आहे.....काही प्रचंड असा जमीनदारी वाडा वा महाल नव्हे, ज्याचे आकर्षण सर्वांना वाटावे.

अगोदरच तिने बक्कळ मिळविलेले असताना केवळ एक घर मिळत नाही म्हणून त्या घरासमोरील झाडाला लटकून जीव देते हा तर बाष्कळ लिखाणाचा कळसच होय...जीव देण्याइतपत इतकी मूर्ख ती निश्चित्तच नसणार. (एक मुलगीही आहे तिला...तिला काय असेच वा-यावर सोडले म्हणायचे ?).

फ़ार कच्चे झाले आहे हे आत्महत्या प्रकरण.

मामा , तुम्ही म्हणताय ते खरं आहे .
पण ती "घर" म्हणजे - घरात शिरकाव या अर्थी म्हणते . घरातली सत्ता.

पण या पूर्ण प्रकारात - काळ - काम - वेगाची गणितं चेकल्यासारखी वाटतात.
सुशमा , आर्चिस किन्वा पूर्वाच्या वयाची वाटते. त्यान्च्या पेक्शा ७-८ मोठी म्हटली तरी चालेल.
म्हणजे तेन्व्हा माधव, दत्ता आणि ईतर दोन मुलेही बर्यापैकी मोठी असणार.
फक्त एक बाई आहे , हे प्रकरण जरी कळलं नसेल तरी अंगणात एवढा मोठा प्रकार होतो हे नक्कीच विसरण्यासारखं नाही. माई हे सांगत असतात तेन्व्हा दत्ताच्या चेहर्यावर ओशाळलेले भाव आहेत. जणू त्याला हे सगळ माहित आहे. माधव आणि ईतरांना - सत्तासोडून - मात्र धक्का बसला आहे. माधव मुंबईला गेला ही गोष्ट खरी असली तरी ईतकी मोठी गोष्ट लपून रहाण्यासारखी नाही.

प्रोमोमध्ये ठोकळी कीचनमध्ये येउन मी काही करू का विचारते , ईथे तर ईकडची काडी तिकडे करत नाही.

तर काल अण्णी अचानकच आजारी पडली. माधव तिच्या डोक्याशी बसून तिची विपू करत असतो. आणि दत्ती एक तवा जमिनीवर ठेऊन त्यावर फडकंबत असते, आणि मग तेच फडकं स्वतःच्या कपाळावर दाबत असते. बहुतेक डोकं शेकत असते.
तेवढ्यात ठोकळी येते. दत्ती तिला एका डोळ्यानं बघत घरातल्या कामांवरुन टोमणे मारत असते... मध्येच अर्चिसला शिंक येते.. ठोकळी त्याला प्रेमाने (असं आपण समजायचं) म्हणते तुला गोळी देते मग बरं वाटेल"(पण सासूला साधं विचारत पण नाय), यावर दत्ती उसळते, आणि म्हणते, "ह्या काय सादासुदा नाय, ह्या असा बरा होणारा नाय. " मग ठोकळी चिडून वर निघून जाते. तेवढ्यात वकील येतात. ठोकळी परत येताना गोळ्या घेऊन येते आणि अण्णीला द्यायला जाते. परत दत्तीचा तोच डायलाॅग.
दत्ता आणि दत्तीची नजरानजरी होते आणि मग दत्ता वकीलांना सहाव्या वाट्याबद्दलचा बहुचर्चित प्रश्न विचारतो. सुषमा अंगणाची पायरी चढायला लागल्यावर अण्णी तिला रोखते. सहावा वाटा सुषमाचा आहे हे कळल्यावर दत्ती पिसाळते.. आणि वर सुजाने म्हटल्याप्रमाणे फरा फरा फरा फरा तोंडाचा पट्टा सोडते. त्यात कामाचं एवढंच कळलं की दत्तीला मोठा मुलगा आहे आणि तो वाया गेलेला आहे. मग वकील सगळं अण्णीवर सोपवून निघून जातात.
अण्णी - "तुमच्या अण्णांनी काय कमी भानगडी नाय केल्यानी. लय लोकांच्या जमिनी हडपल्यानी. अगदी गावात एक बाई... शेवंता तिचा नाव. तिचीच लेक सुषमा. आज अण्णांच्या नावावर २० एकर जमीन हाय. पण तेव्हा २५० एकर जमिनीचे मालक होते. सगळी जमीन तिच्या नावावर केल्यानी. दागदागिने दिल्यानी. गावात घर दिल्यानी. पण तिका ह्या घरात येवचा व्हता. नायकांच्या घरावर सत्ता गाजवायची होती. पण मी तिका
येवकं दिलय नाय. शेवटी ती दारात आली हिरवा शालू, चुडा, दागिने मळवट... इ. घातलेली. मी तिला घरात घेतली नाय म्हणून तिना समोरच्या झाडाकं लटकून जीव दिल्यानं. डोळे भायरं इल्याले. जीभ भायर इल्याली. पण नजर स्थिर घराकडे बघत...... हा सीन खरंच टरकवणेबल होता.

मध्येच अर्चिसला शिंक येते.. ठोकळी त्याला प्रेमाने (असं आपण समजायचं) म्हणते तुला गोळी देते मग बरं वाटेल"(पण सासूला साधं विचारत पण नाय), यावर दत्ती उसळते,

हो अगदी अगदी . त्या ठोकळीच सासू आणि दत्तीला इग्नोर करणं खटकलं . पण नंतर निदान सासूला औशध आणून तरी देते.

हा सीन खरंच टरकवणेबल होता.>> हो मी ही टरकले , माईना बघून .

दत्तीला - छाया का कामात मदत करत नाही ते कळलं नाही . बघाव तेन्व्हा जिन्यावर बसलेली असते.

अरे मी लेट झाली का? बरं... असुदे. Happy

स्वस्ति +१. मला पण ते पटलं नाही.

शेवटी परत घराचा ड्रोन शॉट झाडावरून >> हा शाॅट इतक्या उंचावर घेतलाय की भानगडीला झाडावर चढुन दोरी बांधून मग फास गळ्यात अडकवून झाडावरुन खाली उडी मारावी लागली असेल तेव्हा ती फास लागून मेली असेल. एवढ्या वेळात कोणीही तिला वाचवायचा प्रयत्न केला नाही का?
किंवा
तीने जीव दिला तेव्हा ती फांदी खालीच होती असेल आणि आता झाड वाढलं तसं ती फांदी पण उंचावर गेली असावी. Proud

मग यात किती वर्ष गेली आणि मुलांना काहीच कसं माहित नाही हा प्रश्न उरतोच.

पण या पूर्ण प्रकारात - काळ - काम - वेगाची गणितं चेकल्यासारखी वाटतात.
सुशमा , आर्चिस किन्वा पूर्वाच्या वयाची वाटते. त्यान्च्या पेक्शा ७-८ मोठी म्हटली तरी चालेल.
म्हणजे तेन्व्हा माधव, दत्ता आणि ईतर दोन मुलेही बर्यापैकी मोठी असणार.>>
+१
आणि गावकर्यांना माहित आहे तर घरातल्या मोठ्या मुलांना माहित नाही असं कसं? बरं हा प्रकार गुपचूप झाला असंही नाही, राहत्या घराच्या अंगणात झालाय. माधवचं लग्न होऊन तो मुंबई ला गेला असला तरी इतर तिघांना हा प्रकार माहिती असलाच पाहिजे. बरं ग्रुहित धरुया की मुलं घरात नसताना हे सगळं झालं तरीही गावात आशा गोष्टींची चर्चा/कुजबुज बरेच दिवस चालते तेव्हा तरी कळायला नको का?

खुळो पांडू व देविकाचो बापूस सोडले तर बाकीच्यांचं मालवणी अत्यंत टुक्क्क्क्कार आहे. ही बोलीभाषेतली ढवळाढवळ खपवली जाणार नाही. यांची मालवणी ऐकून कदाचित आश्विनी काळसेकरणीन जीव दिला असेल.. Happy

आश्विनी काळसेकरणीन जीव दिला असेल.. >>> ओ थांबा थांबा. त्या रोल मधे अश्विनी काळसेकरला पहायला मजा येईल असं बोललो मी. ती आहे की नाही सध्या माहित नाही हाsssss ! Happy

एवढी इस्टेट त्या बाईला दिली होती मग मुलीच्या नावाने पैसापण बक्कळ ठेवला असेल की तिने, मग मुलगी इथे अशी का राहतेय ह्यांच्याकडे.

बाकी ठोकळी नाव पहिल्यांदा ज्यांनी दिलं इथे त्यांना hats off.

अफाट चूका केल्यात. सस्पेन्स नीट ठेवताच आला नाही याना. गम्मत म्हणजे प्रोमो मध्ये दाखवतात ना की दत्ताची सत्ता ( दत्ती) ठोकळी ला विचारताना दाखवलीय की रात्री झोप नीट लागली ना, मग ठोकळी अगदी हसत मोकळे पणाने सान्गते की हो, पण बाजूला कोम्ब्ड्यान्चे खुराडे होते. आता आल्यापासुन आपण बघतोय की या दोन बायान्मध्ये अजीबात पटत नाही, मग एवढा मोकळेपणा आला कुठुन? वर अशोक मामान्ची पोस्ट पण सही आहे. उगाच कोणी आत्महत्या करेल आणी घरातल्या मुलाना समजणार पण नाही?

त्यातुन सुषमा, अर्चीस एवढी वाटते वयाने.

थोडी रंगायला लागली आहे सिरिअल . ठोकळी मध्ये बहुतेक ती शेवंता घुसली असणार... असे वाटते मग छान अभिनय करेल ती पुढच्या भागात .

माशाबाला पाहून भूतं हादरलेली असतात. त्यांच्याकडे पण दिवसा खेळ चाले ही सीरीयल चालू असते. त्यात ही माशाबा भर रात्री समुद्रावर जाऊन त्यांना घाबरवते.

छान अभिनय करेल ती पुढच्या भागात .>> स्वराली, त्यानंतर मी तिला अजाबात ठोकळी म्हण्णार नाऽऽऽऽऽय. Happy

नवीन प्रोमोमध्ये बहुतेक दत्ता नि दत्तीचा फुकट गेलेला मुलगा गणेश घरी आलाय... तो म्हणतो अण्णा कुठेही गेले नाहीत.. इथेच आहेत. म्हणजे अण्णा भूत झालेत हे नक्की समजायच का? आता अण्णा आणि शेवंताचं भूत मिळून नाईकांना त्रास देणार वाटतं. मेल्यावर पण अण्णा भानगडीतून बाज आला नाही. किती त्या माईला छळणार.. Sad

मामांची पोस्ट पटली.

कदाचित तिचा खून करून झाडाला लटकवलं असेल, आत्महत्या नसेल ती. भासवलं असेल.

पण तिच्याबद्दल माहिती नसेल कोणाला, हे काही पटत नाही.

रस्त्यावर रिकाम्या हातान चल्लेल्या पाहुण्यांका गाव फिरवत नेणाऱ्या त्या चिरंजीवास ( नाव आठवत नाही आता ) घराकडे बोलावुक आधीच फोन कारायचो ना, येड्याक पाठवीत कशाक होते आधी,

पहिल्याच दिवशी म्हातारो गजकाच्या आधी पावणे इलेले , ते ऱ्हवले खय, कपडे बीपडे आणूक नाय तेंनी ?

कटप्पांन बाहुबलीक कित्याक मारल्यान, या समाजाच्या आधी सहावो हिस्सो समाजलो, तर बरा होयत....

पडसाद उमटलेच

व्हॉट्स अप मॅसेज,,,

कोकणात भुतखेतं असतात अशा आशयाची टीव्ही मालीका प्रसारीत करून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठलेल्या महाभागांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे
त्याचबरोबर सागरी पर्यटन धोक्याचे आहे अशी चुकीची आणि कोकणातील काही सागरी किनाऱ्याबाबत निखालास खोटी माहिती देणाऱ्यांविरोधात कोकणवासियांचे एल्गार उभारणेकरिता आज सायं ६ वा चिपळूण रेस्ट हाऊसला मिटींग आयोजित करण्यात आली आहे

Pages