रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कुणीतरी कोकणातल्या भुताखेतांच्या गोष्टी सांगतय म्हणुन प्रेमात पडलेली ही पहिलीच बहुदा.

कालच्या भागात समुद्र अप्रतिम दाखवला Happy

ती किंवा माधवही वाईट नाहीयेत आजोबा. अभिनयात ठोकळे आहेत असं म्हणतोय आम्ही. पहिल्या एपिसोडमधे तर तिच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नव्हती. म्हणुन तिला नाव दिलं ठोकळी Happy

आणि म्हणे मी काही काम करणार नाही. केलं तर उगीच खोबरं कमी/ कोकम जास्त म्हणतील. ऑ? मोठी जाऊ ना ही. आमच्या कडे येउन बघ म्हणावं Lol

शुभांगी >>>>> Thanks for update on last episode...

Baki Serial baddal bhiiti yekunach kammi zali italya posti wachun..

Smileys ekdam mast aahet saglyach.

अगो अंजू ,नायकांच्या घरातलं कोणी न कोणी पण्यात खेचल जात नव्ह. काल तो अर्चिस खेचला जात होता. आत्ता आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही Happy

माधवसारख्यांना म्हणजे..

आज वांगं चालेल का - हो
कि दोडका करू - चालेल
पण गवार आहे घरात - ठीक आहे
कि चपातीचा चिवडा चालेल - हो
नाही तर आळूचं फदफदं - चालेल
नीट सांग ना , मला काहीच सुचत नाही - मी काय सांगणार ? ठेविले अनंते तैसेचि रहावे

इकडे त्या कोंबड्या नाय वालीने मलाच मेलीला सगळं काम करायला लागत म्हणुन टाहो फोडला.>> तिच्या सोबत एक तन्द्रीत असलेली यमु मोलकरीण दाख्वली.. हीचा ही काही रोल असू शकतो सस्पेन्समध्ये.

अभिरामाच्या बायकोस फोन करुन तिच्याशी अभिरामाने गप्पा मारल्या आणि डेटवर येतेस का अस विचारल.>>> त्यब्द्द्ल देवकिच्या आईने तिला झापले. आणी धुणे धुवाय्ला लावले Proud . वरुन असेही म्ह्णाली कि त्यपेक्शा हीरीत ढकललेली बरी!!

आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही स्मित>>>> आणि आपली ठोक्ळी म्ह्णेल त्यात कै विशेश , ग्राविटेशनल फोर्स मुळे खेचतो समुद्र, मासे समजुन माठान्ना !!! Biggrin Biggrin

ऑ? मोठी जाऊ ना ही. आमच्या कडे येउन बघ म्हणावं >>>>> पण ती शास्त्रज्ञ पण आहे ना, म्हणुन चालत तिने अस म्हटलेल.. आपल्याकडे अस नसत ना... तुमचा हापिसातला हुद्दा ठेवा तिकडेच आणि घ्या खोबर खोवायला.

गुब्बे थान्कु अपडेट्ससाठी.

अगो अंजू ,नायकांच्या घरातलं कोणी न कोणी पण्यात खेचल जात नव्ह. काल तो अर्चिस खेचला जात होता. आत्ता आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही, हे इंटरेस्टींग होय सुजा, सही.

पण ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा.

त्या अण्णांची काही भानगड होती का ?? कि त्यांची नजर वाईट होती ?? काल त्या देविकाची आई म्हणाली, तरी मी म्हणत होते त्या नाईकांशी सोयरिक नको, अण्णा कशे होते ते त्या साऱ्या गावाला माहित होते.... अशा संदर्भातलं काही तरी बोलत होती

आई चाललिये आता समुद्रात >>> आई चालत गेली आणि पोर कार नी .. ठोकळी दुसर्या बिच वर गेली वाट्ट !
आणी पोर लोक चार होते तरी २ कार नी आणि २ बाईक ने गेले... सम्थिन्ग फिशि ना?

तिच्या सोबत एक तन्द्रीत असलेली यमु मोलकरीण दाख्वली.. हीचा ही काही रोल असू शकतो सस्पेन्समध्ये. >>> ती काल भांडी चोरायचा प्रयत्न करत होती, आणि शेवटी खोलीतून बाहेर जाताना एक भांडं नेलच तिने !!

श्रद्धा_ बरोबर तसच असेल अण्णांची भानगड. म्हणूनच तो सहावा वाटा. आणि साखरपुड्याच्या दिवशी त्यांची बायको पण मक्ख होती. त्याच कारण हि तेच असेल Happy

पण मी लहान जाऊ आहे घरात. म्हणुन म्हणत होते. >>>> अग तुला मोठी जाउ तरी आहे आमच्याकडे मोठी, मधली, धाकटी सगळा वन वुमन शो आहे.. आता बोल..

ती काल भांडी चोरायचा प्रयत्न करत होती, आणि शेवटी खोलीतून बाहेर जाताना एक भांडं नेलच तिने !!>>> अय्यो भारी ओब्सर्वेशन.

ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा >>>>> अन्जुने सिक्सरच मारला आज.. नाईकांना समुद्राची भिती आहे काय, बघतेच त्या समुद्राकडे आज.. असा तर विचार करत नसेल ती?

त्या देवीकाचे वडील कसला भीषण अभिनय करतात, काल तिची आई देविकाला ओरडत असताना त्यांचा चेहरा मक्ख म्हणजे इतका मक्ख होता !!

काल तिची आई देविकाला ओरडत असताना त्यांचा चेहरा मक्ख म्हणजे इतका मक्ख होता !! >>> असंच होतं काही दिवसांनी कोडगेपणा अचूक दर्शवलाय

Pages