पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत टुकार सिरियल Sad
नायक नायिका आणि त्यांचा ग्रुप, एकाच्याही नाकावरची माशी उडेल तर शपथ( आधी बसली तर पाहिजे, तिला बिचारीलाही काही चॉईस आहे की नाही)
गिरिश ओक मुरलेला अभिनेता आहे पण त्याच्याकडून अवास्तव काहीतरी करून घेत आहेत.

एक `गुंडा पुरूषदेव' नावाची सीरिअल होती पूर्वी ( सुरू झाली आणि नंतर अचानकच गुंडाळली) , तशीच थीम आहे या सीरियलीची.

गुंडा पुरुषदेव या सिरेलीत काय होते माहीत नाही... ती बघितली जायची. कदाचित नेहमीचा भरजरी भडक भंपक भ्लोजप (आपले ... क्लोजप ओ..) भपका नव्हता, म्हणून बघितली जायची.

गुंडा पुरुष देव बहुतेक लिमिटेड एपिसोडसची होती. श्रीरंग गोडबोले यांची होती. बरेच दिग्गज होते त्यात पण मला बोअर वाटायची म्हणून मी जास्त बघू शकले नाही. पण star cast खूप छान होती.

हा ते कॉमन वाटतेय. मोहन जोशी यांना त्यात 'गुंडा पुरुष देव' ह्या घराण्याच्या देवाचं नीट झालं पाहिजे, असा आग्रह असायचा आणि ते बायकोला वगैरे वेठीस धरायचे त्यासाठी तसंच इथे गिरीश ओक आग्रही मठाच्या कारभाराबाबत.

दोन नंबरची सून आल्यावर काहीतरी परिस्थिती बदलत जाते, कर्मठपणा कमी होतो बहुतेक तसंच इथे असेल सून आल्यावर.

दोन नंबरची सून आल्यावर काहीतरी परिस्थिती बदलत जाते, कर्मठपणा कमी होतो बहुतेक तसंच इथे असेल सून आल्यावर. > हे फारच अचानक गुंडाळलं. आजुन एक साम्य म्हणजे सुनेची आई, आजी उद्योजिका आणि घर सांभळणे बाबांकडे. इथेही आई नोकरी करून घर चालवते आणि बाबा लेखन करतात.

कालच्या भागात तो वासु उर्मीकडे येतो तेव्हा ब्राउन पँटमध्ये होता आणि नंतर ती दोघं बागेत बोलत असतात तेव्हा त्याने ब्लू जीन्स घातली होती. घरातून बाहेर येता-येता पँट बदलली की काय? Wink

बरं उर्मी बाबाला सांगते "आम्ही गच्चीत जातोय रे. " आणि प्रत्यक्षात मात्र घराबाहेरचं बागेतलं शुटींग होतं. असं वाटतंय एडिटींग गंडलंय पुरं.
मी फक्त कालचा भागच बघितला.

साती " हा माझा शर्या " अस नाही ना म्हणाला नवरा Lol
नवर्याला एकेरी नावाने हाक मारणे . लिंबू कुठल्या जमान्यातले आहात तुम्ही ? नवर्याला एकेरी वा नावाने बायका हाका मारायला लागल्यापासून जमाना लोटला Happy
मनाली . खरच मेले ठार Rofl

ही सिरियल डोक्यात जाते आहे.
वासुचा बाप जाणूनबुजुन फारच लाऊड दाखविला आहे, व "मठाधीपति" बनवुन सेरियल आडून हिंदु धर्मावर्/विशिष्ट जातीवर यथेच्छ राळ उडविण्याचे निमित्त साधले आहे असे माझे मत.
त्यात जे दाखवितात ते पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असेलही कदाचित, पण ते आत्ता २०१५ मधे अस्तित्वात आहे असे दाखविले आहे हाच मोठा विनोद आहे.
पूर्वी कसे, फक्त लाल अलवणातील स्त्रीया दाखवित, विधवा वगैरेंची शंभर दिडशे वर्षांपूर्वीची दु:खे आज २०१५ मधे उगाळीत बाकी समाजाच्या भावनांना भिती दाखवित हात घालीत स्वतःचा धन्दा करणारे लेखकु/दिग्दर्श्क/सिनेमानाटकवाले यांचे पेव फुटले होते, तस्सेच अगदी सध्या सेरियलींच्या जमान्यात अशा निर्मात्यादिग्दर्शकांचे पेव फुटले आहे, वाईट इतकेच वाटते की हे "झी मराठी" वर घडते आहे.
वरील मत माझे वैयक्तिक मत आहे.
ही सिरियल लावली की लिंबी देखिल च्यानेल बदलून जुनी गाणी लावुन बसते.

ही सिरियल लावली की लिंबी देखिल च्यानेल बदलून जुनी गाणी लावुन बसते.>>> बदलाचं चांगलं लक्षण.

आई रहायला आल्यामुळे काल ही सिरियल बघायचा योग आला. हिरो-हिरॉइन बहिण भाऊ वाटतात. चेहरेपट्टी सारखीच वाटली मला.

आणि कॉलेज लास्ट इयरला असणार्या मुलाचं लग्न? बात कुछ हजम नही हुई.

ही चर्चा वाचून शीरेल पाहू लागले, तुनळी वर २ मी. चे एपिसोड...त्यामुळे गिरिश राव त्यन्च्या मोठ्या मुलाला दुजा भाव का करत आहेत ते कळले नाही...

अरे जिथे मुलीला १२ वी परीक्षेला न बसू देता तिचं लग्नं लावतात तिथे मुलाचं कॉलेज लास्ट इयरला लग्न लावणं ठीक आहे ना Wink

अ आणि अ मालिका आहे ही.

वासुचा बाप जाणूनबुजुन फारच लाऊड दाखविला आहे, व "मठाधीपति" बनवुन सेरियल आडून हिंदु धर्मावर्/विशिष्ट जातीवर यथेच्छ राळ उडविण्याचे निमित्त साधले आहे असे माझे मत. >> हो ना .
देवसाखरी गाव टाईममशिनमध्ये अडकल्यासारखे वाटतेय . उर्मी ची विचारसरणी आणि वासूचं बॅकग्राउन्ड , यामधल्या तफावतीसाठी असेल , कदाचित . पण फारच लाउड आहे.
कुठलीही सून , आंघोळ न करता , सकाळच्या वेळी घराबाहेर रांगोळी काढणार नाही , हे नक्की .
आणि साधारण ९ - १० वाजता त्या सूनेची आंघोळ झाली नसेल , हे पटत नाही Happy

ब्राम्हणांच उगाच विद्रुपीकरण करणा चालू आहे असा सरळ वाटतंय :राग:... आजकाल एवढा कोणीही कर्मठ नसता.... ही serial पण तशीच ....
खरच पण खूपच परंपरावादी दाखवलाय ते कुटुंब... मोठ्या सुनेचे वडील आजारी तर सासूबाई म्हणतात परंपरा आहे मोठ्या मुलाने आणि सुनेने सोड्मुन्जीला बसायची... अरे काय यार.... जरा पण माणुसकी नाही.. कसला देव न कसला धर्म...

आजच्या भागात दादा प्रवचन देताना स्त्रियांनी शिकलं तरी नोकरी का करू नये यावर भाष्य करत होते. 'मुलगी शिकली आणि प्रगती नाही तर अधोगती झाली असं म्हणाले.' Angry Angry

राधोदय, या मालिकेतल्या दादांसारख्या विचारसरणीचे लोक खरोखर आहेत अजुनही आपल्याकडे.. मला अशा लोकांचा राग येण्याऐवजी कीव येते हल्ली. कारण या लोकांच जग हे अजुनही बारा बलुतेदारांच्या काळात अडकलेल आहे. त्याबाहेरच्या जगात कैक वर्ष उलटुन जाउन प्रचंड उलथापालथ झाली आहे हे त्यांना नुसतच ऐकुन माहित असत.. मनानी हे लोक त्या नव्या जगात गेलेलेच नसतात..

राधोदय, या मालिकेतल्या दादांसारख्या विचारसरणीचे लोक खरोखर आहेत अजुनही आपल्याकडे.. मला अशा लोकांचा राग येण्याऐवजी कीव येते हल्ली. कारण या लोकांच जग हे अजुनही बारा बलुतेदारांच्या काळात अडकलेल आहे. >>>> +११११

आणि कधीक्धी हे लोक फक्त वयाने मोठे असल्यामुळे त्याना सुनवता येत नाही ईछा असुन पण

कुठलीही सून , आंघोळ न करता , सकाळच्या वेळी घराबाहेर रांगोळी काढणार नाही , हे नक्की .
आणि साधारण ९ - १० वाजता त्या सूनेची आंघोळ झाली नसेल , हे पटत नाही >>>>> ही दोन्ही विधानं हास्यास्पद आहे. Happy

आजकाल एवढा कोणीही कर्मठ नसता.... ही serial पण तशीच .... >>>>> अगदी तंतोतंत असच उदाहरण ओळखीत बघितलेलं आहे. सुनेचे वडील नुकतेच गेलेले पण तरी काहीच दिवसांमध्ये घरी दणक्यात महाराजांचा उत्सव साजरा झाला. वर 'सुनेच्या माहेरचं सुतक तीन दिवसच असतं' त्यामुळे उत्सव करायला काही हरकत नाही असा काहितरी युक्तीवाद !!

ब्राम्हणांच उगाच विद्रुपीकरण करणा चालू आहे असा सरळ वाटतंय >>>> पण त्या उर्मीच्या घरचे आधुनिक विचारांचेही 'कुलकर्णी' आहेत की.

तद्दन फालतू मालिका आहे,
काम नाय धंदा नाय अन् लग्न करायला उठलेत बिनडोक साले!!
आणि असल्या फालतू मालिका पाहणारेही किती बिनडोक असतील??(माझ्यासकट)

Pages