रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंगो!!
मीही याच विषयावर बोलणार होतो. भुताच्या सिरिअल फारशा येत नाहीत. असल्या तरी त्या कॉमेडी टाईप असतात.
पण ही सिरिअल जरा बरी वाटतेय. निदान ट्रेलर बघून तरी मस्त वातावरणनिर्मिती केल्याचे दिसतेय.
पहायला नक्कीच आवडेल. २२ जानेवारीला सुरवात होतेय वाटतं याची. Happy

कथा धरपांच्याच होत्या पण सादरीकरण गंडलेलं >>> नाही. नंतर नंतरच्या कथा नक्की धारपांच्या नव्हत्या. मला नक्की माहिती आहे हे.

दुसरा विहिरीवरचा प्रोमो लोकांना हॉरर वाटला हे वाचून खूपच आश्चर्य वाटलं. आम्हाला त्यात काहीच भीतीदायक वाटलं नाही. घरातल्या बाईला विहिरीवर रात्री जाऊ नये ही उमज असणारच. त्यापेक्षा ती पहिल्या प्रोमोतली नवी शहरी बाई गेली असती आणि तिला असा अनुभव आला असता तर जास्त पटला असता. शिवाय घागर हळूहळू वर येतानाही दाखवायला हवी होती आणि मग अचानक सुटून खाली पडली असं दाखवलं असतं तर आणखी मजा आली असती.

प्रोमो मधे बोलली जाणारी भाषा ही धेडगुजरी मालवणी आहे. कोकणात भुते भरपूर असतात असा समज असल्याने कदाचित कोकणातील पार्श्वभूमी घेतली असावी, पण किमान तिथली भाषा व्यवस्थित बोलता येणारे कलाकार तरी घ्यावेत.

शिवाय घागर हळूहळू वर येतानाही दाखवायला हवी होती आणि मग अचानक सुटून खाली पडली असं दाखवलं असतं तर आणखी मजा आली असती. >>>>> हा हा हा तसं कधीच होत नसतं. कधी अशा कथा जुन्या माणसांकडून ऐकल्यात तर तुंम्हाला समजेल. अशा प्रसंगात- वजन हलकं असूनही त्या वेळी ते खुप जड असल्याचा भ्र्म निर्माण करतं!
किंवा मग तुंमची दिशाभूल करण्यासाठी लांबचा रस्ता भलत्याच ठिकाणाहून जवळ दाखवला जातो.
शेवटी ह्यालाच तर चकवा म्हणतात! Happy

मला दोन्ही प्रोमो अजिबातच हॉरर नाही वाटले.
पहिल्या प्रोमोत, उगीचच हॉरर म्युजिक टाकून आणि सगळ्या बायकांच्या चेहर्‍यावर भिती दाखवून वातावरण निर्मिती चा प्रयत्न वाटला.
आणि दुसर्‍यात निळा अंधार दाखवून, रातकीडे किरकिरवून वातावरण निर्मिती केल्यासारखी वाटली. दोन्ही प्रोमोज उगीचच लाऊड वाटले.
आता सिरीयल सुरु होई पर्यंत अजून किती प्रोमोज येतात, आणि ते किती चांगले सादर करतात पाहू या. झी च्या परंपरेनुसार, प्रोमोज मधे एक आणि सिरीयलीत भलतेच असं ही होऊ शकेल.

आजकाल "मालवणी " शब्दाक खुप मागणी आसा . खाद्यपदार्थ म्हणा नायतर नाटक , शिनेमा , मालिका . खयसून तरी रसिक मिळवणा . पण अस्सल ता अस्सल . हे दिग्दर्शक जेव्हा ' आवाजपरीक्षा ' [Audition ] घेतत तेव्हा काय बगतत ???? अस्सल
मालवणी पात्रयोजना होयी . उगीच हेल काढना म्हण्जे मालवणी न्हय . त्यापेक्षा मराठी शब्दच
ठेवा .

पण रात्रीच्या वेळी कशाला विहिरिवर जावे आणि कळशी सुटली तर घाबरायचे कशाला ते मला समझल नाही >>> कळशी सुटली म्हणुन ती घाबरली नाही तर दोरी ओढत असताना तिला भरपुर जड लागत होती (तिच्या एक्स्प्रेशनवरुन बनविलेले मत) पण दोरी वर आल्यावर दोरीला कळशी नव्हती व कळशी पडण्याचा आवाजही नाही आला म्हणुन ती घाबरली.

घरातल्या बाईला विहिरीवर रात्री जाऊ नये ही उमज असणारच.>> रात्री विहिरी वर जाऊ नये काय? असं काही आहे का? जर माझ्या घरामागे विहीर असली असती तर मी रात्री विहिरी वर पाणी शेंदायला गेले असते. शेवटी विहीर नेहमीची आणि सवयीची आहे ना.

रात्री विहिरी वर जाऊ नये काय? असं काही आहे का? >> अंहं तसं म्हणायचं नव्हतं मला. मला म्हणायचं होतं की तिथे 'काहीतरी' अनुभव येऊ "शकतो" हे त्या घरातल्या बाईला ठाऊक असणारच. असं अचानकच एका रात्री विहिरीपाशी गूढ काहीतरी घडणार नाही ना. म्हणून नवखी बाई गेली होती असं दाखवायला हवं होतं.

मला तरी हॉरर साठी सिरिअल बघायची नाही. पण ज्या प्रकारे त्या कथेचा सस्पेंसकडे रोख आहे ते पहायचे आहे. जसे कि "भुलभुलैया" सिनेमा. तो घाबरवण्यासाठी तयार केलेला नाहियेच मुळी. पण ते गुढ वातावरण मात्र छान निर्माण केलं गेलं आहे तिथे.
अर्थात इथेही सिरिअलमध्ये सासवासुनांचा "इमोसनल अत्याचार" व्हायला लागला कि मग मात्र, टाटा बाय-बाय! Angry

हो निल्सन, ती बाई दोर ओढत असते तेव्हा तिला जड लागत असतो, आणी एकदम मध्यावर आल्यावर अचानक फक्त दोर दिसतो आणी कळशी गायब्?:अओ: काय विचीत्र दिग्दर्शन आहे ! कळशी आधीच ( खाली विहीरीच्या तळाशी) गायब झाली असेल तर दोर ओढताना जड कसा काय लागु शकतो?

हो गुरुदासजी, या कलाकाराना मालवणी टोन अजीबात जमलेला नाहीये.

कळशी आधीच ( खाली विहीरीच्या तळाशी) गायब झाली असेल तर दोर ओढताना जड कसा काय लागु शकतो?

रश्मी तेच तर हॉरर ना ;). Lol (झीच्या मते, मला वाटलं नाही त्यात तसं काही गूढ) .

काल हा बाफ उघडला होता, तशीच झोप लागली. रात्रभर किंकाळ्या, हॉण्टेड गाणी, वटवाघळाचे आवाज असलं काय काय ऐकू येत होतं.

रश्मी तेच तर हॉरर ना डोळा मारा. हाहा > Lol हो कदाचित कळशी काढुन एखादा अदृश्य भुतबित आला असेल दोरीला लटकुन वर म्हणुन दोरी जड लागत असेल खेचायला Proud

Happy

कदाचित लहानपणापासून सुट्टीत कोकणात गेल्यावर रात्री भुताच्या गोष्टी ऐकायची सवय असल्याने, फारसं वाटत नसेल.

पण मागे 'गहिरे पाणी' गूढ मालिका होती ती आवडली होती. सर्वात मस्त ती रत्नाकर मतकरींची घड्याळाची काहीतरी गोष्ट असते ती फार आवडली. मी त्या कथा वाचल्या असूनही, सादरीकरण आवडलं होतं.

मलाही प्रोमोज पुरेसे भितीदायक वाटले नाहीत, नवर्‍याच्या मते सस्पेन्स थ्रिलर असेल, शिरेलीच नाव हॉरर आहे अस दाखवतय.. खर काय ते २२ ला कळेलच.

विचार करा, जर कळशी शोधली आणि त्यात सर्वात जड धातू इरिडियम चा मोठ्ठा ठोकळा मिळाला तर? घाबरलेली बाई लगेच खुश आणि श्रीमंत!! Happy

विचार करा, जर कळशी शोधली आणि त्यात सर्वात जड धातू इरिडियम चा मोठ्ठा ठोकळा मिळाला तर? घाबरलेली बाई लगेच खुश आणि श्रीमंत!! >>>>>>>>>>>>>> काहीही हं अ Biggrin Biggrin

मला नाही आवडले Promos..... 3D च्या जागी आली आहे म्हणून आधीच मनात राग होता. पण बाकी सुद्धा मनोरंजक किंव्हा चित्त्वेधक काही वाटले नाही. Sad

Pages