
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
पात्र नसेल तर सरळ त्याचे
पात्र नसेल तर सरळ त्याचे 'उत्तपे' घाला. हाकानाका. मी उत्तपेच केले होते. आप्प्यांपेक्षा कमी वेळेत झाले. भिजवताना इडली पीठापेक्षा थोडंस जास्त सैल ठेवलं तर दडस होणार नाहीत.>>>> थॅंक्स अंजली .. करूनच पाहीन .
पण इथे फोटो देणार नाही . नाहीतर पूनम धपाटे देईल

नाहीतर पूनम धपाटे देईल
नाहीतर पूनम धपाटे देईल फिदीफिदी हाहा>>>>
ओट्स च्या बॅटरचे धपाटे कसे करणार?
दोसे उत्तपेच होणार फार फार तर!
(No subject)
तेच की कृष्णाजी! धनश्रीएल,
तेच की कृष्णाजी!
धनश्रीएल, थँक्स!
प्राजक्ता, मामी- खलास फोटो! प्राजक्ता, तीळांमुळे फोटो कातिल दिसतोय!
(खाण्याच्या पदार्थामध्ये खलास, कातिल हे शब्द घालणं चुकीचं आहे, माहितेय, पण भावनाओंको समझो :खोखो:)
अमि, एका बाजूने फ्लॅट झाले तर
अमि, एका बाजूने फ्लॅट झाले तर आप्पे चालणार नाही. ते दोन्ही बाजूंनी फुगले तरी चालत नाही.
आप्पे कसे चालणार ना?
ओटस काय असते? कुठे कशा
ओटस काय असते? कुठे कशा स्वरुपात मिळते? किराणा दुकानात पाकिट लटकलेले बघितले होते ज्यावर ओटस लिहिले होते. पण जवळून बघितले नाही.
ओटस काय असते>>> हे गव्हा
ओटस काय असते>>>
हे गव्हा सारखे एक तृण धान्य असून त्याला सातू किंवा यव- जव असे म्हणतात!
ह्याची यज्ञ-कर्म धार्मिक विधी ह्यामध्ये अधिक प्रमाणात वापर होतो हे आपणास सांगणे न लगे!
बाजारात आजकाल जे ओट्स मिळते पाकीटात ते ह्या यवाचे पोहे होत!
तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा!
चिरोटी रवा यात खपेल का? मला
चिरोटी रवा यात खपेल का? मला तो रवा संपवायचा आहे.
प्राजक्ता.. मस्त दिस्ताहेत
प्राजक्ता.. मस्त दिस्ताहेत आप्पे..
मामी.. कसला सुर्रेख सोनेरी रंग आलाय .. यम!!!
आता इथे वेरिएशन्स पाहण्याची उत्सुकता निर्माण होतीये ..
मी आज केले. फटू काढायचा
मी आज केले. फटू काढायचा राहिला, पण तरीही चवीला उत्तम आणि चांगले खरपूस झाले होते. ओट्स एरवी लेक खात नाही, पण यात नक्की काय आहे ते न समजल्यामुळे सगळेच गट्टम झाले आहेत.
मी चिरोटी रवा वापरला आणि भिजवताना थोडं ताक घातलं.
चिरोटी रवा म्हणजे?
चिरोटी रवा म्हणजे?
आज केले. छान झाले होते. मी
आज केले. छान झाले होते. मी भिजवतना ताक वापरले आणि पिठात जिरे, मोहरी , कडीपत्ता, तीळ अशी फोडणी घातली.
ओके किस्ना, माहितीबद्दल
ओके किस्ना, माहितीबद्दल धन्यवाद
असो....
ते सातू आहेत होय..... इंग्रजी नावामुळे दुर्लक्ष केले होते..... किंवा कधी कधी असेही होते की अदरवाईज आमच्या टाकाऊ वाटणार्या गोष्टी छान छान प्याकिंग मधुन इंग्रजी नावाने समोर आल्या की "पवित्र" होतात
एकदा आणुन बघितलेच पाहिजे. (होप सो की लिंबी नाक मुरडणार नाही - अन नाक मुरडायला नको असेल, तर तिला आधीच "हे सातू" आहेत असे सांगितले पाहिजे)
ए मी पण मी पण मस्त झाले
ए मी पण मी पण
मस्त झाले आप्पे!
अमि, माझेही आप्पे एका बाजूने फ्लॅट झाले, पण दडस नाही झाले. छान हलके झाले. रवा आणि ओट्स आंबट ताकातच भिजवले. कांदा, वाटली आलं-मिरची घातली, मीठ आणि हिंग घातला. लेकीला डब्यात दिले होते, घरी आल्यावर काही डब्याविषयी काही तक्रार ऐकायला लागली नाही म्हणजे डब्यातही चांगले राहिले होते
एक वाटी रवा आणि दोन वाट्या ओट्स या प्रमाणात ३६ आप्पे झाले.
आज परत केले होते. पण घरातलं
आज परत केले होते. पण घरातलं आलं संपल्याचा शोध लागल्यावर मखलाशी करून त्यात कांदा आणि सिमला मिरची चिरून घातली. आल्यालाही कळलं नाही की ओटसच्या आप्प्यांत आपण नव्हतो
तोंडी लावायला तेलात कालवलेली एमटीआरची इडली/डोसा चटणी (लाल रंगाची. त्याला लाडाने गनपावडरही म्हणतात.)
ओट्स खायचे तर आहेत, पण
ओट्स खायचे तर आहेत, पण त्यांची चव आपलीशी वाटायला हवी हे आखुडशिंगीबहुदुधी काम या आप्प्यांमुळे विनासायास होत असल्यानेच ही रेसिपी होट होतेय असं वाटतंय
नंदिनी, चर्चा, मंजूडी, ललि धन्स! मंजू फोटो मस्त!
आता नारळ-गूळ घालून ओट्सचे गोड आप्पे करावेत असं म्हणतेय मी. पण परत कृती लिहिणार नाही, डोन्ट वरी
ओट्स आणि रव्याचे प्रमाण सेम
ओट्स आणि रव्याचे प्रमाण सेम ठेऊन त्यात केळं आणि गुळ घालून...दुधात भिजवून, थोडा सोडा, वेलची पावडर घालून बनवले...हे पण खुप छान बनले!
काल परत केले. या वेळेला २
काल परत केले. या वेळेला २ चमचे दही आणि चिमुटभर सोडा टाकला. हे मस्त हलके झाले. ओव्हरनाईट करून ठेवलेले आज डब्यात पण छान लागले.
काल पहिले २-३ डोसे टाईप केलेले, ते आणखी भारी लागळे खर तर. त्यात तर कांदा, आलं काहीच न्हवतं, नुसतं मीठ. तरी एकदम सह्ही झाले. पण उरलेल्याचे आप्प्याच्या ग्ल्यामरनी आप्पेच केले :p पुढच्यावेळी सगळे डोसे, तो पर्यंत कुणी अप्याच्या कृती लिहू नका फक्त.
पुढच्यावेळी सगळे डोसे>> किती
पुढच्यावेळी सगळे डोसे>> किती पेशन्स लागतो एकेक डोसा करायला! आणि एकाने भागत नाही!! म्हणून मला आप्पे अॅट्रॅक्टिव्ह वाटतात जास्त
पण पसंद अपनी अपनी 
काही नाही २०० झाले.
काही नाही २०० झाले.
२००डोसे?
२००डोसे?
२०० प्रतिसाद.
२०० प्रतिसाद.
पुनम , मस्त रेसीपी आहे. करून
पुनम , मस्त रेसीपी आहे. करून पहाते.
वरती तु साहित्य लिहिलयस तेच वापरून मी मुठीया करते.
ओट बारीक करून. त्यात रवा अॅड केला कि बारीक चिरुन मेथी घालायची. आल,जीर,लसून पेस्ट आणि थोडा ओवा. लिंबू पिळून मिठ घालून मळून घेते. आता त्याचे सिलिंडर शेप मधे मुटके करून वाफवून घेते.
वाफविले कि काप करून कडीपत्ता ,तीळ घालून फोडणी.
अतिशय छान लागते.
हेल्थ बग चावून कॉस्टको मधून प्रचंड मोठ ओटच पोतं आणलं कि असले पदार्थ करावेच लागतात. मला कस माहित ते अज्जिब्बात विचारू नका.
>>तो पर्यंत कुणी अप्याच्या
>>तो पर्यंत कुणी अप्याच्या कृती लिहू नका फक्त.
कुणी म्हणजे तूच लिहिणार आहेस नं अमित? शिकरणाप्पेवाली
हे आप्पे माझ्या लिस्टवर आहेत पण अजून मुहुर्त लागायचा आहे आणि आमच्याकडे पब्लिक ओटमिल सध्यातरी न कुरकुरता खाताहेत. असे सारखे आप्पे वर आले की करावे लागतात म्हणून मी सुलेखाताईंचे आप्पे केलेत त्याचे नंतर फोटो टाकेन
ओ, योजटा.
ओ, योजटा.
किती पेशन्स लागतो एकेक डोसा
किती पेशन्स लागतो एकेक डोसा करायला!>>> उत्तप्पे घाला. एकानं भागेल आणि फार पेशन्सही लागणार नाही.
मग हे सगळं मिश्रण कुकरच्य
मग हे सगळं मिश्रण कुकरच्य भाताच्या भांड्यात ओतून ढोकळ्यासारखं शिजवून घेतलं आणि वरून चुरचुरीत फोडणी दिली तर?
(कुरकुरीतपणा गायब असेल पण एक वार आणि काम फत्ते ..
:))
आहा! कित्ती दिवसांनी असा
आहा! कित्ती दिवसांनी असा पाकृचा धागा बघितला! नाहीतर तेच ते आपले चर्चासत्र आणि तोंडाचे मात्र!

बाकि एक शंका- हेच आप्पे गोड बनवता येतील का ओ?
सीमा, इथे काय लिहितेस इतकी
सीमा, इथे काय लिहितेस इतकी छान पाकृ? वेगळा धागा काढून लिही प्लीज.
बिघडवणारी लोकं, पदार्थ ' येन
बिघडवणारी लोकं, पदार्थ ' येन केनप्रकारेण ' बिघडवू शकतात .
पहिल्यान्दा केले तेन्व्हा चिवट झाले होते आणि फुलले ही नव्हते .
काल दूसरा प्रयत्न केला .
ओट्स , रवा , साखर सगळं मिक्सरमधून गरकवलं . एक चमचा दही , पाणी आणि थोडासा खायचा सोडा घातला.
साबांच्या सूचनेनुसार ,थोडसं तेल घातलं , चिवट होउ नये म्हणून .
अर्ध्या तासाने करायला घेतले. यावेळी टप्प फुलले , पण उलटायला गेले तेन्व्हा फुटायला लागले. एक्दम रवाळ झाले होते. खाताना कुस्करले आणि शिर्यासारखे चमच्यासारखे खाल्ले.
पण अजून हिम्मत हरले नाही आहे . चवीला भन्नाट होते , त्यामुळे आणखी एक प्रयत्न होणारच .
Pages