
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
हायला, काय मस्त जाळी दिसतेय
हायला, काय मस्त जाळी दिसतेय आप्प्यांवर! नक्की करणार. ओट्स आहेतच घरी.
मस्त दिसतायेत आप्पे. रेसिपीही
मस्त दिसतायेत आप्पे. रेसिपीही सोपी आहे.
माधव यांचे आप्पे बटरसारखे दिसतायेत मस्त !!
वॉव माधव! मस्त दिसत आहेत
वॉव माधव! मस्त दिसत आहेत आप्पे.. मस्त जाळी पडली आहे.
शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली
शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे >>>
पूनम, मस्त रेसिपी आहे.
माधवचे आप्पेही झकास दिसतायत. माधव, चटणी नाही का केली? अर्थात व्यवस्थित तिखट मीठ असेल तर नुसतेही छानच लागतात.
मयेकर, किती अवघड लिहिता हो?
मयेकर, किती अवघड लिहिता हो?
माधव, फोटो मस्तच. लगेच केलेत
माधव, फोटो मस्तच. लगेच केलेत पण? ग्रेट
वा माधव खूप छान. मला डॅम
वा माधव खूप छान. मला डॅम खात्री होती भाजलेल्या रव्याचे आप्पे छान होतील. खूप सुंदर प्रकाश झिरपला आहे फोटोवर आणि आप्प्यावरची जाळी सछिद्र माठातल्या गार पाण्याची आठवण काढून गेली
माधव, लगेच केल्याबद्दल
माधव, लगेच केल्याबद्दल धन्यवाद! छान दिसत आहेत.
वा छान झालेत आप्पे, माधव
वा छान झालेत आप्पे, माधव यांचेपण.
रवा भाजून घेतला तरी फुगतात हे सिद्ध झालं.
मला ढोकळ्याचा जो अनुभव आहे तो मी लिहिला
.
काय ठरलं मग शेवटी? रवा भाजून
काय ठरलं मग शेवटी? रवा भाजून घ्यायचा की न भाजता घ्यायचा की फ्रिजमधे जसा उपलब्ध असेल (जाडा, बारीक, मध्यम, शून्य नंबर, पावणेतीन नंबर, भाजून ठेवलेला, पुरचुंडी बांधून ठेवलेला किंवा एक पुरचुंडी बारीक रवा, एक पुरचुंडी मध्यम किंवा जो काही असेल तो) तसा घ्यायचा?
बरं, रव्याच्या ऐवजी फ्रिजमधे रव्याच्या जागी चुकून ठेवलेले वरीचे तांदूळ घातले तर चालेल का? (नाही चालणार! आप्पे उरपतणारच नाहीत!)
पावणेतीन नंबर>> मयेकरांनी
पावणेतीन नंबर>>

मयेकरांनी सांगितलंच आहे ना. सर्व तर्हेचे आणि नंबरांचे आणि स्थितीचे रवे वापरून करा आणि इकडे रिझल्ट कळवा. मीही वाट बघतेय कोण कधी कसे करताय्त हे आप्पे!
रव्यात असे नं पण असतात? मला
रव्यात असे नं पण असतात? मला फक्त जाड्/बारीक एवढच माहितीये
अरे, वर ओट्स कुठले असा एक
अरे, वर ओट्स कुठले असा एक प्रश्न आहे. त्याचे काय झाले?
हा बाफ हळूहळू 'एक होता
हा बाफ हळूहळू 'एक होता आप्पा..' च्या वळणावर जाणार आहे.
अरे, वर ओट्स कुठले असा एक
अरे, वर ओट्स कुठले असा एक प्रश्न आहे. त्याचे काय झाले?>> हां ते राहिलंच. क्वेकर या ब्रॅन्डचे क्विक कुकिंग ओट्स!
हे सोडून ओट्सचे अन्य कोणतेही प्रकार मला माहित नाहीत, त्यांची नावं माहित नाहीत, त्यांचे गुणधर्म माहित नाहीत वा वैशिष्ट्यही. दुसर्या ब्रॅन्डचे अथवा दुसर्या प्रकारचे ओट्स घेतले तर काय होईल? मला खरंच माहित नाही! मी एकच उत्तर देऊ शकते- करून बघा आणि सांगा! सर्वांनाच शहाणं करा! 
ओट्स भाजून घ्यायचे का?
ओट्स भाजून घ्यायचे का?
प्राचे नालायक! माझं उत्तर-
प्राचे नालायक!

माझं उत्तर- तुला पाहिजे तसं करून बघ
पाणी कोणतं? हा प्रश्न नाही विचारलास? साधं? फिल्टरचं? मिनरल? बोअरचं? बोअर+कॉर्पोरेशन मिक्स (काय प्रमाणात)? विहीरीचं? उकळलेलं? उकळून गार केलेलं? फ्रीजमधलं? निम्मं फ्रीज, निम्मं साधं? (उलट केलं तर?) कोमट? (किती कोमट? आमच्याकडे गरमला कोमट म्हणतात, खूप गरमला गरम म्हणून विचारलं!) स्वच्छ? थोडंसं गढूळ?
हातासरशी मीठ - मिरची वर पण
हातासरशी मीठ - मिरची वर पण प्रकाश टाका. म्हणजे साधे मीठ / खडे मीठ
कमी तिखट की तिखट मिरची
आलं किती घ्यायचयं? टेक १ इंच
आलं किती घ्यायचयं?
टेक १ इंच ऑफ जिंजर अँड किस इट का?
वर्षा मिरचीचे पाण्यापेक्षा
वर्षा
मिरचीचे पाण्यापेक्षा जास्त प्रकार आहेत. तुला आवडते ती घे! तेच मीठाबाबत. चवीप्रमाणे घे हो पण.
अवनी, किस द जिंजर इफ यु लाईक इट, बट ऍज इज रिटन इन द रेसिपी, चेचिंग विल बी बेस्ट!
हेहेहे.. खलबत्त्या तला बत्ता
हेहेहे.. खलबत्त्या तला बत्ता तुटलाय? मग कशाने चेचु? तुम्ही स्टेप बाय स्टेप पाकृ टाकत जा पाहू..
सगळ्यात कळीचा प्रश्ण आहे,
सगळ्यात कळीचा प्रश्ण आहे, वाटी कुठली घ्यायची? आणि कोणत्या मापाची?
ह. घ्या.
मीठ कोणाच्या चवीप्रमाणे
मीठ कोणाच्या चवीप्रमाणे घ्यायचं?
मीठ कोणाच्या चवीप्रमाणे
मीठ कोणाच्या चवीप्रमाणे घ्यायचं>> बहुदा संजीव कपूर
किस द जिंजर इफ यू लाईक इट>>
किस द जिंजर इफ यू लाईक इट>>
(No subject)
किस द जिंजर इफ यू लाईक इट>>
किस द जिंजर इफ यू लाईक इट>>
अवनी, पुढच्या वेळी नक्की!
अवनी, पुढच्या वेळी नक्की!
झंपी यु नेल्ड इट!
चिनूक्स काय अचूक प्रश्न विचारता हो!
हैला! माहितीचा स्रोत संदिग्ध
हैला!
माहितीचा स्रोत संदिग्ध लिहिला आहे हे प्रतिसादात लिहिलं नाही.
वहिनी कुठली वाहिनी बघते ते विचारलं नाही.
वहिनी(वर)चं प्रेम!
हळूहळू, स्टेप बाय स्टेप
हळूहळू, स्टेप बाय स्टेप चिरफाड करायची मंजू. डायरेक्ट स्रोतावर नाही यायचे.
Pages