बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
हा असला फालतू आणि टुकार
हा असला फालतू आणि टुकार चित्रपट बनविणार्यांना कोणीतरी चेचला पाहिजे. परत हिम्मत नाही झाली पाहिजे असला काही विचार करायची सुद्धा.
नाकावर टिच्चून चित्रपट
नाकावर टिच्चून चित्रपट प्रदर्शित होत आहे
आणि मोठ्या संख्येने बघा असे आवाहन होत आहे
<<फारएण्ड | 18 December, 2015
<<फारएण्ड | 18 December, 2015 - 00:17
लिंबू मग लोकांनी काय करायला हवे आहे? थिएटर वर जाउन पिक्चर बंद पाडायचा? त्याने दाखवले आहे ते तुम्हाला पटले नाही म्हणून?
प्रत्येक जातीत सगळे थोरपुरूष (आणि स्त्रिया) वाटून टाका. त्या त्या जातींच्या स्वघोषित प्रतिनिधींनी ठरवलेला त्यांचा इतिहास हाच खरा इतिहास आहे व त्यांची संमती घेतल्याशिवाय कोणालाही त्या व्यक्तींना 'टच' करता येणार नाही, नाहीतर राडे करू. अशी व्यवस्था असायला हवी आहे का?>>
मला स्वतःला हा चित्रपट आला /गेला, हिट झाला/फ्लॉप झाला याने काहीच फरक पडत नाही. इट्स जस्ट अ मुव्ही आफ्टर ऑल. आणि जर रामायण महाभारतची parody होऊ शकते (शांत गदाधारी भीम !) तर पेशव्यांच्या इतिहासाची का नाही?
पण एक गोष्ट लक्षात आली- काशीबाई पेशवे या एक अबला महिला..अशा काळातल्या जिथे स्त्रियांना काही हक्क नव्हते, व्हॉईस नव्हता. या बिचार्या माऊलीच्या कॅरेक्टरचे भन्सालीने पिंगामध्ये जे काही केले आहे त्याचा प्रचंड आनंद झालेले लोक इथे आहेत- याच धाग्यावर तशा पोस्ट्स आहेत. आता त्या माऊलीने या लोकांचे काय बिघडवले होते की यांना इतका हर्षवायू व्हावा? म्हणजे विशिष्ट जातीच्या एका आदरणीय स्त्रीच्या कॅरेक्टरला असे नृत्य करताना दाखवल्याने एक्साईट होणारे हे लोक स्वतःची 'संस्कृती' इथे दाखवून देत आहेत. I dont know whether to pity them for their depravity or be scared of the fact that such people exist in this country.
बिचार्या माऊलीच्या
बिचार्या माऊलीच्या कॅरेक्टरचे भन्सालीने पिंगामध्ये जे काही केले आहे त्याचा प्रचंड आनंद झालेले लोक इथे आहेत- >>>>> रिअली?
बिचार्या माऊलीच्या
बिचार्या माऊलीच्या कॅरेक्टरचे भन्सालीने पिंगामध्ये जे काही केले आहे त्याचा प्रचंड आनंद झालेले लोक इथे आहेत- >>>>> रिअली?
>>
येस! खूप आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/after-bjp-worker...
वावावा आवडलं! मुहूर्त निघाला!
रिअली? >> हो. फेबु वरही
रिअली? >>
हो. फेबु वरही ब्रम्हेंनी शेअर केलेल्या अनेक पोस्ट मधे विशिष्ट समुहाचा असा सुर दिसला की इतके वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केला आमच्या बायका नाचवल्या तर आता भन्साळीने तुमच्या बायका नाचवल्या तर काय बिघडते.
याच समुहातील लोकांनी असा प्रश्न विचारला आहे की नक्की राग कशाचा आहे? काशीबाईंना नाचवल्याचा की, मस्तानी सोबत नाचवल्याचा?
या "काही" लोकांना खरेच आनंद झालेला आहे आणि हे यांच्या फेबु पोस्ट मधुनही दिसते आहे.
भन्साळीने खरेच किती वाईट द्रुश्य चित्रित केले हा भाग जरी सोडला तरी समाजात असे लोक आहेत ज्यांना खुद्द पेशव्यांबद्दल असे केले म्हणून आनंद होतो आहे ही मराठी समाजासाठी आणि संस्क्रुतीसाठी अतिशय गंभिर बाब आहे.
आणि प्लिजच नोट की हे ते लोक नाही आहेत जे म्हणता आहेत की कला स्वातंत्र म्हणून सोडुन द्या. हे ते लोक आहेत ज्यांना पेशवे हे मराठी साम्राज्याचे पराक्रमी योद्ध म्हणुन नव्हे तर विशिष्ट समाजावर सुड घेण्याचे माध्यम म्हणून माहित आहेत / माहित करुन दिले जात आहेत / त्यांना ते तसे सुड घेण्यासाठी वापरायचे आहेत.
याच निमित्ताने आणखी एक पोस्ट होती की, मराठा समाजाच्या मित्रांकडून पवारांच्या वाढदिवसासकट इतर अनेक दिवसांच्या शुभेच्छा शेअर करणा-या पोस्ट आल्य पण विशिष्ट दिवसाच्या शुभेच्छा देणा-या आल्या नाहीत. आणि म्हणून पोस्टकर्त्याचे असे म्हणने होते की हे सगळॅ पुरोगामी नाहीत. जातीयवाद माननारे आहेत.
आता फेबु सारख्या ठिकाणी कोणी काय शेअर केले किंवा न केले यावरुन या विशिष्ट लोकांची मते बनत आहेत / बनवली जात आहेत. आता आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी उठसुठ फेबुवर शेअर करत फिरावे का? फेबुवर शेअर केले नाही म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वाईटच भावना असतील असे सिद्ध होते का?
हे ही अतिशय गंभीर आहे.
स्पॉक, +१३ संपूर्ण पोस्तीस
स्पॉक,
+१३
संपूर्ण पोस्तीस अनुमोदन!
अरे लोकहो सोशलसाईटवर बागडणारे
अरे लोकहो सोशलसाईटवर बागडणारे काही मूठभर लोक असे जातीयवादी विचार करणारे असतात आणि ते देखील ओळखू येतात. प्रत्यक्षात माझ्या आसपास मी बघतो तर असे कोणी नाहीत. पेशव्यांची जात कोणती विचारली तरी माहीत नसेल ९० टक्के लोकांना, खास करून आमच्या पिढीला, तिथे जातीवरून द्वेष काय करताहेत कप्पाळ
भन्साळीने खरेच किती वाईट
भन्साळीने खरेच किती वाईट द्रुश्य चित्रित केले हा भाग जरी सोडला तरी समाजात असे लोक आहेत ज्यांना खुद्द पेशव्यांबद्दल असे केले म्हणून आनंद होतो आहे ही मराठी समाजासाठी आणि संस्क्रुतीसाठी अतिशय गंभिर बाब आहे. >>> अर्थात, ज्या नव्या पिढीला बाजीरावांचा इतिहास माहित नाही, बाजीराव नक्की काय आणि कसा होता हे माहित नाही, नुसते राउच नाही तर इतर पेशव्यांचही कर्तुत्त्व माहित नाही त्यांच्यापुढे अत्यंत चुकीची माहिती ठेवली जाईल यामुळे, कारण शितावरुन भाताची परिक्षा करणारे अनेक असतात.
ऋन्मेष, ज्यांना जातीयवाद
ऋन्मेष, ज्यांना जातीयवाद निर्माण करायचाच आहे ना? त्यांना या गोष्टी बरोब्बर माहित असतात.
जयंत.१ | 18 December, 2015 -
जयंत.१ | 18 December, 2015 - 03:23
नाकावर टिच्चून चित्रपट प्रदर्शित होत आहे
आणि मोठ्या संख्येने बघा असे आवाहन होत आहे डोळा मारा
आनंदाच्या उकळ्या फुटणं म्हणजे हेच का?
ऋन्मेष , असं काही नाही
ऋन्मेष , असं काही नाही बाबा.
आपल्या पिढीतही असले बेक्कार लोकं आहेत
प्रत्यक्षात माझ्या आसपास मी बघतो तर असे कोणी नाहीत >>> लकी यू
पेशव्यांची जात माहिती नसेल,
पेशव्यांची जात माहिती नसेल, त्यांना पण सिनेमा बघून समजेलच की ती. बेदिंग सीन मध्ये जानव घालून सिक्स पॅकवाला रणवीर काय किरीस्ताव दिसतो काय??
(समस्त पिढीचे जीके कमी आहे हे अगदी मान्य मात्र, नसेल माहिती त्यांना पेशव्यांची जात )
सीम्स, नाही गं माहीती खरच
सीम्स, नाही गं माहीती खरच अनेकांना (जवळचं उदाहरण माझी बहिण - अर्थात तिला कोणाच्याच जातीशी काही देण घेण नसल्याने तिने पेशव्यांच्या जातीकडेही फार लक्ष दिलं नसावं)
प्रत्यक्षात माझ्या आसपास मी
प्रत्यक्षात माझ्या आसपास मी बघतो तर असे कोणी नाहीत >>> लकी यू
+१
या धाग्यावरच किती आहेत असे लोक!
Cnw काल पर्यंत बाजीराव बघू
Cnw
काल पर्यंत बाजीराव बघू नका म्हणणारे तुमचे संस्कृतिरक्षक आज शाहरुखचा चित्रपट बघू नका तर बाजीरावचा चित्रपट बघा घसे डब्बल ढोलकी वाजवत म्हणत आहे. या बदलणार्या रंगावरून कुठल्याही सुजाण नागरीकाला गंमत वाटणे साहाजिक आहे
आणि मला पिंगा गाण्यात काहीही
आणि मला पिंगा गाण्यात काहीही आक्षेपार्ह नाच वाटला नाही उलट दिपिका आणि प्रियंका फार सोज्ज्वळ सुंदर दिसल्या आहे
अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोण असतो कोणी काय काय बघत असतात त्यावर आपला कंट्रोल नाही ना
रीया, पण सोशलसाईटवर जी
रीया, पण सोशलसाईटवर जी परिस्थिती भासते तेवढे तरी नक्कीच दिसत नाहीत. निदान शहरांत तरी हे बाळकडू कोणी आपल्या पोरांना पाजत नाहीत असे मला वाटते. मी जेव्हा ऑर्कुट समूहांवर बागडू लागलो तेव्हा मला पहिल्यांदा समजले की महापुरुषांच्याही जाती असतात. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर एक छोट्याश्या काळासाठी का होईना या प्रभावाखाली येत मी सुद्धा तसाच विचार करू लागलेलो. आणि आता तर काय व्हॉटसप मुळे हे सारे तुमच्या दारात आलेय, तर कित्येक लोक अजाणत्या वयापासूनच बहकू शकतात... असो, हा या धाग्याचा विषय नाही, मी माझे अनुभव कधीतरी लिहेन यावरचे, अश्या कट्टर जातीधर्म विचारसरणीच्या लोकांना मी नंतर खूप पिडले आहे..
माझा कोणत्याच राजकीय पक्षाशी
माझा कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही त्यामुळे 'माझे' संस्कृतीरक्षक वगैरे कोणी नाहीत.
बाकी तुमचा आनंदोत्सव चालू द्या!
होना, काशिबै यांची डान्स
होना, काशिबै यांची डान्स करायची इच्छा भन्साळींनी पूर्ण केली तर जळतात मेले लोकस.
रीया, पण सोशलसाईटवर जी
रीया, पण सोशलसाईटवर जी परिस्थिती भासते तेवढे तरी नक्कीच दिसत नाहीत. निदान शहरांत तरी हे बाळकडू कोणी आपल्या पोरांना पाजत नाहीत असे मला वाटते
>>
असमत रे ! दुर्दैवाने हे वर जे लिहिलयेस ते चुकीचं आहे आणि शहरात जातीयवादाचं बाळकडू कसं पाजलं जातं ते पहायचं असेल तर मला येऊन भेट. हवे त्या जातीची असली लोकं दाखवते तुला
कट्टर जातीधर्म विचारसरणीच्या
कट्टर जातीधर्म विचारसरणीच्या लोकांना मी नंतर खूप पिडले आहे..
>>
+13
उत्तम!
कट्टर जातीधर्म विचारसरणीच्या
कट्टर जातीधर्म विचारसरणीच्या लोकांना मी नंतर खूप पिडले आहे..
>>
इथे पण पकवा ना त्यांना...म्हणजे दोन्ही बाजूच्या जातीयवादींना..
मलाही या दोन्ही गाण्यांमुळे
मलाही या दोन्ही गाण्यांमुळे व्यक्तीशहः काही वाईट वाटले नाही कारण जसे ऐतिहासीक व्यक्तीम्च्या वस्तु, शस्त्रे, इमारती, लेखन ई. बघुन लगेच ती व्यक्ती, तो काळ, तो इतिहास मनात येते त्याप्रमाणे हे गाणे बघुन अजिबातच पेशवे आठवले नाहीत.
पण जी अमराठी लोकं आहेत व ज्यांना काहीच इतिहास माहिती नसेल त्यांना हा चित्रपट बघुन बाजीरावच आठवेल आणि त्यांच्या मनात पेशव्यांची तसेच मराठी साम्राज्याची चुकीचीच प्रतीमा तयार होईल हे वाईट आहे.
अशोका चित्रपट बघताना असेच मला तो ऐतिहासी काळ आठवुन आणि सारुक करिनाचा डान्स बघुन विचित्र आणि वाईट वाटले होते (ऑकवर्ड). पण मला पुरेसा इतिहास माहिती असल्यमुळे काही वाईट मत तयार झाले नाही सम्राट अशोकाबद्दल.
पण माझ्यासारखे हे असे होणारे लोकं कमी आणि असे निव्वळ गल्लभरु चित्रपट बघुन मत तयार करणारे जास्त आहेत त्यामुळॅ आक्षेप घ्यावासा वाटतो.
त.टी. अशोका चित्रपटाच्या वेळी मी कोणताही आक्षेप घेण्याच्या वयाचा नसल्यामुळॅ घेतला नाही. याचा माझ्या जातीशी आणि पुरोगामी असण्या / नसण्याशी काहीही संबंध नाही हा वैधानीक इशारा गरजुंसाठी.
रियाला अनुमोदन.
रियाला अनुमोदन.
इथे पण पकवा ना
इथे पण पकवा ना त्यांना...म्हणजे दोन्ही बाजूच्या जातीयवादींना..
>>>
+१
रीया, ओके. आपले अनुभव
रीया, ओके. आपले अनुभव वेगवेगळे असू शकतात. तसेही माझे फार काही व्यापक नाहीयेत जे ठामपणे बोलावे.
इथे पण पकवा ना
इथे पण पकवा ना त्यांना...म्हणजे दोन्ही बाजूच्या जातीयवादींना..
>>>
हाहा अरे नाही, सध्या मी माझी स्टाईल अन इमेज बदलली आहे. पिडायचो म्हणजे त्यांचे ब्लडप्रेशर वाढवायचो. आणि हो, दोन्ही बाजूच्यांना, माझ्या जातीचेही मला शिव्या घालून जायचे, कारण कोणालाच मी आपला वाटू नये म्हणून मी माझी आई, बाबा, आजी, आजोबा, काका-काकी सर्वांचेच लवमॅरेज दाखवत प्रत्येकाला वेगळी जात दिली होती.
खरे तर माझ्यासाठी ते सारे नवीन आणि शॉकिंग होते, म्हणून एक ध्येय असल्यासारखे मी त्यांच्यात काड्या करायचो. सध्या मी माझ्या आसपास अश्या विचारसरणीच्या आहारी जाताना कोणी दिसले तर त्याला सावध करतो ईतकेच.
असो, खूप झाले विषयांतर
बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’
बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपने विरोध दर्शवला आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहातील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द करावे लागले आहेत. चित्रपटातील गाण्यांमुळे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडला होता. भाजपच्या पुण्यातील कोथरुड शाखेने ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहाच्या मालकांना ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाऱया नुकसानाची जबाबदारी चित्रपटगृह मालक आणि संचालकांची असेल, असा धमकीवजा इशारा दिला होता.
संस्कृती रक्षकांना जाग आली रे
एवढा विचार करायची गरज नाही.
एवढा विचार करायची गरज नाही. माझ्यासारख्या अनेकांना अशोक हा सम्राट होता, युद्धे जिंकला इतके ढोबळ माहीत होते. तरी त्या पिक्चर मधे जे दाखवले जात होते ते भंपक होते हे बहुतांश मराठी लोकांनाही समजले असेल. तसेच पिंगाचे आहे. ते इतके रिडिक्युलस आहे की कोणाही पाहणार्याला ते प्रत्यक्षात घडलेले नाही हे लगेच लक्षात येइल. कारण राजघराण्यातील व्यक्तींनी असे नाचणे हे बहुधा भारतात कोठेच होत नसावे. अनेक ठिकाणी अजूनही होत नाही.
दुसरे म्हणजे भन्साळीने जे काही दाखवले आहे ते सेन्सॉर मधून पास झालेले आहे. त्यावर बंदी आणायला सबळ कारण दाखवून कायदेशीर मार्ग आहेत. ४०-५० लोकांनी थिएटर जवळ जाउन चित्रपट प्रदर्शन बंद पाडणे हा पायंडा एकदा योग्य धरला की तो कोणत्याही गटाला न आवडणार्या कोणत्याही चित्रपटाकरता वापरला जाईल. अनेकदा तसा वापरला जातोच. ज्या वर्गाला याचा सर्वात जास्त राग आलेला आहे, त्याच वर्गाला आत्तापर्यंतचे सर्वात अनुकूल सरकार सत्तेवर आहे. देशात आणि राज्यातही. अगदी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देउन झालेले आहे. आणि तरीही चित्रपट रिलीज झालेला आहे.
जयंत - ही पोस्ट तुमच्या पोस्ट्शी संबंधित नाही. त्याआधीच्या काही पोस्ट्सशी आहे.
Pages