बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
नवीन ट्रेलर खरंच आवडलं. पण
नवीन ट्रेलर खरंच आवडलं. पण पिंगा गाणं मुवितून वगळायला हवं असं माझं वै. मत. जरी ते स्वप्न वगैरे असेल तरीही.
नवीन ट्रेलर मस्तं आहे !
नवीन ट्रेलर मस्तं आहे !
मस्त अहे नविन ट्रेलर त्यात
मस्त अहे नविन ट्रेलर
त्यात पिन्गा नाहीये.
Some more info on Mastani.
Some more info on Mastani.
हे वाचा आणि ठरवा...
मस्तानी’ हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी साहित्यात, मराठी मनात वारंवार तिच्या व्यक्तिमत्त्वाचे उल्लेख येतात. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कायम थट्टेचा, टिंगल-टवाळीचा उपसर्ग पोहोचला आणि तो अबाधित राहिला, म्हणूनच आजही या ३०० वर्षांत महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थाना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी.
मस्तानीची दुसरी ओळख आहे, ती म्हणजे रखेल मस्तानी, नाची मस्तानी, कंचन मस्तानी आणि तिची शेवटची ओळख म्हणजे तिने पान खाल्ल्यानंतर पानाची पिंक तिच्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची व ती पान खाऊन सज्जात बसायची त्याला लोक ‘मस्तानीचा सज्जा’ म्हणून ओळखत. मस्तानी या पद्धतीने इतिहासपटलावर प्रतीत झाली. परंतु खरंच मस्तानी अशी होती का? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?
मस्तानीला समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्याला छत्रसाल महाराजांना समजून घ्यावे लागेल. राजा छत्रसाल महाराज हे प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वराअगोदर त्यांची पूजा केली जाते. ‘छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली!’ अशी प्रार्थना म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एवढे मोठेपण हिंदुस्थानातील कोणत्याही राजाला लाभले नाही. छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते. प्रगत, उदारमतवादी प्रणामी पंथात हिंदू-मुस्लीम या धार्मिक भेदास मान्यता नव्हती. वेद आणि कुराण यातील ईश्वर एकच असून, मनुष्यमात्राची समानता, धार्मिक सहिष्णुता आणि निरामय प्रेमभावना ही या पंथाची तत्त्वे होती. या प्रणामी पंथास निगडित असलेली खूप मोठी मोठी नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महात्मा गांधी यांचे. ते व त्यांचे कुटुंब हे प्रणामी पंथीय होते. हे ऐकले तर आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे.
अशा पंथातून, अशा संस्कारातून मस्तानी आली होती. ती छत्रसाल महाराजांना यवन उपपत्नीपासून झाली होती. प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य धरत नसत. त्यामुळे मस्तानी ही छत्रसालांची औरस राजकन्याच ठरते. तिचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक संस्कार हे छत्रसालानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. वैभवात ती राहिली होती. गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता. तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत.
अशा या लाडक्या, राजकन्येचा मस्तानीचा खांडा पद्धतीने बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. छत्रसाल राजाने त्या वेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. ही भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण करणाऱ्या महमंद बंगषाला बाजीरावांनी पराभूत केल्याची कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल राजाने मराठे व बुंदेला ही सोयरीक निर्माण केली. बाजीरावांचाही या विवाहामागील हेतू पाहिला तर मस्तानी लावण्यवती होती, एवढाच नव्हता, तर बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता. बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि त्यासाठी त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज बाजीरावांनी ओळखली होती. पुढे पुढे मात्र या व्यवहारात भावनिक जवळीक निर्माण झाली. छत्रसालांनी बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’
‘महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को अपनौ भाई समझे हो.’ पत्राची तारीख आहे शनिवार, २३ सप्टेंबर १७३२. सदर पत्रातून बाजीरावांचा आणि मस्तानीच्या परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं. बाजीरावांनी केवळ सौंदर्यवती मस्तानीला पुण्यात आणले नाही, तर त्यांनी मस्तानीसोबत प्रणामी पंथाची भेदाभेदातीत निरामय प्रेमतत्त्वाची, अनोखी जीवनदृष्टीही आणली होती. हा नाही म्हटला तरी पुण्यातील लोकांना धक्काच होता आणि आव्हानही. त्यातच बाजीराव-मस्तानी यांच्या परस्परासंबंधीच्या निष्ठा फारच पक्क्या होत्या. परस्परांतील प्रेमही अतूट होते.
सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. त्यातील निजामभेट, कोकण मोहीम सात-आठ महिने. त्याअगोदर डबईचे युद्ध आणि नंतर उत्तरेची मोहीम. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर मस्तानीला रायांचा सहवास असा नव्हताच. पेशवे कुटुंबाचेही तसे दुर्लक्षच होते. एक रखेल या पलीकडे मस्तानीचे अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.
परंतु मस्तानीस जसा समशेर हा मुलगा झाला, तसे पेशवे कुटुंबास एका भीतीने ग्रासले की, कदाचित मस्तानीचा वंशज पेशव्यांच्या गादीवर हक्क सांगेल. झाले त्याच दिवसापासून मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी- प्राशनी ठरविले. एवढेच नाहीतर या संकटास कायमचे पंगू करण्यासाठी बाजीराव-मस्तानी हा संबंध वैवाहिक नाही, ती पत्नी नसून रखेल आहे, शिवाय ती खानदानी नसून ती निजामाच्या रक्षेची मुलगी आहे, शहाजन खानाची कलावंतीण आहे- अशा कपोलकल्पित गोष्टींचा पुण्यात बोभाटा सुरू केला.
आणखी एक आवई अशीच उठवली गेली, ती म्हणजे मस्तानी आल्यामुळे बाजीरावांचे काशीबाईंवरील लक्ष उडाले. परंतु वास्तवात मात्र मस्तानीचे व काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे होते. मस्तानी आल्यानंतर ही काशीबाईंना तीन अपत्ये झाली. यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे चारही बाजूंनी मस्तानीवर हल्ले होत होते. यात थोडा अंकुश होता, तो शाहू महाराजांचा. त्यातच बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला. शनिवारवाडय़ात प्रशस्त हवेली बांधली. एवढे नव्हे तर, समशेरच्या मुंजेची तयारी सुरू झाली.
या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास आणखीनच धार चढली. त्यातच या लढय़ात पुण्यातील ब्रह्मवृंद उतरला आणि बघता बघता राजकारणात व रणभूमीवर महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत झाले.
पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे गुप्त मनसुबे रचले गेले. खरे तर मस्तानी ही योद्धा होती. तिने दिल्लीच्या मोहिमेत बाजीरावांच्या रिकिबीला रिकीब लावून घोडा पळविला होता; परंतु इथे मात्र बाजीरावांच्या अनुपस्थितीत एकटी मस्तानी असहाय्य झाली, अगतिक झाली. ती सहनशीलतेची ढाल पुढे करून जगण्याची पराकाष्ठा करीत होती; परंतु अखेरीस ती कोसळली.
आजही मस्तानी-बाजीरावांचे इंदोर येथील वंशज म्हणतात ते खरेच! मस्तानीला मराठी मुलखाने न्याय दिला नाही. मस्तानी ही कधीच सत्तालोलुप नव्हती. महत्त्वाकांक्षी नव्हती. सुखलोलुप नव्हती. तसे असते तर एवढे बुंदेला येथील वैभव, ऐश्वर्य, आई-वडील आपला मुलुख सोडून ती हजार किलोमीटर एवढय़ा दूर पुण्यात आली नसती, यावरूनही ते सिद्ध होते. ती पुण्यात आली. राहिली. तिने इथली भाषा, पेहराव स्वीकारला. राऊंच्या पाठोपाठ काशीबाईंचे प्रेम मिळवले. मात्र ही पुण्याई तिच्यासाठी तुटपुंजी ठरली.
इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात निर्दोष समाज हा भारतात कधीच नव्हता, आजही तो नाही. आणि तो तर तीनशे वर्षांपूर्वीचा काळ होता. परंतु, बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा प्रकाश मस्तानीच्या रूपात पाहिला होता. तो मस्तानीच्या रुपाने त्यांना मराठी मुलुखात पेरायचा होता; परंतु तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.
सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे बाजीरावांची राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले. व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज निखालस खोटा आहे. मस्तानी बाजीरावांच्या जीवनात आली ते वर्ष आहे इ. स. १७२२. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. दुसरी गोष्ट मस्तानीमुळे गृहकलह पेटला असतानाही परकीय नादीर शहाचे आक्रमण होताच सबंध हिंदुस्थान वाचवण्यासाठी त्यांनी नर्मदेच्या तटावर सैन्य उभे केले होते. दक्षिणेत नादीर शहा उतरला नाही, यातील एक प्रमुख कारण बाजीराव होते. नादीर शहापाठोपाठ त्यांचे नासीरजंगाशी युद्ध झाले, त्याला पराभूत केले. हे युद्ध मोठे होते. आपल्यावर व मस्तानीवर होणारी बदनामी तलवारीच्या टोकावर झेलत त्यांनी मराठी राजकीय सत्तेची पुनर्रचना केली. त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. होळकर, पवार, खेर (बुंदेला) शिंदे या मराठा सरदारांची नर्मदेपलीकडे अभेद्य फळी उभी केली, तो त्यांच्या व्यवस्थापनाचा व दूरदृष्टीचा महनीय नमुना होता.
चारित्र्यसंपन्न, निव्र्यसनी, बुद्धिमान, कष्टाळू, अलोट देशप्रेम अशा बाजीरावांच्या अकस्मात मृत्यूने मराठी राजसत्तेवर दूरगामी परिणाम झालेले आपल्याला आढळतात
त्याने रिलीज केलेला नवीन
त्याने रिलीज केलेला नवीन ट्रेलर पाहा. खतरनाक आहे. >>> अगदी अगदी.
रणवीर सिंग बाजीराव म्हणून आवडला होताच , या ट्रेलर मधला त्याचा मराठी अॅक्सेन्ट नोंदला , आणखीनच आवडू लागला . त्याच्यासाठीच फक्त त्याच्यासाठीच बघणार हा चित्रपट .
अरेरे! मिनाक्षी खरच धन्यवाद
अरेरे!
मिनाक्षी खरच धन्यवाद तुला. अतीशय मोलाची माहिती दिलीस मस्तानीविषयी. उगा गैरसमज होते, तेही दूर झाले.:स्मित:
मीनाक्षी छान पोस्ट. नितिन
मीनाक्षी छान पोस्ट.
नितिन देसाई यांनी 'बाजीराव मस्तानी' मालिकेत ती छत्रसाल राजाची कन्या होती हे दाखवलं होतं. छत्रसाल राजाची भुमिका अविनाश नारकर यांनी केली होती. नंतर शाहु महाराजांची भुमिका पण त्यांनीच केली होती. प्रणामी पंथाचीपण ओळख मला त्याच मालिकेत झाली.
इ मराठीवर हि मालिका होती आणि फार अभ्यासपुर्ण हाताळली होती 'देसाई' यांनी.
मीनाक्षी मस्त
मीनाक्षी मस्त पोस्ट.
माहितीसोबत पोस्टची भाषाही उत्तम आहे.
व्हॉटसपवर शेअर करू शकतो का?
आपणच लिहिली असल्यास आपल्या नावाने शेअर करेन.
मिनाक्षी माहिती आवडली...
मिनाक्षी माहिती आवडली... धन्यवाद.
आता हा बाफ पूर्णपणे वाचून
आता हा बाफ पूर्णपणे वाचून काढला. सचिन पगारेचे << << मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल. >> हे पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह आहे. तीव्र निषेध. त्यांच्याकडून दुसरी अपे़क्षा नव्ह्तीच. अॅडमिन , इथे लक्ष देणार का ? आशूचॅम्प, सेनापतीच्या पोस्टला +१
मीना़क्षी कुलकर्णी , मस्त माहिती.
बाकी गाण्याबद्द्ल, मलाही ते गाण खटकल. पण चित्रपटावर बंदी वगैरे घालण्याच्या मी विरोधात आहे. ऊठसूठ बंदी घालणे हा नक्कीच उपाय नाही.
मीनाक्षी, हा वरचा मजकूर तुमचा
मीनाक्षी,
हा वरचा मजकूर तुमचा आहे का? कारण मला तो काहींनी अजून वेगवेगळ्या नावांनी पाठवला आहे. शिवाय या मजकुरातल्या काही तपशिलांबद्दल शंका आहे. तुम्हीच हे लिहिलं असेल तर कृपया संदर्भ द्याल का?
मा.* जी सचिनजी पगारेजी सोडले
मा.* जी सचिनजी पगारेजी सोडले तर ईथे बाकीच्यांना नाय काय काम( त्यात मीपण आलो) उगा टीपी करतायत झालं.
पगारेजी तुम्हीजी चालुजी द्याजी.
(मा.* म्हणजे माननीय हं !)
शिवाय या मजकुरातल्या काही
शिवाय या मजकुरातल्या काही तपशिलांबद्दल शंका आहे. तुम्हीच हे लिहिलं असेल तर कृपया संदर्भ द्याल का? >> मला पण! मजकूरात लिहिले आहे कि मस्तानी बाजीरावांच्या आयुष्यात १७२२ साली आली पण जैतापुरची (का जैतपुर?) लढाई जिच्यात बंगशाचा पराभव झाला १७२९ सालची आहे. मस्तानीची उपेक्षा झाली हे अगदी मान्य पण मजकूरातल्या काही गोष्टी जुळत नाहीत.
मीनाक्षी ह्यांनी बहुदा खालचा
मीनाक्षी ह्यांनी बहुदा खालचा लेख टाकला आहे
https://lekhsangrah.wordpress.com/2011/03/24/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C...
अशोक मामांचा "राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी " ह्या धाग्यावर अरुंधती कुलकर्णी यांनी ही लिंक दिली होती.
नव्या ट्रेलर नंतर लोकांचे
नव्या ट्रेलर नंतर लोकांचे मतपरिवर्तन झाले वाटते …
नविन ट्रेलरची लिंक द्या
नविन ट्रेलरची लिंक द्या
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eHOc-4D7MjY
ट्रेलर चांगले आहे. पण ते
ट्रेलर चांगले आहे. पण ते बाण हाताने पकडणे वगैरे जऽरा जास्त होतेय.
पेशव्यांच्या ध्वज फक्त भगवा का दाखवलाय? तो जरीपटका असायला हवा. अर्थात ही लिबर्टी इतरांच्या काहीच नाही म्हणा.
जरीपटका म्हणजे काय?
जरीपटका म्हणजे काय?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40335 ह्या नोड वरील एका चित्रात दिसतो तसा.
ट्रेलर चांगले आहे. पण ते बाण
ट्रेलर चांगले आहे. पण ते बाण हाताने पकडणे वगैरे जऽरा जास्त होतेय.
>>
+१
थँक्स केदार
ट्रेलर चांगले आहे. >>>> +
ट्रेलर चांगले आहे. >>>> + १
मला पीसी चा डायलॉग झेपला नाही.. " पर आपने तो हमसे गुरुर माँग लिया वगैरे.
दिपीका ला साखळदंडानी बांधले आहे.हे जरा अतिच वाटतेय.
मला पीसी चा डायलॉग झेपला
मला पीसी चा डायलॉग झेपला नाही.. " पर आपने तो हमसे गुरुर माँग लिया वगैरे.
दिपीका ला साखळदंडानी बांधले आहे.हे जरा अतिच वाटतेय.
>>
अहो इतक्या मेलोड्रामा शिवाय पिक्चर पूर्ण कसा व्हायचा … त्यात तो भंसाळीचा
ते दीवानी मस्तानी गाणे
ते दीवानी मस्तानी गाणे अत्यंत फिकट आहे. मार डाला धुवून विसळल्या सारखे. काचमहाला पेक्षा आपले टी टू फर्स्ट क्लास दिसते. नाकात नथनी लूक बेकार आहे. प्रियांकाला नात्याचा सिरीअस नेस झेपत नाही का? पायाला चिमटे काढते, वर उभी राहून वेडावून हसते काय.
ट्रेलर पाहिलं. उगाचच लार्जर
ट्रेलर पाहिलं. उगाचच लार्जर दॅन लाईफ़ आणि भडक वाटलं. केस मोकळे सोडून मस्तानी युद्धावर का जाईल? अंबाडा बांधणार नाही का साधा लॉजिकली? बाजीराव पेशवे युद्धभूमीवर निघाले की काशीबाई नियमितपणे फ्लॅग ऑफ करत असत का? डायलॉगबाजी का केलीये इतकी? प्रत्येक जण इकडून तिकडून डायलॉग फेकायला लागला की बोअर होतं. त्यातल्यात्यात रणवीरच काय तो बरा वाटतोय सध्यातरी.
रणवीर तिघांच्यात चांगला
रणवीर तिघांच्यात चांगला वाटतोय. त्यामुळे टीव्हीवर आल्यावर मूवी बघेन. थेटरात नाही जाणार.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/petition-filed-a...
कोर्ट फटके मारत आता
प्रतिसादांबद्दल धन्यवाद... पण
प्रतिसादांबद्दल धन्यवाद... पण ही माहिती माझी नसून मला व्हॉट्सअॅपवर आलेला एका फॉरवर्ड लेख आहे , जो मी इथे टाकला, फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने,... दुर्दैवाने लेखकाचे नाव मला माहीत नाही. मी नताशा यांनी दिलेली लिंक आणि मी टाकलेला लेख सेम आहे, असे दिसते.
पिंगा गाणं यूट्यूब व पाहिलं.
पिंगा गाणं यूट्यूब व पाहिलं. वेगळ्या बायका घेऊन परत डोला रे चा रिपीट मारला आहे.बायांचे एक्सप्रेशन्स बेगडी आहेत, आजूबाजूच्या कोरस च्या नाचातही मेळ नाहीये.भव्यदिव्य कपडे, सेट,,रंगीत पडदे हे सर्व हदिदेचुस ते देवदास ते गोळ्यांचा मारा रामलीला ते बाजीराव मध्ये सारखेच आहे. तो डोक्यावर आपटलाय, प्रत्येक चित्रपटात तोच फॉर्म्युला वापरतोय. गाणं गुनागुणावं
आणि लक्षात ठेवावं इतकं चांगलं नाही, ते आपोआप इग्नोर होईल. त्याने पिंगा शब्द न वापरता सरळ मस्तानी आणि काशीला थेट शेवटच्या गाण्यात लावणी नाचताना दाखवले असते तरी चालले असते.तसेही शेवटचे गाणे हे लोक एकदम गर्दी न करता हळूहळू एक्सिट करावे म्हणून असते.☺
तो डोक्यावर आपटलाय, >>
तो डोक्यावर आपटलाय, >>
Pages