बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे असे दाखवून भंसाळी सगळ्या वादावरच पडदा पाडणार आहे.>> असे असेल तर वादच मिटला...
ते गाणे उत्तान, अश्र्लील वगैरे अजिबातच वाटत नाही..फक्त इतिहासाचा संदर्भ सोडून केलेले वाटते..
मुख्य गोष्ट म्हणजे काशीबाईंचा मस्तानीला विरोध होता..शनिवार वाड्यात सर्वांचाच होता..मग ह्या दोघी एकत्र नाच करणे कसे शक्य आहे?
गाणं पाहून इतिहासाशी फारकत
गाणं पाहून इतिहासाशी फारकत वाटली म्हणून ते मत इथे लिहिले.
एका गाण्यावरून किंवा एका ट्रेलरवरून सिनेमाबद्दलची कोणतीही मते मला निदान सिनेमा मी स्वतः पाहीपर्यंत मांडायची नाहीत. त्यामुळे इथे अधिक लिहिण्यासारखे सध्या तरी माझ्याकडे काही नाही.
अभिव्यक्तीच्या क्लीशे बद्दल - अभिव्यक्ती ही अभिव्यक्तीच ठेवा. तिच्याशी प्रामाणिक रहा.
ह्या गाण्याच्या/सिनेमाच्या संदर्भात बोलायचं तर त्या अभिव्यक्तीला इतिहासाचे प्रमाण, आधार लावू नका. फिक्शन म्हणा आणि मनसोक्त हवं ते इंटरप्रीट करा, इमॅजीन करा, हवं तितकं अभिव्यक्त व्हा मुक्त होऊन !
भन्साळीने रिसर्च करायला हवा
भन्साळीने रिसर्च करायला हवा होता.
उदा. त्या काळी तुळशीबागेत कुठल्या साड्या मिळत होत्या ?
पेशविणी इतक्या सपाट पोटाच्या असायच्या का ? तळवलकर्सची शाखा शनिवारवाड्यात होती का ?
नसेल तर मग दिवेकरीणबांची पूर्वज कुठे राहत होती ? ती बया पेशविणींना काय खायला सांगायची ?
वरील प्रश्नांची उत्तरं नसतील तर मग पेशविणींची पोटं सिनेसृष्टीत प्रवेश करणा-या सौदिंडीन हिरविणीसारखी असायला हवीत. इतका रिसर्च केला तर मग ते गाणं रिअलॅस्टीक होण्याकडे पहिलं पाऊल पडू शकतं.
आता नाच गाण्याविषयी
शनिवारवाड्यात नाचगाणं होत असतं तर ते बिच्चारे पुरूष कशाला ना इकडे तिकडे फिरले असते ? उगाच मग घाशीराम कोतवाल सारखं नाटक निघालं असतं ? पिंगा कि लावणी च्या ऐवजी अनेक खेळ दाखवता येऊ शकले असते. पण मग सात्विक सेन्सॉर बोर्डाने तो पास केला असता का ?
एकीकडे जेम्स बॉण्डला पूजा केल्याशिवाय कामगिरीवर पडत नाही तो माणूस असं दाखवा म्हणतं आपलं बोर्ड .. विचार करा रिअलॅस्टीक शिणेमा काढला तर काय होईल ?
भन्साळी काकांनी ऐतिहासिक
भन्साळी काकांनी ऐतिहासिक म्हटलंय का काय?
>>
घ्या भंसाळी ऐतिहासिक म्हणेल तर आमचा बाजीराव अन त्याच्या सौभाग्यवती ऐतिहासिक होणार?
आणि इतिहासात होऊन गेलेल्या घटनांबदल कधीपासुन अभिव्यक्ती?
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे असे दाखवून भंसाळी सगळ्या वादावरच पडदा पाडणार आहे. >> +१ मला ते मस्तानीचे स्वप्न वाटले होते. तिला हरताळकेचे आमंत्रण आले आणि ढँटडँण ... पैठण्याचे स्वप्न, राणीबरोबर नाचल्याचे स्वप्न.
पण बाजीरावाचे म्हणूनही चालेल.
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे
ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे >>> बाजीरावास अशी स्वप्ने पडत ? आभादु.
ऋन्म्या
तुला एव्हढा पेकालीन इतिहास माहीत आहे आणि अंगवस्त्रं तेव्हढं माहीत नाही होय रे लब्बाडा ?
वा. आला का धागा. Love story
वा. आला का धागा.
Love story of a worrier - बाजीराव मस्तानी असे नाव असल्याने मुख्य फोकस मस्तानीवर आहे हे भंसालीने नावातच स्पष्ट केले आहे. बाकी त्या अनुषंगाने बाजीराव काय पराक्रम करेल ते येतील बहुदा.
रार +१ एका गाण्यावरून किंवा
रार +१
एका गाण्यावरून किंवा एका ट्रेलरवरून सिनेमाबद्दलची कोणतीही मते मला निदान सिनेमा मी स्वतः पाहीपर्यंत मांडायची नाहीत.
ट्रेलरवरून सिनेमा पाहायला
ट्रेलरवरून सिनेमा पाहायला जाणार का तेवढ तर सांगा. काही जणात तर तितकेही धाडस नाही उरले.
ट्रेलर कसंही असलं तरी सिनेमा
ट्रेलर कसंही असलं तरी सिनेमा पाहाणारच. त्याशिवाय आमच्यासारख्या लोकांना चैन पडत नाही
मि. बाजीरावकपुर झकास दिसतात
मि. बाजीरावकपुर झकास दिसतात त्यामुळे सिनेमा पाहु शकते :).
भन्सालीशी तसं काही वाकडं नाही, त्याचे सिनेमे ब्लॅक, देवदास, हम दिल, गुजारीश , रामलीला आवडले होते .
सावरीया मात्रं अजिबात आवडला नव्हता !
इथे ऐतिहासिक विषयावर सिनेमा काढलाय म्हणून गाण्यातल्या चूकांवर ऑब्जेक्शन !
सिनेमा बघायला जात, पण भन्साळी
सिनेमा बघायला जात, पण भन्साळी सोकावतो :|
ह्या उठलेल्या वादामुळे ह्या
ह्या उठलेल्या वादामुळे ह्या सिनेमाचा खूप प्रचार होतो आहे. माझ्यामते लोक सिनेमा बघितल्याशिवाय राहणार नाहीत. लोकांना हे असे विषय वाद फार रुचतात.
हा सिनेमा बघायला थेटरात जाईन
हा सिनेमा बघायला थेटरात जाईन बहुदा. ह्याआधी थेटरात पाहिलेला शेवटचा सिनेमा आठवत नाहिये. बरीच वर्ष झाली.
काही म्हण हं ऋन्म्या, तू ज्या
काही म्हण हं ऋन्म्या,
तू ज्या गतीने आणि ज्या टायमिंगला धागे काढतोस त्यामुळे मागचे आपले धागासम्राट मागे पडले.
जंजीरच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. हा सिनेमा आला आणि राजेशखन्ना माजी सुपरस्टार झाला. त्यानंतर अनेक दिवस तो मीच खरा ओरिजिनल सुपरस्टार आहे हे ओरडून सांगत होता.
>>>>>आता नाहीतच पुरावे मग
>>>>>आता नाहीतच पुरावे मग डान्स वर का थांबता. वाटच लावायची आहे इतिहासाची तर गो ऑल द वे!! "सुबह होने न दे" म्हणत मस्त दोनचार अॅब्ज दाखवणारे मावळे आणा, लेट दि क्रिएटीव्हिटी टच इटस झेनिथ.>>>>
अकबर बिरबल सारखी एक जोडी
अकबर बिरबल सारखी एक जोडी बॉलीवूड मध्ये ही आहे - शाहरुख खान आणि करण जोहर ......
ऋणम्या आणि मायबोलीकर...
ऋणम्या आणि मायबोलीकर...
माननीय श्री. विनोद तावडे
माननीय श्री. विनोद तावडे जी,
सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले.
ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत.
आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही.
देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल?
तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही.
क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली.
महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे.
आपला नम्र
एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...
साभार व्हॉट्सॅप
तावडे यात काय निर्णय घेणार?
तावडे यात काय निर्णय घेणार? काहीही ! शिवसेना यात 'निर्णय ' घेऊ शकते. पण सेनेला पेशव्यांबद्दल फार ममत्व नाही. पेशवे हिंदू आहेत एवढेच. बाकी महाराज एके महाराज.
लोकहो, काय टीका करायची ती
लोकहो, काय टीका करायची ती करा. पण सरकारला आणि सेन्सॉर ला यात ओढू नका. भन्साळी ला या भंकस मधून जे काही साध्य करायचे आहे ते ऑलरेडी झालेले आहे - प्रसिद्धी.
सरकारने यात हस्तक्षेप करणे म्हणजे रोगापेक्षा भयंकर इलाज आहे. उठसूठ भावना दुखावून सरकारला बंदी बिंदी आणायला लावणे असले प्रकार आपल्याकडे खूप चालतात. त्यात आणखी भर कशाला?
गाणे वाईट नाही पण त्याचा
गाणे वाईट नाही पण त्याचा आस्वाद घ्यायला हा १७ व्या शतकातील इतिहासावर चित्रपट आहे हे विसरावे लागते, यातच सारे काही आले. तो नाच मस्तानी काशीबाई यांचा नसून, दिपिका आणि प्रियांका यांचे एक परफर्मन्स आहे असे बघावे लागते - यात दिग्दर्शन जाम मार खातंय असं मला वाटतं.
बाकी कालाय तस्मै नम:.
लोकांना आवडतं म्हणुन
लोकांना आवडतं म्हणुन पानिपतावर सिनेमा काढला तर हे युद्धाच्या आदल्या रात्री शेकोटी भोवती अब्दाली आणि सदाशीवराव भाऊंची जुगलबंद कव्वालीही दाखवतील.
नमस्कार, या गाण्यावर वाद
नमस्कार, या गाण्यावर वाद याचमुळे आहे, की हे गाणे काशी बाई आणी मस्तानी वर एकत्रित चित्रित झाले आहे, मुद्दा असा पण वाचण्यात आलाय की मूळ सिनेमा मधे हे गाणे नाही, तर शेवटी दाखवले जाईल, अर्थात त्याने वाद समाप्त होत नाहीच... काशी बाई या पायाने अधू होत्या, त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्य नाही, मुळात काशी बाई आणि मस्तानी बरोबर का नाचव्यात... ही सरळ सरळ इतिहासाची दिशाभूल आहे...
दा व्ह्न्सी मधे येशू ख्रिस्त
दा व्ह्न्सी मधे येशू ख्रिस्त चक्क विवाहीत असल्याचे आणि कुमारिका म्हणून पूज्य असलेली मेरी ही त्याची पत्नी असल्याचे दाखवले गेले आहे. पण तिथे यावरून गदारोळ झालेला नाही असे युक्तीवाद अनुक्रमे
विश्वरूपम
मै हूं खान
आणि अन्य काही विस्मरणात गेलेल्या हिरव्यादुखण्यांच्या सिनेमाच्या वेळी झालेले होते हे स्मरते. दाखले देणारे स्वतःच आभादु चे रुग्ण असल्याचे पाहून धक्काच बसला.
इतिहासचा खून झाल्याचं दुखः
इतिहासचा खून झाल्याचं दुखः नाही, राजकारणी सोकावतात.
राजकारण्यांना पोळी भाजायचा चान्स देऊ नका कृपया धन्यवाद.
कापोचे, कृपा करा आणि ठिणगी टाकू नका हो. लोक टपलेले आहेत,
टॅक्स मिळतो सिनेमातून तर
टॅक्स मिळतो सिनेमातून तर कशाला सरकार हस्तक्षेप करेल? जिथे स्वतःला काही झिज बसत नाही तिथे झटपट बॅन-बिन करतात.
फार तर फार धूम्रपानाच्या सीनखाली वैधानिक इशारा देतात तसा वन-लायनर त्या सीनखाली किंवा सुरूवातीला देतील.
चला या धाग्यावर मोदी, अके,
चला या धाग्यावर मोदी, अके, रागा, ओवेसी यायची वेळ झाली.
आता तर नीतीश , लालू सुद्धा येतील.
एका पिच्चर मधून मिळणारा tax
एका पिच्चर मधून मिळणारा tax जास्त महत्त्वाचा की संस्कृतिरक्षण/ हनन, मतदारांच्या भावनांचे रक्षण इ. इ. करून मिळणारी मतं आणि ५ वर्षे शाश्वत सत्ता? जिकडे पारडं झुकेल तिकडे राजकारणी जातील नाही का?
लोकांना आवडतं म्हणुन
लोकांना आवडतं म्हणुन पानिपतावर सिनेमा काढला तर हे युद्धाच्या आदल्या रात्री शेकोटी भोवती अब्दाली आणि सदाशीवराव भाऊंची जुगलबंद कव्वालीही दाखवतील.>>>>>:हहगलो:
Pages