मधुमेहींसाठी योगासने

Submitted by हर्ट on 15 November, 2015 - 10:00

मी योग शिकवतो. आमच्याकडे मधुमेह असलेले अनेक स्त्री पुरुष येतात. आणि त्या सर्वांना अर्धमच्छिन्द्रासनाचा अत्यंत मोठा फायदा झाला आहे. रोज सकाळ, संध्याकाळ, आणि रात्री जेवणापुर्वी हे आसन केल्यानी किडनीवर खूप चांगला परिणाम होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक प्रश्न.
आपल्याला मधुमेह झालाय, हे कसे कळते? म्हणजे डेंगु, चि. गुनीया सारखी प्राथमिक लक्षणे वगैरे काही दिसतात का?

मधुमेहासाठी अस काही आसन असते >> मधुमेहासाठी काही आसन्/आसने असतात हा चुकीचा समज आहे. खरंतर अमुक आजारासाठी तमुक आसन असे काहीच नाही. काही आसनांमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते असे योग विद्या निकेतनच्या अभ्यासातुन काढलेला निष्कर्ष सांगतो, असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण आसने करतो म्हणुन नियमित औषधे किंवा पथ्य पाळली नाहीत तरी चालेल असे बिलकुल नाही. आणि सर्वच प्रकारच्या मधुमेहांवर (Type I/II) आसन प्रभावी ठरतेच असे नाही.

आसने ही जाणकार तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. अर्धमत्स्येंद्रासन हे करायला अवघड आसन आहे. त्यामुळे नविन साधकांनी लागलीच ते करु नये.

बी, तुमच्या क्लायंटसना किडनीचा मधुमेह असतो का?
मधुमेह किडनीमुळे होणारा आजार आहे का?
फायदा होतो म्हणजे काय होतं? किडन्या दुखायच्या बंद होतात का?
अर्धमच्छिंद्रासन की अर्धमत्स्येंद्रासन?

चक्रम Lol

चक्रम, किडनीचा मधुमेह असा काही प्रकार नसतो.
मधुमेहातली किडनी 'डायबेटिक किडनी' असा प्रकार असतो मात्र! म्हणजे मधुमेहामुळे किडन्या अगोदर सुजतात आणि मग हळूहळू काम करेनाश्या होतात. त्याला डायबेटिक नेफ्रोपथी म्हणतात.

अर्थात बी ना काय म्हणायचेय ते मला माहित नाही, मी आपली तुमची एक शंका दूर केली.

इथे वाचा आणि मी जर मुर्ख वाटत असेल तर सोडून द्या.

Ardha Matsyendrasana for Diabetes treatment

The half spinal twist pose is just like a boon for those who have sugar problems. The diabetic patient should perform it regularly. Practising this yoga pose helps to instruct the beta cells of pancreas to secrete more insulin as Ardha Matsyendrasana stimulates the pancreas. Secretion of insulin ensures sugar control in blood thereby beneficial in diabetes.

http://www.gyanunlimited.com/health/ardha-matsyendrasana-half-spinal-twi...

अर्धमच्छिंद्रासन की अर्धमत्स्येंद्रासन?

मत्स्य हा संस्कृत शब्द झाला. माशाला मच्छि असेही म्हणतात. म्हणून दोन्ही नावे प्रचलित आहे.

धन्यवाद असेच इतर धाग्यांवरही शहाणे वागा. मुर्खांना सोडून द्यायचे असते. तुमच्याकडे तर एक नाही दीड शहाणपण आहे. परत एकदा धन्यवाद.

अधिक सविस्तर लिखाण आवडले असते. धाग्यात एकाच आसनाचा उल्लेख आहे पण नाव योगासने असे आहे. पुढे यात इतर आसनांचा समावेश होइल काय?

होईल. अवश्य होऊ शकतो. पण इथे येणार्‍या प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांना जो पाठिंबा मिळतो त्यामुळे असे वाटते ह्यांना आपल्या सांगण्याची किंमत नाही वाटत. मग लिहूण उपयोग काय.

मत्स्य हा संस्कृत शब्द झाला. माशाला मच्छि असेही म्हणतात.>> इथे थोडी गल्लत होते आहे असे वाटते. कारण 'मत्स्यासन' हे एक वेगळे आसन आहेच. तसे माशाला 'म्हावरां' असेही म्हणतात. म्हणुन 'म्हावरासन' असे म्हणणे योग्य होणार नाही, नाही कां?? Wink

बी, अर्धमत्सेंद्रासनामधे उर्ध्व शरीराला जो पीळ बसतो त्याने pancreas वर दाब येतो व त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रीत करण्याचे कार्य व्यवस्थित चालते असे मह्टले जाते. यावर शास्त्र्शुद्धरीत्या संशोधन झाले आहे का हे ठाऊक नाही. पण योविनी ने केलेल्या निरीक्षणानुसार औषंधासोबत हे व ईतर आसने केल्याने मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत होते असा निष्कर्ष काढला आहे. याला ढोबळ निष्कर्ष म्हणुन हवं तर. पण या आसनाने मधुमेह नाहीसा होईल असा दावा कोणी करत असेल तर ते चुकीचे ठरेल.

भ्रमर, हे आसन केल्यानी मधुमेह नाहिसा होता नाही. असे वर मी वा लिंकमधेही लिहिलेले नाही. मधुमेह झालेल्या व्यक्तीने हे आसन केले असता त्याला आराम मिळतो. फायदा होतो. असा त्याचा अर्थ आहे. आले लक्षात? धन्यवाद.

ही नवीन माहिती मिळाली Happy धन्यवाद बी. मी असेही वाचले आहे की स्ट्रेंग्थ ट्रेनिंग (म्हणजे बॉडी वेट किंवा इतर सहाय्यक उपकरणे वापरून केलेला वजनाचा व्यायाम) नियमित केले की इन्सुलिन सप्लाय वाढल्या जातो. अर्थात मला ह्याबद्दल काही जास्त माहिती नाही.

पण नेटवर ह्यासंबंधी सकारात्मकता दिसली.

For people with diabetes, strength training helps the body :

Respond better to insulin
Improve the way it uses blood sugar
Lose weight
Lower your risk for heart disease

आणि इतर

http://care.diabetesjournals.org/content/29/8/1933.full
अवांतर:

पेपरात वाचण्यात आले की बॅरियाट्रिक की काय वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया असते, ती केली की ही शुगर लेव्हल कंट्रोल होऊन मधुमेह नाहीसा होतो.

http://www.loksatta.com/udyacheaaj-news/what-happens-during-bariatric-su...

माझ्या आत्यानी ३ महिन्यांपूर्वी ही शस्त्रक्रीया केली, मग वरील लेखात सांगितलेले परिणाम दिसून आलेत.

अजून अवांतर: आमच्या आवडत्या सेलिब्रिटी आहारतज्ञ दिवेकरबाई म्हणतात की व्यायामानी मधुमेह कंट्रोल मध्ये राहतो पण फार्मा कंपन्यांना त्यांच्या दुभत्या गायी (पक्षी डायबेटीक रुग्ण) प्रिय असल्याने ते असे रिसर्च होऊ देत नाहीत Wink

अनिरुद्ध, योगाभ्यासानी एकूणच जीवन आनंदी राहत. रोज एक तास योगाभ्यास केला की नक्कीच आपले आजार आटोक्यात राहतात. आपले शारिरिक बदल .. आपल्या शारिरिक गरजा आपल्याला कळतात.

मला तर योगाभ्यासाची इतकी सवय झाली आहे की नाही केला की तो दिवस वाया गेला असे वाटते.

बी,

अनुमोदन. व्यायामात रेग्युलर राहिलो की त्याची सवय लागते आणि सुटत नाही Proud

Good Habits are Hard to come and hard to go Happy

अनिरुद्ध, चांगल्या सवयींचे महत्त्व कळायलाही शहाणपण लागत. जे प्रत्येकांकडे नसत. सांगून सांगून ओरडून ओरडून आपणच थकून जातो पण ज्याला त्रास होतो आहे ती व्यक्ती काही मनावर घेत नाही. आपण प्रेमापोटी काळजी करत बसतो.

अर्धमत्स्येंद्रासन>>> हे मत्स्येंद्रस्वामी अशा कुनाच्या तरी नावानं ओळखलं जातं ना? त्यांचा आणि मच्छीचा काही संबंध नाही.

बी, लेख लिहिताना सविस्तर लिहिला असतास तर अधिक उपयोगी पडणार नाहीका? ढोबळ तीन चार वाक्यं लिहीलीस तर त्यावर कोण काय प्रतिक्रिया देणार आहे? तू जर योग शिकवत असशील तर सविस्तर चर्चात्मक लेख योप्ग्य त्या रीसर्च आणि माहीतीसकट देऊ शकतोस. उगाच तीन चार वाक्यं लिहून मग लोकांवर कमेंट टाकात "व्हीक्टीम" खेळण्यात अकाय अर्थ आहे?

भ्रमर +१

पॅक्रीयाज चे कार्य सुधारले की रक्तशर्करा आणि मुत्रशर्करा नियंत्रणात यायला मदत होत असावी. अद्याप कैवल्यधाम लोणावळा या यौगीक रिसर्च करणार्‍या संस्थेने सुध्दा असा रिसर्च करुन पेपर पब्लीश केल्याचे वाचनात नाही.

असो, डायबेटिस करता योग असा काही वेगळा असत नाही. अनेक आसनांचे फायदे मिळतात. स्ट्रेस लेव्हल कमी झाल्यामुळे सुध्दा लिव्हरमधुन रिलीझ होणारी अतिरिक्त साखर नियंत्रणात रहाते असे योगाचार्य विश्वास मंडलीक ( योग विद्या धाम - नाशिक ) यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंट या कार्यशाळेत ऐकले होते.

बर्‍याच वेळा साखर किंवा तत्सम साखर वाढवणारे गोड फळे/ भात टाळुन सुध्दा रक्तशर्करा आटोक्यात रहात नाही म्हणणार्‍या व्यक्तीना स्ट्रेस असु शकतो ज्यामुळे अतिरिक्त साखर लिव्हर रिलिझ करते हे मंडलिक सरांचे विवेचन अनेक वर्षांनंतर लक्षात राहिले.

त्यांच्या मते वाढलेली साखर नियंत्रणात आणायला शंखप्रक्षालन उपयोगी पडते ( पुस्तक वाचुन कुणी करण्याच्या फंदात पडु नये ) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

नंदीनी, मला लेख लिहायचा असता तर तो मी माझ्या रंगबेरंगीमधे लिहिला असता. मला जे काही सांगायचे होते त्यासाठी तेवढ्या तीन चार ओळी पुरेशा आहेत. इतर लोकांचे इनपुट्स येतीलच. ज्यांना ह्या विषयात रस आहे, गांभिर्य वाटते ते लिहितील. त्यांची मते सांगतिल.

सस्मित, योगामधली बरीच आसने ही प्राणी पक्षी ह्यांच्या नावावर आधारलेली आहे. उदा: श्वानासन, सिहांसन, बकासन, उष्ट्रासन, गौमुखासन, चातकासन, मयुरासन, मकरासन. बरीच आहेत. हेही खरे आहे बहुतेक शाकाहारी लोकच योगासनाचा मार्ग अवलंबतात. ह्याचा अर्थ असा नाही की मासाहारी लोक करत नाहीत योगा पण तुलनेनी शाकाहारी लोक जास्त आहेत. हे मी माझ्या वर्गात येणार्‍या संख्येवरुन सांगत आहे.

मी असेही वाचले आहे की स्ट्रेंग्थ ट्रेनिंग (म्हणजे बॉडी वेट किंवा इतर सहाय्यक उपकरणे वापरून केलेला वजनाचा व्यायाम) नियमित केले की इन्सुलिन सप्लाय वाढल्या जातो.
<<
हे बरोबर आहे.
योग = स्ट्रेंग्थ ट्रेनिंग नव्हे.

Pages