२५० ग्रॅम मटण खिमा
१ मोठा कांदा
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
२ टोमॅटो
१ दालचिन काडी
१ काळी वेलची
२ हिरवी वेलची
१ तमालपत्र
१ चक्रफुल
१/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून जिरं पावडर
२ टीस्पून धणे पावडर
३ टेबलस्पून तेल
१/२ लिंबाचा रस
मीठ
मुठभर कोथंबिर
५-६ पाव
खिमा पाव करायला खूप दिवस टाळाटाळ करत होतो. पण कालचा रविवार सत्कारणी लावला. खूप सोपी आणि झटपट होणारी पाकृ असल्याने मध्येच करायला हरकत नाही असं ठरवलं.
चला, लागुया कामाला...
खिमा एका चाळणीत घ्यावा. चाळणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चाळण बुडवून खिमा हलक्या हाताने धुवून चाळण बाहेर काढावी. अशाप्रकारे २-३ वेळा खिमा धुवावा, जेणेकरून लालसरपणा आणि वासाची उग्रता कमी होईल. खिमा साधारण १० मिनिटं चाळणीत निथळत ठेवावा.
----
जाड बुडाच्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिन, वेलची, तमालपत्र आणि चक्रीफुल परतून घ्यावं. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. मंद आचेवर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. आता त्यात धुवून निथळत ठेवलेला खिमा घालून ५ मिनिटे परतावा.
आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो, गरम मसाला, हळद , जिरं पावडर, धणे पावडर, तिखट आणि मीठ घालून परतून घ्यावे. साधारण १०-१२ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. गरज लागल्यास अगदी थोडं पाणी शिंपडावे. खिमा तेल सोडू लागल्यावर लिंबाचा रस घालावा. आच बंद करून वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालावी.
पाव दोन्ही बाजूने ओव्हनमध्ये किंवा तव्यावर थोडे भाजून घ्यावेत आणि मध्ये कापून त्यात खिमा घालून, आवडत असल्यास थोडा कांदा घालावा.
खिमा कोवळ्या मटणाचा असावा. वासही कमी येतो आणि शिजतोही लवकर.
केली आज खिमापोळी. तयार खिमा
केली आज खिमापोळी. तयार खिमा नसल्याने चिकन उकडून बारीक केलं. बाकी सगळे जिन्नस तेच घेतले पण कमीअधिक प्रमाणात. मस्तं चव आली पण!
मस्तच
मस्तच
Pages