सेहेवागी पोवाडा...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 22 October, 2015 - 11:25

वीरुच्या निवृत्ती निमित्ताने ,पूर्वी मिसळपाव.कॉम वर लिहिलेला हा पोवाडा इथे देत आहे..कारण आज मी तो म्हणला ..
तेंव्हा त्या रेकॉर्डिंगसह देत आहे.. ऐकून/वाचून कसा वाटला..ते जरूर सांगा.
----------------------------------------------------------------------------------------

http://www.mediafire.com/watch/i5lrmme6ayuny6e/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%...
जय हो..
जय हो..
जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!

(गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना..
मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!
पेटली पुन्हा ती आग...
हो sssssssss ओ..ओ..ओ...ओ..ओsssssssss

पेटली पुन्हा ती आग,मृत्युची बाग
तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा
सांगे सेहेवाग कथा आत्मा... हो जी..जी..जी..! ॥धृ॥

धन्य धन्य उपरी कट,मारी तो खट..
तसा कोणाही नाही जमला...तसा कोणाही नाही जमला
ऐसा खतरा हा वीर मामला...हो..जी..जी..जी..॥१॥

तडतडा फोडे तो चेंडू, झोडे जसा झेंडू
चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात..चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात
बॉलरं लावी कपाळा हात...जी..जी..जी..॥२॥

बाऊंड्य्रा आणि सिक्सरं,मारी अक्सरं
जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल,जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल
किती पाजी-बॉलरा..हा...ल हलाहल जी..जी..जी॥३॥

किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत..
तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास!
जरी वाटली तुम्हा बकवाsssस..जी..जी..जी..॥४॥

ऐश्या या धडाकेबाजा,म्हणीन मी राजा
रनांचा गडी पॉssवर..बाज,रनांचा गडी पॉssवर..बाज
राssखिली कैकदा लाज..हो..जी..जी..जी॥५॥

तेंडल्या ढाणा होता वाघ,तरी ही बाग
आपुल्या परि तिथे फुलली..आपुल्या परि तिथे फुलली..
आता तारीफ मनी उरली..हो जी..जी..जी॥६॥

चला घेतो अता आंम्ही रजा,पाहुन ही मजा
आत्मा हा खूssषं लै झाला..आत्मा हा खूssषं लै झाला..
पssवाडा लिवन्या योग-पहिला __/\__ हो जी..जी..जी॥७॥
================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users