आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499
स्वित्झर्लंड भाग १० - रिगी http://www.maayboli.com/node/54543
स्वित्झर्लंड भाग ११ - मेन्झबर्ग ! http://www.maayboli.com/node/55213
स्वित्झर्लंड भाग १२ - ले प्लेएत्स्झ http://www.maayboli.com/node/55284
स्वित्झर्लंड भाग १३ - बेल्लीकॉन इन विंटर http://www.maayboli.com/node/55334
शनिवारी १० जानेवारीला सकाळी ९ ला भारतात परत यायची फ्लाईट होती. जायच्या आधी, आवरा आवरी, गिफ्ट पॅकिंग्ज, मित्रांचा निरोप घेणे वगैरेमुळे फार वेळ नव्हता. तरी गुरुवारी बराच सुर्यप्रकाश असल्याने, झुग मधील ओबरअॅगेरी ला भेट द्यायचा प्रोग्रॅम फिक्स केलाच!
आपल्याकडे जशी जुळी शहरे असतात सांगली-मिरज, बन्याची वाडी-मन्याची वाडी, दहीबाव-मीठबाव टाईप, तसं इथे ओबरॅगेरी-ऊंटेरअॅगेरी , ओबररॉरडॉर्फ-निदररॉरडॉर्फ (ओबर-वर, निदर, ऊंटेर-खाली) अशी बरीच जुळी खेडी आहेत! ओबरअॅगेरी हे असंच कँटॉन झुग मधील जोडगोळ्यांपैकी एक निवांत खेडं! इतिहासात पहिला उल्लेख अगदी १२ व्या शतकापासुन!
अॅगेरसी या तळ्याच्या काठाने वसलेल्या या शहरात सगळ्यात प्रेक्षणीय गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे तळेच!
आदल्या रात्रीच हिम भुरभुरलं होतं!
तळे अगदी नितळ! काच आहे की काय असं वाटावं इतकं स्तब्ध!
मधुन मधुन उठणार्या हलक्या लाटा मात्र त्याच्या जिवंत अस्तित्वाची आठवण करुन द्यायच्या!
बाकी गावाच्या मागं ज्याला प्रि-अल्पाईन म्हणतात अशा डोंगररांगा आणि त्याची विस्तीर्ण अशी कुरणं!
त्याच्यामध्ये वसलेल्या शेतकर्यांच्या छोट्या छोट्या लाकडी बंगल्या!
त्यातल्या पायवाटा हिमाने झाकुन अजुन उठावदार झालेल्या!
सुखी माणसाचा सदरा!
हा नजारा पाहिला त्यावेळी भुगोल आठवला ६ वी तला! त्यावेळी पुस्तकात वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश आणि तिथले व्यवसाय याबद्दल माहिती होती. "युरोपियन आल्प्स-पर्वतरांगांच्या दर्याखोर्यात सुचिपर्णी वृक्षांच्या मुबलकतेमुळे लाकडाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो" असं वाक्य आणि त्याखाली असंच काहीसं चित्र होतं! त्यावेळी वाचताना वाटायचं अशा ठिकाणी कधी जायला मिळेल काय!
पुढच्या स्टॉप ला जायला ठेसनात आलो!
इथुन पुढे झुग पर्यंतचा प्रवास म्हणजे स्वर्ग सुख! छोटीशी ट्रेन. पुर्ण मोकळी, दोन तीन म्हातार्या सोडल्या तर! दोन्ही बाजुला खुळ्यासारखा उधळलेला निसर्ग!
धुकं, सुर्यप्रकाश आणि तळं या सगळ्यांच्या गुजगोष्टीतुन वेगळाच नजारा समोर येत होता!
कडेला असलेल्या सफरचंदाच्या बागा!
या घरात राहणार्यांवर मी अफाट जळलो!
मनात नाही म्हटलं तरी उदास वाटत होतं जरा. आतापुरती तरी ही शेवटचीच स्विस दर्शानाची ट्रीप ! परत असं प्लॅन करुन उरलेला केव्हढाच्या काय स्वित्झर्लंड कधी बघायचा!
येईन मार्था बरोबर बर्याच गप्पा मारत बसलो, झालेले............ न झालेले विषय!
मस्त सफर. १ला फोटो सुंदर.
मस्त सफर.
१ला फोटो सुंदर.
ह्म्म्म... सगळ्या सुंदर
ह्म्म्म... सगळ्या सुंदर गोष्टी कधीना कधी संपतात.... हे फोटोफिचरही असेच..
बाकी फोटो सुंदर.
खूप छान ....
खूप छान ....
सुंदर फोटोज....
सुंदर फोटोज....
Lovely, as usual. Tu parat ja
Lovely, as usual. Tu parat ja re tithech...
मस्त!
मस्त!
किती सुंदर लेखन शैली.
किती सुंदर लेखन शैली. केंव्हाही वाचाव तर अगदी भिडतच भिडत!
आहाहा.. सुंदर दृष्यं.. तू
आहाहा.. सुंदर दृष्यं.. तू जाच परत तिथे.. म्हंजे आम्हीही येऊ आणी मार्थाला भेटू
तो तलाव म्हंजे अक्षरश: काचेचाच वाटतोय..
सुरेख फोटो आणि वर्णन..सुंदर
सुरेख फोटो आणि वर्णन..सुंदर झाली आहे ही लेखमाला! धन्यवाद!
मस्त रे कुलू. मला तिथल्या
मस्त रे कुलू.
मला तिथल्या मोठाल्या खिडक्या (स्वच्छ काचा ) असलेल्या ट्रेन्स फार आवडतात. कारण कुठेही पाहिल तरी सगळ पिक्चर पर्फेक्ट असत ! कोणत्याही अडसराशिवाय.
जशी अपेक्षा अगदी तसेच सुंदर
जशी अपेक्षा अगदी तसेच सुंदर देखणे लेखन आणि सोबतीला तर नजर लागावी अशा चित्रांचा खजिना. परत निर्मनुष्य रस्ते....इतकेच काय ज्याला आपण इकडे "स्टेशन" म्हणतो त्याचे चित्र नजरेसमोर आले तर जे काही दिसते त्याचा मागमूसही स्वीसच्या या कुलुने टिपलेल्या चित्रात दिसत नाही....हा म्हटलं तर आगळाच अनुभव.
अगदी जीवावर आले असेल तुझ्या.....त्या जादूने भारलेल्या जागेला आणि तितक्याच प्रेमळ लोकांना "बाय..." म्हणताना.
जयु, साधना, प्लूमा, सकुरा,
जयु, साधना, प्लूमा, सकुरा, बी, चिन्नु, वर्षु, जिज्ञासा खुप खुप धन्यवाद
वर्षु तु स्वित्झर्लंड पहायलाच हवा! मी परत कधी गेलो तर तु येच!
दिनेश , हो परत जायलाच पाहिजे! मी असताना तु यायला हवा होतास. मजा आली असती
तिथल्या मोठाल्या खिडक्या (स्वच्छ काचा डोळा मारा ) असलेल्या ट्रेन्स फार आवडतात>>>> एकदम बरोबर इन्ना! सगळ्या खिडक्या लखलखीत स्वच्छ! बसेसच्या पण गं :अओ:. मला म्हणजे गहीवरुनच आलं एव्हढी स्वच्छता बघुन पहिल्यांदा!
मामा, काय सांगु तुम्हाला किती जीवावर आलं लोकाना बाय म्हणताना!
पुढचा भाग शेवटचा असेल या मालिकेचा. त्यात येईलच ते सविस्तर!
लवली. फिरवलंस रे बाबा
लवली.
फिरवलंस रे बाबा तुझ्याबरोबर आम्हालाही. थांकू.
मालिकेचा शेवटचा भाग येणार आता .
मस्तच ! छान आहेत फोटो
मस्तच ! छान आहेत फोटो
कुलु, मुला , हरले रे हे पाहून
कुलु, मुला , हरले रे हे पाहून ! इतके सुंदर फोटो, अनुभव ,शब्द ! असेच सुंदर प्रदेश पाहात आमच्या आतला जिप्सी जागवत राहा !
धन्यवाद अन्जु, निलेश,
धन्यवाद अन्जु, निलेश, भारतीताई!
कुलु ....काय मस्त सफर घडवलीस
कुलु ....काय मस्त सफर घडवलीस रे स्विटझर्लन्डची!
अप्रतीम लिखाण आणि नेत्रसुखद फोटो!
काही दिवस तरी तू हे सगळं भयंकर मिस करशील रे ...इकडे आल्यावर!
वॉव, ग्रेट, ग्रेट..... किती
वॉव, ग्रेट, ग्रेट.....
किती रमणीयता भरुन असावी निसर्गात .....
मोठमोठ्या काचांच्या खिडक्या
मोठमोठ्या काचांच्या खिडक्या पाहून दगड फेक करायला असे शिवशिवत होते म्हणून सांगू ! ::फिदी:
मानुषी, पुरंदरे काका धन्यवाद
मानुषी, पुरंदरे काका धन्यवाद