वॉल माउंटेड टीव्ही च्या केबल्स कंसिल्ड वायरिंग नसताना कश्या लपवायच्या?

Submitted by मेधावि on 29 August, 2015 - 23:11

वॉल माउंटेड टीव्ही च्या केबल्स कंसिल्ड वायरिंग नसताना कश्या लपवायच्या? कोणाकडे काही आयडिया असल्यास सुचवता येतील का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन गृहितके धरून उत्तर लिहितो आहे.
१. तुम्हाला हौशी (नॉन-प्रोफेशनल, घरच्या घरी करावयाचे) सोल्यूशन हवे आहे.
२. तुम्ही भारतात आहात. (विटांच्या भिंती, व त्याला प्लास्टर, वर रंग. अमेरिकेसारखे वॉल पॅनलिंग नाही.)

मार्गः

१. पट्टी फिटिंग नामक इलेक्ट्रिक वायर फिटिंगचा प्रकार असतो. यात एक केसिंग असते, ही बर्‍यापैकी स्वस्तात इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानात विकत मिळते, फुटावर. सुमारे २-३ इंच ब्रॉड असलेली पट्टी पुरून जाईल, जिच्यात टीव्हीची पॉवर केबल, सेटटॉप बॉक्सची केबल, व होम थिएटरसाठीच्या केबल्स बसून जातील.
ही पट्टी सामान्यतः फिकट पिवळ्या रंगाची असते, तिचा बेस भिंतीवर खिळ्या/स्क्रूनी बसतो, डबल साईडेड स्टिकर टेप+फेविक्विकनेही चिकटवता येतो. वरतून दुसरे झाकण दाबून बसते. पट्टीवर रंगही देता येतो.
रिझल्ट्स साधारणतः असे दिसतील :

२. केबल झाकायचा प्रयत्न करायचा नाही. उलट अ‍ॅक्सेंचुएट करायची.
अ. भिंतीशी केबल चिकटवून टाकायची, वेगवेगल्या केबल्स इंटिग्रेटेड सर्किट चिपवर तांब्याच्या लाईन्स असतात ना? तसं डिझाईन करून चिकटवावे. फेविक्विकचा एक छोटा थेंब १-१ फुटावर लावला की केबल मस्त चिकटते. केबल्सना हवं तर कॉपर कलर देता येतो वरून.
ब. केबलला हिरवा रंग देऊन कागदाची/प्लॅस्टिकची हिरवी पाने कापून (रेडीमेड शोपिसेस मधलीही चालतील) भिंतीवर वेली / बांबू आहेत असा लुक तयार करता येईल.
अ‍ॅक्चुअल प्लॅस्टिकचे बांबूही शोपिस मिळतात. त्यांच्यापाठी केबल नेऊन बांबूची डिझाईन करता येईल.

या वरील उपायांतही थोडीफार कारागिरी अंगी असणे गरजेचे आहे.

याव्यतिरिक्त करायचे तर अनेक इलाज आहेत, ते शक्यतो प्रोफेशनल व्यक्तीस बोलावून करवून घेणे.

भिंतीला झिरी मारणे, त्यात केबल नेणे, व वरतून परत मॅचिंग रंगकाम करणे हा किचकट उद्योग होतो. त्या ऐवजी एक टीव्हीपेक्षा मोठे, भिंतीपासून अर्धा पाऊण उंच बाहेर येईल असे उभे लाकडी पॅनल, त्यावर लॅमिनेट वा वॉलपेपर तयार करणे, हा एक इलाज होतो.

दीमा सरस,
पट्टी उपाय आमचा वापरून झालाय. भिंतीच्या रंगात बरेपैकी मिसळून जाते.

त्या वायरींना कवर करत भिंतीला वॉलपेपर लावायचा पर्यायही चाचपून बघा..

मी मागच्या खोलीतुन वायर फिरवुन टीव्हीच्या बरोबर मागे ड्रील केलेय.... त्यामुळे हॉलमध्ये वायर फिरवलेल्या दिसत नाहीत!

अर्थात हे त्या भिंतीमागे एखादी रुम असेल तरच शक्य आहे म्हणा!

नुसते रूम नाही.. आपली रूम म्हणा.. नाहीतर तुमचे ऐकून कोणी शेजार्‍याच्या रूममधून फिरवतील ..

दिमा यांच्या पहिल्या प्रतिसादात after शीर्षकाखाली फोटो आहे त्याप्रकारे आम्ही घरच्या घरी करुन घेतले आहे. इकडे भिंतीला चिकटवायची केसिंग पट्टी मिळते (भारतातही मिळायला हरकत नाही) ती वापरली. त्यामुळे भिंती ड्रील करणे वगैरे भानगडीत न पडता अक्षरशः १० मिनिटांत काम झाले.

इथे बिंतीला जो रन्ग दिलेला असतो त्यामुळे अ‍ॅढेसिव भिण्तीला चिकटत नाही अथवा गळून पडते. बाथरूमलाही चिकटत नाही...