Submitted by आरती on 26 August, 2015 - 05:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक मोठा पेरू,
पाव वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
पाव वाटी खोबऱ्याचे काप / खवलेला नारळ / किसलेलं खोबरं,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक चमचा गोडा मसाला,
दोन हिरव्या मिरच्या,
आठ-दहा कडीलींबाची पाने,
वरून घालायला कोथिंबीर,
फोडणीसाठी मेथ्या,तीळ,जिरे,मोहरी,हळद,हिंग आणि तेल
चवीप्रमाणे मिठ, गुळाचा खडा.
क्रमवार पाककृती:
पेरूच्या छोट्या-छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या.
तेल तापवून मेथ्या,तीळ,जिरे,मोहरीची फोडणी करून घ्यावी.
हळद-हिंग-गोडा मसाला, हिरवी मिरची-कडीलींब घालावे.
पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे.
मिठ, गुळ, भाजलेले दाणे, खोबऱ्याचे काप घालून एक वाफ आणावी.
चिंचेचा कोळ आणि पाव वाटी पाणी घालून एक उकळी आणावी.
कोथिंबीर घालावी.
.
वाढणी/प्रमाण:
एका पेरुचे ४ जणांना पुरते.
अधिक टिपा:
पंचामृत आंबट-गोडच छान लागते त्यामुळे त्याप्रमाणात गुळ घालावा.
माहितीचा स्रोत:
सासुबाई + बदल.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुळात मी पूजेची टिंगल केली तर
मुळात मी पूजेची टिंगल केली तर तुझा नक्की काय प्रॉब्लेम होतोय तेच मला कळेनासं झालंय. <<
तुला काय आणि किती कळतं हा माझा प्रॉब्लेमच नै... पुजेसारख्या गोष्टींची टिंगल करायची तर पुजाच करू नका ना. पुजा पण करायची आणि मग तेच पंचामॄत घ्यायचं याला काय अर्थ आहे का?
आयुर्वेदामधेय फेशियल आहे यात भोंदूपणा कसला? तू स्वतः आयुर्वेद वाचून बघ की. <<
जसा काय तू वाचलाच आहेस.. फेशियल हा शब्द पण संस्कृत नाही हे कळतंय का?
पुण्यामध्ये सर्व ब्युटी पार्लरमध्ये पंचामृत फेशियल अव्हलेबल आहेच की. <<
त्या पुजेचं पंचामृत थोडीच घेतात?
ओके ममो.. मी सध्या मिळताहेत
ओके ममो.. मी सध्या मिळताहेत त्या पेरूंचं करून बघते. मस्त गाड्या लागताहेत सगळीकडे.
हे पा नीधप आणि नंदिनी, असं
हे पा नीधप आणि नंदिनी, असं ठरवून केलेलं भांडण नीट होत नाही.
पावसाळ्यात पेरू बघून घे गो
पावसाळ्यात पेरू बघून घे गो मंजूडे. बारीक पांढर्या अळ्या निघतात त्यात. आधीच पाचापेक्षा जास्त घटक झालेत त्यात आणखी एका घटकाची भर नको. शिवाय ते मग नॉनव्हेज पंचामृत बनेल. सत्यनारायण रागवेल मग.
नविनच रेसिपी आहे माझ्यासाठी..
नविनच रेसिपी आहे माझ्यासाठी.. करुन बघेन
वा, मस्त फोटो आणि रेसिपी.
वा, मस्त फोटो आणि रेसिपी. पेरू आहेत घरात तेव्हा ट्राय मारतेच आज.
करनाच पडेगा... कभीभी नही
करनाच पडेगा... कभीभी नही किया
आरती, फोटो जबरदस्त!!
पेरुची कोशिबिर खाल्लिये, इथे
पेरुची कोशिबिर खाल्लिये, इथे धड पेरु मिळत नाही तेव्हा पेअर्,ग्रिन अॅपल वर प्रयोग करु..
चला आता पेरूच्या पंचामृताची
चला आता पेरूच्या पंचामृताची डाळ शेपू करूया !!!>>>>>:हहगलो: अरे देवा! इथे पण? सॉरी बाकी सर्व सदस्याना सॉरी. पण खरच हसू आवरेना.
माझ्या मावससुबाईनी आमच्या लग्नानन्तर आमच्या घरी केले होते. मस्त झाले होते.
आरती, मला नक्कीच हे करायला आवडेल, पण मी खोबरे यातुन गाळेन. बाकी पदार्थ घरात हजर आहेत.
बाबो! इतके प्रतिसाद बघून मला
बाबो! इतके प्रतिसाद बघून मला वाटलं पंचामृतावर अस्मिता आली की काय. पण नेहमीचीच सोंग आहेत.
असो, भेंडीचं पंचामृत बहु आवडेश. तेव्हा हे मिरची किंवा भेंडी किंवा कारली घालून नक्की करून बघेन. इतर कुणी गिर्हाइक नसेलच तेव्हा मी एकटीनंच ओरपेन.
हे पा नीधप आणि नंदिनी, असं
हे पा नीधप आणि नंदिनी, असं ठरवून केलेलं भांडण नीट होत नाही. <<
तू पण ना मंजू.. किती घाई...
छान आहे पाकृ! हे पंचामृत
छान आहे पाकृ! हे पंचामृत अनेकदा खाल्लं आहे व अशाच स्टाईलने भाजीही करते पेरूची. त्यात फक्त चिंचेचा कोळ, गूळ घालत नाही. दाण्यांऐवजी दाणेकूट घालते. त्याने रस्सेदार भाजी होते. खोबर्याचे काप घरातल्या मेंबरांना आवडत नाहीत म्हणून तेही वगळते. पण हे घटक जरा उणे-अधिक झाले तरी मूळ पेरूची चवच इतकी मस्त असते की बास! आणि असा शिजवलेला पेरू घरातील ज्येनांना चावता / खाताही येतो याचे समाधान!
नी, आम्हाला कळलेलं हो
नी, आम्हाला कळलेलं हो
मला आणि नीरजाला भांडता येत
मला आणि नीरजाला भांडता येत नाही असं वाटलं की काय!!!
आता याच कृतीनं भेंडीचं पंचामृत केलं होतं, मस्त झालेलं. चांगले पेरू मिळाले तर पेरूचंही करणार. .
नंदिनी, नाहीच आलं की....पकडलं
नंदिनी, नाहीच आलं की....पकडलं ना आम्ही तुम्हाला
अकु, मी खल्लेल्या पंचामृतात
अकु,
मी खल्लेल्या पंचामृतात पण दाण्याचाकुट आणि तिळ्कुट वापरलेला होता, आणि फक्त मोहरीची फोडणी, त्यात लाल तिखट. बहुतेक त्याचमुळे मला ते खुपसं भाजीच्या जवळच वाटलं. म्हणुन मी बदल करुन तिळ, मेथीदाणे, जिरे, हिरवी मिरची, कडिलंब फोडणीत घातले आणि नेहमीच्या पंचामृतात असतात तसे भाजलेले दाणे खोबर्याचे काप आख्खेच घातले.
तेंव्हा कुठे ते मला पंचामृता सारखं लागलं
नंदिनी, भेंडीचं करताना भेंडी
नंदिनी, भेंडीचं करताना भेंडी वाफवुन घ्यायची का आधी ? तार येत नाही का ?
मी किंचित तेलात परतून घेते.
मी किंचित तेलात परतून घेते. मूळ रेसिपीत तळून घ्यायला सांगितलं होतं. तेवढी उठारेट कोण करतंय?
छान आहे. वेगळी रेसिपी. करून
छान आहे. वेगळी रेसिपी. करून बघेन. फोटोही सुरेख कलरफुल.
आमच्याकडे आवडेल बियांसकट.
आई कोशिंबीर करायची पेरूची, मेथीदाण्याची फोडणी करायची.
मस्त रेसिपी! माझी आई ढब्ब्या
मस्त रेसिपी!
माझी आई ढब्ब्या मिरचीचे पंचामृत करते. मला वाटले पंचामृतं दोनच. एक हे ढब्ब्या मिरचीचे अन दुसरे गोड. (मला दोन्ही खूप आवडतात!)
मस्त !! मला 'हा' पण आवडतो
मस्त !!
मला 'हा' पण आवडतो
हा भारीये. मस्त!
हा भारीये. मस्त!:हाहा:
शँकी, "हा" भाताबरोबर की
शँकी,
"हा" भाताबरोबर की पोळीबरोबर?
किन्वासोबत कसा लागेल?
दीमा, किन्वा महाग आहे भारतात,
दीमा, किन्वा महाग आहे भारतात, ह्या बरोबर खाऊन वाया घालवू नका.
अरे देवा, पंचामृत आणि साबण ?
अरे देवा, पंचामृत आणि साबण ? मी तर कल्पनाच करु शकत नाही.
किती वाईट असतात ना लोक.
अहाहा फार मस्त फोटो.
अहाहा फार मस्त फोटो.
आई मिरच्यांचं करते पंचामृत.
आई मिरच्यांचं करते पंचामृत. आणि त्यात दाण्याचं कुट, तिळाचं कुट इ घालते. मला फारसं (खरं तर अजिबात) आवडत नसल्याने मी कधी केलं नाहीये. पण भावाला आणि नवर्याला खूप आवडतं मिरचीचं पंचामृत. त्याला हे पण आवडेल बहूतेक. त्याच्यापुरतं करून इथे अभिप्राय सांगते.
असं ठरवून केलेलं भांडण नीट
असं ठरवून केलेलं भांडण नीट होत नाही>> तेथे काही योग्य माणसेच पाहिजेत. कितीही प्रयत्न केला तरी निर्बुंध्दपणा असा ठरवुन करता येत नाही. हे ज्ञानमृत त्यांनीच मला एकदा पाजले आहे.
अरे बापरे\किंवा बापरे. ज्ञानामृतात किती घटक असतात?
लहानपणी खाल्ले होते. पण पेरुच्या बिया दातात अडकुन बसायच्या त्याने वैताग (दुरुस्त केले. नाहीतर अरे बापरे पुण्यात याला वैतात म्हणतात का? आमच्याकडे.. अशा पोष्ट यायच्या) येत असे.
पण पेरुच्या बिया दातात अडकुन
पण पेरुच्या बिया दातात अडकुन बसायच्या त्याने वैतात येत असे. >> म्हणुनच बिया काढून करतात आमच्यात
पकडलं ना आम्ही तुम्हाला डोळा
पकडलं ना आम्ही तुम्हाला डोळा मारा>> आम्ही???
Pages