मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पोलिस पण अगदी त्यांच्यासारखा होता, धड काही सांगत नव्हता.

तसेही जय बर्‍याच वेळा डोक्यावर पडल्यासारखा वागतो. आता आय कार्ड साठी पोलीस आलेत, त्यानी जयचे कार्ड बागेत मिळाल्याचे ( मालिकेत सान्गीतले) सान्गीतलेले पाहुन आज रजनी बाई रजनी सारख्या वागुन जयची झाडाझडती घेणार आहेत. आणी हे बावळट्ट ध्यान नेहेमीप्रमाणे लाम्बवेल सगळे.
एकदाही हा माणुस ठामपणे त्या रजनीला झापत नाही, सदा आपले मुळु मुळु. सान्गुन टाक ना एकदा की मी तुझ्यात इन्टरेस्टेड नाहीये, मामला खतम.

>>>> आधी ठीके पण आता सीरिअल ला इतके महिने झाल्यावर पण याच्या अभिनयात सुधारणा नाहीये, एक्स्प्रेशन्स मध्ये मार खातोय जाम. <<<<
तस नाही ते... निर्माता/लेखक/दिग्दर्शकात सुधारणा नाही म्हणुन त्यांनाच बुकलायला हवय, पण त्यांना फटके पडत नाहीयेत .... Proud
याला काय? डायरेक्टर सांगेल तस वागायच, लेखक लिहील तेच बोलायच...... !

>>> सान्गुन टाक ना एकदा की मी तुझ्यात इन्टरेस्टेड नाहीये, मामला खतम. >>>
असा "मामला" खतम केला तर तो आधुनिक "पुरुष" कसा काय?

आणि त्याला इंटरेस्ट असूनही नेहमीप्रमाणे नीट एक्स्प्रेशन्स देता येत नसतील तर? भलतीच पंचाईते बिचार्याची Proud

लिंबुटिंबु.. तुमचे नाव जय असल्याने त्या रडक्या जयची सारखी बाजू घ्यायचे काही कारण नाही.
तुम्हाला तर वाईट वाटायला हवे आपल्या नावाचं असलं कणाहीन पात्र दाखवलं म्हणून.

त्या येडचाप जानी, मेघना किंवा या आदेचं नाव विनिता दाखवलं असतं तर मला वाईट वाटलं असतं खुप.

जय म्हणजे नोबिता आहे.>> प्रतिसाद ऑफ द यीअर. हा पुरस्कार माझ्यातर्फे खरेच हसून फुटले. Happy

त्या इन्स्पेक्टरच्या एन्क्वायरीचा अर्थ अगदीच अपेक्षित निघाला.. तो ज्याक्षणी म्हणाला की एन्क्वायरी अनेक प्रकारची असते तेव्हाच लक्षात आल होत की हा नक्की एखाद्या टूरची एन्क्वायरी करायला आलेला असणार आणि हापिसातल्या एक्काही माठाच्या लक्षात आल नाही की ब्वा आपण टूरींग बिझनेसमधे कामाला आहोत, इथे एन्क्वायरी हा शब्द रोजचाच आहे..

धन्यवाद अमा.:स्मित: पण काल ज्या पद्धतीने नन्दिनीने रजनीला झाडल ते बघुन मला गहीवरुन आल.:इश्श:

पण अदितीची अ‍ॅक्टिन्ग सही होती. चेहेर्‍यावर तणाव छान दाखवला तिने. अभिनयाच्या बाबतीत ती जयच्या बरीच पुढे आहे.

पण कालच भजी-वडा पाव झेपल नाही. आमच्या पुण्यापेक्षा मुम्बईत पोळीभाजी केन्द्रे, डबेवाले चौपटीने जास्त आहेत. याना तिथुन पोळी भाजी आणता आली नाही? केन्द्रे काय ९ वाजता बन्द होतात का? घरी येताना डबा घेऊन यावा. पण यान्च्या पेक्षा तो दिग्दर्शकच माठ आहे ( की चालू आहे? ) तसे दाखवता आले नाही त्याला.
आजच्या भागात जयचे पोट बिघडल्यावर काका म्हणतात इथे डबा करुन ( स्वयम्पाक ) घ्यायला मनाई केली आहे का? म्हणजे काय त्या जय अदितीपेक्षा काकाच लवकर लाईनीवर आले असे त्याना दाखवायचे असेल.

तो इन्स्पेक्टर आणि जय ... दोघान्चा चेहरा बोलताना अगदी सारखा दिसत होता ...
निर्विकार ... काहिहि भाव नसलेला......... Happy

वडा - भजी पेक्षा .. गाडीवर डोसा छान मिळाला असता... आणि त्रास पण नसता झाला... आणि एकदम असा कसा झाला त्रास... तोच वडा खाउन आदिती किती शान्त झोपलि होती ... काय काय दाखतात ...

त्या ठोकळा जयला पोटदुखीचाही अभिनय धड जमला नाही. कळवळणे आणि ओरडणे यातला फरकच माहीत नाही जणू. कुणीतरी धरून मारल्यासारखा ओरडत होता तो. त्या आधीचा काका काकूंचा संवाद किती बेगडी. फार कृत्रिम, नाटकी वाटते ही सिरीयल. लवकर बंद पडावी हीच सदिच्छा.

आज जयच्या पोटात दुखले ......बाहेरचे कांदाभजी खावुन.....काय कमाल आहे; चाळीत रहाणारा जय दोन दिवस भजी खाउन आजारी पडतो आणि माहेरी बिस्लेरिने तोंड धुणारी आदिती अग दी ठणठणीत?

आज जयच्या पोटात दुखले ......बाहेरचे कांदाभजी खावुन.....काय कमाल आहे; चाळीत रहाणारा जय दोन दिवस भजी खाउन आजारी पडतो आणि माहेरी बिस्लेरिने तोंड धुणारी आदिती अग दी ठणठणीत?>>> + १००

या पुळपुळीत जय पेक्षा तो आदे कितीतरी पटीने उत्तम आहे काम करण्यात...

जय आता जाम डोक्यात जातोय... :रागः :रागः :रागः

पुळपुळीत जय पेक्षा तो आदे कितीतरी पटीने उत्तम आहे काम करण्यात...>>
आदेची अॅक्टींग फार उत्तम आहे. पण ती सिरियलच पाणचट आहे... जय नुसता ठोंब्या आहे.

त्या ठोकळा जयला पोटदुखीचाही अभिनय धड जमला नाही. कळवळणे आणि ओरडणे यातला फरकच माहीत नाही जणू. कुणीतरी धरून मारल्यासारखा ओरडत होता तो.+१००

जय म्हणजे नोबिता आहे.>> अगदी अगदी!!

भगवती तुम्ही डोरेमॉन पाहत नाही वाट्टं? जय हा भोकाड पसरून अश्रूंचे कारंजे उडवणारा (मनातल्या मनात) रड्या नोबिता!

इतकी छान ट्रॅव्हल्स कंपनी दाखवलेय तर थोड्या टिप्स घ्याव्यात ना वीणा पाटील कडून पण घोळ त्या लववाछपवीतच अडकलाय!! वेगळं काही का दाखवत नाहीत हे सिरीयलवाले? सगळ्या घिस्यापीट्या वाटा घासघासून गुळगुळीत झालेल्या अती प्रेडीक्टेबल!

Pages