माहीरा खानचे हमसफर मधले काम आवडले होते म्हणून तिची नवीन, सध्या सुरु असलेली मालिका सदके तुम्हारे (Sadqay tumhare) YouTube वर बघायला घेतली. आता ह्या २७ भागांच्या मालिकेचा शेवटचा एक भाग उरला आहे. त्यात जे होईल ते होईल पण त्या आधीच ही मालिका माझ्या आवडत्या मालिकांमध्ये जाऊन बसली आहे.
लेखक/पटकथाकार खलील उर रेहमान कमर (Khalil-Ur-Rehman-Qamar) ह्यांची ही मालिका त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मालिकेची कथा बघता जर ही गोष्ट खरी असेल तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल!
ही आहे एक प्रेमकथा- शानो (रुक्साना) आणि खलीलची. बऱ्यापैकी cliche वळणांनी पुढे सरकणारी. म्हणजे गावगुंडांकडून धोधो मार खाऊनसुद्धा त्यांना धोपटून काढणारा हिरो आणि घरात आई – वडिलांच्या नजरकैदेत अडकलेली हिरोईन असलेली. मी ह्या मालिकेतल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्या दोन्ही गोष्टी लिहिणार आहे. अर्थात आवडलेल्या गोष्टी ह्या न आवडलेल्या गोष्टींपेक्षा खूप जास्ती आहेत. त्यामुळे मालिका बघावी अशी झाली आहे.
पहिल्यांदा थोड्या खटकलेल्या गोष्टी. बहुतांश पाकिस्तानी मालिकांमध्ये मेलोड्रामा नावाचा प्रकार नसतो. अत्यंत emotionally intense scenes सुद्धा फार संयतपणे चित्रित करतात. पण ह्या मालिकेतले काही (च) प्रसंग मात्र मेलोड्रामाकडे झुकतात. अर्थात ती थोडी कथानकाची मागणी आहे. तरीही एक प्रेमकथा म्हणून आपल्याला माहिती असलेले twists and turns येतात तेव्हा वाटतं “यार कुछ अलग दिखाते!” पण ते तेवढ्यापुरतंच. दुसरी गोष्ट, तशाही पाकिस्तानी मालिका थोड्या संथ असतात कारण त्यात ढँढँ प्रसंगांची आणि पात्रांची भरताड नसते. पण सदके तुम्हारे मध्ये एक दोन भागात मला वाटलं की हे फारच हळूहळू चाललंय! काही घडत का नाही! कदाचित मीच पुढची गोष्ट बघायला उतावीळ झाले असेन! असो, इतनी बुराईयाँ काफी हैं!
अजून एक गोष्ट आहे जिचा उल्लेख केला पाहिजे ती म्हणजे नाती! ह्या मालिकेत नात्यांना फार म्हणजे फार महत्व आहे! जर तुम्हाला ती नाती समजली नाहीत किंवा त्यात गोंधळ झाला तर मग कठीण आहे! कारण संपूर्ण कथा ह्या नात्यांच्या गुंतागुंतीभोवती फिरते. तेव्हा पाहताना गोंधळलात तर YouTube video खालच्या प्रतिक्रिया वाचा आणि समजून घ्या (जे मी केलं)!
आता आवडत्या गोष्टी!
१. उत्कृष्ट चित्रीकरण (Cinematography) आणि दिग्दर्शन - सदकेची पटकथा तर सुंदर आहेच पण त्या सुंदर script ला तितक्याच खूबसूरतीने पेश केलं आहे. ही कमाल सर्वस्वी एहतशाम ह्या दिग्दर्शकाची! प्रत्येक सीनमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले आहे. It’s an absolutely flawless piece of direction! गोष्ट घडते ७०च्या दशकात. लाहोर (ह्याचा मूळ उच्चार फार गोड आहे –लहौर) आणि आजूबाजूच्या खेड्यांत. त्या काळाचे चित्रीकरण इतके सुंदर आणि अस्सल आहे की त्यासाठी DoP ला १०० पैकी १००० गुण! मालिकेचा OST देखिल फार सुंदर चित्रित केला आहे, राहत फतेह अली खान ह्यांच्या मखमली आवाजाला पुरेपूर न्याय देणारा! खेड्यातली घरं, हवेल्या, मशीद, तिथलं निवांत जीवन, मैदानावर रंगणाऱ्या क्रिकेटच्या मॅचेस, सायकली, टांगे, Volkswagen ची जुन्या मॉडेलची hatchback कार, (एक मिस्टेक हो गयी है! बसेस मात्र नव्या २०१४ च्या आहेत पण बाकीच्या हजार सुंदर गोष्टीपुढे ही एक चूक माफ!) शेतं, घराचं अंगण, गच्ची, अंगणातली चूल, विहीर, झाडं आणि अतिशय सुरेख असं घरांचं interior – रंगीत stain glassच्या खिडक्या, झरोके, furniture सगळंच त्या काळात घेऊन जाणारं! ह्या मालिकेचे बरेचसे चित्रीकरण पंजाबच्या दुर्गम खेड्यांत केले आहे. मला वाटते कुठेच सेट वापरलेला नाही. दिग्दर्शकाच्या शब्दांत सांगायचे तर “उन जगाहों में जहाँ वक्त अभी भी रुका हुवा है!” अर्थात अशा locations वर चित्रीकरण करणे काही सोपे काम नाही.
२. कथेतली पात्र आणि अभिनय - माहीरा खान एक उत्तम अभिनेत्री आहे हे हमसफर पाहताना जाणवतंच. पण ह्या मालिकेत तिने इतकं समजून उमजून काम केलं आहे की ह्या भूमिकेसाठी तिला पुरस्कार मिळाला पाहिजे! शानो दुसरी कुणी असूच शकत नाही! Also, no doubt Mahira is beautiful but in this drama she looks absolutely stunning! खलिलचं काम करणाऱ्या अदनान मलिकची ही पहिली मालिका आहे. Khalil is that quitessential angry young man of 70s. Adnan plays khalil with lot of panache and you can’t help but start liking this “a bit नकचढा” hero! Again, it is not easy to potray the author himself in his own life story. Adnan has handled the pressure quite well and gives justice to his character with his performance.
ही कथा जितकी शानो आणि खलिलची आहे तितकीच ती त्यांच्या आई- वडिलांची आहे. अब्दुल रेहमान (फरहान अली आगा) आणि इनायत (ताहीरा इमाम), आणि अमीन साब (रेहान शेख) आणि रशीदा (सामिया मुमताझ) – ह्या चौघांनी आपआपल्या भूमिकांमध्ये अभिनयाची कमाल केली आहे! In fact, ह्या चौघांच्या convincing अभिनयाच्या जोरावर मालिका उभी राहिली आहे. पण त्यातही जी सगळ्यात अवघड आणि complex व्यक्तिरेखा, शानोची आई – रशीदा जिने आपल्या अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे ती म्हणजे सामिया मुमताझ! सदके तुम्हारे ह्या गोष्टीचा आत्मा जर कोणत्या पात्रात असेल तर ते पात्र म्हणजे रशीदा! इतका गुंतागुंतीचा रोल ज्या तऱ्हेने सामिया मुमताझने साकारला आहे त्याला तोड नाही! She is the best and hats off to her! मी कुठेतरी वाचले की ज्येष्ठ अभिनेत्री झोहरा सेहगल यांची ती नात आहे. No wonder she is such a talented actor, it’s in her genes!
ह्या मालिकेत एकूण 60 speaking characters आहेत आणि प्रत्येकजण आपल्या भूमिकेत फिट बसला/बसली आहे. I always wonder how these casting directors always put together such perfect cast!
३. कथा आणि अप्रतिम संवाद - जर सदके तुम्हारे एक घिसीपीटी प्रेमकहाणी असती तर तिचे मूल्य शून्य असते. पण खलिल उर रेहमान हे फार मोठ्या ताकदीचे पटकथाकार आहेत. This drama is probably his best work so far. ह्या मालिकेचा opening scene च इतका भारी आहे – कॉलेजच्या एका वर्गात बसून काही विद्यार्थिनी मोकळ्या तासाला शेरांच्या भेंड्या (उर्दूमध्ये ज्याला बैतबाझी का मुकाबला म्हणतात) खेळत आहेत! I was sold on that scene! ह्या मालिकेतली काही वाक्यं तर quote करून ठेवावीत इतकी सुंदर आहेत! माझं सगळ्यात आवडतं वाक्यं म्हणजे “मुहोब्बत में गर इल्हाम ना हो तो फिट्टे मूँह मुहोब्बत का!” (इल्हाम = intuition) प्रेमाला भाषा नसते हे खरं पण मला असं वाटायला लागलंय की जर प्रेमाची स्वतःची भाषा असेल तर ती उर्दूच असेल बहुतेक! अर्थात ही एक प्रेमकथा आहे त्यामुळे शानो आणि खलिल मधले संवाद तर सुरेखच आहेत पण त्याहून अप्रतिम संवाद शानो आणि रशीदामधले आहेत! Honestly I have’t seen/heard of a mother-daughter relationship like Shano and Rasheeda’s. माहीरा खान आणि सामिया मुमताझ दोघींनी ह्या संवादांना पुरेपूर न्याय दिला आहे. शिवाय लहौरचा लहेजा आणि पिंड दा पंजाबी ठसका ह्यामुळे सगळेच संवाद “असल मिट्टी की खुशबू वाले” झाले आहेत!
ही एक सत्यकथा आहे. त्यामुळे पुढच्या भागात जो काही सुखद/दुःखद शेवट होईल तो तसाच होणे अपरिहार्य आहे. सुरुवातीला कथा सरळधोपट वाटली तरी ती तितकी साधी नाही असं हळूहळू कळत जातं. जसजशी प्रत्येक पात्राची कथा आपल्यापुढे उलगडत जाते तसं कळतं की ही गोष्ट खलिल आणि शानोची नाहीच्चे! ही गोष्ट आहे नियतीची आणि तिने मांडलेल्या खेळाची! नियती कसे अजब खेळ खेळत असते आणि प्रेम माणसाला चांगल्या आणि वाईट दोन्ही दिशांना कुठवर ओढून नेऊ शकतं ह्याचा विचार करून थक्क व्हायला होतं!
Sadqay tumhare starts off as a cliche love story but is very powerfully unfolded and as you see the layers and nuances of it you don’t think of it as a cliche love story anymore!
इश्क दिल के दर पे यूँ आया था के हम नझर उतारें!
हम सदके तुम्हारे!
(सदके – कुर्बान/समर्पित)
परीक्षण अतिशय आवडले.
परीक्षण अतिशय आवडले. यु-ट्यूबवर नक्की बघीन अन मग परत प्रतिसाद देइन. या सिरीयलची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
छान लिहिलंय परिक्षण.
छान लिहिलंय परिक्षण.
छान लिहिलंय परिक्षण. वॉच लेटर
छान लिहिलंय परिक्षण. वॉच लेटर ला अॅडलेत भाग. आता करीन सुरुवात एक एक पाहायला...
He lekhan vaachoon khup
He lekhan vaachoon khup utsukataa vaaTalee. Net connection changale asale tarach baghaayalaa miLel malaa.
प्रियाजी, चैत्राली, योकु,
प्रियाजी, चैत्राली, योकु, दिनेशदा, धन्यवाद! नक्की बघा
मला वरती मजकुरात लिंक घालता
मला वरती मजकुरात लिंक घालता येत नाहीये! पण ही सदके च्या प्रोमो ची लिंक
https://www.youtube.com/watch?v=uaIgYRhEP9Q