इक दिन कहीं...

Submitted by आयडू on 15 December, 2009 - 09:35

इक दिन कहीं...

सॉल्लिड गाणं! सोनून गायलेल अर्थात सोनू जे गातो ते सॉल्लिडच म्हणा.. और प्यार हो गया तलं ऐश्वर्या - बॉबी ( देओल)वर चित्रीत केलेलं गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आहे.

अर्थात सिनेमात दाखवल्या प्रमाणे ...और प्यार हो गया असं होत नसतं सहसा.. पण म्हणतात ना जब भगवान देता है तो छप्पर फाडके तसं होत असलं पाहिजे रिअल लाईफ मध्ये.

काय होतं की अख्या ग्रूप मध्ये सोनी इरीक्सनेचे एक्स्ट्रा इअरफोन्स जेंव्हा तुमच्या जवळ असतात आणि समजा समोरची ऐश्वर्या [नावाला हो!! Wink कत्रिना का नको?? कारण कत्रिनात अन् ऐश्वर्यात एक बेसिक फरक आहे!! ] जेंव्हा विचारते की मला एक्स्ट्रा इअरफोन्स देशील का? आणि तुम्ही ते निरपेक्ष भावनेनं देता...

आणि मग जेंव्हा ही देण्याघेण्याची लिस्ट रारंग ढांग - मीरा, अ गर्ल लाईक मी - पाथ ब्रेकर्स, कोल्ड कॉफी - आईसक्रीम, अशी एक्सचेंज होत होत वाढतच जाते... अन् मग कधीतरी भर पावसात एका संध्याकाळी "इन अ गूड कंपनी" बघण्यात जाते.. तेंव्हाच तेंव्हाच तुम्हाला समजत नसतं की हे नक्की काय आहे? आणि जेंव्हा तुम्ही स्वतः कन्फ्युज असता तेंव्हा कधीही आता काय करू? कुणाला विचारू? असा प्रश्न न विचारता तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारता...

आय डू!! आय डू!!

डू यू??

तेंव्हा ती व्यक्ती उत्तरादाखल काहीही बोलतच नाही आणि और प्यार हो गयातलं इक दिन कहीं हम दो मिलें... हे गाणं गायला लागते अन् वेड्यासारखी हसत सुटते... बस्स फक्त हसते तेंव्हा तुम्हाला काय कराव सुचत नाही अन् मग तुम्हीही वेड्यासारखे काहीही कारण नसता हसत सुटता वेड्यासारखे..

अन् त्याचा परिणाम ब्लॉगवर आणखी एक पोस्ट वाढवण्यात होतो आणखी एक प्रश्न! https://www.youtube.com/watch?v=VRDYvCYtM4s

गुलमोहर: 

.

kiti god gaane aahe. mi kadhi aikalyaache aathavat naahi. pan aataa aikalyaavar khup aavadale.