मी!

Submitted by मुग्धमानसी on 7 March, 2014 - 02:16

भगवंताचे डोळे, त्यातले मी पाणी,
चित्तातला वन्ही, विझविते.

कानड्याचे पाय, त्यातली मी वीट,
तोलताहे नीट, तुझी श्रद्धा!

श्रीरंगाचे बाहू, त्यातली मी मिठी,
अद्वैताच्या गाठी, बांधते मी.

ओंकाराचा नाद, त्यातला मी श्वास,
त्याविण विश्वास, जन्म नाही!

उद्याची माऊली, ब्रम्ह तीचे दास,
उरी नऊ मास, जगविते.

थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी.

नको पडू पाया, नको करू पुजा,
देव्हार्‍यास दुजा, देव शोध.

माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?

आगीतली धग, पाण्याचा ओलावा,
अनुभव घ्यावा, तेंव्हा कळे!

तसे बाईपण, मातीत मुरते,
आकाशा भिडते, झाड तेंव्हा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम कविता!!
<<माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?<< या अफाट ओळींसाठी __/\__ !!

अ फा ट !!

थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी............ उच्च !!

तसे बाईपण, मातीत मुरते,
आकाशा भिडते, झाड तेंव्हा!............अहाहा.... !

निव्वळ ग्रेट !!
सगळ्यांचे प्रतिसादही सुयोग्य नेमके

चला माझा प्रतिसाद देवून झाला आता ही कविता पुन्हा पुन्हा वाचतो ..
धन्यवाद मुग्ध्मानसी

थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी.

माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?

<< !! दंडवत !!

Happy

Pages