नमस्कार! फॉर अ चेंज आज मी कलर्ड पेन्सिल स्केच अपलोड करत नाहीये.
मांजरं माझा वीक पॉईंट. जुन्या मायबोलीवर मांजरांवर थोडंफार लिहिलंही होतं. लहानपणी आसपास मांजरं असण्याची कायम सवय. आता मांजरं नाहीत माझ्याकडे गेली अनेक वर्ष, पण तात्पुरत्या संपर्कात येणार्या मांजरांशी तरीही सूर जुळतात अद्यापही. नुकत्याच पाहिलेल्या काही देखण्या मांजरांना माझ्या नवीन कॅमेर्यात कैद करायचा मोह आवरला नाही.
उदाहरणार्थ हे पहा: ब्राऊन डोळ्याचे हे मांजर.
हे एकच मांजर आहे की! अॅन ऑड आइड कॅट!! ही जेनेटीक कंडीशन आहे म्हणे. पण दुर्मिळ.
लायब्ररीत जात असताना ओझरतंच एक देखणं पांढरं-सोनेरी मांजर दिसलं. काही सेकंदांच्या त्या दृष्टीभेटीतच मांजराचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असल्याचं जाणवलं. पटकन मागे वळून पाहिलं तर तेवढ्यात बेटं गायबही झालं. नंतर येताजाता तिथल्या एका दुकानात बर्याच गबदुल मांजरांचा मुक्काम असल्याचं पाहिलं. तेव्हा ठरवलं एकदा प्रत्यक्ष भेट देऊन शोधून काढू त्याला. त्यानुसार त्या मांजराचा पत्ता लागलाच. मग काय मी कॅमेरा घेऊन लगेच हजर झाले तिथे.
दुकानदाराची परवानगी घेऊन फोटोसेशन चालू तर केलं. पण हे बोकोबा भलतेच लाजाळू निघाले. बघावं तेव्हा मान फिरवणे, डोळेच मिटून घेणे वगैरे प्रकार चालू झाले. मग शेवटी मालकांनी थोडा खाऊ दिला:
तेवढ्यात काहीतरी चाहूल लागली म्हणून मान वर झाली आणि त्या निळ्या आणि ब्राऊन डोळ्यात मी हरवून गेले लिट्रली.
मध्येमध्ये वर उडणार्या कावळे चिमण्यांवर आम्ही लक्ष ठेवून होतो बरं!
पण तिकडची बाकीची मांजर पण काय कमी नव्हती. काय एकेकाचे रंग आणि आरस्पानी डोळे!
त्या दुकानदाराकडे अशी जवळपास दहा मांजरं आहेत. सर्व देखणी, सुदृढ आणि स्वच्छ. त्या सर्व मांजरांची ऑपरेशन्स करुन घेतली आहेत त्यांनी. (त्याची खूण म्हणून कानाच्या टोकाचा तुकडा पाडला आहे. फोटोतही दिसतोय.)
ऑड आइड बोकाबांना दुकानदार 'वैटी' 'वैटी' असं हाक मारत होते. ते व्हाइटी (व्हाईट रंंगामुळे) असावं असं मला वाटलं. व्हाइटीबुवांनी नंतर मस्त पोजेस दिल्या. त्यांना या क्लिकक्लिकाटाची सवय असणार. बरेच मांजर फॅन्स फोटो काढून गेलेत.
मला फोटोग्राफीचा जराही गंध नाही पण माझ्या सध्याच्या नवीन कॅमेर्यातून फोटो काढणे हा सध्या जणू छंदच झाला आहे. त्यामुळे या फोटोंमध्ये प्रकाश चित्रणाच्या चुका असल्यास पदरात घ्या. आय होप तुम्हालाही आवडली असतील ही मांजरं.
थँक्स बीएसके, सुजा
थँक्स बीएसके, सुजा
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
वॉव, भारीचे हे सारे ....
वॉव, भारीचे हे सारे ....
मान्जरे मला आणी लेकीला फार
मान्जरे मला आणी लेकीला फार आवडतात. ती मान्जर पाळु म्हणते पण ते शक्य नाही. बोकोबा भारी आलेत. आमच्या इथल्या ( माहेरच्या ) मनीने आमचे घर सुरक्षीत आहे असे समजून तिचे १ ले का कितवेतरी बाळन्तपण आमच्या घरात केले. सकाळी म्यावचा आवाज आल्यावर आम्हाला समजले. पण तिच्या तीन पिल्लापैकी एकाला बोक्याने डाव साधुन जखमी केले, कारण ते पिल्लु बोका होते आणी एक बोका दुसर्या बोक्याला राहु देत नाही म्हणे. बिचारे गेले काही दिवसात, मी त्याला प्राण्याच्या दवाखान्यात नेले होते.:अरेरे:
पण डॉ. म्हणाले की आईने जवळ घेतले तरच जगेल. पण ती घेईना. मला जाम धक्का बसला त्यामुळे मी मान्जर- कुत्रा पाळायचाच नाही असे ठरवलेय.
आई ग कित्त्त्ती गोड आहेत .
आई ग कित्त्त्ती गोड आहेत . आम्ही पण सगळे माउ प्रेमी . लहान पणा पसुन इतकी मांजरं पाळली आहेत,
आणि त्यांचे इतके लाड केलेत.मला अत्ता पण हे फोटो बघुन त्यांना आवळु चिव्ळु करवसं वाटतय.
हे आमचं माउ. आता नाहीये ते.
हे आमचं माउ. आता नाहीये ते.
हे माझं माउ पिशवीच्या आत जाउन
हे माझं माउ पिशवीच्या आत जाउन खेळत बसलं होतं , तेव्हाचे फोटो आहेत.
धनुडी, गोड आहे पिलू. अंधारात
धनुडी, गोड आहे पिलू. अंधारात डोळ्यांच्या बाहुल्या कशा रुंदावतात.
कस्ले मस्त फोटो
कस्ले मस्त फोटो आहेत!!............अगदी गोड!!
आमच्याकडे आम्ही तिघी (महणजे मी आणि माझ्या मुली) मांजरप्रेमी आहोत. मांजर म्हणजे अगदी वीकपॉइंट!! मा़ंजराबद्द्ल बोलायचं तर कितीही दिवस कमी पडतील असं वाटतं. फे बु वर, हाऊ टु बी अ कॅट, लव्ह म्यू अशा कम्युनिटीजच्या आम्ही फॅन आहोत!!
धनुडि, कसली खट्याळ आहे मांजर
धनुडि, कसली खट्याळ आहे मांजर तुमची. मस्तच.
आता नाहिये माझं माउ , २ वर्ष
आता नाहिये माझं माउ , २ वर्ष झाली त्याला जाउन. अजुनही त्याच्या आठवणीने मी कासाविस होते.
मस्तच... म्याव..
मस्तच... म्याव..
मला दुरन्गी डोळ्यांच्या
मला दुरन्गी डोळ्यांच्या बोक्याचे फोटो विशेष आवडले नाहीत .तो दु;खी वाटतोय .तसेच त्याच्या परवानगी शिवाय कुणीकान कापलेलाही आवडले नाही तू तुझ्या चांगल्या मूड मध्ये फोटो काढलेयत तरी पण … sorry .
वर्षा सिरीयसली घेऊ नकोस माझे
वर्षा सिरीयसली घेऊ नकोस माझे विधान... थोडी जम्मत केली . ....
खूप गोड !
खूप गोड !
मी खूप काही मांजर प्रेमी नाही
मी खूप काही मांजर प्रेमी नाही पण माझ्या लहानपणी वडिलांच्या आईकडे कायम मांजर असायच. एक गेलं की शोधाशोध सुरु नव्या माउसाठी ! नंतर मी बारा-तेरा वर्षांची असताना मी आणि माझ्या भावाने एक माउ पाळलं होतं. एका ट्रिप हून आल्यावर कॅमेर्याच्या रोलमधे एकच फोटो शिल्लक होता म्हणून माझ्या भावाचा त्या माउबरोबर फोटो काढला आणि दुसर्याच दिवशी ते माऊ गायब झालं ते कायमचच ! त्यानंतर माउ पाळणंच काय पण कोणत्याच माउचा कुठे फोटो काढला नाही.. कारण हेच की माझ्या बाबांनी त्यांच्या घरी असणार्या माउचा जेव्हा जेव्हा फोटो काढला तेव्हा तेव्हा ते माउ नंतर गायब झालं.. राहिले ते फक्त फोटो ! काय संबंध आहे की नाही ते माहित नाही पण माना अथवा मानू नका झालं हे नेहेमीच असं झालं.
धन्यवाद रोहित,
धन्यवाद रोहित, भारती.
सोनचाफा, गूढकथेसारखं वाटतंय.
@भुईकमळ, अहो सिरीयसली घेण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हालाही तुमचं मत असणारच की. सॉरी काय त्यात.
सगळे फोटो खूप छान. ही आमची
सगळे फोटो खूप छान. ही आमची झोई (सगुणा).
मी हा धागा यापूर्वीही
मी हा धागा यापूर्वीही पाहिलेला.. प्रतिसाद कसा दिला नाही कम्माले..
ते निळ्या पिवळ्या डोळ्यांची मांजरे नेटवर पाहिले होते मी.. चक्क इथेपन मिळाले म्हणजे काय..
ते कानाचा छोटा टवका उडवणं आवडल नाही मला.. त्या मालकाचा निषेध
.
फोटो मस्तच आहे सारे.. प्रतिसादातले पन मस्तच..
ते झोई उर्फ सगुणा नावं खुप्पच आवडल ..
थंबनेल असलेला फोटो जरा मोठा करुन टाकता आला तर बघा भोजराज..
धन्यवाद टीनाजी. हा बघा झोईचा
धन्यवाद टीनाजी. हा बघा झोईचा मोठा फोटो:
कसली क्युट आहे हि..खुपच मस्त.
कसली क्युट आहे हि..खुपच मस्त.. गब्बु गब्बु..
खूप गोड फोटो आलेत
खूप गोड फोटो आलेत
मांजरं मला खूप आवडायची.पण ती माझ्या कंपोस्ट बकेट मध्ये उडी मारून उचकापाचक करून स्टॅर्टर म्हणून गोगलगाय एग्ज खाऊन मग टाईल वर शी करते(ही शी
प्री गोगलगाय डायट ची असेल) म्हणून सध्या मांजरं आर्च एनिमी.☺️☺️
>>> कसली क्युट आहे हि..खुपच
>>> कसली क्युट आहे हि..खुपच मस्त.. गब्बु गब्बु..
डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय...नुकतंच नविन डाएट सुरु केलंय
>>> सध्या मांजरं आर्च एनिमी.
>>> सध्या मांजरं आर्च एनिमी.
नेटवर कुठेतरी वाचाल की मांजरं प्रत्येकाला भक्ष्यं (prey) आणि भक्षक (predator) ह्याच नजरेने बघतात... खखोदेजा
भ्भोजराज, फारच गोंडस मनी आहे.
भ्भोजराज, फारच गोंडस मनी आहे.
धनुडी, तुमचे पण गोड.
निळ्या डोल्याचे एका कानाने
निळ्या डोल्याचे एका कानाने बहीरे असते
अरेच्चा या शेवटच्या कॉमेंट्स
अरेच्चा या शेवटच्या कॉमेंट्स पाहिल्या नव्हत्या.
भोजराज तुमची झोई अत्यंत गोड आहे.
>>ते कानाचा छोटा टवका उडवणं आवडल नाही मला.. त्या मालकाचा निषेध
टीना, मला वाटतं अशी इयर नॉच ही spay/neuter surgery केल्याची बाह्य खूण असते. इथे पहा. मी बर्याच मांजरांच्या कानांवर अशी नॉच पाहिल्ये. नाहीतर spay/neuter surgery केलीय की नाही हे ओळखणे कठीण.
आमचा टारझन...
आमचा टारझन...
अईग, किती ते गोडू. टारझन आणि
अईग, किती ते गोडू. टारझन आणि झोई. खुपच क्युट
टारझन गाढ झोपलाय. मस्त.
टारझन गाढ झोपलाय. मस्त.
Pages