उर्दू ग़ज़ल- काही शतकांचा प्रवास- १

Submitted by समीर चव्हाण on 10 January, 2015 - 11:47

ग़ज़ल ही काव्यविधा काही शतकांच्या प्रवासात हजारो वाटा चोखाळते, कुठल्याही विरामाशिवाय, मजलदरमजल, हा एक चमत्कार नाही तर काय आहे. हा कारवा आजतागायत चालला आहे, ज्यात मोलाची भर पाडणारे थोडे-थोडे म्हणता शेकडो ठरावेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षांनीही लोक ह्यांना स्मरत आहेत, वाचत आहेत, त्यांची पोइट्री सेलिब्रेट करीत आहेत. ह्या विधेत हिंदी-मराठी-पंजाबी-फारसी आणि विशेषकरून ह्या सगळ्यां भाषेंची घुलावट दिसून येते. ही काव्यविधा, काही प्रमाणात का होईना, समजून घेण्याचा एक सोपा मार्ग किंवा त्याकडील पहिले पाऊल म्हणजे त्यातील काही महत्त्वाच्या शायरांची किमान ओळख करून घेणे. गेल्या अर्ध शतकातील मराठी गझलेतील घडामोडी पाहता, ही ओळख मराठीतील सगळ्यांसाठीच आवश्यक आणि मोलाची ठरावी. ह्या मालिकेत पुढील कवींचा परिचय करायचा विचार आणि प्रयत्न आहे: वली, इन्शा, सौदा, दर्द, मीर, नजीर, नासिख, जौक, बहाद्दुर शाह जफ़र, गालिब, मोमिन, सिराज औरंगाबादी, अनीस, मीर दबीर, अमीर मिनाई, दाग, हाली, अकबर अलाहाबादी, मख्दूम, रियाज खैराबादी, बेखुद देहलवी, सलील देहलवी, साकिब लखनवी, इक्बाल, हसरत मोहानी, फानी, यास चंगेजी, जिगर, जोश मल्सियानी, जोश मलीहाबादी, फिराक, हरीचंद अख्तर, अंदलीब शादानी, राम प्रसाद बिस्मिल, अबिद, आदम, अहमद मुश्ताक़, जफ़र इक्बाल, अहमद नदीम कासमी, रविश, ज़ज्बी, मीराजी, फैज़, कतील शिफाई, साहिर, मजरूह, नासिर काज़मी, मजाज़, अख्तर शीरानी, जां निसार अख्तर, कैफी आज़मी, तेग इलाहाबादी, सहबा अख्त़र, इशरत किरतपुरी, अहमद फ़राज़, निदा फाज़ली, बशीर बद्र, अमीर क़ज़लबाश, वसीम बरेलवी, शकील बदायुनी, अली सरदार जाफ़री, शहरयार, दर्शन सिंह, दुष्यंत कुमार, हाफिज़, बशर नवाज़, हनीफ साग़र, शहजाद अहमद, मोहम्मद अल्वी, राजेश रेड्डी, अली अहमद जलीली, अदम गौंडवी, झुबैर रिज़्वी, शमीम अब्बास, मुनव्वर राना, अज़्हर इनायती, परवीन शाकिर, आणि शारिक़ कैफी.

पहिल्या भागात आपण वली आणि इन्शा ह्या दोन गझलकारांची ओळख करून घेऊया. डिटेल्स न देता फक्त ओळख करण्यावर भर देत आहे. कारण वेळेची कमतरता तर आहेच, माझ्या मर्यादाही आहेत.

उर्दू शायरीचे बाबा आदम म्हणून वली दकनीचे नाव घेतले जाते (किमान भारतात). वलीचा जन्म १६४८ च्या औरंगाबाद चा असून गझल दिल्लीत पोहोचवण्याचे श्रेय त्याला जाते. गुजरातात त्याचे वास्तव्य असावे. त्यामुळेच त्याला वली गुजराती ही म्हणतात. तिथेच त्याची मजार होती, जी गुजरातच्या २००२ मधील दंगलीत नेस्तनाबूत झाली.
वलीच्या गझलेत गगन, चरन, जोत, चंदर असे अनेक हिंदी शब्द येतात. रेअरली मराठी शब्दही.


आज दिसता है हाल कुछ का कुछ
क्यूं न गुज़रे ख़याल कुछ का कुछ

दिसता = दिखता

त्याच्या गझलेत हिंदू धर्माचेही संदर्भ येतातः

शहर भीतर जो आवे नहान का दिन
हिंदू की कौम के अश्नान का दिन

अश्नान = स्नान

ही गझलेची सुरुवात असल्याने विचारांची उंची जागोजागी नसली तरी विचार जाणवतो:

मुफ्लिसी सब बहार खोती है
मर्द का ऐतबार खोती है

मुफ्लिसी = गरीबी

हा शेर, त्यातील खयाल, आणि विशेषत: त्यातील प्रवाहीपणा (रवानी) पहावा:


ऐसा बसा है आकर तेरा ख्या़ल ज्यू में
मुश्किल है ज्यू सूं तुजको अब इम्तियाज़ करना

ज्यू = जी, इम्तियाज़ = फरक

त्याची एक भाषा, शैली जाणवते जी लोभसवाणी आहे.


उस दिलमें ग़म्ज़:-ए-आहू पछाड है
ऐ दिल सम्हाल चल कि अगे मारधाड है

ग़म्ज़:-ए-आहू = हिरन के नाज़ नखरे,

त्याच्या काही सुंदर जमीन आहेत. ही पहालः

किया मुझ इश्क़ ने जालिम कूं आब आहिस्ता आहिस्ता
कि आतिश गुल कूं करती है गुलाब आहिस्ता आहिस्ता

मीर तकी मीर त्याच्याबद्दल अभिमानाने म्हणतो:


खूगर नही कुछ यूं ही हम रेख्तागोई के
माशूक़ जो अपना था, बाशिंदा दकन का था

रेख्ता = उर्दू

वलीचा एक, माझा अतिशय आवडता शेर, ज्यातील सत्य हजारो लोकांनी पडताळले असावे:

राह-ए-मज्मून-ए-ताजा़ बंद नही
ताक़यामत खुला है बाब-ए-सुख़न

लिहिणा-यांसाठी नवनवीन विषयांचे मार्ग बंद व्हावे कसे ?
अगदी प्रलयापर्यंत निर्मितीची संभावना बनून राहिल.

ह्या भागात दुसरा परियच करून घेऊया सैयद इन्शा अल्लाह खां इन्शा ह्याचा. इन्शाचा जन्म १७५५-१७६० च्या दरम्यान मुर्शिदाबाद येथे झाला तर मृत्यू लखनऊ येथे. इन्शाबद्दल मला विशेष माहिती नाही आहे. वाचण्यात आलेय की इन्शाला उर्दूचे व्याकरण जागेवर बसवण्याचे श्रेय दिले जाते.
त्याची एक प्रसिध्द गझल कमर बांधे मधील काही शेर देत आहे:


कमर बांधे हुए चलने को यां सब यार बैठे है
बहुत आगे गए, बाकी जो है, तैयार बैठे है


न छेड ऐ निकहते-बादेबहारी राह लग अपनी
तुझे अठखेलियां सूझी है, हम बेजा़र बैठे है

निकहते-बादेबहारी = वसंतपवन


तसव्वुर अर्श पर है और सर है पा-ए-साक़ी पर
ग़रज़ कुछ और धुन में इस घड़ी मय-ख़्वार बैठे हैं

अर्श=सातवा आसमान


यह अपनी चाल है उफ़तादगी से इन दिनों पहरों तक
नज़र आया जहां पर साया-ए-दीवार बैठे हैं

उफ़तादगी= दुर्बलता


भला गर्दिश फ़लक की चैन देती है किसे इंशा
ग़नीमत है कि हमसूरत यहाँ दो-चार बैठे हैं

फ़लक = संसारचक्र, ग़नीमत= अच्छी बात

इन्शाचा ह्युमर बढिया होता. एक किस्सा असा आहे:
एक मशहूर शायर शेख़ क़लन्दर बख़्श जुर्रत आंधळे होते. एकदा ते चिंतेत बसले होते. इन्शा आले आणि विचारले. त्यावर ते म्हटले की एक मिसरा झालाय, पुढे सुचत नाहीए. असे म्हणत मिसरा ऐकवला:

उस ज़ुल्फ़ पे फब्ती शब-ए-दीजूर की सूझी

फब्ती=कुटिल मुस्कान, दीजूर= अँधेरा

इन्शा ताबडतोड म्हटले, असे करा:

अन्धे को अन्धेरे में बड़ी दूर की सूझी

त्याचा हा एक शेर पहाल, उर्दू-हिंदीचे मिश्रण:

जज्बा़-ए-इश्क़ सलामत है तो इन्शा-अल्लाह
कच्चे धागेसे चले आयेंगे सरकार बंधे

काय मक्ता आहे. लाजवाब.
आता इथेच थांबतो.
पुढील भागात सौदा आणि दर्द ह्यांचा परिचय करून घेऊयात.

समीर चव्हाण

भाग २ http://www.maayboli.com/node/52303

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह समीरजी .
स्तुत्य उपक्रम आहे.
आमच्यासारख्या नवशिक्यांना भरपूर शिकायला मिळेल.

धन्यवाद . Happy

धन्यवाद, सुशांत आणि भूषण.

नंदिनीजी, आपल्याला काय म्हणायचे ते स्पष्ट लिहिलेत तर काही बोलता येईल.

समीर चव्हाण

थोड्क्यात असला तरी पहिला भाग नेमकी ओळख करून देण्यास पुरेसा वाटला अर्थात लेखाची लांबी अजून थोडी जास्त असती तरी वाचायला अजिबात कंटाळा आला नसता इतक्या बोलकेपणे व्यक्त झालेले आहात आपण !!
गरजे नुसार एखाद्या शायरावर अख्खा एक भाग दिलात तर मजा अजून वाढेल. काही शायरांवर एक भागही कमी पडणार असेल तर दोन भाग केलेत तरी चालेल .
असो
पुढील सर्व भागांच्या तीव्र प्रतीक्षेत

धन्यवाद समीरजी

धन्यवाद, वैभव आणि नंदिनीजी.
पुढील भाग लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न राहीन.

समीर

सुरेखच उपक्रम
शायरांची नावे वाचूनच एका monumentला हात लावून आल्यासारखे वाटले

लेखाच्या शेवटचा मक़्ता लाज़वाब

कल चौदहवी की रात थी....ही याच इन्शाची गझल का?

धन्यवाद.

कल चौदहवी की रात थी....ही याच इन्शाची गझल का?

नाही. ही गझल इब्ने-इन्शाची आहे.
इब्ने-इन्शा सुटला होता नजरेतून. अजूनही बरेच आहेत तसे, उदा. शकील.
सगळ्यांचा परिचय देणे अशक्य आहे.
धन्यवाद.

वलीचा एक अप्रतिम शेर मिळाला, जो नव्याने टाकला आहे.
हा ख्याल नवीन नसला तरी शेरातील प्रवाहीपणा (रवानी) वाखाणण्याजोगी आहे:


ऐसा बसा है आकर तेरा ख्या़ल ज्यू में
मुश्किल है ज्यू सूं तुजको अब इम्तियाज़ करना

ज्यू = जी, इम्तियाज़ = फरक

धन्यवाद.