विमानातील मोशन सिकनेस

Submitted by sneha1 on 11 October, 2010 - 10:44

मला ह्या महिन्यात भारतवारी करायची आहे.लेक साडेचार वर्षांची आहे, तिला घेऊन पहिल्यांदाच एकटी जाते आहे.माझी अड्चण अशी आहे की मला विमान लागतं.डॉक्टर ने औषध दिले आहे, पण त्याच्या मते कोणत्याही औषधाने झोप येणारच्.एकटीने लेकीला सांभाळायचं आहे,त्यामुळे औषध न घेता हा त्रास कमी कसा करायचा हे सांगू शकेल का कोणी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टरने काहीतरी कानाला चिकटवायचे दिले आहे:-) त्याच्या मते कोणतेही औषध non drowsy असले तरी त्याची खात्री देता येत नाही.
तुम्ही सांगितलेले काहीतरी वेगळे दिसते.धन्यवाद..

स्नेहा, मला उपाय माहिती नाहीत, परंतु विमानात बसल्यावर एअर होस्टेसला याची कल्पना देऊन ठेवा म्हणजे त्या मुलीकडे लक्ष ठेवणे इ. मदत करतील.

त्या बँडसचा काही उपयोग होत नाही. स्वानुभव आहे.

स्नेहा, कधी जायचं आहे ? आतापासून रोज वाटीभर कोरडे चिरिओज खायला सुरुवात करा. प्रवासार बरोबर पण छोटी झिप लॉक भरुन चिरिओज ठेवा. प्रवास करायचा आहे त्या दिवशी, आदल्या दिवशी खूप मसालेदार, तेलकट काही खाऊ नका. विमानात बसण्याआधी एक तास काही तरी कोरडे (पराठा, पोळी, नुसता ब्रेड) खा. खूप पोटभर नको आणि पोट अगदी रिकामे पण नको. विमानात जेवायला देतील ते शक्यतो टा़ळा. बरोबरचा एखादा/दीड पराठा (न लाजता, इतर प्रवाशांच्या तु क ना इगनोअर करुन) खा. अधनं मधनं चिरिओज तोंडात टाका. मी तर एक मील पराठा आणि एक मील फक्त चिरिओज खाते. खाल्ल्या खाल्ल्या पाणी पिऊ नका. थोड्या वेळाने माफक पाणी प्या. कुठलेही सायट्रस ज्यूस, सोडा वगैरे प्यायचे टाळा. हे आणि हेच उपाय केल्यावर प्रवास सुसह्य होतो (मला आणि शेजारच्यांना). पिशव्यांची गरज पडत नाही.

सिन्ड्रेलाने सान्गितलेले प्रतिबन्धात्मक उपाय "सार्वत्रिक" (म्हणजे अगदी इकडच्या लोकल बस प्रवासासाठी सुद्धा) उपयोगी अन परफेक्ट वाटताहेत Happy लक्षात ठेविन! चिरिओज म्हणजे काय ते माहित नाही, पण इकडे चणेफुटाणे खायला हरकत नसावी. असो.

स्नेहा, विश यू ह्याप्पी जर्नी ! (शुभास्ते पंथानः संतू - झक्की, बरोबरे का हे वाक्य?)

धन्यवाद्...मला वाटतं चिरिओज तिथे मिळतात, आणि त्याच्याऐवजी मुरमुरे/लाह्या खायला हरकत नसावी.जाणकार सांगतीलच Happy

परदेशात मिळणार्‍या औषधांबद्द्ल माहित नाही. पण भारतात मोशन सिकनेसवर Avomine म्हणून गोळ्या मिळतात. त्या मला तरी खूप परिणामकारक वाटतात आणि मला तरी त्या गोळीने अद्याप कधीही drowsiness वाटलेला नाही.

मी तर कित्येक प्रवास अ‍ॅवोमिन मुळे गाढ झोपेत काढलेत. लोक पैजा मारायचे आज गाडी सुटल्यावर साडेतीन मिनिटांनी की सव्वाचार मिनिटांनी नीरजा गार होणार यावर.. Happy

अरे बापरे! असं आहे काय? मी देशी-विदेशी सर्व प्रवासात ह्या गोळ्या वापरल्या. सी सिकनेस साठी सुध्दा वापरल्या पण मला कधीच असा अनुभव आला नाही. बरं झोपेच्या गोळ्याही मी सहसा घेत नाही की ज्यामुळे इम्युनिटी आली असेल असं म्हणता येईल.

अगं व्यक्ती तितक्या प्रकृती.
ज्याला मुळात मोशन सिकनेस आहे प्रचंड प्रमाणात त्याला झोप येतेच. अर्थात अपवाद असतातच की. परत प्रकृतीत बदलही होतातच.मी पूर्वी बस चालू झाली की ब्वॉक ब्वॉक सुरू करायचे. त्यामुळे अ‍ॅवोमिन झिंदाबाद होते. आता कोकणातल्या वाकड्या तिकड्या रस्त्यांवर फिरताना अ‍ॅवोमिनची आठवणही येत नाही. झोपेची सवय मात्र अजून तशीच आहे. Happy

मी यावेळी तो पॅच वापरला.उलट्या मुळीही झाल्या नाहीत, पण झोप मस्त आली...

.

पॅच?