Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृत्युचे भाकीत सांगू नये असा
मृत्युचे भाकीत सांगू नये असा संकेत ज्योतिषात आहे.
एका प्रसिद्ध ज्योतिषांनी
एका प्रसिद्ध ज्योतिषांनी डिसेंबर २०३४ अर्थात वयाच्या साडेछपन्नाव्या वर्षी असे वर्तविले आहे..,>>>>>>> जन्म-मृत्यू हे दैवाधिन आहे.
मृत्यूचे भाकित करु नये असा
मृत्यूचे भाकित करु नये असा सर्व मान्य संकेत ज्योतिषशास्त्रात पाळला जातो , जरी जातकाने तशी ईच्छा प्रकट केली तरी अशी भाकितें करणे हे नैतिकतेला धरुन होणार नाही, तसेच अशी भाकिते स्विकारायची, पेलायची, पचवायची ताकद सगळ्या जातकात असेलच असे नाही. अशा भाकितांचा काही वेळा गैरवापर होण्याची शक्यता असते.
एका प्रसिद्ध ज्योतिषांनी
एका प्रसिद्ध ज्योतिषांनी डिसेंबर २०३४ अर्थात वयाच्या साडेछपन्नाव्या वर्षी असे वर्तविले आहे>>>>>>>> ठरावि़क महादशेत आणि ग्रह वगैरे बघून मॄत्युची वेळ सान्गता येतो पण ते पुर्णपणे चुकिचे आहे...कारण मॄत्यु अकाली असेल तर महामॄत्युजय मत्राचा जाप करून तो टळू शकतो किवा तुमच्या हातून पुण्य घड्ली असतील तरीसुधा तुमच आयुष्य वाढ्त अस मी एकलय....
चेतन, यावरुन ज्योतिषाकडे
चेतन, यावरुन ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी पुस्तकातील एक भाग आठवला.तो देतो.
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कंुडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे!
आमच्या संपर्कात एक गृहस्थ आले होते. त्यांना एका ज्योतिषाने मृत्यूचे भाकीत सांगून हादरवून टाकले. त्यानंतर त्यांनी अनेक ज्योतिषांकडे हा फीडबॅक घेवून चकरा टाकल्या. सर्वांचे खिसे भरले. काहींनी त्यांना चारसहा महिने काहींनी वर्ष दोनवर्ष मुदतवाढ दिली. अत्यंत मानसिक तणावात त्यांनी काही वर्ष काढली. त्यातील फोलपणा आम्ही समजावून द्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी सुद्धा काही वर्ष जावी लागली. सात आठ वर्ष उलटून गेली तरी त्यांना काही झाले नाही. मग मागे वळून पहाताना आता त्यांना वाटतं उगीच आपण हा काळ तणावात घालवला. मनुष्य अमर थोडाच आहे?
मृत्यूची वेळ ठाऊक असेल तर
मृत्यूची वेळ ठाऊक असेल तर माझा तोपर्यंतचा काळ तणावात जाणार नाही. उलट अगदी व्यवस्थित जीवन जगता येईल, आनंद चित्रपटातल्या आनंद सारखे.
>>>> मृत्यूची वेळ ठाऊक असेल
>>>> मृत्यूची वेळ ठाऊक असेल तर माझा तोपर्यंतचा काळ तणावात जाणार नाही. उलट अगदी व्यवस्थित जीवन जगता येईल, आनंद चित्रपटातल्या आनंद सारखे. <<<<
चेतनजी, थोडासा लहान तोंडी मोठा घास घेतोय क्षमा करा पण 'व्यवस्थित जीवन जगण्या साठी' मृत्यूची वेळ ठाऊक असायलाच हवी का? व्यवस्थित जगण्याची सुरवात तर आजपासूनच नव्हे आत्तापासूनच नाही का करता येणार ? जे आपल्या हातात आहे , आपल्या ईच्छाशक्तीवर अवलंबून आहे ते करायला वाट कशाची बघायाची ? उद्याचे मला माहीती नाही आजचा दिवस ,हा क्षण माझ्या हातात आहे तो मी व्यवस्थितच जगणार 'कम व्हॉट मे' अशी सकारात्मक वृत्ती असली म्हणजे झाले.
(हायला,, हे लिवलस आन एक दारात आल्यालं गिर्हाइक घालवून बस्लास की रे भाद्दरा,, कर अस्स्सच घंदा कर गड्या , लाखाचे बारा हजार झालेच म्हणून समज ! )
>>हायला,, हे लिवलस आन एक
>>हायला,, हे लिवलस आन एक दारात आल्यालं गिर्हाइक घालवून बस्लास की रे भाद्दरा,, कर अस्स्सच घंदा कर गड्या , लाखाचे बारा हजार झालेच म्हणून समज ! )<<
काही धंदा नुस्कानी मदी केला की मंग त्याला समाजशेवा म्हंत्यात ! अशीच तुमच्याकून समजाशेवा घडो ही इश्वरचरनी प्रार्थना!
चेतन, कृपया आनंद काँप्लेक्स
चेतन, कृपया आनंद काँप्लेक्स मध्ये तुमचे जीवन वाया घालवू नका. ती फक्त एक फिल्म आहे. त्या फिल्म प्रमाणे जगायचे व मरायचे अश्या कॉम्प्लेक्स् ला मनाशी घट्ट धरून माझा नवरा हॉस्पिटलची पायरी देखील चढला नाही. कोणाला तब्येतीची खरी माहिती सांगितली नाही व जगणे शक्य असूनही केवळ स्वत:च्या मिसमॅनेजमेंट मुळे लवकर वारला.५२ एज. तुमची मानसिकता कदाचित खूप जास्त मॅच्युअर असेल पण आनंद/ आराधना कॉप्लेक्स मुळे जीवनातला आनंदच हरवून बसलेलीही माणसे आहेत त्यांच्या अश्या काँप्लेक्स चा त्रास घरच्यांनाच जास्ती होतो. राग मानू नका. खूप छान आणि खूप जगा.
सुधीरजी तुमची पोस्टे वाचते मी. माहितीपूर्ण असतात.
जर मृत्यू आधी जाणून
जर मृत्यू आधी जाणून त्याप्रमाणे नियोजन करण्यात अर्थ नसेल तर इतर कुठलीही गोष्ट जाणून घेण्यात तरी काय अर्थ राहिला? भविष्य जाणून घेण्याचे मग प्रयोजनच काय राहते? उलट इतर अनेक गोष्टी जाणून घेतल्या नाहीत व त्या तशा घडल्या तरी त्यावर मात करण्याचे इतर उपाय आहेत. जसे की, अचानक नोकरी गेली तरी काही बिघडत नाही, व्यवसाय करता येतोच की (अगदी टाटा बिर्ला व्हायची गरज नाही, रस्त्यावर टॅक्सी चालवूनही पोट भरता येते). उलट मृत्यू ही एकच गोष्ट अशी आहे की ज्यावर उपाय नाही, टाळता येत नाही आणि त्याला पर्याय नाही (म्हणजे जसा नोकरीला पर्याय उद्योग तसा...)
म्हणूनच आयुर्विमाचा बाजार तेजीत असतो.
आयुर्विम्यावरून आठवलं, ज्या प्रसिद्ध ज्योतिष्यांनी २००८ साली माझं मृत्यू भाकित वर्तविलं ते माझ्या नात्यातलेच असल्याने त्यांनी शुल्क घेतलं नाही. परंतु आपण तरी कुणाकडून फुकट कशाला काही घ्या म्हणून मी त्यांच्या मुलाकडून २५ वर्षांचा आयुर्विमा उतरवून घेतला.
त्यांना गंमतीने म्हणालो देखील, की माझा हा २५ वर्षांचा आयुर्विमा वायाच जाणार कारण यानंतर २६ वर्षांनी मी मरणार आहे ना?
तात्पर्य:- मला मृत्यूची अगदी खात्रीशीर माहिती असेल तर त्याच्या अगदी वर्षभर आधी मी मोठ्या रकमेचा आयुर्विमा तरी उतरवून ठेवू शकतो. माझ्या वारसांची तरी सोय होईल.
>>जर मृत्यू आधी जाणून
>>जर मृत्यू आधी जाणून त्याप्रमाणे नियोजन करण्यात अर्थ नसेल तर इतर कुठलीही गोष्ट जाणून घेण्यात तरी काय अर्थ राहिला?<<
मूळ प्रश्न हा आहे की मृत्यू जाणणे शक्य आहे काय?( इथे ज्योतिषाधारे हे महत्वाचे). जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार आहे हे तर प्रत्येक जण जाणतोच. खरा प्रश्न आहे तो कधी? आणि हे भाकीत खरे येण्याची शक्यता किती? ज्या अर्थी तुम्ही आज जिवंत आहात त्या अर्थी २००८ साली मृत्यु येईल हे भाकित खोटे ठरले. जातकाचे मृत्युचे भाकीत सांगू का नये? तर त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य बिघडेल अशी शक्यता जास्त असते. एखादा खंबीर आहे असे जरी म्हटले तरी तो मेंदुत चाललेली विचारप्रक्रिया तर थांबवू शकत नाही. ज्योतिषा धारे मृत्यु सांगता येतो का? याबाबत वर मी लिहिले आहेच. मृत्यु ही आयुष्यातील नि:संदिग्ध मोठी घटना आहे तर मृत व्यक्तिच्या पत्रिकेवरुन तो जिबंत नसुन मृत आहे हे ज्योतिषाला सांगता यायला हवे. अंनिस चे तर त्यासाठी २१ लाखाचे आव्हान आहे.
आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते.
अमा च्या सांगण्यात कळकळ आहे कारण त्यांनी जवळून अनुभवले आहे.
प्रकाश अहो हो. साध्या
प्रकाश अहो हो. साध्या मध्यमवर्गी मुलांवर अश्या चित्रपटांचा फार परिणाम होतो त्याहून लिहीले आहे. तुमच्या एका धाग्यावर तुम्ही मेष वृश्चिक योगाबद्दल लिहीले आहे . पण असे वाटतेच की त्या योगाबद्दल आधी माहिती असती किंवा आईवडिलांनी पत्रिका नीट बघितली असती तर एव्ढे सफरिन्ग वाचले असते. वेळेचा सदुपयोग करता आला असता
घाटपांडे, तुमचा विश्वास नसेल
घाटपांडे, तुमचा विश्वास नसेल तर कृपया इथे रसभंग करु नका. इतर लोक, प्लीज इग्नोर धिस ट्रबलमेकर.
तुळ राशिच्या साडेसाति च काय
तुळ राशिच्या साडेसाति च काय राव? त्रासुन गेला आहे जिव
@ कोकणस्थ - हा धागा ज्योतिष
@ कोकणस्थ - हा धागा ज्योतिष विषयाबाबत आहे व मी ज्योतिष विषयासंबंधीतच लिहितो आहे. पाककृती किंवा कविता गझल लिहित नाही. आपण दुर्लक्ष करु शकता.
अमा मी मृत्यु षडाष्टक व प्रीती षडाष्टक या संकल्पना सांगण्यासाठी मेष बृश्चिक योग हा प्रिती षडाष्टक आहे असे लिहिले होते.व हा योग वर्ज्य नाही.दाते पंचागात याबाबत लिहिले आहे.
हो का? बरं बरं.
हो का? बरं बरं.
अमा मी मृत्यु षडाष्टक व
अमा मी मृत्यु षडाष्टक व प्रीती षडाष्टक या संकल्पना सांगण्यासाठी मेष बृश्चिक योग हा प्रिती षडाष्टक आहे असे लिहिले होते.व हा योग वर्ज्य नाही.दाते पंचागात याबाबत लिहिले आहे.>> वर्ज्य नाही पण किती त्रासदायक आहे. तुमचे पोस्ट वाचले तेव्हा मला एकदम संगती लागली. ज्योतिषावर सर्व टाकून द्यायचे असे नाही. पण एक कोडे सुटल्यासारखे होते.
पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं
पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
http://www.maayboli.com/node/51264
=============================
=================================================
mnc | 1 September, 2009 - 23:55
ashwini:
अश्टम शुभ ग्रह अणि अशुभ अशी वर्गवारि करु नका please.
कुठलेही ग्रह अश्टम मध्ये असताना त्यान्च्य करकत्वाला न्युनत्व येते.
रवी ८ मध्ये : सरकार, सिनीयर्स, वडील विरुद्ध जातात. त्यान्चा पाठिम्बा मिळत नाही.
चन्द्र ८ मध्ये: पीयर्स, पाणि, आइ चा पाठिम्ब मिळत नाहि, mind (nirasha)
शनि : masses विरुद्ध जातात. वाज्पयी २००३/२००४ मध्ये हारले. अश्तम शनि व्रुश्चिकेला. मोदि कसाबसा निवदुन आले.
मन्गळ ८ : sports, driving, blood साठी वाइट.
८ वे स्थान म्य्तुत्यु स्थान पेक्शा म्र्युत्यु वेळची परिस्तिति सान्गते. ह्याचे जास्त समर्पक नाव "पीडा स्थान" आसे आहे. जे ग्रह ८ मध्ये असतात त्यन्च्या करकत्वा प्रमाणे पीडा होते. ते ज्य स्थानाचे मालक आहेत त्याबाबतित थोडे लक्श द्यावे लागते.
पत्रिके मध्ये असतिल तर त्यान्ची अयुश्यभर काळजी घ्यावी लागते. गोचरी ने असतिल तर तेवढा काळ
========================================
लिम्बूटिम्बू, mnc,
सातव्या पानावर, अष्टमातल्या ग्रहांच्या भ्रमणाबद्दल जे लिहीले आहे, ते अष्टम स्थान लग्न कुंडलीतले की चंद्ररास कुंडलीतले? दोन्ही कुंडल्यातल्या शनी भ्रमणाच्या परीणामातला फरक सांगाल का?
साडेसाती मधे गुरु उपासना
साडेसाती मधे गुरु उपासना केल्यानि काहि त्रास कमी होतो का .
चेतनजी, आपली कुंडली नक्कीच
चेतनजी,
आपली कुंडली नक्कीच अपमृत्यु योगाची नाही. आपल्याला दिर्घ आयुष्य आहे. याच कारण आपला अष्टमेश शनी आहे आणि तो वक्री नाही.
आपल्या मनातुन हा विचार जाई पर्यंत शिवलिलामृताचे पारायण करा.
<< आपली कुंडली नक्कीच
<< आपली कुंडली नक्कीच अपमृत्यु योगाची नाही. आपल्याला दिर्घ आयुष्य आहे. याच कारण आपला अष्टमेश शनी आहे आणि तो वक्री नाही. >>
धन्यवाद.
<< आपल्या मनातुन हा विचार जाई पर्यंत शिवलिलामृताचे पारायण करा. >>
मृत्युची भीती नाहीच. फक्त आयुष्य नेमकं किती आहे हे कळलं म्हणजे नीट नियोजन करुन आपल्या इच्छा पुर्णत्वास नेता येतात.
फक्त आयुष्य नेमकं किती आहे हे
फक्त आयुष्य नेमकं किती आहे हे कळलं म्हणजे नीट नियोजन करुन आपल्या इच्छा पुर्णत्वास नेता येतात.
तुमच्या हेतुबद्दल अजिबात शंका नाही पण गंमत वाटते असे काही वाचुन. आयुष्याचा काहीही भरवसा नाही, कुठल्याही क्षणी एका क्षणात मृत्यु आपल्याला गाठू शकतो हे आजुबाजुला पाहिले की लक्षात येते. अशा वेळेस, नीट नियोजन करुन आपल्या इच्छा पुर्णत्वास नेण्यासाठी आज दिवस तुमचा समजा हीएकच गोष्ट नीट कळणे आवश्यक आहे. ते नाही कळले तर अगदी कोणी स्टँपपेपरवर तारिख लिहुन दिली तरी काहीही फरक पडत नाही.
आपले आयुष्य लिमिटेड आहे, एकेक क्षण महत्वाचा आहे हे माहित असुनही मी दररोज कुठलेही काम हाती घ्यायचे म्हटले की 'हे काम मी उद्यापासुन नक्की सुरू करेन' हा मंत्र जपत असते.
नितीन्चंद्र जी पत्रिकेत
नितीन्चंद्र जी
पत्रिकेत अष्ठमेश गुरु जर व्ययात असता अपमृत्यू येईल काय ?
धा दिपकजी, अष्टमेश गुरु
धा दिपकजी,
अष्टमेश गुरु व्ययात कोणत्या राशीत आहे ? गुरुच्या दोन राशी असतात.
१) तो कोणत्या नक्षत्रात आहे ? नक्षत्र गोचर पहाणे महत्वाचे असते.
२) नक्षत्र स्वामी वक्री आहे का नाही.
३) गुरुवर पाप ग्रहाची दृष्टी आहे का ? हर्षल/ मंगळ सारख्या पापग्रहाबरोबर कुयोग होतो का हे ही महत्वाचे.
४) ही सर्व फळे महादशा आणि अंतर्द्शा व्ययेशाची किंवा अष्टमेशाची असताना अनुभवाला येतात. हे वय ७५ असेल तर तो अपमृत्यु कसा म्हणायचा ?
हे सर्व पाहिल्या शिवाय लिहणे चुकच आहे. शिवाय गुरु हा पाप ग्रह नसतो.
अष्टमात चंद्र जलराशीत असता किंवा अष्टमेश चंद्र व्ययात, पापकर्तारीत असताना, महादशा / अंतर्दशा तशा असताना, खात्री साठी हात पाहुन आयुष्य रेषा तुटलेली असताना आयुष्य वाढीसाठी उपाय सांगावा पण अपमृत्युचे भविष्य वर्तवु नये.
( मृत्युचे भविष्य पाहु नये असे नाही पण वाईट असल्यास वर्तवु नये. जातक विनाकारण जीवाला त्रास करुन घेतो. शेवटी भविष्य चुकु शकते )
मृत्यु येण्याचा योग असतो . याचे वर्णन आधीभौतीक, आधीदैवीक आणि आधीअध्यात्मीक अश्या तीन प्रकाराने होते.
जर जातक आजारी पडला असेल/ अपघात झाला असेल तर डॉक्टरांच्या औषधाने ज्यात बरे वाटते त्या मृत्यु योगाला आधीभौतीक म्हणतात.
जर औषधाने बरे वाटत नसेल तर परमेश्वराला हात जोडावेत. ( अंधश्रध्दा म्हणले तरी चालेल पण नवस बोलावा आणि गंडांतर टळल्यावर तो नक्की फेडावा ) याला आधीदैवीक अश्या प्रकाराचा मृत्यु योग म्हणतात.
अवांतर ( हिंदी सिनेमातल्या डॉक्टर्स ना हा योग हमखास समजतो. इसे दवाकी नही दुवाकी जरुरत है असे वारंवार ते म्हणतात ) सामान्य माणसाला ते समजत नाही किंवा आपल्यावर पुरोगामी असल्याचा शिक्का बसेल म्हणुन लोक नवस बोलत नाहीत किंवा बोलला तर तो दडवतात.
तिसरा आणि ज्यावर उपाय नाही असा योग आधीअध्यात्मीक आहे. यात परमेश्वर सुध्दा जन्म - मरण या फेर्यातुन काही काळ वाचवु शकत नाही.
जन्म आणि मरण हे कर्माच्या आधीन असतात. हा योग आधीअध्यात्मीक नसताना त्यात डॉक्टर्स किंवा संत यात फेरफार करुन जातकाला काही काळ जीवनदान देऊ शकतात. सप्त चिरंजीव सोडता या भुमीवर कायमचे वास्तव्याला कोणी नाही.
चेतनजी,
प्र्त्येक दिवस बोनस आहे हे समजुन जगावा. दरदिवशी हे जीवन मिळाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावे आणि शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणुन कर्माचे सिध्दांत जाणुन कृती करावी. पुरुषार्थ करावाच पण धर्म आणि मोक्ष या साठी असावा.
हा विषय गहन आहे. मला माहित आहे ते लिहले. काही न्युनता असल्यास क्षमस्व
ज्यांना या ज्योतिष / कर्मसिध्दांत यावर विश्वास / गती नसेल त्यांनी काही प्रतिसाद न दिल्यास आनंद होईल.
धन्यवाद नितीन्चंद्र जी
धन्यवाद नितीन्चंद्र जी
नितीनचंद्रजी माझ्या पत्रिकेत
नितीनचंद्रजी माझ्या पत्रिकेत आपण म्हणता तसं काही नाहीये.
अर्थात १८ मे २००८ रोजी वर्तविले गेलेले माझे मृत्यूभाकित हे त्यादिवशी पत्रिका तपासून नव्हे तर हात तपासून वर्तविले गेले होते.
शुक्र ग्रहाला प्रसन्न
शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्याचे सोपे रोजच्या रोज करता येण्याजोगे उपाय कुणी जाणकार सांगू शकतील का ???>>>>>शुक्रवारी श्रीसुक्त पठण करा.
>>अर्थात १८ मे २००८ रोजी
>>अर्थात १८ मे २००८ रोजी वर्तविले गेलेले माझे मृत्यूभाकित हे त्यादिवशी पत्रिका तपासून नव्हे तर हात तपासून वर्तविले गेले होते. <<
आम्ही पत्रिकेवरुन सांगितल अस समजत होतो. असो. हातावरुन आयुर्मान ढोबळ मानाने सांगतात. महिना वर्ष इतपत सांगता येत नाही.असे हस्तरेषातज्ञच सांगतात.
चेतनजी, आपण हस्त रेषेवर
चेतनजी,
आपण हस्त रेषेवर अवलंबुन भविष्यावर अवलंबुन त्रास करुन घेतलात. माझ्या प्रार्थमीक हस्त रेषेच्या अभ्यासानुसार आपली आयुष्यरेषा मजबुत आहे आणि तुटलेली नाही.
आयुष्यरेषेच्या आतल्या बाजुला असलेली रेषा आपले उत्तम कर्म दाखवते. जरी नंतरच्या काळात आपल्यावर गंडातर आले तरी कमी वयात आपल्या जीवाला धोका नाही.
पत्रीकेनुसार काही काळ आपल्याला आजारपण संभवते पण आयुष्याला घोका संभवत नाही. लग्नी असलेला रवी उत्तम लाईफ एनर्जी दाखवते. तुम्हाला दिर्घायुष्य आहे.
मी विनाकारण तो काळ शोधणार नाही जेव्हा माझ्यामते आजारपण संभवते. विनाकारण नाही त्या गोष्टीचा विचार आजपासुन करणे चुकीचे आहे. चेतन गुगळे म्हणजे आपण बहुदा जैन आहात. आहाराचे नियम तुम्ही लोक खुप चांगले पाळता. जैन समाज व्यसनापासुन दुर असतो. कोलेस्टरोल वाढणार नाही यावर नियंत्रण ठेवा. शरीरात काही मुलतः असलेल्या दोषांमुळे आजार होणार असेल तर योगाभ्यासाने त्याचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.
इमेल ने फोन नंबर पाठवतो. अजुन काही शंका असल्यास विचारा.
Pages