ज्योतिष शास्त्र आहे की थोतांड??

Submitted by मी निलेश on 26 September, 2014 - 15:22

स्वत: च्या विद्वत्तेची आणी पुरोगामीत्वाची टिमकी वाजवणारे लोक स्वत:च्या जीवनात अडचणी आल्या वर
ज्योतिषा कडे धावत जातात पण उघडपणे आम्ही नाही त्यातले हा आव आणतात.

ज्योतिष शास्त्र आहे मानणारे मात्र ज्योतिष हे शास्त्र आहे असे सिद्ध करून दाखवू शकत नाहीत.

ज्योतिष हे नक्की शास्त्र आहे की थोतांड??
जाणकारांनी आपली मते मांडवीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्योतिष वर्तवायच्या प्रयोगातील, साहित्य, कृती, निरीक्षण या पायर्‍यांचा विचार करता शास्त्र आहे असे म्हणू शकतो.
पण निष्कर्ष वा अनुमान याची गॅरंटी नसल्याने ठामपणे शास्त्रच आहे असेही म्हणू शकत नाही ...

तुर्तास, शब्बाखैर !

निलेश या बद्दल तुमचे काय मत आहे?
मंगलयानाच्या धाग्या वर तुम्ही ज्योतिष हे शास्त्रच आहे असा ठाम मत मांडला आहे .
मग हा धागा काढून "ज्योतिष हे नक्की शास्त्र आहे की थोतांड??" हे इतरांना विचारण्यात काय उपयोग?
का तुमच च अजून ठरत नाहीये Biggrin

हे एक गणितावर आधारीत (प्रोबॅबिलिटीज वर) शास्त्र आहे असे माझे वैयक्तिक मत आहे Happy

मी ज्योतिष शास्त्र चा १००% समर्थक आहे ,मी हजारो वेळा शास्त्राच्या सत्यतेचा अनुभव घेतला आहे,पण माझे मत म्हणजे सर्वांचे मत नाही म्हणून हि चर्चा.
इतरांच्या मताला मान देण्याचा उदार पणा माझ्या कडे आहे.

निलेश तुम्ही हजारो वेळा शास्त्राच्या सत्यतेचा अनुभव घेतला असेल तर "ज्योतिष हे नक्की शास्त्र आहे थोतांड नाही " असे धाग्याचे नाव हवे Wink
राच्याकने तुमचे अनुभव वाचायला आवडतील

एक प्रश्न -

देव आणि त्याची उपासना करायचे प्रकार जसे धर्मानुसार बदलतात तसेच ज्योतिष हे देखील धर्मानुसार बदलते का?

अहो डीवि बाई,
त्या लिंकेत युजीसी अ‍ॅप्रूव्ह्ड आहे असं कुठे म्हटलेलं आहे?
महामहोपाध्याय मुरलीमनोहर जोशींनी तो घाट घातला होता, पण ते सक्सेस झालं नाही त्यावेळी. आता या सरकारात करून पहा म्हणावं प्रयत्न.

थोडं अधिक संशोधन करून कोणता अतिरेकी कुठे बाँब पाडणारे, नेक्स्ट इलेक्शनला कोण निवडून येणारे, धागाकर्त्याला उद्या सर्दी होणार का? इ. प्रश्नांची उत्तरं तात्काळ देता येतील असं भविष्यकथन सुरू करावं.

आपण तप:सामर्थ्याने शाप देण्याचंही शास्त्र विकसित करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. पाकीस्तान नकोय? दे शाप. ओबामा ऐकत नाही? दे शाप. लै झक्कास होईल बघा.

ईब्लिस,
ज्योतिष या शास्त्राला त्याच्या काही मर्यादा आहेत आणि त्या निसर्गानेच घालून दिलेल्या आहेत अन्यथा अनर्थ झाला असता.
साधेसेच उदाहरण घेऊया, जर होणारे अपत्य मुलगा आहे की मुलगी हे सोनोग्राफीच्या ऐवजी ज्योतिषीच सांगू लागला तर कित्येक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या असत्या. सारे कायदे थिटे पडले असते.

ऋन्मेऽऽष,
शास्त्राला मर्यादा नसतात.
थापा मारण्याला असतात.
स्त्रीभ्रूणहत्या होतील म्हणून सोनोग्राफीचा शोध लागायचा थांबत नाही, अन हिरोशिमानागासाकी होईल म्हणून अणूऊर्जा वापरात यायची थांबत नाही.

<<<<< ज्योतिष हे थोतांड असतं तर त्यावर पदवी अभ्यासक्रम निघाले नसते.
पदवी अभ्यासक्रम युजीसी प्रमाणित आहेत कां?? >>>>

केवळ UGC प्रमाणित पदवी अभ्यासक्रम आहे हा एखाद्या गोष्टीला शास्त्र आहे असे म्हणण्यासाठी पुरेसे नाही. पण हा मुद्दा 'ज्योतिष शास्त्र आहे' या बाजूचे पारडे जड मात्र करू शकतो.

मी काय म्हणते
दर वेळी नवा आयडी येतो आणि होऊन गेलेल्या वादग्रस्त विषयावरचे धागे काढतो आणि तिच तिच मंडळी नव्याने त्या त्या धाग्यांवर वाद घालतात.
यातुन काय मिळत असावं?:अओ:
संमि यांनी वरती एक लिंक दिली आहे ना त्यावरची चर्चा वाचून निलेश यांना ते शास्त्र कि थोतांड हे ठरवू देत की.
सगळे पुन्हा नव्याने वेळ वाया का घालवताय?

शास्त्राला मर्यादा नसतात यापेक्षा माणसं शास्त्र कशी वापरतात यांवर त्याच्या
मर्यादा अवलंबून असतात.

रीया,
काही वाद हे न संपणारे असतात, खास करून जे आस्तिकत्व-नास्तिकत्व या सदराअंतर्गत मोडतात.
म्हणून ते घालायचेच नाहीत असे होत नाही.

अवांतर - वेळ वाया घालवणे म्हणजे ती गोष्ट करणे जी आपल्याला करण्यात रस नसणे.
यावर मी वेगळा धागा काढू शकतो Happy

केवळ UGC प्रमाणित पदवी अभ्यासक्रम आहे हा एखाद्या गोष्टीला शास्त्र आहे असे म्हणण्यासाठी पुरेसे नाही.
>>>>>>

सहमत आहे,
शेवटी ती मान्यता देणारे वा नाकारनारेही मनुष्यच, ते ही श्रद्ध अंधश्रद्ध असायची शक्यता असतेच.

नोट - इथे ज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा असे मला म्हणायचे नाही. ते अजून चर्चेने सिद्ध व्हायचे आहे.

चालू द्या मग Happy

तसाही माझा प्रश्न नॉन डुआय साठी होता Happy
तुमच्याकडे अनेक डु आय आहेत म्हणजेच बराच वेळ आहे आणि तो वाया घालवण्यासाठीच आहे यात वाद नाही.

डी आणि इब्लिसदादा, तुम्ही इथे वेळ वाया घालवू नये ही माझी मनापासोन इच्छा आहे Happy जबरदस्ती नाहीच Happy
हे मा शे पो Happy

Pages