आता कशाला शिजायची बात- मंजू - पुर्णान्न दहीवडे चाट

Submitted by मंजूताई on 7 September, 2014 - 22:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवरणासाठी :- साळी/धान्याच्या लाह्या दोन वाट्या, आवडीनुसार आलं, मिरची , मीठ व ताक भिजवण्यासाठी
भरण्यासाठी :- सफरचंद बारीक चिरलेलं, डाळिंबाचे दाणे, अंकुरित मूग, स्वीट कॉर्न, चाट मसाला, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबू
दही :- दही मीठ, साखर, चाट मसाला, चिंचेचा सॉस, पुदिण्याची चटणी
सजावटीसाठी :- पुदिना व कोथंबीरीची पाने, लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

पाच मि. लाह्या ताकात भिजवून आल, मिरची मीठ टाकून वाटून घ्याव. सारणाचं साहित्य एकत्र करुन घ्यावे. लाह्यांची पारी करून त्यात सारण भरुन घ्यावे व पाच मि फ्रीजमध्ये ठेवावे. दही फेटून त्यात मीठ साखर टाकावे.
भरलेले वडे दोन भागात कापून एका ताटलीत ठेवावे त्यावर दही, चाट मसाला, चिंचेचा सॉस, पुदिन्याची चटणी, लाल तिखट टाकावे. कोथंबीर व पुदिन्याच्या पानांनी सजवावे

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

कांदा, लसूण न वापरायचा ठरवला होता पण सारणात लाल मिरची, लसूण चटणी घातली छान चव येते तसेच वरुन कांदाही टाकू शकतो. सारणात आपआपल्या श्रेणीनुसार ( < तीन > ) प्रमाणे बदल करु शकता. लाह्यांच पीठ करुन ते ताकात भिजवू शकता.
पाकृ केली, फोटो काढला व वडे गट्टम केले. नंतर परत एकदा नियम वाचले आणि लक्षात आलं की शेव चालणार नाही. संयोजकांना विनंती फोटोतल्या 'शेवे'कडे दुर्लक्ष करावे.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages