आता कशाला शिजायची बात - प्रभा- अंजीर बर्फी [खारीक खोबरे घालुन]

Submitted by प्रभा on 1 September, 2014 - 12:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंजीर, खजुर, डेसिकेटेड कोकोनट, खारीक पावडर, मिल्क पावडर, ड्रायफ्रुट.

क्रमवार पाककृती: 

प्रथम ४-५ अंजीर व ३-४ खजुर अर्धी वाटी दुधात २-३ तास भिजवुन ठेवलेत. नंतर दुधातुन काढुन घेतले व १५-२० मिनिटांनी मिक्सर मधे बारीक केले..त्यात थोड डेसिकेटेड कोकोनट व खारीक पावडर घालुन परत मिक्सर मधे बारीक केल.. नंतर थाळीमधे ते मिश्रण काढुन त्यात परत खा. पा. व खोबर घालुन व्यवस्थित गोळा बनवुन घेतला. त्यात मिल्क पावडर, ड्राय फ्रुट भरड घालुन नीट गोळा करुन घेतला. त्याचे छोटे छोटे गोळे करुन हातावर त्याला अंजीराचा आकार दिला. मधे बदाम ठेवला..
अंजीर बर्फी तयार

वाढणी/प्रमाण: 
५-६
अधिक टिपा: 

न शिजवता काय प्रसाद बनवता येइल याचा विचार करता करताच हा प्रसाद सुचला

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

धन्यवाद. मंजु , आरती. गोपालकाला बघितलास न. छानच वाटतात हे प्रसाद. . मला करायलाहि आवडत..

धन्यवाद. मंजु , आरती. गोपालकाला बघितलास न. छानच वाटतात हे प्रसाद. . मला करायलाहि आवडत..

धन्यवाद. मंजु , आरती. गोपालकाला बघितलास न. छानच वाटतात हे प्रसाद. . मला करायलाहि आवडत..

छान

मस्त.. एकदा फोटो टाकल्यावर परत मूळ पाककृती मधे तो टाकता येतो. त्यासाठी त्याचे संपादन करायचे आणि
आपल्याला हव्या त्या ठिकाणी ती लिंक पेस्ट करायची. कधी कधी प्रतिसाद वाढले तर दुसर्‍या पानावर हा फोटो दिसणार नाही. पाककृतीतच असला तर शेवटच्या पानावरही दिसतो.

धन्यवाद सर्वांना. दिनेशदा मला ते फोटोच तंत्र अजुन नीट जमलेल नाही. पण मी प्रयत्न करते. हे क्षेत्र आमच्यासाठी नविनच. आणि साठीनंतर यात शिरले. पण नक्की करुन बघेल. धन्यवाद. मार्ग सुचविल्याबद्दल.

धन्यवाद मनीमोहोर. सोप्प आहे. भिलवलेला बदाम सोलुन मधुन मोकळा करायचा. ते दोन्ही भाग खालुन थोडे कट करुन गोलाकार आकार द्यायचा. अंजिराचा छोटा गोळा हाताने दाबायचा व मधे बदाम ठेउन प्रेस करायच. .नक्की करुन पहा. साखर नसल्यामुळे सर्वांनाच चालत.अंजिर बर्फी अंजिराच्याच आकारात.

छान!