घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:43

जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.

चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.

गणपती बाप्पा मोरया !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमचा बाप्पा ! गेली ७-८ वर्षे आम्ही ही पन्चधातूची मूर्ती पुजतो.पुजेसाठी जी समोर लहान मूर्ती आहे तिची प्राण प्रतिष्ठा व तिच्यावरच विसर्जनाचा विधी करतो. मग दोन्ही बाप्पा (लहान व मोठा) पुढील वर्षापर्यत बॉक्समध्ये रहातात. असा हा आमचा इको-फ्रे.न्डली बाप्पा !

IMG_20140829_130734.jpgIMG_20140829_130658.jpg

मी मोदक मोजले अगदी २१ मोदक मस्त बसले त्या चांदीच्या केळीच्या पानात.
बप्पांची पूजा झाली की वेगळेच रूप येते.

चैतन्य, मस्तच झालीये मूर्ती.

सगळेच बाप्पा आणि सजावटी सुरेखच आहेत.

आर्च यंदा सुबक मोदकांचे ताट दिसत नाहीये. >>> +१

ही आमची सजावट

हा बाप्पा (पुजेच्या आधीचा)

पुजेनंतर मखरात स्थानापन्न झालेले बाप्पा

इको फ्रेंडली बाप्पाची इको फ्रेंडली आरासच असावी यावर भर असतो आमचा. त्यामुळे सजावटीसाठी हुकमी थर्माकोल बाद ठरतो आणि मग नवनवीन कल्पना शोधायला लागतात. मायबोलीवरच मॉड्युलर ओरीगामीची ओळख झाली. तेंव्हापासूनच यातून मखर करता येइल का याचा विचार चालू होता यंदा तो विचार अंमलात आणलाय. अंदाजे साडेतीन हजार कागदी तुकड्यांपासून ही सगळी सजावट झालीये.

सगळ्यांचे बाप्पा आणि डेकोरेशन खूपच छान आहे.
माधव, खूपच वेगळी सजावट आहे. तुमची आयडीया भारी आहे. खूप आवडली.
अंदाजे साडेतीन हजार कागदी तुकड्यांपासून ही सगळी सजावट झालीये. <<< __/\__
माधव, प्लीज वेगळा धागा काढून ह्या सजावटीबद्दल सविस्तर लिहा. इथे लिहिल तर नंतर शोधायला प्रॉब्लेम होईल.

बाप्पाच डेकोरेशन करण्या अगोदर आम्हाला माटीच डेकोरेशन कराव लागत. त्याचा फोटो देत आहे.
बाप्पाचा आणि डेकोरेशनचा फोटो आज किंवा उद्या देईन.
P28-08-14_15.28.jpg

Pages