नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!
१ हेच का ते अच्छे दिन ?
२ अमीर खानच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा पण बुध नीचेचा असे असल्याने तो असे narcissistic वर्तन करत असेल का?
३ Homeopathy मधल्या Lycopodium किंवा Pulsetilla औषध अशा केसेस मध्ये परिणामकारक असेल का?
४ मांसाहारी व्यक्तीमध्ये सात्विक गुणापेक्षा तामस गुणाचे संवर्धन जास्त असल्याने असे होत असेल का?
५ अरविंद केजरीवालांसारखा स्वच्छ माणून पंप्र झाल्यावर असला आचरटपणा थांबेल का?
६ व्यवसायिक भारतीय सिनेमात कॉस्ट्यूम डिझायनिंग हा विषय गभीरतेने घ्यायला कधी सुरुवात होणार? इथे तर मुदलात कॉस्ट्यूमचाच पत्ता नाही.
शब्दखुणात होमिओपथी
शब्दखुणात होमिओपथी दिल्याबद्दल निषेध, पोस्टरमधील कपडे हे होमिपदिच्या औषधाच्या पोटन्सीप्रमाणे आहेत काय?
आत्ताच काही निष्कर्ष काढणे
आत्ताच काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे , सिनेमा बघितल्यावरच काय ते कळेल. बावळट आहे अमीरखान. असले काहीतरी करण्यापेक्षा जर मनापासून अश्या लोकाम्ची काळजी असेल, तर जाहिराती न करता संडास बांधून दिले तर जास्त फायदा होइल.>>>> पण तो कुठे म्हणाला मला मदत करायचीये म्हणून?
निव्वळ थिल्लरपणा करून
निव्वळ थिल्लरपणा करून प्रसिद्धी करायची . अमीर खानचा मुलगा त्याला त्या पोस्टर बद्दल प्रश्न विचारात नसेल का ? . शौचालयाची आवश्यकता दर्शवणार्या विद्या बालन च्या जाहिराती सध्या TV वर झळकताहेत . सोबर , पटतील अश्या योग्य तर्हेने त्यात शौचालयाची आवश्यकता सांगितली आहे
कुठेतरी वाचलं की आमीर खान पण
कुठेतरी वाचलं की आमीर खान पण बसलाच होता. पण रेडिओवर राष्ट्रगीत सुरू झालं म्हणून उभा राहिला.
कुणी काही म्हणा, पण त्याला जे
कुणी काही म्हणा, पण त्याला जे साधायचं होतं त्याने ते साधलंय. आठवा, त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या आधी असं काहीतरी पिल्लू सोडून तो जाम पब्लिसिटी मिळवतो. जे त्याच्या पोस्टरला नावे ठेवताहेत, तेच आधी हा सिनेमा पहायला जातील. जसं सेन्सॉर बोर्डवाले आधी सिनेमातील सगळी दृश्ये डोळे भरून पाहून घेतात आणि मग ठरवतात की ही इतरांना पाहण्यासाठी योग्य नाहीत म्हणून.
एलियन मूवी म्हणजे बालिशच
एलियन मूवी म्हणजे बालिशच असणार.
पण एक शंका, एलियन लोकांच्या हाताला पण रग लागत असेल का ?
विकु
विकु
त्याच्या हातातली वस्तू
त्याच्या हातातली वस्तू ट्रान्झिस्टर नसून टू इन वन आहे. त्यात रेडिओ व कॅसेटप्लेयर दोन्ही आहेत.
तेव्हा प्लीज तितकी दुरुस्ती करून घ्या.
धन्यवाद!
परग्रह्वासी वगैरे ष्टोरी आणि
परग्रह्वासी वगैरे ष्टोरी आणि नाव पिके म्हणजे मला केविन स्पेसीच्या के पॅक्स वरुन उचलल्याची शंका येते.
तुकाचा अभंग बदलू आता...लंगोटी
तुकाचा अभंग बदलू आता...लंगोटी ऐवजी रेडीओ..
आणि आमिरच्या पोस्टरला इरोध करणारे नाठाळ ... हाण काठी....
चावरे अहो डास काय म्हणताय टेंशन घेत जाऊ नका शक्यतो.
अगं बाई ! इतक्या पोस्टी
अगं बाई !
इतक्या पोस्टी झाल्या तरी ट्रान्झिस्टर जिथल्या तिथे हो !
कपाळाचा धक्का .. आणि कपाळाची
कपाळाचा धक्का .. आणि कपाळाची पाश्चात्य संस्कृती ..
कामसूत्र चित्रपट मी पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा खरा मला सुखद धक्का बसलेला. सो कॉलड पाश्चात्य संस्कृतीं म्हणत जे अवडंबर आपण डोक्यावर चढवून ठेवलेय ते लोक्स खरे तर आपलेच भ्रष्ट अनुकरण करत आहेत हे मला कामसूत्र बघून समजले होते.
आणि आता दुर्दैवाने आपण त्या भ्रष्ट अनुकरणाचे अंधानुकरन करत आहोत.
घागरा आणि कोट मध्ये आमीर खान दाखवणे यामागे स्त्री-पुरुष समानता असो वा नसो, पण व्यावसायिक चित्रपटांमधील प्रमुख पुरुष कलाकारांनीही देहप्रदर्शन करने यातून तरी नक्कीच दिसू लागलीय.
सलमान खानने अंगप्रदर्शन करणे आणि आमीर खानने अंगप्रदर्शन करणे यात तेवढाच फरक आहे जेवढा सनी लिओनने करने आणि माधुरी दिक्षितने करने यात आहे. सो जस्ट वेट अॅण्ड वॉच !
तळटीप - वरील पोस्टमध्ये एका वाक्यात उपहास / उपरोध आहे.
अर्र्र्र्र्र्र्र्र सलमान खान
अर्र्र्र्र्र्र्र्र सलमान खान ची तुलना डायरेक्ट सन्नी लिओन सोबत...
आता काही खर नाही तुमचे
एलियन लोकांच्या हाताला पण रग
एलियन लोकांच्या हाताला पण रग लागत असेल का ?>> रग हाताला लागला असता तर अंगाभोवती ओढून घेतला असता ना? ती बॉडी मॉर्फ केल्यावाणी वाट्ते. पण कान ओरिजिनल आहेत. वय काही लपत नाही. चांगले दुसरे एलिअन पट बघा लोक्स. मेन इन ब्लॅक सीरीज/ फिफ्थ एलिमेंट मध्ये ब्रूस विलीस आहे. त्याची बावडी पण बरी दिसते ह्याच्यापरीस.
आता काही खर नाही तुमचे >>
आता काही खर नाही तुमचे >> त्यासाठीच तळटीप आहे ना
मी आग लावण्याचा प्रयत्न करतोय
मी आग लावण्याचा प्रयत्न करतोय
उदयन, काही हरकत नाही. पण इथे
उदयन, काही हरकत नाही. पण इथे एक लक्षात घे. सनी लिओनसारखे अंगप्रदर्शन हि कॉम्प्लिमेंट आहे. शी इझ प्रोफेशनल डूड ! तर त्या अंगाने (द्रुष्टीने) विचार कर
मी दुष्टाने विचार करतोय
मी दुष्टाने विचार करतोय
अमा , रग म्हणजे ब्लँकेट हे
अमा , रग म्हणजे ब्लँकेट हे नव्हतं आलं डोक्यात
वय काही लपत
वय काही लपत नाही.
>>>>>>
सिनेमात आमीर खानच्या कॅरेक्टरचे वय काय दाखवलेय कोणाला काही अंदाज / वा ठोस माहिती ?
एक शंका आहे - इथे आमिरऐवजी
एक शंका आहे -
इथे आमिरऐवजी समजा आलिया असती तर पोष्टी अशाच आल्या असल्या काय?
काल बातम्यात दाखवले. अमिरने
काल बातम्यात दाखवले. अमिरने सान्गीतले की या पुढे जे पोस्टर येईल, त्यात ट्रान्झीस्टर पण नसेल झाकायला.ऑ!
काल बातम्यात दाखवले. अमिरने
काल बातम्यात दाखवले. अमिरने सान्गीतले की या पुढे जे पोस्टर येईल, त्यात ट्रान्झीस्टर पण नसेल झाकायला.ऑ!
>>>>>>
त्यात फ्रंट व्यू च्या जागी मग टॉप व्यू असेल ................ छत्री घेऊन
इथे आमिरऐवजी समजा आलिया असती
इथे आमिरऐवजी समजा आलिया असती तर पोष्टी अशाच आल्या असल्या काय? >>
जसं आमीरच्या पोष्टरला कपडे घातले गेले आहेत तसंच आलियाच्या मोठ्या बहिणीच्या मासिकावरच्या फोटोलाही कपडे घातले गेले आहेत. फरक इतकाच की आमीरच्या घरावर अजून मोर्चा गेलेला नाही. अशाच लोकांमुळे (अजून तरी) संस्कृती टिकून आहे. नाहीतर काय झाल असतं याची कल्पनाच करवत नाही.
कुणी काही म्हणा, पण त्याला जे
कुणी काही म्हणा, पण त्याला जे साधायचं होतं त्याने ते साधलंय. आठवा, त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या आधी असं काहीतरी पिल्लू सोडून तो जाम पब्लिसिटी मिळवतो. जे त्याच्या पोस्टरला नावे ठेवताहेत, तेच आधी हा सिनेमा पहायला जातील. \
+१०००००००००० मी हेच लिहायला आलेले.
एलियन ची ष्टोरी म्हणजे
एलियन ची ष्टोरी म्हणजे मुलांसाठी असणार सिनेमा. प्लस आई बाबा. पण त्या पोष्टरमुळे कुणी मुलांना दाखवायचं धाडस करणार नाही. म्हणजे पब्लिसिटी वायाच जाणार..
एलियन ची ष्टोरी म्हणजे
एलियन ची ष्टोरी म्हणजे मुलांसाठी असणार सिनेमा. प्लस आई बाबा. पण त्या पोष्टरमुळे कुणी मुलांना दाखवायचं धाडस करणार नाही. म्हणजे पब्लिसिटी वायाच जाणार..
अहो हे पहिले पोस्टर आहे.. त्या पोस्टरने त्याचे काम केले आहे. आता पुढची पोस्टरे अशी नसणार. ती नोर्मल असणार पण तरी उत्सुकता तर वाढलीय त्यामुळे लोक चित्रपटाची वाट पाहणार. आणि पाहायला जाणार. आमिर हुशार आहे, त्याच्याएवढी धंद्याची गणिते शारुकलाही जमत नाहीत.
सिनेमा यायच्या आधीच एवढी
सिनेमा यायच्या आधीच एवढी चर्चा, तर्क वितर्क...
सिनेमाची पी आर एजन्सी हुशार आणि एफिशियन्ट आहे एवढेच यावरून सिद्ध होते.
हे मान्य. पी के नावाचा सिनेमा
हे मान्य.
पी के नावाचा सिनेमा येतोय हे सर्वांना समजलं.
आमिर हुशार आहे, त्याच्याएवढी
आमिर हुशार आहे, त्याच्याएवढी धंद्याची गणिते शारुकलाही जमत नाहीत.
>>>>>
शाहरुख खान का आठवावा मध्येच ?
याचाच अर्थ शाहरुख खान हाच आजच्या तारखेला नंबर वन सुपर्रस्टार आहे हे यावरून सिद्ध होते.
Pages