कॉर्न पास्ता

Submitted by स्नू on 30 July, 2014 - 04:02

लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मॅक्रोनि पास्ता 4 मूठ (उकडलेला)
बटर / साजूक तूप
स्वीट कॉर्न दाणे 1 वाटी (वाफवलेले)
टोमॅटो प्यूरी 2 टेबलस्पून
मलई 2 टेबलस्पून
ओरेगानो
चिली फ्लेक्स
मीठ

क्रमवार पाककृती:
१. एक चमचा साजूक तूप कढईत घालावे.
२. तूप गरम होताच वाफवलेले स्वीट कॉर्न दाणे आणि टोमॅटो प्यूरी टाकावी.
३. मीठ, ओरेगानो व चिली फ्लेक्स चवीनुसार टाकावेत. मीठ कमीच असू द्यावे कारण मॅक्रोनि पास्ता उकडतांना मीठ टाकावे लागते.
४. साधारण २ मिनिटे सर्व मिश्रण परतल्यावर उकडलेला पास्ता ओतावा.
५. ताजी मलई मिश्रणात ओतावी व पास्त्याला सगळा मसाला व्यवस्थित लागेल असे पहावे.
६. साधारण २ मिनिटे कमी गॅसवर मिश्रण झाकून ठेवावे.
७. पास्ता ओलसर हवा असल्यास मलई सोबत थोडे दूध टाकता येईल.

वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी

20140730_082015.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा, ओके.
सृष्टी, मंजुडी थॅंक्स
देसी स्टाइल म्हणजे आपलं तुपाची फोडणी वगैरे घालून. इटालियन पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. Happy

मंजुडी, मी नेहमी जिरं आणि कांद्याची फोडणी देते एकदा तर कढीपत्ता पण टाकला होता. आज नाही टाकला. नाव बदललं आहे. Happy