वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok

अरे पोळ्या दिसत नाहीत मेनूत ? मी आणू शकतो. कुठे ऑर्डर करता येतील, चांगल्या कुठे मिळतात?
आमच्या जवळ श्री च्या बर्‍या मिळतात पण चांगल्या नाही.

हो, आणतो. कोणी चांगल्या पोळ्या देणारे आहेत का आसपास ? मी आता ऑर्डर देऊन येता येता pickup करेन.

आहेत ना.. मस्त पोळ्या मिळतात (काय मै?)... ७३२-४७६-४५३८ ला फोन करा..

योगिनीबेनने पाठवले सांगा. किती पाहिजेत आणि कधी ते आत्ताच सांगा आणि येताना घेऊन या.

प्लेन्सबरो मधेच आहेत..

सुप्र ! आताच लालूची पाठवणी केली, त्यामुळे अधिकृत रित्या एवे ए ठि समाप्त झाले.

* वर्‍हाड जेवणावर आणि एकूण व्यवस्थेवर वरकरणी तरी समाधानी दिसलं. त्यांनाच थोडी कामं, जसे जेवण गरम करणे, वाढणे, खुर्च्या हलवणे, फोटो काढणे, पाहुण्याचंं आदरातिथ्य, २-३ मेंब्रांची गाडीने ने - आण इ. किरकोळ काम बघावं लागलं, पण त्यांची तक्रार दिसली नाही Happy
* जावयांनी जो उखाणा घेतला त्या बेसिस वर त्यांना टिपापाची ऑनररी मेंबरशिप विथ " टिपापा अप्रूव्हड" ष्ट्याम्प मिळणार.
* दी आणि भगवती या नविन मेंबर्स कसलीही इजा न होता/ टाके वगैरे न पडता इथून सुखरूप बाहेर पडल्या.
* जीएस आणि बुवांनी जेवण पॅक करून नेण्यावरून एकमेकाला टॅकल केले पण कमीत कमी इजा रिपोर्टेड
* विकुंनी आंब्याचा शिरा खरोखरच आणून त्या एका वादाला पूर्णविराम दिला.
* स्वित्झर्लंड पर्यटकांना खूषखबर ! टिटलिस च्या पायथ्याशी आता खास शेव भाजी मिळणार !
* "१०० इयर्स ऑफ बॉलिवुड" च्या ऑडिशन्स च्या टेप च्या अनकट व्हर्जन साठी देसयांना क्याश ऑफर्स
* आघाडीच्या काकवांच्या उपस्थितीअभावी कम्बर्ड्डे साजरा करायचा राहिला Sad

जावयांचा उखाणा सिक्रेटली पाठवून द्या.
दी आणि भगवती यांनी पुढच्या गटगची लापि आत्तापासूनच वाजवली तर तुम्ही उपस्थित मंडळी 'बरी' वागलात असं वाटेल. Wink
जीएस कन्या बाबांवर गेली आहे असं वाटलं.

बाकी सगळा उखाणा नाही पाठवत पण "प्राची" म्हणेल तीच माझ्यासाठी पूर्व दिशा हे त्याचं जिस्ट होतं Happy अजून काही सांगायची जरुरी नाही ना ! Happy

मजा केलेली दिसतेय. बर्‍याच दिवसांनी गटग हुकलं Sad

यंदा आपल्या त्या ह्या आल्या होत्या म्हणे. त्या नक्की कोण गावच्या हे विचारलं का तुम्ही त्यांना? Wink

फोटो भारी. पाठवल्याबद्दल पाठवणार्‍यांना धन्यवाद Happy

Pages