अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पूर्वि भ ज प सोडुन असे कोणी केले आहे काय? दुसरर्‍या पार्टीचे आमदार फ़ोडुन सरकार स्थापन? केले असेल तर लिंक द्या.

आणि जर कोणी केले असेल आधी तर यांनी केलेल चालेल. असा नियम आहे म्हणे.

<<ये मुष्किलही नही, नामुमकीन हैं ! अनहोनी ! >>
बघूया. काही सांगता येत नाही.

स्पार्टाकस,
वाड्राचं उत्तर नाही दिलंत?

यूरो,
डिफ्लेक्शनचा काहीतरी नियम असतो म्हणे. सविस्तर माहीत नाही. पण ह्या कारणामुळे काँगी आमदार थेट भाजपात जाऊ शकत नाहीत. म्हणून ते शिरोमणी अकाली दलात जाणार आणि मग अकाली दल भाजपाला समर्थन देणार असं काहीतरी चाललंय.

भाजपाला आधी ३१ जागा मिळाल्या तेव्हा 'हमें बहुमत नहीं है, हम जोडतोड की सरकार नहीं बनायेंगे' असं म्ह्णत त्यांनी टाळलं होतं. आता २८ जागा आहेत. आता जर सरकार बनवलं तर तोंडघशी पडणार आहेत. पण आपचं सरकार बनू न देणं, ह्यासाठी त्यांना करावं लागतंय असं दिसतं. कारण निवडणूका झाल्या तर बहुमत आपला मिळणार हे त्यांनाही माहीत आहे. ह्यावेळी आप पंजाबमधून लोक बोलवून बसवेल इव्हीएम मशिन्सचं रक्षण करायला Lol

त्यांनी सरकार बनवलं तरी मुख्य विरोधी पक्ष आप असणार आहे. त्यामुळे तेही त्यांना कठीण जाणार आहे. आड निवडतात की विहीर ते बघायचं.

<<भाजप हा पक्षच असा आहे की त्यांना स्पर्श झाला की सगळी पापं धुतली जातात. तिरुपतीला जायची गरज पडत नाही.>>
आब्र +१
राव इंद्रजीत सिंग ह्यांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात यावी ह्यासाठी भाजपाच्या किरीट सोमैय्यांनी पत्र लिहिलं होतं. पण आता ते पवित्र झालेत.

Inderjit singh.jpg

>>डिफ्लेक्शनचा >>

अर्रर्र च्यक् च्यक्. बॅड इंन्ग्लिस. जस्ट लाईक आसुतोस Proud

त्याला डिफेक्शन म्हणतात.

Defection =
Withdrawing support or help despite allegiance or responsibility (and switching your support to another)

Deflection =
1.The property of being bent or deflected
2. A turning aside (of your course, attention or concern)

मिर्ची ताई अन्टी डिफ़ेक्शन बिल बद्द्ल म्हणत नाही आहे मी.

दुसर्‍या पक्षाचे आमदार फ़ोडुन सरकार बनवणे नितीमत्तेला धरुन नाही नव्हे का? तरीपण असा आरोप केलाच कोणी तर दडपुन लिंक द्यायच्या आणि म्हणायचे यांच चाललं मग आम्हालच का म्हणता?

तोच तर लोचा आहे. आप इज जस्ट लाईक एनी अदर पोलिटिकल पार्टी. तसलेच लोक सगळीकडे. आणि म्हणे हे प्रामाणिक Proud

<<दुसर्‍या पक्षाचे आमदार फ़ोडुन सरकार बनवणे नितीमत्तेला धरुन नाही नव्हे का? तरीपण असा आरोप केलाच कोणी तर दडपुन लिंक द्यायच्या आणि म्हणायचे यांच चाललं मग आम्हालच का म्हणता?>>

हे काही कळलं नाही. आपने कोणाचे आमदार फोडले? Uhoh

विचारवंत,
स्पेलिंग मिष्टेक. धन्यवाद.

कारण निवडणूका झाल्या तर बहुमत आपला मिळणार हे त्यांनाही माहीत आहे>> हे शक्य वाटत नाही. ज्या लोकांनी आपला मत दिल होते ती आता त्यांना शिव्या घालत आहेत. दिल्लीत आप नसलेलच बर आहे. नाहितर यांची धरणे, फालतुपणा. ट्रफिक जाम. आम्हाला घरी जायला उशीर. आप म्हणजे दुसरे कम्युनिस्ट आहेत.

मुंबैत चर्चगेट स्टेशनवर त्यांनी केलेली मोडतोड विसरलात? पन्नासेक मेटलडिटेक्टर मोडले ह्या लोकांनी! आणि "सरकारसारखी मेटल डिटेक्टर्सची सुद्धा बेस नीट नव्हती" असली मस्तवाल उत्तरे दिली. क्षणभर वाटले समाजवादी पार्टीचे मेंबर आहेत की काय. तीच गुंडगिरी.

Kejriwal in Mumbai: AAP workers break metal detectors at Churchgate

<<दिल्लीत आप नसलेलच बर आहे. नाहितर यांची धरणे, फालतुपणा. ट्रफिक जाम. >>

Lol खरंय तुमचं. काय फाल्तुपणा आहे ना धरणे म्हणजे.
हे अस्सं व्हायला पाहिजे. ह्याची स्वय झाली आहे आता आम्हाला. थ्रिल वाटतं, हो ना?
BJP leader shot dead in Greater Noida, mob set ablaze vehicles

सी एम असताना काम सोडुन धरणे द्यायचे. अशा कारणासाठी की जे केंद्र सरकार कधीच एकणार नाही. नंतर थातुरमातुर कारण काढुन राजीनामा द्यायचा. राजीनामा देताना का नाही विचारले लोकांना. आणि उगाच कुठल्याही लिंका देऊ नका.

आणि उठसूठ लोकांना समस आणि काय काय च्या माध्यमातून विचारायचे. च्यामारी लोकांनी एकदा मतदान करुन दिल होत ना रे बाबा तुला निवडून. परत परत काय ह.पा. जनमत विचारतोस?

मंदारडी, आपण दिल्लीमध्ये राहता का? राहत असाल तर तिथल्या जनतेचा एकंदरीत सध्या मूड काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

सी एम असताना काम सोडुन धरणे द्यायचे. अशा कारणासाठी की जे केंद्र सरकार कधीच एकणार नाही. नंतर थातुरमातुर कारण काढुन राजीनामा द्यायचा. राजीनामा देताना का नाही विचारले लोकांना.>>>>> अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीच्या थिंक टँकला विधानसभा निवडणुकीत आपण सरकार बनवण्यापर्यंत पोहचु अस वाटले नव्हते. पण जनतेने त्याना ती संधी दिली आणि इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ते स्थापन करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता निवडणुकीपुर्वी दिलेली वचनांची पुर्तता कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला होता. आणि उत्तर सोप्पं होत ते म्हणजे काहीही करून लवकरात लवकर राजीनामा देणे आणि त्याचे खापर दुसर्‍यावर फोडुन जनतेची सहानभुती मिळवणे. जे त्यांनी केल पण वेळ आणि मुद्दा चुकला जनतेची नाराजी जाणवु लागल्यावर त्यांना त्याची उपरती झाली.

आता भाजपा आमचे आमदार फोडत आहे असा गळा काढत आहेत. निवडणुक तिकिट वाटप करताना झोपले होते का? आआप हा स्वच्छ चारित्र्य असणार्‍या लोकांचा पक्ष आहे ना? मग आपले आमदार फुटणार नाहीत या बद्दल शंका का घेता? नाहीतरी एका आमदाराने बहुतेक बिन्नी आडनाव होते त्याचे त्याने निवडणुकीनंतर लगेचच मंत्रीपद न दिल्यामुळे शालजोडीतली दिलीच होती, आणि आआप म्हणजे काहीही वेगळे नाही हे दाखवुन दिलेच होते म्हणा.

मंदार देशपांडे, त्या मिर्चीताई आहेत आआपच्या खंदया समर्थक त्यामुळे लिंका देणे थांबवु शकणार नाहीत. वरती त्या काँग्रेस आणि भाजपाचे लग्न लावुन मोकळ्या झालेल्या आहेत, अजुन काय काय करतील माहित नाही. त्यांना आमच्या कडुन पुर्ण मुभा आहे पण तुम्हाला जो त्रास सहन करावा लागतोय त्याबद्दल क्षमस्व.

मी नोएडाला असतो. विधानसभेच्या वेळी मी पण आपच्या बाजुने होतो. लोकांनी आपला मोठ्या अपेक्षेने मत दिली. पण सध्यातरी मला पब्लिक आप वर चिडले आहे असे दिसते. लोकसभेच्या वेळी आपने काँग्रेसला सोडुन भाजपाला टारगेट केले. त्यावरुन लोकांना त्यांच्या हेतुबद्दल शंका आली. त्यामुळे मध्यमवर्ग ज्याने आपला मतदान केले होते विधानसभेला तो आप पासुन दुर गेला. सध्या पब्लिक confused आहे. निवडणुक झाली तर मतदान कमी होइल. त्याचा आपला / भा़जपाला तोटाच होइल. त्यापेक्षा उशीरा निवडणुका झाल्या आणि केंद्रात भाजपाने खुपच घाण केली तरच आपला फायदा होइल असे मला वाटते.
आपचे काही आमदार (उदा. राखी बिड्ला) खुपच माजोरडे आहेत. आपने जर अशा लोकांना दुर ठेवले तर त्यांना अजुन एक संधी मिळु शकेल.

धन्यवाद.

पण सध्यातरी मला पब्लिक आप वर चिडले आहे असे दिसते>> हे नक्की कशामुळे घडत असावे?

विचारवंतांचा एकोळी दंगा चालू झाला...

<<आआप ने नाही हो फ़ोडले आमदार. पण समजा फ़ोडले असते तर हाच डिफ़ेन्स असता की नाही?>>

नाही. आपने सत्ता बनवण्यासाठी २० कोटी रूपये देऊन भ्रष्टाचाराचे किंवा गुंडागर्दीचे आरोप असणार्‍यांना फोडून आपल्या बाजूला घेतलं असतं तर मी त्यांना डिफेण्ड केलं नसतं.

<<त्यापेक्षा उशीरा निवडणुका झाल्या आणि केंद्रात भाजपाने खुपच घाण केली तरच आपला फायदा होइल असे मला वाटते.>>

अहो महाराज, मग भाजपा निवडणूका का होऊ देत नाहीये ????????
आपने पार राष्ट्रपतींना जाऊन निवडणूका घ्या म्हणून सांगितलंय. घेऊन टाकायच्या ना मग एकदाच्या निवडणूका. आपवाले हरतील, त्यांची चांगलीच जिरेल, आणि गप बसतील की जाऊन कोपर्‍यात. कित्ती सोप्पं आहे !

हे नक्की कशामुळे घडत असावे?>> Mainly due to mess in water and power subsidy. He told 700 ltr free water per day for household having meter. But is Delhi lot of houses are without meters and there was no plan or interest shown by AAP to install that. Secondly power bills cut of 50% was not provided and AAP messed up big here. They asked people not to pay bills and told them they will waive the same if they came to power. But failed very badly on this. They declared the waiver for the people who not paid the bills when they formed govt and angered the people who paid the bills on time. Later power companies did not agreed to the waiver and people who did not paid the bills have to pay old bills with penalty. People now understand that AAP has no plans to execute their poll promises. Sorry for reply in English.

<<आपचे काही आमदार (उदा. राखी बिड्ला) खुपच माजोरडे आहेत.>>

खरं असावं तुमचं बहुतेक.
पण मग ४९ दिवस त्या सत्तेत असतानाचा माजोरडेपणा पाहूनही पाच लाख तेवीस हजार अठ्ठावन्न (५,२३,०५८) लोकांनी मत का बरं दिलं असेल त्यांना ??

Statistics is like a XXXXXX. What is revealed is suggestive, but what is concealed is vital.
Wink

मंदारडी,
तुम्ही जे लिहिलंय त्यासाठी काही बातम्यांच्या लिंका आहेत का? (नितीसेण्ट्रलच्या नको !)
प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तपासणं अशक्य आहे.त्यामुळे मला लिंका चालतात.

मिर्ची माझा प्रतिसाद परत वाचा. <<निवडणुक झाली तर मतदान कमी होइल. त्याचा आपला / भा़जपाला तोटाच होइल>> म्हणुन भाजपा निवडणुक घेत नाही.
आपला विरोध करणारे सगळे भाजपाचे समर्थक नसतात.

येथे मते मांडणार्‍या लोकांनी मी दिलेली लिन्क एकदा पहावी अश्वनी उपाध्याय यांची.
मिर्ची, खरेतर यातल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा व्हावी असे वाटते, पण सद्ध्या मोठमोठ्या पोस्टी टंकण्याएवढा वेळ मिळत नाहीये (विचारपण करावा लागेल ना लिहिताना :डोमा:)

तुम्ही जे लिहिलंय त्यासाठी काही बातम्यांच्या लिंका आहेत का?>> मी जे लिहिले आहे ती माझ्या बरोबर काम करणार्या दिल्लीतल्या सामान्य माणसांची मते आहेत. असो

प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तपासणं अशक्य आहे>>

नदी तपासणी ऑफरची आठवण झाली. Rofl

मी जे लिहिले आहे ती माझ्या बरोबर काम करणार्या दिल्लीतल्या सामान्य माणसांची मते आहेत.

>>

अहो त्यांचा आम आदमी तोच खरा आम आदमी. बाकी कुण्णी कुण्णी नै.

<<त्याचा आपला / भा़जपाला तोटाच होइल>> म्हणुन भाजपा निवडणुक घेत नाही.>>

म्हणजे काँग्रेसला फायदा होईल म्हणता ??? Uhoh
(की मी असं कुठे म्हटलोय?स्पष्ट लिहा ब्वॉ कोणाला फायदा होऊ शकेल ते.)

<<येथे मते मांडणार्‍या लोकांनी मी दिलेली लिन्क एकदा पहावी अश्वनी उपाध्याय यांची.
मिर्ची, खरेतर यातल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा व्हावी असे वाटते, पण सद्ध्या मोठमोठ्या पोस्टी टंकण्याएवढा वेळ मिळत नाहीये >>

आणि पहाताना हेही लक्षात ठेवावं की अश्विनी उपाध्यायला आपने तिकीट नाकारलं होतं Wink
सवड मिळेल तेव्हा लिहा.मला स्वतःला त्या आरोपांमध्ये काहीच तथ्य दिसलं नाही. तरी तुम्हाला हवं असेल तर चर्चा करूया.
वेळेचा प्रश्न येतोय खरा. जनू बांडे म्हणतात तसं ओवाळून टाकायला लागेल की काय?

>>मला स्वतःला त्या आरोपांमध्ये काहीच तथ्य दिसलं नाही. >>

बरोबर आहे. हे म्हणजे आमच्या लोकांनी चोरी केली तरी अंतर्गत लोकपाल, अंतर्गत चौ़कशी - जज, वकील, पट्टेवाला सगळंच आपचं. मग असली वाक्य उगम पावतात.

Pages