Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधी गुर्जींच आणखी एक
आधी गुर्जींच आणखी एक स्टेटस..
अधून मधून विरंगुळा म्हणून
काय करावं या पोराचं ???
=============
बाळूच्या गंमती तुमास्नि सांगितल्याच न्ह्य्य व्हय ? आर तिच्या मायला हाय का आता ! चव्हाट्यावर याचं आन मुद्याचंच बोलाईचं न्हाई तर कसं काय असं व्हतंय गड्या !
तर ना काय सांगत व्हतु, आमचा बाळु, म्हंजी बाळ्या लैच भारी. आता वय वाढलं म्हनुन बाळासायेब लिव्हायला लागतंय पोष्टरवर पन बाळ्याचा बाळ्याच राह्यला आमचा बाळ्या. बाळ्याला ना दुसरं कसं करतं तसंच करायची लई भारी खोड. पण व्हतंय काय त्येचं टायमिंग तरी चुकतंय न्हाई तर मंग ठिकान तरी चुकतंय.
गनपती गेलं त्या दिवशी याला नाचायचं व्हतं, पन मागच्या टायमाला समदं पिऊन टाईट झाल्यालं ह्येला माहितच न्हवतं, तवा या टैमाला ह्यो इतका प्येयला, इतका प्येयला कि अगाबाबोबो.. आन त्याचं त्वांड कदी न्हाई त्ये असं उचकटलं कि पोलिसानी त्येला लगीचच गाडीत घातला आन आडबाजुला घेवुन अस्सा तुडवला अस्सा तुडवला अन वरून पानी बी वतलं. डब्बल तरास झाला. पंधरा दिसानी आमदार सायबानी सोडवून आनलं. पन म त्ये बी म्हनलं, भडवीचं कवा बी प्येतंय आन कायबी करतंय. चरबी उतरु द्या वाईच. आता आमदार सायेबच असं म्हनलं म्हनल्यावर पोलिसानी बी हात साफ करुन घियाला लैच भारी चानस भेटला. जरा रुबाब पन झाडाय भेटला. पंधरा दिसानी इमानदारी सोडला. पन हागायला बी नकु म्हनत व्हतं आठवडाभर. लै बेकार हाल झाले.
तवा नाचायचं -हायल्येलं त्यो किडा काय डोस्क्यातन जाईना. नवरात्र तर गेली चौकीतच. अन त्येला चानस भेटला. मुसलमानाचा जुलुस निघाल्याचं समजलं म्हनुन ह्ये बी कलरफुल सदरा घालुन निघालं. समदं म्हनलं आरं कशापायी जातुस , तर एक न्हाय दोन न्हाय. आन सांजच्याला आलं त्येच परत सुजल्यालं. पोलीस परत आलते पन या वख्ताला आमदार सायेब जातीनं हजर राह्यल, जाताना हाग्या दम भरुन गेलं. काय झालं म्हनुन लै इच्चारलं तर सांगंनाबी.
तवा पोलिसवालं म्हनलं, सांभाळा वाईच. लैच येड्यावानी करतंया. मुसलमानाचा दु:खाचा सन व्हता म्हनुन ते छाती पिटत्यात अन ह्ये भांगडा करतंय म्हनल्यावर दंगल नसती व्हय झाली ? बरं की आम्ही बंदुबस्ताला व्हतु म्हनुन निभावलं.. च्या मारी, आज पेटलंच व्हतं न्हायतर. येक तर सायेब बी न्हाय अन एसआरपीबी न्हाय वख्ताला हितं.
मंग समद्यानी येकेक हानली आनि पर्त्येकानं येकतरी शानपनाची युगत सांगितली. बाळु आपला खाली नजर लावुन -हाईला.
आता जास्त काय कराय नगं म्हनुन त्येला बापानं कांपुटर घिऊन दिलाय, अन त्ये तसले पिच्चर बगायचं कनेक्शन बी घिऊन दिलंय अन त्ये पोरीशी वळख वाडवायचं असतंय ना, फेसबुक का काय त्ये बी खातं काडलंय बाळुनं. आमीबी काडलंय . काय येकेक पोरी ! अगागागागा... समद्या डिट्टो हिरविनीवानीच दिसत्यात. येकतर डिट्टो कतरिनाचा सेम तो सेम. आता बाळुनं गप येळ घालवायचा का न्हाई ?
तर भडव्यानं तिथं बी चव्हाट्यावर भांडन काडलंय. आता तिथं समद्या जाती धर्माची मानसं गुन्यागोविंदानं नांदत्यात, तर ह्ये काय करतंय म्हाईत हाय का , ड्राय डेच्या टायमाला गोडसेवरच भाषण ठोकतंय लिवुनशान. अन ईदला तर शाहीस्तेखानाची बोट कापली कशी त्येचं कीर्तन केलं. आता त्येचा उद्देश चांगला अस्तुया ह्ये आम्हाला म्हाईत हाय वं, पन पब्लिक लैच खवळतंय. त्ये मोदीसायेब कुठतरी निवडुन आलय तर ह्ये नी तित्तच इशरत जहा ला आदरांजली असं लैच सुद्ध लिवायचं म्हनुन लिवलं. राहुला गांधी ला आसच कुटलीतरी पोस्ट भेटली पक्षात तर तितं कलमाडी सायबाचा निशेध करुन मोकळं झालं.
पुन्यांदा पोलीस घरला आलं. लैच चोपला. लै बेक्कार हानला..
त्येचा बा म्हनतुय काय करावं या पोराचं ???
शेवटी म्हनलं इच्चार करुन द्या आम आदमी पक्षात धाडुन
२ फेब्रु २०१४
आब्र, मी तुमची बनाना आदमीची
आब्र,
मी तुमची बनाना आदमीची पोस्ट काही कळली नाही म्हटलं.
गुर्जींची पोस्ट. विरंगुळा
गुर्जींची पोस्ट. विरंगुळा म्हणून.
ईथ खेळ चाललेत का आठवले ?
ईथ खेळ चाललेत का आठवले ?
आब्र, तुम्ही विरोधात लिहिलंत
आब्र,
तुम्ही विरोधात लिहिलंत तरी तुमच्या पोस्टस् सेन्सिबल असतात. कशापाई त्या गुर्जींच्या नादाला लागताय?
Arvind Kejriwal among '100
Arvind Kejriwal among '100 Global Thinkers of 2013'
"Known for his no-nonsense oratory" १००% सहमत.
ह्यावरून आठवलं. दिल्लीच्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये यंदाच्या जानेवारीत बरखा दत्तने 'स्वराज' ह्या पुस्तकाचे लेखक अरविंद केजरीवालांची मुलाखत घेतली होती.
मी डाऊनलोड करून ठेवली आहे. केजरीवाल आणि कुमार विश्वास ह्यांच्या काही मुलाखती चुकवू नयेत अशा आहेत. त्यातलीच ही एक.
ह्यात बरखाने प्रश्न विचारलेले काही मुद्दे -
१.'स्वराज' मध्ये लिहिलेली थिअरी प्रत्यक्षात उतरवणं कठीण वाटतंय का?
२. मोहल्ला सभांमुळे अल्पसंख्यांकांवर अन्याय होऊ शकतो. डेमोक्रसी मोबोक्रसी बनू शकते.
(मयेकरांनी मागे हा मुद्दा मांडला होता)
३. उद्या कोणी मोहल्ला उठून म्हणेल 'आपल्याला एक युद्ध करायला पाहिजे', 'ह्या मोहल्ल्यात मुस्लिम घर घेऊ शकणार नाहीत' 'इथे समलैंगिक लोक राहू शकत नाहीत' वगैरे
४. खाप पंचायत बंद करायला हव्यात की नाही?
५. सगळं काम जनता करणार तर मग नेत्यांची गरजच काय?
६. उद्या भारतावर पाकिस्तानने आक्रमण केलं आणि काही मोहल्ले म्हणायला लागले की प्रतिकार नाही करायचा तर?
७. काश्मीरमधील जनता म्हणायला लागली की आम्ही भारताचा हिस्सा नाही आहोत तर?
८. अण्णा तुमच्यावर नाराज का आहेत? तुमच्यामध्ये इतका दुरावा कसा आला?
९. मोदींविरुद्ध निवडणूक लढणार का?
१०. जनलोकपालबिल मांडणार का? मांडता नाही आलं तर काय करणार?
समर्थक आणि विरोधक दोघांनीही एकदा ही मुलाखत जरूर पहा अशी विनंती.
(३४ मिनिटांचा हा व्हिडिओ अचानक संपतोय. पुढचा भाग मला कुठे सापडला नाही. कुणाला सापडल्यास प्लीज इथे लिन्क द्या.)
स्विस बँकेतील काळा पैसा परत
स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी तयार केलेल्या SIT ने सिंगापूरमधील बायोमेट्रिक्स कंपनीने रिलायन्समध्ये गुंतवलेल्या ६५०० कोटी रूपयांची चौकशी करण्याबद्दल प्रशांत भूषण ह्यांनी अर्ज केला आहे.
केवळ एका खोलीत चालू असलेली बायोमेट्रिक्स कंपनीचे मालक असलेले अतुल शांतीकुमार दयाल हे रिलायन्स समूहाच्या ३२ कंपन्यांचे डायरेक्टर आहेत असं भारतीय दूतावासाने दिलेल्या रिपोर्टनुसार समजतं !
"It was pointed out that this is a company with no assets, no equity and does not file an income tax returns in Singapore claiming to be a small company. Yet, this huge investment by this company, amounting to Rs6,530 crore is the single biggest foreign direct investment (FDI) into India from Singapore."
मोदींनी FDI ला पाठिंबा देण्यामागे हे कारण असू शकेल का? म्हणजे आपल्याच देशातला पैसा परकीय गुंतवणूक आहे असं दाखवून पुन्हा देशात आणायचा.
ICICI बँक सुद्धा ह्या प्रकारात अडचणीत येण्याची शक्यता दिसतेय.
मिर्ची, >> मोदींनी FDI ला
मिर्ची,
>> मोदींनी FDI ला पाठिंबा देण्यामागे हे कारण असू शकेल का? म्हणजे आपल्याच देशातला पैसा परकीय गुंतवणूक
>> आहे असं दाखवून पुन्हा देशात आणायचा.
घनदाट शक्यता आहेशी वाटते.
आ.न.,
-गा.पै.
अमित शहांची नेमणूक भाजप
अमित शहांची नेमणूक भाजप अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यावर DNA मध्ये [Opinion] A new low in Indian politics ह्या नावाने एक बातमी होती. त्यात अमित शहांवर चालू असलेल्या गुन्ह्यांबद्दल लिहिलेलं होतं.
आत्ता त्या लिन्कवर गेलं तर बातमी काढून टाकण्यात आली आहे. मिडियाचं कठीण आहे
अमित शहांच्या नियुक्तीबद्दल बीबीसीमध्ये आलेली बातमी - कई मामलों में अभियुक्त बने भाजपा अध्यक्ष.
अहो गुंडगिरी करणार्यांची
अहो गुंडगिरी करणार्यांची पार्टी आहे.. उत्तर प्रदेशात सत्तेसाठी काय चालु केले आहे माहीत आहे ना.. सरळ सरळ पोलीसच आरोप करत आहेत की हे मुद्दामुन लोकांच्या भावना भडकवत आहेत..
सत्तेसाठी काहीही करु शकतात..
मिर्ची, कुठे आहात ? विपु
मिर्ची, कुठे आहात ? विपु पाहिलीत का ?
उपोषणानं केवळ तब्येत बिघडते!:
उपोषणानं केवळ तब्येत बिघडते!: केजरींना उपरती
देर आये दुरुस्त आये
महेश 12 July, 2014 -
महेश 12 July, 2014 - 12:49
हेलो, नुकतीच एक लिन्क पहाण्यात आली, यावर काय मत आहे तुमचे ?
http://www.youtube.com/watch?v=uOrpn3zIs5c
तुमच्या विपुला इथेच उत्तर देते.
हा व्हिडिओ २-३ महिन्यांपूर्वीच बघितला आहे. त्यातले आरोप खरे असतील असं तुम्हाला खरंच वाटतं का?
सगळ्यांवर लिहायला फार वेळ लागेल आणि त्यात काही अर्थही नाही. २-३ मुद्द्यांवर लिहिते.
१. फोर्ड फाउंडेशन - ह्यावर मागेही लिहिलं होतं. दिल्ली हायकोर्टाने आपला नव्हे तर भाजप आणि काँग्रेसला ह्यात दोषी ठरवलंय. त्याबद्दल काय म्हणणं आहे बाँग्रेस समर्थकांचं?
२. नक्शल आणि अतिरेकी केजरीवालांना भेटतात - असं असेल तर तेव्हा पोलिस काय करत असतात? पकडून तुरुंगात टाकायचं की सरळ अतिरेक्यांना पण आणि केजरीवालांना पण !
'पाकिस्तानी एजण्ट' वर गुन्हा का नाही दाखल केला मोदींनी अजून?
३. नवीन जिंदाल आपला पैसे पुरवतात - असं असेल तर त्यांचं नाव भ्रष्ट लोकांच्या यादीमध्ये द्यायची हिंमत झाली असती का केजरीवालांना?
AAP’s list of corrupt includes Rahul Gandhi, Naveen Jindal
४. योगेंद्र यादव राहुल गांधींना भेटले (म्हणून आप काँग्रेसची बी-टीम आहे) - हे वाचा.
Yes, I met Rahul Gandhi, Haryana CM: Yogendra Yadav
अश्विनी उपाध्यायचा व्हिडिओ आज पुन्हा पाहिला नाहीये. वरील मुद्दे त्यात होते असं आठवतंय. नसेल तर प्लीज सांगा.
ज्या सिस्टीमला, ज्या ताकदवान लोकांना आणि त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या बदमाषीला आपकडून आव्हान दिलं गेलंय, ते लोक काहीच करणार नाहीत असं वाटतं का? आपला संपवायचे सगळे प्रयत्न चालू आहेत - साम,दाम,दंड,भेद.
पण आप सगळ्यांना पुरून उरेल...उरावी अशी मनापासून इच्छा आहे. नाहीतर कठीण आहे सगळं.
<<उपोषणानं केवळ तब्येत
<<उपोषणानं केवळ तब्येत बिघडते!: केजरींना उपरती
देर आये दुरुस्त आये>>
वृषाली, अहो ही उपरती दोन वर्षांपूर्वीच झालीये. म्हणून तर पक्ष स्थापन केला ना.
पण आंदोलनं थांबवणार नाहीयेत ते. सवड मिळाल्यास हे ऐका/पहा - Interaction with Maharashtra Volunteers
११ जुलैचा स्वयंसेवकांसाठीचा गुगल हँगआऊट आहे. मी फक्त समर्थक आहे, स्वयंसेवक नाही. पण तरीही मी हँगआऊट्स बघते. नेहमीच्या राजकारणापेक्षा काहीतरी वेगळं सापडतं त्यात
http://www.abplive.in/incomin
http://www.abplive.in/incoming/article361889.ece/alternates/FREE_768/f%2...
ह्यावर अश्विनी उपाध्यायचं काय म्हणणं असेल?
चित्रातील व्यक्ती - संघकार्यकर्ते वेदप्रताप वैदिक आणि मोस्ट वॉण्टेड अतिरेकी हाफिझ सईद.
Ved Pratap Vaidik speaks on Hafiz Muhammad exclusively with India TV
"सियासत को लहुं पीने की लत है
वरना मुल्क में सब खैरियत है !"
मिर्ची, तुम्ही जे मुद्दे
मिर्ची, तुम्ही जे मुद्दे लिहिले आहेत तेवढेच नाही तर अन्य मुद्दे सुद्धा आहेत,
उदा. पक्ष हा पक्षासारखा नसुन केवळ चार लोकच सर्व निर्णय घेत आहेत हुकूमशाहीप्रमाणे, इ. इ.
पुन्हा सवडीने सविस्तर लिहिन.
महेश, उपाध्याय बरंच काही
महेश,
उपाध्याय बरंच काही बोलले आहेत. तिकीट न मिळाल्याने आलेल्या वैफल्यातून बोलले असण्याची शक्यता असू शकते.
तुम्हाला जे मुद्दे महत्वाचे वाटतात ते सवडीने लिहा. त्यावर चर्चा करूया.
आप खासदार भगवंत मान त्यांच्या विभागात भ्रष्टाचाराविरुद्ध २४ x ७ हेल्पलाइन चालू करत आहेत.
पशुखाद्य घेऊन जात असलेल्या तीन लोकांकडून जकात अधिकार्यांनी लाचस्वरूपात घेतलेली २०,००० रूपयांची रक्कम त्यांनी परत मिळवून दिली, अशी बातमी वाचण्यात आली.
काम 'सणसणीत' नसेल, पण जनहितासाठी आवश्यक वाटलं. म्हणून इथे लिहिलं.
मिर्ची ताई असे छोटे मोटे
मिर्ची ताई
असे छोटे मोटे भ्रशट्राचार पकडुन देश , राज्य चालऊ शकत नाही. त्यावर उपाय शोघला पाहिजे.
उदा.... जकात रद्द करुन VAT/GST implement करणे, e-tender, e- governance ईत्यादी.
मराठीत एक म्हण आहे... सरड्याची धाव कुंपणापर्यन्त. तसेच आप ची कामे म्हणजे धरणे करणे, छोटे मोठे लाच घेणारे सरकारी नौकर पकडणे, दुसर्या सरकार्वर आरोप करणे
सरकार चालवणे, विरोधात बसुन constructive feedback देणे वगैरे त्याना जमत नाही.
<<असे छोटे मोटे भ्रशट्राचार
<<असे छोटे मोटे भ्रशट्राचार पकडुन देश , राज्य चालऊ शकत नाही. त्यावर उपाय शोघला पाहिजे.
उदा.... जकात रद्द करुन VAT/GST implement करणे, e-tender, e- governance ईत्यादी.>>
मग कसं चालतं राज्य? गुजरातसारखा e- governance वापरून?
Gujarat is the first state to have acknowledged blocking access to economic data on its web pages during the campaign period
<<सरकार चालवणे, विरोधात बसुन constructive feedback देणे वगैरे त्याना जमत नाही.>>
आपला सरकार चालवता आलं नाही म्हणूनच भाजप घाबरून पुन्हा निवडणूका न घेता सरकार बनवायचा प्रयत्न करत आहे, हो ना?
लोकशाहीतलं सरकार वरून खाली नाही चालवलं जात. असं चालवलं गेलं तर काय होतं ते बघितलंय आपण इतक्या वर्षांत. लोकशाहीमध्ये सरकार जनतेला सहभागी करून घेऊनच चालवलं जातं, जायला हवं.
४९ दिवसांत मोदी सरकारने केलेली भरीव कामगिरी सांगाल का? युटर्न्स सोडून.
SC won’t take action against
SC won’t take action against Kejriwal over January protests:
The case, which was made against the then Delhi CM for protesting while he was in office, was closed by the court, which said that the ‘case wasn’t fit to proceed further’
AAP - the journey has just began!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kejriwal-Delhi-Posters/art...
विश्वास ठेवा किंवा ठेवू नका... पण नवी दिल्लीतील मतदारांना आम आदमी पक्षाचे नेते व त्यांचे आमदार अरविंद केजरीवाल यांचा शोधच लागेनासा झाला आहे. केजरीवाल बेपत्ता असल्याचे नवी दिल्लीतील मतदारांचे म्हणणे आहे. तसे पोस्टरच दिल्लीकरांनी झळकावले असून केजरींना शोधून देणाऱ्यास भरघोस इनाम घोषित केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांनी दिल्लीकरांना भरमसाठ आश्वासने दिली होती. दिल्लीकरांनी त्यावर विश्वास टाकला आणि तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना झिडकारून मोठ्या अपेक्षेने केजरीवालांना निवडून आणले. त्यानंतर केजरीवाल मुख्यमंत्री झाले... त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले... ते लोकसभा निवडणूक लढले... हरलेही...! या साऱ्यामुळे मीडियात राष्ट्रीय नेते झालेले केजरीवाल स्वत:च्या मतदारांना मात्र दिसलेच नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे लोक संतापले आहेत.
'हरवलेल्याचा शोध' अशा आशयाची पोस्टर दिल्लीतील गोल मार्केट परिसरात लागली आहेत. या पोस्टरवर अरविंद केजरीवाल यांचा गांधी टोपी घातलेला आक्रमक आवेशातील फोटो आहे. केजरींना नवी दिल्लीच्या समस्यांची जाणच नसल्याचा आरोप पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलाय. केजरींच्या शारीरिक वर्णनासह अन्य माहितीही पोस्टरवर देण्यात आली आहे. या पोस्टरची संपूर्ण दिल्लीत जोरदार चर्चा आहे.
केजरीवालांचे पोस्टरवरील वर्णन असे...
रंग : सावळा
आजार : खोकला
काम : आंदोलनं करणं आणि खोटं बोलणं
स्वप्न : मुंगेरीलालचे
हरवलेल्याचा शोध' अशा आशयाची
हरवलेल्याचा शोध' अशा आशयाची पोस्टर दिल्लीतील गोल मार्केट परिसरात लागली आहेत. या पोस्टरवर अरविंद केजरीवाल यांचा गांधी टोपी घातलेला आक्रमक आवेशातील फोटो आहे. केजरींना नवी दिल्लीच्या समस्यांची जाणच नसल्याचा आरोप पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलाय. केजरींच्या शारीरिक वर्णनासह अन्य माहितीही पोस्टरवर देण्यात आली आहे. या पोस्टरची संपूर्ण दिल्लीत जोरदार चर्चा आहे. >>>>
मस्तच... पण एक शंका आहे... भाज्प्यांच्या ३० आमदारांची पोस्टर का लागली नाही... केजरीवाल एकटेच दिल्लीचे आमदार आहेत का ? बाकीचे आमदार काय करतात.. ?
हे बघा तुम्ही म्हणताय ते
हे बघा तुम्ही म्हणताय ते पोस्टर. किती रूपये लागतात ओ असले पोस्टर्स छापून चिकटवायला?
त्यातून आता तर सतिश उपाध्याय दिल्ली बीजेपीचे अध्यक्ष झालेत. पैसों की क्या कमीं??
सतिश उपाध्याय हे रिलायन्स समूहाचे डायरेक्टर उमेश उपाध्याय ह्यांचे बंधू.
दिल्ली प्रदेशाध्यक्ष झालेले सतिश उपाध्याय आणि दिल्लीचे गवर्नर नजीब जंग दोघेही रिलायन्सचे एक्स-एम्प्लॉयी आहेत. प्रदेशाध्यक्षांची बरीच गुंतवणूकही आहे रिलायन्सच्या शेअर्समध्ये. त्याचा इथे काही संबंध नाही म्हणता? बरं.
उदयन,
बाकीचे आमदार खूप कामं करत आहेत सध्या. बीजेपी आणि काँग्रेसचं लग्न ठरतंय. बस्ता बांधण्यात व्यस्त आहेत ते. २० कोटीचा शालू दिला जातोय म्हणे प्रत्येक नवरीला.
आप बाँग्रेससाठी 'गले की हड्डी' झाली आहे असं दिसतंय. गिळता येत नाही आणि टाकताही येत नाही.
भाजपा आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं तर भारतीय राजकारणात आपमुळे रचला गेलेला एक इतिहास होईल का?
येड्या बीजेपीला हे दिसलं
येड्या बीजेपीला हे दिसलं नाही...दिसणारही नाही.
Arvind Kejriwal's Mohalla Sabha at Kali Bari Sabzi Mandi for utilisation of MLA fund
भाजपा आणि काँग्रेसने एकत्र
भाजपा आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं तर भारतीय राजकारणात आपमुळे रचला गेलेला एक इतिहास होईल का?
>>>>>> +१००१
अण्णू गोगट्या होणे म्हणजे
अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे हा अंतुशेटनी मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे - पु.लं.
केजरीवाल होणे म्हणजे जबाबदारी टाळून पलायन करणे हा स्वतः केजरीवालनी देशातील सर्व भाषांना बहाल केलेला वाक्प्रचार आहे.
देशातलं सर्वात कमी दिवसांचं
देशातलं सर्वात कमी दिवसांचं सरकार अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ दिवसांचं होतं. त्या वेळी कुणालाच बहुमत नसल्याने अटलबिहारी वाजपेयींचं सरकार कोसळल्यावर लोकसभा विसर्जित झाली. मुळात अल्पमतात असताना वाजपेयींनी सरकार स्थापनच का केले ? ज्या पक्षांची भाजपशी आघाडी नव्हती त्यांनी वाजपेयींना पाठिंबा द्यावा अशा अचाट अपेक्षा त्या वेळी व्यक्त केल्या गेल्या. निवडणुकीचा खर्च देशाला परवडणारा नाही असाही युक्तीवाद केला गेला.
निवडणूक पूर्व युती नसताना निवडून आल्यानंतर आघाडी भाजपला एरव्ही मान्य नव्हती. पण स्वतःच्या बाबतीत भाजपला हे नियम कधीच मान्य नसतात. त्या वेळी अडवाणींनी भाजप सरकारला पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षाच्या खासदारांनी पुढे यावं त्यांचं स्वागत केलं जाईल असं वक्तव्य केलं होतं. हे घोडेबाजाराला उत्तेजन देणारं वक्तव्य होतं. सरकार कोसळल्यानंतर ज्यांनी विरोधात मतदान केलं ते खलनायक असल्यारख्या जाहिराती वृत्तपत्रातून आल्या होत्या. वाजपेयी सरकार वाचवण्याची कांमगिरी ही भाजपची नसून या पक्षांची होती असा साक्षात्कार भाजपच्या धुरिणांना झाला होता. अल्पमतात असताना जर देशाचं सरकार ते बनवू शकतात तर दिल्लीचं सरकार त्यांनी का बरं बनवलं नाही ? नाहीच बनवलं तर मग लाला केजरीवाल यांना पाठिंबा का नाही दिला ?
भाजपचं तत्वज्ञान हे सरड्यासारखं असतं. मद्रदेशीच्या अम्मांना एकेकाळी भ्रष्टाचाराची मूर्ती असं संबोधणा-या या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्याबरोबर त्या पावन झाल्या. काँग्रेसचे तत्कालीन दूरसंचार मंत्री पंडीत सुखराम शर्मा यांच्या हमामखान्यातील तख्तपोशींमधून भारतीय चलन बाहेर पडलं तेव्हां याच भाजपने त्यांना भ्रष्टाचाराचे प्रतीक मानून संसदेत गोंधळ घातला होता. देशभर घंटानाद, राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन केले होते. त्याच सुखराम यांनी हिमाचल विकास पार्टीच्या माध्यमातून भाजपशी संधान बांधले की त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केले गेले. भाजप हा पक्षच असा आहे की त्यांना स्पर्श झाला की सगळी पापं धुतली जातात. तिरुपतीला जायची गरज पडत नाही. धन्य धन्य.
मिर्ची, भाजप आणि काँग्रेस
मिर्ची, भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणे अशक्य वाटते आहे.
ये मुष्किलही नही, नामुमकीन हैं ! अनहोनी !
काँग्रेसचे आमदार फोडुन भाजप
काँग्रेसचे आमदार फोडुन भाजप सरकार बनवेल. हे सहज शक्य आहे. अगदी आपचे आमदार पण फुटु शकतात. निवडणुका नकोत आता. आप/ काँग्रे/भाजपाच्या FM वरच्या जाहीराती एकायची आता तयारी नाही. एकदम डोक्यात जातात.
एकमेकांचे आमदार फोडून करणे
एकमेकांचे आमदार फोडून करणे शक्य आहे,
पण आआप आणि कॉन्ग्रेस जसे एकत्र आले होते तसे शक्य नाही वाटत.
Pages