मराठी मंडळ कोरियाचा दिवाळी अंक २०१२

Submitted by विजय देशमुख on 6 January, 2013 - 07:57

मराठी माणुस म्हटलं, की दिवाळी अंक हे समीकरण ठरलय. म्हणजे मराठी म्हणजे गणेशभक्त असणारच जसं गृहीत धरल्या जातं, तसच काहीसं दिवाळी अंकाशिवाय मराठी माणसाची दिवाळी होत नाही.

आजच्या घडिला सुमारे ३५० मराठी माणसांचं ’मराठी मंडळ कोरिया’ वर्षभरात विविध कार्यक्रम राबवते, त्यातलाच एक म्हणजे ’साहित्य-शोभा’ दिवाळी अंक. यावर्षीचे दिवाळी अंकाचे २रे वर्ष.

हा अंक ऑनलाईन वाचता येईल किंवा पीडीएफमध्ये उतरवुन घेता येईल. अंक वाचण्याकरीता http://marathimandalkorea.blogspot.kr/ इथे भेट द्या.

आपल्या सुचना व प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत,

विजय देशमुख

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही ठीकठाकच वाटला
पण कोरियात राहून मराठीची सेवा करता आहात त्यासाठी धन्स
अंकामधली तुमची कविता वाचली आवडली
पुढील अंकाकरिता लाख लाख शुभेच्छा

कोरियात राहून असं काही करत आहात हे खरंच कौतुकास्पद आहे. उत्साह आणि प्रामाणिक धडपड जाणवली.
अंकाचं ऑनलाईन-सादरीकरण छान आहे.

सर्वांना धन्यवाद.

खरय की या दिवाळी अंकात २-३ लोकं वगळता सगळ्याम्नी प्रथमच मराठित लेखन केलय. म्हणुन तर अंक प्रकाशीत करायला उशीर झाला. Happy

विजय देशमुख,

अतिशय उत्तम उपक्रम! अंक पूर्णपणे वाचला नाहीये. तुम्ही इतक्या दूरवर राहून मराठीसाठी एव्हढं करताय ते पाहून अभिमान वाटला. अंकात अमित भटांनी म्हंटलंय की प्रथम जगतातील (First World) मराठी लोकांप्रमाणे कोरियातील मराठीजनांची माहिती जगासमोर यायला हवी. त्यास तथास्तुपूर्ण शुभेच्छा! कौरीय मराठीजनांची स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित होवो. Happy

आ.न.,
-गा.पै.

खुप छान आहे अंक. मी पुण्यात राहते पण कोरिया बद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. मी कोरियन सिरियल्स पाहते. थोडं-फार कोरियन समजतेही. तुमच्या पैकी कोणी कोरियन सिनेमाबद्दल किंवा सिरियल्स बद्दल लिहिल अशी आशा करते. तुमच्या पुढिल अंकासाठी शुभेच्छा.

अभिनंदन व सगळ्यांना शुभेच्छा...अंक वाचणार आहे नक्की...
आनिका>>+१ नक्कीच कुणीतरी लिहायला घ्याच.
धन्यवाद!