Submitted by विजय देशमुख on 6 January, 2013 - 07:57
मराठी माणुस म्हटलं, की दिवाळी अंक हे समीकरण ठरलय. म्हणजे मराठी म्हणजे गणेशभक्त असणारच जसं गृहीत धरल्या जातं, तसच काहीसं दिवाळी अंकाशिवाय मराठी माणसाची दिवाळी होत नाही.
आजच्या घडिला सुमारे ३५० मराठी माणसांचं ’मराठी मंडळ कोरिया’ वर्षभरात विविध कार्यक्रम राबवते, त्यातलाच एक म्हणजे ’साहित्य-शोभा’ दिवाळी अंक. यावर्षीचे दिवाळी अंकाचे २रे वर्ष.
हा अंक ऑनलाईन वाचता येईल किंवा पीडीएफमध्ये उतरवुन घेता येईल. अंक वाचण्याकरीता http://marathimandalkorea.blogspot.kr/ इथे भेट द्या.
आपल्या सुचना व प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत,
विजय देशमुख
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठीकठाक अंक.
ठीकठाक अंक.
मलाही ठीकठाकच वाटला पण
मलाही ठीकठाकच वाटला
पण कोरियात राहून मराठीची सेवा करता आहात त्यासाठी धन्स
अंकामधली तुमची कविता वाचली आवडली
पुढील अंकाकरिता लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद कावळा आणि वैभव
धन्यवाद कावळा आणि वैभव
अंक पूर्ण वाचला नाही. आत्ता
अंक पूर्ण वाचला नाही. आत्ता फक्त चाळला आहे.तरी चांगला वाटला.
पुढच्या अंकासाठी शुभेछा.
कोरियात राहून असं काही करत
कोरियात राहून असं काही करत आहात हे खरंच कौतुकास्पद आहे. उत्साह आणि प्रामाणिक धडपड जाणवली.
अंकाचं ऑनलाईन-सादरीकरण छान आहे.
छानच मांडणी,दाद देण्याजोगा
छानच मांडणी,दाद देण्याजोगा उत्साह व लेखन. शुभेच्छा.
सर्वांना धन्यवाद. खरय की या
सर्वांना धन्यवाद.
खरय की या दिवाळी अंकात २-३ लोकं वगळता सगळ्याम्नी प्रथमच मराठित लेखन केलय. म्हणुन तर अंक प्रकाशीत करायला उशीर झाला.
विजय देशमुख, अतिशय उत्तम
विजय देशमुख,
अतिशय उत्तम उपक्रम! अंक पूर्णपणे वाचला नाहीये. तुम्ही इतक्या दूरवर राहून मराठीसाठी एव्हढं करताय ते पाहून अभिमान वाटला. अंकात अमित भटांनी म्हंटलंय की प्रथम जगतातील (First World) मराठी लोकांप्रमाणे कोरियातील मराठीजनांची माहिती जगासमोर यायला हवी. त्यास तथास्तुपूर्ण शुभेच्छा! कौरीय मराठीजनांची स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित होवो.
आ.न.,
-गा.पै.
खुप छान आहे अंक. मी पुण्यात
खुप छान आहे अंक. मी पुण्यात राहते पण कोरिया बद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. मी कोरियन सिरियल्स पाहते. थोडं-फार कोरियन समजतेही. तुमच्या पैकी कोणी कोरियन सिनेमाबद्दल किंवा सिरियल्स बद्दल लिहिल अशी आशा करते. तुमच्या पुढिल अंकासाठी शुभेच्छा.
अभिनंदन व सगळ्यांना
अभिनंदन व सगळ्यांना शुभेच्छा...अंक वाचणार आहे नक्की...
आनिका>>+१ नक्कीच कुणीतरी लिहायला घ्याच.
धन्यवाद!
चांगला उपक्रम. शुभेच्छा
चांगला उपक्रम. शुभेच्छा
ल-प्री, गापै, आनिका +
ल-प्री, गापै, आनिका + १
अभिनंदन आणि शुभेच्छा