गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.

अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.

गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणार्‍या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.

गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?

गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्‍यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्‍यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.

तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्‍याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्‍याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्‍याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्‍यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्‍याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.

स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्‍याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्‍याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्‍याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्‍यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.

मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्‍यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्‍यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्‍याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्‍यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्‍या अधिकार्‍यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्‍यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्‍यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्‍यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्‍या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्‍यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचविचार,

>> मोदी काय राहुल गांधी काय किंवा प्रणव मुखर्जी काय किंवा किंवा पी चिदंबरम काय, काय फरक पडतो?

तुमचा हेतू स्तुत्य आहे. मात्र रास्व संघासारख्या निरुपद्रवी संघटनेचा जे लोकं द्वेष करतात, त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीची अपेक्षा कशी बाळगता येईल? मोदी हा हिटलरच आहे हे सिध्दांत कोळून प्यायलेली लोकं आहेत ही.

शिवाजीमहाराजांनी अनेकांना अनेकदा सांगितलं की मी राज्य केलं काय वा तुम्ही केलं काय सारखंच. आपण दोघे मिळून पाशवी राजवटींना पाणी पाजूया. ऐकलं का कुणी? अगदी चंद्रराव मोऱ्यापासून जयसिंगापर्यंत अनेक उदाहरणे आहेत. छत्रसालाने खरंच महाराजांची शिकवण सार्थपणे अंमलात आणली.

आ.न.,
-गा.पै.

त्यांच जाऊद्या हो.
त्यांच कॉंग्रेजीच्यां "विजारी" धुण्याच कंत्राट १६ मे नंतर संपणार आहे, आणि त्याचीच त्यांना चिंता लागुन राहीलेय.

डुआयडी काढुन वैयक्तिक चिखलफेक करणे हे काहीजणांचे लक्षण आहे जे आता ही दिसुन येत आहेच

बकी मोदी जे स्वप्ने दाखवत आहे ते खोटी स्वप्ने आहे. जितके गुजराती आहे त्यांच्यातील ५०% लोकांनी तरी इमानदारी ने इंकम टॅक्स व सेल टॅक्स व्हॅट वगैरे सरकारी टॅक्स भरली तरी देशाचे भले होईल

जर आर्थिक घोटाळ्यांमधे शहा, मेहता या सारखीच नावे सर्वात आधी येतात. स्व्त चोर्‍या करायच्या आणि दुसर्यांना इमानदारीचा मंत्र शिकवत फिरायचे. हेच काहीजणांचे धोरण आहे

आजच्या लोकसत्तेच डोळे उघडणारा लेख आलेला आहे नक्कीच वाचावा

काही जणांना "आसाराम बापु" सुध्दा निरुपद्रवी वाटत होता Wink
असते काही जणांच्या डोळ्यावर पट्टी Biggrin

अग्निपंख,

>> पण तुमच्या आमच्या सारखे जे आत्ता एकेमेकांना विविध प्राण्यांची नावे देत सुटलेत ते नंतर असे
>> राजकारण्यांसारखे एकत्र येनार काय?

चांगला प्रश्न आहे. एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या राजकारण्यांना एकत्र येण्यासाठी सत्ता नामक गाजर अस्तित्वात असतं. तसं काही गाजर माबोवरतरी दिसंत नाही. त्यामुळे इथल्या लोकांच्या अहंचे अविष्कार राजकारण्यांपेक्षा तीव्र आहेत. Happy

जर भांडण सत्तेपल्याड गेलं तर राजकारणी एकत्र येत नाहीत हे राजोद्धवकलहावरून लख्ख दिसतं.

आ.न.,
-गा.पै.

किशोरडी,

>> काही जणांना "आसाराम बापु" सुध्दा निरुपद्रवी वाटत होता

वाटंत होता कशाला, वाटंत आहे म्हणा! भारतीय न्यायव्यवस्थेत पुरावा नामक काही चीज असते.

थारूड्याची पत्नी संशयास्पद स्थितीत परलोकवासी झाली तरी तो मोकाट फिरतो. यावरून काय ते ओळखावं.

आ.न.,
-गा.पै.

टीप : विषय बाफशी सुसंगत नसल्याने हामाशे संदेश.

शिवाजीमहाराजांनी अनेकांना अनेकदा सांगितलं की मी राज्य केलं काय वा तुम्ही केलं काय सारखंच. आपण दोघे मिळून पाशवी राजवटींना पाणी पाजूया. ऐकलं का कुणी?

मग महाराजांच्या आधीच्या पिढ्या त्या पाशवी शक्तींकडे का नोकर्‍या करत होत्या?

आणि महाराजांनंतरही पुन्हा दुसर्‍या पिढीपासून दिल्लीशी सलोखा का झाला?

खुद्द पेशवे दिल्लीच्या रक्षणाला पानिपतात रक्त सांडून मोकळे झाले.

असो. हा धाग्याचा विषय नाही. Happy

खुद्द पेशवे दिल्लीच्या रक्षणाला पानिपतात रक्त सांडून मोकळे झाले.

दिल्लीच्या रक्षणाला, मुघलांच्या नाही. Happy
बाकी धाग्याचा विषय नसल्याने मी ही थांबतो.

गुजरात मधील विजयाचे रहस्य !! ५ जानेवारी २०१३ चा धागा ,

गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आंध्रप्रदेश, ,,,,,,, मधील विजयाचे रहस्य !! १६ मे २०१४ चा
धागा,....

आज दुसर्‍या एका धाग्यामुळे या धाग्याची आठवण झाली. मूळ लेख वरवर पाहिला. शेवटच्या परिच्छेदातले हे वाक्य प्रचंड आवडले.
पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ?..............

समर्थकांचे योग्य त्या जागी दाखवलेल्या प्रामाणिकपणासाठी अभिनंदन.

मयेकर तुमच्या प्रतिसादामुळे आज पुन्हा काही दिवसांनी हा धागा वर आला, आणि पुन्हा एकदा मीच वाचून पाहिला.
खरोखर यामधे दिल्याप्रमाणे निदान काही प्रमाणात का होईना बदल होऊ लागले तर "अच्छे दिन" दूर नाहीत.

मोदी असोत की कोणीही असो, प्रत्येक माणसामधे स्वतःच आतुन बदल घडणे आवश्यक आहे.

महेश,

>> पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी
>> मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ?

या विधानातून इतरांप्रमाणे मोदींही दंगली घडवतात असं सूचित होतंय. अर्थात यास काही पुरावा नाही.

आ.न.,
-गा.पै.

गापै, मुळ लेखकाने असे का लिहिले हे त्याचे त्यालाच माहित. मी तो लेख जसाच्या तसा इकडे दिला होता.
त्यामुळे यावर नो एनी कमेण्ट्स !

लेख वाचल्यावर सुमारे दीssssssड वर्षाने मयेकरांना त्यातले एक वाक्य जे तोडमोड करुन सोयिस्कररित्या वापरता येईल असे दिसले. फारच हळू बुवा Proud

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची गुजरात राज्यसरकारकडे विचारणा : शंभरेक मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीतून पोहत का जावे लागते?

ती मुले ऑलिंपिक जलतरण स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक देण्याची आतापासूनच तयारी करीत असतील.

बंगळुरातील शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यावर मानवाधिकार आयोग कोणाला आणि कोणता प्रश्न विचारणार आहे? बिहारात २२ मुले विषबाधेने मृत्युमुखी पडल्यावर आयोगाकडून कोणाला प्रश्न विचारण्यात आले?

-गा.पै.

गा पै,

ईग्नोर माराच यांना,

त्यांची " सहन होत नाही सांगताही येत नाही" अशी अवस्था झालीय !!

येते कित्येक वर्षे अशीच जातील अनावस्थेत

Rofl

Rofl

काही लोक, "मिर्चीताईं आप/केजरीवाल संबंधीच्या प्रश्नांना उत्तरे न देता पळ काढतात," असे म्हणताना पाहून आश्चर्य वाटत नाही.

मयेकर धन्यचवाद हा धागा पुन्हा वर आणल्याबद्दल,
अनेक नविन वाचकांना या निमित्ताने गुजरात मधे काय प्रकारचे प्रयोग घडले हे कळत आहे. Happy

Happy

"संसद काय करतेय? गुजरात भारताचा भाग नाही का? (राष्ट्रीय अन्न सुरक्षा) कायदा म्हणतो की तो संपूर्ण भारतासाठी आहे आणि गुजरात त्याची अंमलबजावणी करत नाही? तुम्हाला भारतापासून वेगळं व्हायचंय? संसदेने हा कायदा संमत केला, पण राज्ये तो अंमलात आणायला तयार नाहीत? आम्ही तो अंमलात आणणार नाही असं एखादं राज्य म्हणूच कसं शकतं? उद्या दुसरं एखादं राज्य म्हणेल आम्ही भारतीय दंड विधान मानत नाही"

हे म्हटलंय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका पीठानं.

गुजरातच्या ज्या प्रशासनाचे गोडवे गाऊन जिभा सुकल्या, लेखण्या झिजल्या, कीबोर्ड्स निकामी झाले त्या प्रशासनव्यवस्थेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करायला तब्बल चार वेळा मुदतवाढ मागावी लागते आहे.

खरं तर गुजरातमध्ये अन्न सुरक्षा कायद्याची तिळमात्र गरज नाही. आदरणीय युगपुरुष नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे गुजरातमध्ये अजिबात कुपोषण नाही. तिथल्या पोरीबाळी बारीक होण्यासाठी डाएटिंग करतात.

ट्रंपना गुजरात भेटीत भलतंसलतं काही दिसू नये म्हणून आपला राजा भिंती बांधतोय.
जपानच्या पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळीही याच युक्त्या अवलंबल्या होत्या.
https://indianexpress.com/article/india/gujarat-civic-body-builds-wall-t...
https://www.indiatoday.in/india/story/another-wall-goes-up-for-trump-thi...

>>>>>>>>>ट्रंपना गुजरात भेटीत भलतंसलतं काही दिसू नये म्हणून आपला राजा भिंती बांधतोय.<<<<<<<
जनतेला स्वातंत्र्या नंतर ४०-५० वर्षे गरीबी हटाव चा नारा द्यायचा पण प्रत्यक्षात जनतेला १-२ रुपयात डाळ तांदुळ देऊन कामा पासुन दूर करुन आयुष्यातुन ऊठवायच व अजुन नागवायच. ह्या देशाच्या गरीबीच भांडवल करुन देशात येणार्या प्रत्येक पाहुण्याला आपल्या गरीबीच प्रेदर्शन होईल व त्यातुन
त्या पाहुण्याच्या देशातुन मदत (Aid) मिळेल अस पहायच ! ह्या पेक्षा तर मोदीजी करतात ते बर आहे !

अरे वा!!
ट्रम्पूली, माबोट्रम्प - असे उल्लेख मागे पडून डीजेटीचा एकदम आदरार्थी उल्लेख?
किटने अजिब रिष्टे है यहापर

Pages