Submitted by प्रीति on 9 May, 2014 - 11:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ मध्यम बटाटे उकडुन
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
४ चमचे टोमॅटो कॅन्ड प्युरी/ १ टोमॅटो चिरुन
१ चमचा कसुरी मेथी
तिखट, मीठ, हळद, मोहोरी, जीरे
गरम मसाल/ बादशहा पंजाबी ग्रेव्ही मसाला/ बादशहा किचन किंग मसाला
क्रमवार पाककृती:
सढळ हातानी तेलाची फोडणी करुन त्यात कांदा चांगला परतुन घ्यावा, मग कसुरी मेथी टाकुन परतावे. मस्त मेथीचा सुगंध येतो. हळद, तिखट टाकावे. मग टोमॅटो प्युरी टाकुन चांगले परतावे. प्युरीचा कच्चा वास गेला की उकडलेल्या बटाटयाचे तुकडे करुन परतावे. मग त्यात रस्सा पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी घालावे, मीठ घालुन ढवळावे. भाजी छान शिजली कि मसाला घालुन परत ढवळावी, ५ मि शिजली कि गॅस बंद करुन झाकुन ठेवावी. गरमा गरम पुरी सोबत खावी.
वाढणी/प्रमाण:
४ जणं
अधिक टिपा:
कसुरी मेथीचा स्वाद मस्त येतो. बादशहा पंजाबी ग्रेव्ही मसाला/ बादशहा किचन किंग मसाला खुप मस्त आहेत.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताट मस्तं दिसतंय. चारोळ्या
ताट मस्तं दिसतंय.
चारोळ्या घातलेलं श्रीखंडही छान दिसतंय.
कसुरी मेथी मी भाजी शिजल्यावर
कसुरी मेथी मी भाजी शिजल्यावर शेवटचे २/३ मिनीट वासासाठी टाकते. अशीही करुन बघेन
साती तो आमरस आहे
साती तो आमरस आहे
चारोळ्या घालून आमरस
चारोळ्या घालून आमरस पहिल्यांदाच पाहिला.
मला वाटलं आम्रखंड आहे.
रश्श्याचा रंग भन्नाट
रश्श्याचा रंग भन्नाट आहे.
(जिलब्यांसारख्या दिसणारा पदार्थ) जिलब्या आहेत का?
हो मृण्मयी घरच्यांना रस
हो मृण्मयी
घरच्यांना रस मिक्सरमधलाच आवडतो म्हणुन असा. मला हाताने केलेलाच आवडतो पण, गुठळ्यावाला
जिलब्या होम मेड आहेत का? मस्त
जिलब्या होम मेड आहेत का? मस्त
अत्याचार! अत्यचार! आता खाऊ
अत्याचार! अत्यचार!
आता खाऊ घाला त्याशिवाय शांती नाही.
ताट अतिशय तोंपासु दिसतय.
दक्षिणा अदिति, यस्स...होम
दक्षिणा
अदिति, यस्स...होम मेड
हस्ताक्षर छान असेल तर दोन
हस्ताक्षर छान असेल तर दोन मार्क वाढवून मिळतात (असे फक्त ऐकले आहे मी )त्या चालीवर ताट स्वच्छ ठेवल्याबद्दल तुम्हाला दोन मार्क एक्स्ट्रा !!
टीप :उकडलेल्या बटाट्याचे काप सुरीने न कापता हाताने कुस्करून फोडावा रस्सा अधिक एकजीव होईल .......आणि हाताची चवही लागेल
आंब्याच्या रसाचेही तसेच !
वैवकु
वैवकु
तो आमरस आहे >>>>>>>
तो आमरस आहे >>>>>>>